बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुस्ती उद्गारवाचक नको गं सविस्तर लिही ना प्रतिक्रीया Happy

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

नमस्कार
माझ्या नवीन (रे मेल्या!!!) कवितेचे नाव

उद्गारवाचक

नीट बघ मीनू उद्गारवाचकातला वाचक
नीट बघ मीनू उद्गारवाचकातला वाचक
तुला फक्त चिन्ह दिसले?

मला तर दिसतो आहे-
अनादि काळापासुन आसेतुहिमाचल रोरावत असलेल्या
विध्वंसक, क्रुर झंझावाताचा अंत

मला तर दिसते आहे-
निकालनिश्चिती एका दूष्टिर्‍हस्वतेची, दूष्टीहीनांच्या दु:साहसाची
त्रिकालाबाधित सत्य ठरलेल्या डरावडरावची.

नीट बघ मीनू उद्गारवाचकातला वाचक
तुला फक्त चिन्ह दिसले?
तुला फक्त चिन्हच दिसले?

--
मी काव्यविभोर अन कडकलक्ष्मी कचराघंटागाडी तु!
माझ्या छिन्नमनस्क स्वप्नांची खळाखळा भरलेली चुळ तु!!

कारे कारे... कारे कारे....
कारे कारे... कारे कारे....
कारे कारे... कारे कारे....
कारे कारे... कारे कारे....

कजरारे कजरारे, तेरे कारे कारे नैना..
गाणं बघून टीव्हीवर डायनोसॉरची उडाली दैना...
फुंकणीने फुंकला मी पुतळ्यामध्ये प्राण..
आळंदीत सापडली सोन्याची खाण..
हिरव्या चुड्यात अडकला रेशमाचा धागा..
गोबीच्या वाळवंटात केळीच्या बागा...
अँजेलिना जोलीने केले ब्रॅड पिटशी लग्न,
म्हणून तू असा उदास बसलास का रे?
कारे कारे... कारे कारे...
कारे कारे... कारे कारे...

आजकाल मा.बो. वर आल्या आल्या इकडे चक्कर टाकल्याशिवात रहावत नाही Wink
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **

पुढच्या कवितेचे नाव आहे, कवितेत कविता...

मनात आले दोन विचार
शब्द सुचले तीनशे चार
केला मग मी विचार फार
पण अर्थ कळेना त्यात एकशे चार

बघितली मी जमिन छोटी
आखली त्यावर चार रेघोटी
बांधला मग मतला काखोटी
आणि सुचली मला कडवी मोठी

दिसली मला एक जागा
मालक त्याचा दिलदार मोठा
म्हणाला इथेच पथारी टाका
हाय काय, नाय काय, लिहून सोडा

मग आला एक दिवस
कुणी म्हणाले तुम्ही कळस
मी म्हणालो कसचे कसचे
माझ्या कविता म्हणजे फक्त आकाशातली नक्षत्रे

नक्षत्रांवर मग आली धाड
कोसळले उल्कांचे पहाड
पण एके दिवशी आली खरी हाक
कवितेवर दिली कवितेने साद

कोण रे ही कविता ? तुला कशाला साद घालतेय ती ?

टण्या, हैडराबादला हीच्चे वाट्टे...मग कविथा असे लिही बघु Wink

पिवळी कविता..

मनात कुठेतरी खोल कुंथत बसलेल्या
शब्दाना वाट मोकळी करुन दिली
आणि एक कविता अवतली ती
गडद पिवळ्या सांजेला
क्षितीजावर कुठेतर चंद्रमौळी डबक्यात
निळी स्वप्ने उगाच हींदकळत होती
पण कळत नव्हत ती का हींदकळता आहेत
कदाचीत चांदण्याला आलेला पूर
माझ्या डोळ्यातल्या अश्रूंचा
गाव उजाडुन गेला असेल
आणि पिवळ्या कागदावरील हे
कवितांचे शब्द असेच तरंग राहीले आहेत
तू अलगद ओंझळीत घ्यावेस म्हणुन...

टण्या, हैडराबादला हीच्चे वाट्टे...मग कविथा असे लिही बघु
>>>
जेव्हा माझे नाव 'संथानु' असे लिहायला लागेन तेव्हा एखादी 'कविथा' पकडेन Happy

ट तुझ्या !@#!@
?
,
!
!!
!!!

गाळलेल्या जागा भरा;
..
...
.....................
..
.

Lol

<<टण्या, हैडराबादला हीच्चे वाट्टे...मग कविथा असे लिही बघु
जेव्हा माझे नाव 'संथानु' असे लिहायला लागेन तेव्हा एखादी 'कविथा' पकडेन >>

Lol

सत्या काविळ झाली काय? बरा हो बाबा! Light 1

बाप रे !! थरारक आहेत सगळ्या कविता Lol

    ***
    comfortably numb

    शिरपाच्या कविता:

    १.

    अरे ए कमळी, मेरी जानेमन, तुझसे नजरिया लडी.
    हे बेब, गेट अप अँड गिव्ह मी सम आंबावडी.

    २.

