गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..
तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:
*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"
*********************
मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.
*********************
माता:
दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.
ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.
*********************
गजानन देसाई:
सोमवारचा शाप
लांबुडका गोल
एक डोंगर
छिद्र त्यास
एका सोंडेस
त्यातून गोवली
बलदंड शृंखला
खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय
रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून
*********************
पुन्हःश्च मीनु:
ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा
*********************
वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:
@मीनु...
छान कविता होती...:ड
**************
@मीनु...
छान कविता आहे...:-प
*********************
आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:
एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल
एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल
एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल
*********************
पुन्हा एकदा मीनु:
कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'
काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?
*********************
हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:
इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही
काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.
*********************
आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः
जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला
का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला
मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला
असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला
*************************************
(No subject)
एकदा
एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल >>>
हे लई भारी आहे. !!!!!!!!!!
वा टण्या...
वा टण्या... सगळ्या कवितांना एकाच ठिकाणी साठवून त्यांचे कॉकटेल बनवण्याची तुझी कल्पना मस्त... दोनेक कविता वाहून गेल्या आहेत फक्त. मी ते पान सेव्ह केलेले आहे. वेळ झाला की टाकते.
दोन रट्टे लावुन काळाला
थांबवनार आहे मी आज <<<<<<
तस्मात रात्रीचं तुरीचं वरण खाउ नये!
<<<<<<<<<<<
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला
<<<<<<<
या सर्व ओळी जबरी...
lol कशाला हे
lol कशाला हे इथे? गडावरचं ठीक आहे 'काहीच्या काही' म्हणून (तिथे तरी टाका). बाकी पार्ल्यातल्या कवितांचा संदर्भ माहित नसल्यामुळं काही कळणार नाही कोणाला. सिंडी, अडम मी लिहिलेलं तुम्ही इथं टाकलंय ते डिलीट करा.
लालू..
लालू.. केलेत मी डिलीट पार्ल्यातले पोस्ट..
तुझं म्हणणं पटलं
अशक्य आहात
अशक्य आहात सर्व!
एकदा
एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल >>>
हे लई भारी आहे. !!!!!!!!!!
ऍडम, धन्यवाद!!
टण्या, प्लिज नोट...
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
टण्या.. मी
टण्या..
मी काय म्हंतो पण, की 'समांतर सरकार' सारखा 'समांतर गुलमोहर' चालवायचा का आपण?
--
तुम्ही म्हणाल तसं!!
मंजु, काय
मंजु, काय नोट करु मी?
साजिर्या, मी नेहेमी पोलिटीकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो.. त्यामुळे तुझ्या समांतर गुलमोहर संकल्पनेचा मी त्रिवार निषेध करतो
....
....
ती 'पाल'
ती 'पाल' वाली कविता माझी आहे हे मी अतिशय विनम्रपणे सांगतेय ते तू नोट कर.....
अर्थात, माझ्या पुढल्या कवितेतून माझी पालीवरची मालकी स्पष्ट होईलच.
भयंकर विमनस्कता.....
बीडी फुकत बसलेल्या पिऊनला
कधी कोणी विचारलंय
------ गड्या, तुझ्या कानातला मळ संपत नाही काय?
कामचूकार असिस्टंटला
कधी कोणी विचारलंय
------ बंधू रे, तुला पगार वाढवून हवाय काय?
गर्विष्ठ सिनीयरला
कधी कोणी विचारलंय
------ मित्रा, तुझं वय काय आणि तू बोलतोस काय?
पिसाटलेल्या बॉसला
कधी कोणी विचारलंय
------ यार, तुझा वेळ जात नाय काय?
पालीसारख्या चिकटून बसलेल्या मला
कधी कोणी विचारलंय
------ बाई गं, तुला दुसरी नोकरी मिळत नाही काय?
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
ही दुपारी
ही दुपारी ठीक सव्वाबाराला स्फुरलेली कविता.. सगळ्यांच्या चरणी अर्पण:
प्रतीक्षा
समोर असतोस, पण शांत बसलेला
माझी तडफड होते,
तगमगही..
पण तू गप्पच.
तुला दिसते ना माझ्या चेहर्यावरची क्षुधा?
तरी तुझी चर्या निर्विकारच?
काहीच हलत नाही आत?
तुला हृदय तरी आहे आहे ना?
की फक्त पोट? आत काहीतरी दडवून बसलेले?
मला प्रश्नच पडतो..
तरीही मी तडफडते,
तगमगतेही,
मीलनवेळेच्या प्रतीक्षेत..
आणि मग वाजतो दीड
संपतो सगळा दुरावा
असतो आता फक्त मी, आणि
माझा डबा!
एक नम्र पुष्प.

-----------------------------------
मैं जहाँ रहूँ, मैं कहींभी हूँ, तेरी याद साथ है..
