बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(चाल संत्र लिंबू पैशा पैशाला )
.
जमीन-मजूर पैशा पैशाला
टाटांची नॅनो आली सिंगूरला
उपास करून जीव दमला
ममताबाईंना खोकला झाला
खो खो खो
(पैला खो खोचक पणाचा
दूस्रा खो खोडसाळ पणाचा
तीस्रा खो खोकल्यातला )

अरे केदार भाउ तिसरा खो.. न मिळाल्या खोक्याचा... Happy

अरे केदार भाउ तिसरा खो.. न मिळाल्या खोक्याचा... Happy

सत्या, केदार - धमाल ह. ह. पु. सत्या ही सविता कोण बरे? Happy

आजच्या ज्वलंत आणि जिव्हाळ्याच्या विषयावर नमुकर स्वाती हिने पाडलेली ही कविता देत आहे..

डास हो डास ...
एक ही नको आस पास...
हीच लावली मी आस...
नव-याने ही घेतला एकच ध्यास..
डासाला करायचे लम्पास..
आमचे पागलपन बघुन वैतागली माझी सास..
तरी जात नाही हा डास...........

कछवा लावा वा वापरा ओडोमॉस
तरी कमी न होतो यांचा त्रास......
रक्त पितात जसा काही टोमटो सॉस...
झोप लागत नाही म्हणुन नखे कापण्याचा करावा लागतो टाईमपास..
मग सकाळी ऊठायला करायला लागतो प्रयास..
पण डासांचे genuine कारण समजुन घेत नाही बॉस
डासांचा हा त्रास बघुन नवरा ही झाला आहे उदास
म्हणतो किती छळतो हा डास

कविता करायचा प्रयत्न केला मी खास..
पण अमर आणि वर्षा सोडुन दिला नाही कोणी रिस्पॉन्स
माझी कविता रुचली नाही कोणाच्याही मनास
म्हणुन माझे मन झाले उदास

आणि अमर तु ह्यावर काढुन दात हसलास
आता कविता करायचा उत्साह झाला आहे खल्लास

साधना मस्तच.

१ कविता,
१ झंडूबामची बाटली...
वाचता वाचता नेत्रांना पूर,
अश्रूंची नदी आटली...
दिसे मला दिवास्वप्न
फुललेल्या तगरीचे...
कविता माझी वाचून
सांडले अश्रू मगरीचे...
अरे पहा गेली गेली
शोधत तलाव मगर...
पत्ता द्यावा कुणीतरी
पुण्यात सहकारनगर...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

हे माझे दोन पैसे. काही मुठभर नतद्रष्ट मायबोलीकरांना ही गझल म्हणजे काहीच्या काही कविता किंवा बडबडगीत किंवा एका बडबडगीताचे विडंबन वाटण्याची शक्यता आहे. त्यांना माझे आवाहन आहे की त्यांनी स्रुजननशीलतेचा आनंद घ्यायला सुरुवात करावी. व त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सर्व प्रकारच्या प्रतिसादांचे मनापासून स्वागत आहे Happy

लेखणीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा
पोपट होता सभापती मधोमध उभा

पोपट म्हणाला, मित्रांनो देवाघरची देणगी
देवाघरची देणगी, अशी ही लेखणी
ह्या लेखणीचे कराल काय ?

गाय म्हणाली अशा अशा
पाडेन मी कविता खाशा

घोडा म्हणाला, कथा ढापेन कविता पाडेन
मी सगळ्या गुलमोहोरात हैदोस घालेन हैदोस घालेन

कुत्रा म्हणाला, कुत्रा म्हणाला
खूशीत येइन तेव्हा,
प्रतिक्रीया देइन मोठ्या

मांजरी म्हणाली, नाही गं बाई
कुत्र्यासारखे माझी मुळीच नाही
खूप खूश होइन जेव्हा प्रतिक्रीया येइल, प्रतिक्रीया येइल

खार म्हणाली, खार म्हणाली
पडेल कविता, पडेल कविता
तेव्हाच होतील प्रतिसादांच्या बाता

मासा म्हणाला, लेखणीचा उपयोग
काय सांगु आता पण..पाडत राहिन कविता

मोर म्हणाला, लाडं लाडं कविता पाडेन मी पाडेन
कवितेत माझ्या अगम्य शब्द टाकेन मी टाकेन

कांगारु म्हणाले, माझे काय ?
तुझे काय ? तुझी लेखणी म्हणजे
खाली डोकं वर पाय !!!