    ऐन दुपारी झाकोळले हे असे का आकाश?
    द्या मला आणुन कोणी मूठभर प्रकाश.
    अंधारात फिरे दूर तिची पूर्वजन्मीची छाया.
    तिला भेटलो ना अजुनी, हा जन्म गेला वाया.
    क्षणात होते संभव सारे,
    क्षणापूर्वीचे असंभवSSSSSSS.
    असशील जर तू इथेच कुठेतर,
    हा माझा प्रवास थांबव.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

    शिरपा

    तुम्ही आलात, झाकलीत मुठ...
    हाल्ला सारा गड, गडावर मुठभेड
    मुठीत काय? मुठीत काय?
    ज्याला त्याला लागलंय वेड
    शिरपाच्या कविता, कवितांचा पाऊस
    पावसात रस कशाचा, अहो फक्त ऊसाचा
    पावसाची सर जोरात, कोसळलं आकाश
    धडाधड धडाधड धडाधड धडाधड धडाधड

    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    कोवळी कोवळी किरणं
    अवतरली भुमीवर सोनेरी
    सोन्याचा अंथर
    भुमीला अंकुर काटेरी
    नको तो प्रश्न अन नको हे उत्तर
    पूर्वेला किनार सोनेरी
    पश्चिम जळताना, पाखरे उडताना
    दाटते किमया अघोरी.
    ~~~~~~~~~
    ~~~~~~~~~
    Happy

    अरे हे काय चालू आहे इथे....? बरच काही मिसलय वाटत अलिकडे गु.मो. वर..

    एक "kujbUJ" होवून जावू द्यात बर...अगदी दिवाळी अंकापासून तुम्बलिये... निचरा व्हायला हवा ना Happy

    आईशप्पथ.... डेंजरस चाललय हे काय चाललय ते..... आलेच नव्हते मध्यंतरी इथे... मस्तच. (एकदम जुन्या माबो सारखं वाटतय.)
    चालूदे
    -----------------------------------------------------
    दम लिया था न कयामत ने हनूज
    फिर तेरा वक्त-ए सफर याद आया

    आंबावडी Happy

    हवी आंबावडि?
    वाट बघ थोडी
    बैलगाडीला बैलांनी
    जोडली रे घोडी
    वेळ झाली थोडी
    आता दे आंबावडी
    हा घे आंबा आणि
    धुवायला साबणाची वडी...

    माझी पुढची कविता आहे . बहर का कहर

    थेंबा थेंबा ने कविता
    आला गुलमोहराला बहर
    काल झाडच वाहुन गेल
    केला पावसाने कहर
    आता कशास कविता
    शोधती आकाशात डोळे?
    गेले थकुन हे डोळे
    आले डोळ्यात गोळे
    डोळ्यात गोळे
    गोळ्यात डोळे
    वाचणारा लोळे
    न वाचणार लोळे
    लोळे लोळे लोळे
    पुन्हा आले गोळे..

    कशी वाटली???

    माझी पुढची कविता आहे गाळणी

    किती सेकंद उलटुन गेली
    मला सुचलीच नाही कविता
    मझ्या आतल्या भावनांची
    आटली वाटत सविता
    सविता सविता ...
    कविता आहे आटली
    ग्लास घाल तुझ्या डोंबलावर
    डायरेक्ट लावतो बाटली
    डायरेक्ट बाटली?
    जरा अतिरेकी वाटली
    मनात कविता होती साठली
    मी पोस्टायच्या आत
    दुरर्‍याने लाटली
    तरीच ती कविता
    माझ्या सारखी वाटली
    आता कवितांच्या पानांची
    चटणी आहे वाटली
    गाळताना चटणी
    माझी जरा फाटली... (गाळणी)
    फाटली तर फाटली
    तरी मी चाटली
    तुम्ही पण चाटुन सांगा
    ही कशी वाटली?

    माझ्या पुढल्या कवितेच नावच आहे कविता

    कोण म्हणतो? कोण म्हणतो मी पाडल्या आहेत?
    अरे धगधगत्या भावना मी कागदावर फाडल्या आहेत

    अरे कविताच्या शद्बांना भावना जडल्या आहेत
    अरे कोण म्हणतो? कोण म्हणतो मी पाडल्या आहेत?

    अरे कविता आहेत त्या, त्या अशाच स्फुरत नाहीत
    बुळबुळीत शेंबडा सारख्या नाका खाली उरत नाहीत

    कोण म्हणतो? कोण म्हणतो मी पाडल्या आहेत?
    शत्रूला हरवण्या मी त्या रंणागणी धाडल्या आहेत...

    मी दमलो आता... आता तुम्ही लिहा...

    Happy Happy

    मी दमलो आता >> साहजिकच आहे. कविता पाडने त्या बाबरीला पाडन्यापेक्षा नक्कीच दमवनारे काम असेल.

    कवितेचे नाव "ओळ्ख"

    ती बघताच बाला
    कलीजा खलास झाला,
    वारुनीचा पिऊनी प्याला
    म्हणते मज, अरे हटाव साला.

    रोज नेसुनी तोटके कपडे
    हातात ती सिगारेट पकडे
    भिती मज वाटे स्वत:चीच,
    पाऊल पडेल वाकडे

    म्हणे मज ती सुंदर बाला
    नारी, नारी म्हणता मज अबला
    बुध्दीच्या तुमच्या, का ऐवढ्याच हो मजला?
    वर सुंदर चेहरा पाहूनी स्वत:च का लाजला?

    बाला बघूनी सुंदर
    होतो मी बेभान
    म्हणतो स्वतस,
    अजुन ते निशान
    स्ट्रेट असन्याचे.

    Pages