ही एक अशीच
ही एक अशीच सुचलेली
"पहीलटकर"
साजिर्याच्या कवितेला
दिप्याचा मुजरा,
केत्याची बाई
माझा पण होई कवी
वैनीच्या डब्यात
मंजुची पाल
झारा धरी केप्या
नित्या कविता घाल
माता ही हरवली
आज्जाने कविता ढापली
हळुच बघा लागली
"माझ्या कवितेची" चाहुल
कवितेच्या प्रांगणात
माझे पहीले पाऊल
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!
आणि सगळे
आणि सगळे थंड पडले!!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अरे माझी
अरे माझी टाकलेली कविता शिंडी ने परत काढली वाटत. हे घ्या ( म्हणजे सहन करा या अर्थी)
अजगरा सारखा विळखा
घालुन बसलेल्या काळसर्पाला,
दया आली आज साहीत्याची
आणि पेटवून दिली त्याने
भूक उपाशी असलेल्या कविंची
दोन रट्टे लावुन काळाला
थांबवनार आहे मी आज
कविता पाडायची गडाला
सुटलिये आज खाज
हजारो वर्षांचा बलात्कार
पाहातोय मी आमच्यावर
आज ओढेल मी कोरडे
खाऊन, पिउन, ढेकर देउन
झोपलेल्या प्रस्थापित साहितीकांवर
---------------------
तटी कवितेला व्याकरणाच्या विळख्यात घालू नका असे आमच्या श्रध्दास्थानापैकी ऐक असनार्या कवि ग्रेस ह्यांनी आत्ताच म्हणले आहे.
माझी आजची
माझी आजची कविता:
कप कालचाच,
चहाही कालचा?
दिसतो ना भिंतीवरी,
फुटकासा आरसा...
ढवळले दूध तापायला ठेवलेले.
ओणवले झाड वडाचे रस्त्यापर्यंत.
रानपाखरांचा माग लागेना,
उडून गेली मैना...
उन्हाचा पारा चाळीसावर,
लोकांची झाली दैना...
फुललेला पळस,
आणि आंब्याची सावली...
दुथडी वाहत मुळा,
मुठेला भेटाया धावली...
चंद्र कलंडला क्षितिजापाशी,
शेकोटीची ऊब.
कौलारू घरांवरून
उडून जाणारा धूर.
शेक्सपीअर बसला इंद्रायणीकाठी,
सूर्य अवचित मावळला.
आता सारे शांत शांत,
आसमंत.
उद्यापर्यंत.
परवाची वाहून गेलेली कविता.
आई लावते मिक्सर
आणि म्हणते हो ओवी.
ओवी कधी ना रिपीट
रोज रोज ओवी नवी.
आई मळते कणीक,
नको फूड प्रोसेसर.
एकीकडे तवा ठेवी,
दुसरीकडे गं कुकर.
आई चिरते गं भाजी,
आई घालते फोडणी.
कटकट मी करता,
देते शोधून ओढणी.
अरे संसार संसार,
बहिणाबाई त्या म्हणती.
लाईट जाता आई लावे,
ओट्यावरी मेणबत्ती.
अशी आई माझी छान
स्वैंपाक करते करते.
हपिसात बसून मस्त
मी जेवते जेवते....
खूप मस्त.
खूप मस्त. आजून येऊ देत.
नमस्कार. मा
नमस्कार.
माझ्या आजच्या कवितेचे नाव-
केकाट कामवाली
--
कलाकाराच्या कल्पनाचित्रातली कल्पना तु,
की कामचुकार कलकलणारी कोल्हेकुई तु?
कदाचित कन्यावस्थेतली काळी कन्हेर तु,
की कचराकुंडीवरून कचाट्यात कोंडणारी तु?
कधी कनकाचा कंदील, की कमानदार कबूतर तु,
की क:पदार्थ कफल्लक कलंकित कपबशी तु?
काचगृहातली कंकणाकृती कसदार काकडी तु,
की कवडीचुंबक कवडीमोल कवीची कळशी तु?
कायाकल्प केलास कसा, केल्यास किती कानपिचक्या तु..
कुठे काबाडकष्ट केलेस, कोणाची कशी कामवाली तु?
--
मी काव्यविभोर अन कडकलक्ष्मी कचराघंटागाडी तु!
माझ्या छिन्नमनस्क स्वप्नांची खळाखळा चुळ भरलीस तु!!
आजची अजून
आजची अजून एक:
फरशीवरती ओतून डोमेक्सयुक्त पाणी
बसून कोपर्यात तिने डिस्कव्हरी चॅनल लावले.
सिंह गुरकावला तेव्हा तिच्या डोळ्यांत दाटले पाणी,
त्या पाण्यात मात्र कुठलेही डोमेक्स नव्हते.
आज आठवे, तिच्या पैठणीचा फरशीवर पसरला पदर,
अन व्हॅनिश घालून धुतलेली पांढरीशुभ्र चादर.
संपेल का महामालिका,
या प्रश्नापाशी,
बॅक्टेरिया अडलेले.
आजन्म!
तळं..... तळं
तळं.....
तळं तळं तळं.....