ह्या लेखणीचा कर्फरा (करा फरा फरा) उपयोग
नाहीतर काय होइल, काय होइल, काय होइल....
दोन पायांच्या माणसाची ज्ञानेश्वरी
लोकांच्या मनावर राज्य करत राहिल !!!

श्र Happy
सिंडीताई कर्फरा शब्द अतिशय आवडला. कसं बरं सुचतं तुम्हाला?

चिनु, धन्यवाद. मी काही फार्फार मोठी कवयत्री नाही. मनात येइल ते इथे उतरवते. इथे मायबोलीवर मृ सारख्या दिग्गज प्रतिभावंतांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद आहेत. आपल्या सर्वांचा सपोर्ट आहे. निभवुन नेते आहे झालं Wink

"सिंडीताई, तुम्ही हल्लीच कविता लिहायला लागलात म्हणून सांगतो.. जरा दमाने येऊ द्या.. मायबोलीवरच्या दिग्गजांना (?) पचायचं नाही नाहितर... अहो त्यांना त्यात स्पर्धा कसली वाटते काय माहित... पण ही विकृती मारली पाहिजे.. "

Proud

सिंडी.. Lol
तुझ्या काव्यप्रतिभेच्या दीपस्तंभी अत्त्यूत्तूंग अविष्कारामूळे आम्ही दि:ड्मूढ (आयला, कसा लिहायचा हा शब्द? गुलमोहोरात विचारला पाहिजे) होऊन आमचा मुखस्तंभ झाला आहे.
म्हणजे आम्ही खुष झालो आहोत. बोल, तुला काय बक्षीस हवे?

--
.. नाही चिरा, नाही पणती.

cinderella ,
वा मस्तच ... पचायला अवघड आहे, पण इलाज नाही 'सत्य हे नेहमी खरे असते' [कोणी म्हंटले आहे बरे ??] ..:)

start to end सगळ्या वाचल्या, मस्त मजा आली ... अगदी नावाप्रमाणे बहर आला आहे.

सिंडी, मस्त Happy
तुम्ही सगळे आहात, म्हणून थोडेफार हसता तरी येतेय सध्या इथे, त्यामुळे चालूद्या Happy
------------------------------------------
हवे ते लाभले असूनी नीजेची याचना..
असे मी मोठमोठ्यांचे दिवाळे पाहिले..

कर्फरा हा शब्द आता नेहमी वापरणार Happy शेवटचे कडवे सही आहे.

  blackribbon1.jpg

  आपल्या सर्वांना माझी गझल आवडली हे बघुन परमानंद झाला. कर्फरा ह्या शब्दाविषयी बोलायचं तर पूढील गझल कार्यशाळेत सर्व गझल ह्या शब्दाने सुरु होउन ह्याच शब्दाने संपवाव्या अशी थीम ठेवावी असे माझ्या एका मित्राने सुचविले आहे. परंतु त्याला योग्य ते शब्द सूचत नसल्याने मीच इथे देते आहे.

  कर्फरा हा शब्द आता नेहमी वापरणार >>> म्हणजे तुमच्या ब्लॉगवर का ? ह्याहुन मोठे भाग्य ते काय Happy

  स्लार्टी सर,
  फर्फरा हा शब्द वापरताना सिंड्रेला मॅडम यांचा शिक्का वापरण्यास मात्र कृपया विसरू नका.

  Happy सिंडी मस्तच.. भावना पोचल्या.. तुझ्या काव्यचांदण्यात आम्हाला अशीच भिजवत रहा...

  Lol
  आयला हा 'सर' काय लवकर सरत नाही बहूतेक माबोतून.
  सिंड्रेला सर, आपलं मॅडम, गझलेत 'सर' बसवला तर मीटर बिघडेल काय? नाही, काळाची गरज आहे म्हणून सांगतोहे.
  काळाची गरज म्हणजे त्या बागूल काळाची नव्हे हां.

  ता.क. - चिन्मय सर, स्लार्टी सरांना कर्फरा म्हणायचे आहे हो. फर्फरा या शब्दावर नविन कविता कर्फरा बघू.

  --
  .. नाही चिरा, नाही पणती.

  सिंड्रेला मॅडम, तुम्हाला दोन गावं इनाम Lol

  आसमंतात उठली लहर
  कविंनी केला कहर
  पिउनी भावनांचे जहर
  बहरतो गुलमोहर

  धरला कविंनी फेर
  मधे शब्दांचे ढेर
  गुलमोहर हा बाहेर
  लगडतोय अखेर

  (हुश्श! दमले!)
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  फार्फार दिवसांनी आसमंतात
  सुंगध भरून आला,
  घरदार अंगण सारं सारं थरारलं.
  त्यांचं परत येणं
  अशी सुखाची बरसात करत गेलं.

  थोडंफार मलाही बरं वाटलंच की,
  जुने मित्र परत दिसले,
  त्याच त्या जुन्या जखमा
  परत परत कुरेदू लागले.

  करवा चौथला अडलेली सव्वाष्ण
  एकदाची खातीपिती झाली,
  इकडे आयाबायांचा जीव
  भांड्यात पडला.

  गाजराचा हलवा,
  डिझायनर साडी,
  खूप सारं शिमर त्वचेवर
  आणि भांगात सिंदूर
  सगळं परत मिळालं..

  सुखेनैव घर नांदू लागलं..

  (म्हणून भारतीय संस्कृती महान!!
  त्यातल्यात्यात गाजर का हलवा, सिंदूर आणि करवा चौथ तर फारच महान..)
  घणी खम्मा!!
  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  पुपुवर काल स्लार्टीची शेजारीण व त्याचे लग्न या विषयावर चर्चा रंगली होती. त्यावर मातेने चर्चेसाठी नविन विषय घेण्याची सूचना केली.
  ..

  'स्लार्टीची शेजारीण' हा विषय बदलून आता आपण नवीन विषय टीपीसाठी घेऊयात. विषय आहे, 'कपाशीवरील कीड आणि गाजरगवत'.
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

  प्रतिसाद Submitted by shraddhak on 18 डिसेंबर, 2008 - 15:06.

  टीपीसाठी दिलेल्या विषयावर कविता, चारोळी, कथा, नाटुकले, नाट्यछटा, ललित इत्यादी प्रकारातला टीपी येणे अपेक्षित आहे. उदाहरण देत आहे.

  ('घड्याळात वाजला एक' या अजरामर टीनेजर गीताच्या चालीवर)
  घड्याळात वाजला दीड.
  कपाशीवर पडली कीड.
  एन्ड्रिन मारण्यात १ तास गेला बाई मी नाही टीपी केला....
  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  बेबस पे करम कीजिये सरकार-ए-कविता...

  प्रतिसाद Submitted by slarti on 18 डिसेंबर, 2008 - 17:41.

  प्रकार : हायकू
  कापसाच्या शुभ्र बोंडावर
  ओघळते हिरवी वळवळ
  हाणा! मारा!! ठेचा !!!
  .
  कपाशीच्या बोंडावरचा किडा
  हरभर्‍यावरच्या अळीचा भाऊ ??
  होली काऊ !
  .
  प्रकार : गद्य हायकू (अर्थात, अलक)
  कापूस पेरला, कीड आली... नायलॉनची मागणी वाढली.
  .
  प्रकार : पार्ले बाफ
  अमुक - हे वाचा - कपाशीवर कीड आली आहे.
  तमुक - काय किड करतोस की काय ?!
  ढमुक - हेकायचाल्लेआहेकळतनाही... आज नाचणीची भाकरी, चिकन आ ला पूज आणि रावणपेस्ट्री. आता झोप आली आहे
  .
  प्रकार : बाराबाफ
  अमुक - कपाशीवर कीड आली आहे म्हणे ! (तिरकस बोलणे).
  तमुक - (शालजोडीतले मारणे) [कपाशीवरची कीड हे ऐकूनच मरते].
  ढमुक - भारतातून काय काय आणलंत ? इकडेही पाठवून द्या.
  .
  प्रकार : गडबाफ
  अमुक - सु(योग्य तो काळ) गडकर्स. दरवाजा उघडला आहे. आज कपाशीवर कीड आहे.
  तमुक - हो ना ! मूडच गेला... आत्या, मस्तपैकी चहा टाका बघू.
  ढमुक - आत्या ? अजून बुधवार सुरूच की काय हो तुमचा ?
  .
  प्रकार : पुपुबाफ
  अमुक - चला, वाडकरी, दिंडी दरवाजा उघडलाय. या पटपट.
  तमुक - आजचा सुविचार : कपाशीवर कीड आली आहे.
  ढमुक - काय सुविचार घेऊन बसलायस ? लग्न कर !