अरे, तळं.........
पुन्हा एकदा तळं....
तुझं तळं
माझं तळं
अथांग तळं
तेच ते गुढ तळं
तळ्यातलं तळं
मळ्यातलं तळं
तळं तळं तळं.....
मला आठवतं ते तळं....
आठवतं तुला ते तळं....?
तुझ्या माझ्यात आंतरपाट झालेलं तळं....
आणि नंतर आयुष्याचं झालेलं तळं........
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!
डोमेक्स
डोमेक्स मधे गटांगळ्या खाताना
बॅक्टेरीयांचीही आसवे गळली
त्यात मात्र डोमेक्स होते,
महामालीका संपण्याची वाट पहात
राहीले ते ही गटांगळ्या खात
तीने सा रे ग म लावल्यावर
संगिताच्या स्वरांचे हिंदोळे घेणारे मन
कुकरची वाजलेली पंचविसावी शिट्टी ऐकुनही
जागे न होणारे तीचे मन,
लोडशेडींगच्या दणक्याने विझला तो दुरदर्शनसंचाचा पडदा
जागे झालेले तीचे मन,
तिसाव्या शिट्टीनंतर गॅस बंद झाला
येईल साजण आता घरी गिळायला
मनातल्या दुखां:चा बांध मोकळा झाला
या गडबडीत सुकले पाणि, फरशीवर टाकलेले डोमेक्सयुक्त,
आणि सुटले बॅक्टेरीया त्यांच्या आयुष्याच्या जोखडातुन !
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
राजाचं
राजाचं तळं
तळ्यातलं तळं ,मळ्यातलं तळं
तळागाळातलंही तळं
तळं तळं तळं
सकाळ गेली रिकामी
सांजवेळ आली
ग्लासातल्या तळ्याची
मला याद आली
तळं तळं तळं
सांजवेळच्या ग्लासात
हळूच डूंबणारं तळं
त्या तळ्याची सोबत करण्या
माझे अर्धांगीनी तु काहीतरी तळं !
तळं तळं तळं !
राज्याच्या तळिरामास अर्पण
.................................................................................................................................
** खरे मित्र असाल तर तुमच्या दुखा:तही सहभागी करुन घ्या ! **
भयानक
भयानक कंटाळ्याची परीसीमा.....
आणि आज मी 'गैरहजर' (गडावर)
आज मी रोमात
फायलींच्या डोंगरात
नेटही जातंय कोमात
मोसंबी ज्यूस ग्लासात
इडली सांबार प्लेटात
नजरेच्या टप्प्यात
पण येत नाही हातात
अन् जात नाही पोटात
तेल नाही दिव्यात
जळून भस्मसात
कुटुंब रंगलंय काव्यात
चाळ माझ्या पायात
पाय माझे तालात
नाचते मी तोर्यात
मोरावानी......
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
काय बहर
काय बहर आहे नुसता... गुलमोहराच्या पाकळ्यांनी अंगण भरुन गेल आहे..
गुलमोहराल
गुलमोहराला बहर येणार तर...
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
त्या
त्या तळ्याची सोबत करण्या
माझे अर्धांगीनी तु काहीतरी तळं ! >>>
या प्रश्नापाशी,
बॅक्टेरिया अडलेले.
आजन्म! >>> श्र, हे विषेश आवडलं, खरे तर एक बदल सुचवणार होते पण असुदेत
कचरा
कचरा उत्तम.
सोमवार, बी(मीनू) आवडले.
श्र, चाफ्फा यांचे बॅक्टेरिया एकदम वास्तववादी.
मंजुडी, बरी जमली आहे पण शेवटच्या चार ओळी कुठून चोरलेल्या आहेत का??
lol
लालू, मला
लालू, मला रीमिक्स करावंसं वाटलं गं अवधूतदादा सारखं..... त्याला चोरी नाही म्हणत
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही....
छे छे
छे छे त्याला Inspired by म्हणतात
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
अरेच्च्चा
अरेच्च्चा मी पाहीलंच नव्हतं इकडे.
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीयांनी आणि तुम्ही मला दिलेल्या प्रेमानी माझं मन आणि डोळे अगदी भरुन आलेत. भरल्या डोळ्यांनी हि माझी नवी कविता तुम्हा सर्वांच्या चर्णी अर्पण.
अंधुक अंधुक दिसतोय हा बाफ

मॉनिटर बिघडलाय की ही कसली वाफ
टण्या तुझ्या जागेचं आज आम्ही भाडं देऊ शकलो नाही
तर उद्या तू या सर्व कवितांच एक पुस्तक काढ
काढशील ना मित्रा?
रॉयल्टी मात्र सगळी तुच घे
नको नको मित्रा आग्रह करुस आम्हाला
ठेव ती तुलाच
मैत्रीखातर इतकंसुद्धा करणार नाही का आम्ही?
आता पुन्हा स्वच्छा झाल्यासारखा दिस्तोय मॉनिटर
डोमेक्समुळे का?
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Pages