  ***
  उसके दुश्मन हैं बहुत
  आदमी अच्छा होगा

  मायबोली हे काही कं बा मित्र-मैत्रीणींनी चालवलेले मॅगझिन आहे हे वरील हायकु वरुन सिद्ध होते. "आमच्या" सीटीबाफवर काय म्हणुन हायकु नै केली Uhoh

  हे काही साहित्य प्रकार (;)) आमचे शेजाराज्यकर श्रीयुत विनय देसाई ह्यांनी पाडलेले-

  कापसाला लागली कीड,
  होडीचं फाटलं शीड,
  ठिगळण्यात एक तास गेला पण मी नाही टीपी केला.

  कापसाला लागली कीड,
  कपाळात गेली तीड,
  दुखण्यात एक तास गेला पण मी नाही टीपी केला.

  शिंडे झकास गं तुझ्या ह्या झकास पर्फारमन्स बद्दल ..
  शिंडीताई तुमच्या चरणी ही माझी छोटुशी कविता सादर अर्पण.

  अमक्यानं टाकली कविता
  तमक्यानं दिला प्रतिसाद
  चुका दाखवण्यात एक तास गेला आन मी नाय टीपी केला.
  ~~~~~~~~~

  ह्या काव्य क्षेत्रातल्या काही अ ल क

  कविता, वा! वा!, हसरे धन्यवाद..
  कविता, चुका.. , कविता
  कविता, चुका, शांतता
  कविता, चुका, शिव्याशाप (चा. वांनी रस्त्यावर फिरणारे देवीचे भक्त आठवावेत.)

  ~~~~~~~~~

  श्र ने दिलेल्या विषयावर स्लार्टी व आश्चिग मधला परिसंवादः

  स्ला: कपाशीवरील किडीला आपण भावनाविरहीत तार्कीक दृष्टीकोणातून बघितले पाहिजे. गाजरगवत हा विषय नंतर स्वतंत्र चर्चेस घेता येइल.

  आ: कपाशीवर कीड आहे हे मान्य करण्यासाठी आधी कपास अस्तित्वात आहे असे मान्य करावे लागेल. कपास ही भौतिक दृष्ट्या अनुभवता येणारी गोष्ट असल्याने तिचे अस्तित्व मान्य करता येइल असा निश्कर्ष काढता येइल. परंतु कीड ही केवळ कपाशीवरच आहे का गाजरगवतावर पण कीड आहे हे दिलेल्या उदाहरणातून स्पष्ट होत नाहिये. पण ज्या अर्थी हे उदाहरण दिलेले आहे त्याअर्थी दिलेली माहिती पूर्ण आहे असे मानावे लागेल. जर तसे मानले तर कपास आणि गाजरगवत ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत असे स्पष्ट होते. ही वैचारिक बैठक बसल्यावर आता आपल्याला किडीचा उगम शोधायला हवा.

  स्ला: मानवीय दृष्टीकोणातून बघितले तरी कीड आणि कपास ह्या दोन्ही गोष्टींचा निर्माता हा एकच असेल असा निश्कर्ष निघू शकत नाही. निर्माता एकच असला तरी तो देवच असेल असेही म्हणता येणार नाही कारण त्याने कीड आणि कपास ह्या दोन्हीची निर्मिती केली तरी त्याला/तिला सर्वच गोष्टींची माहिती आहे हे सिद्ध होत नाही. सध्यातरी मी मी गाजरगवताचे 'ऍनाग्राम' शोधायचा प्रयत्न करत आहे.

  Pages