शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:27

काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्‍या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - वाहतुकीचे साधन

शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.

2010_MB_Zabbu-Vehicles-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud जपान्यांनाही डार्विनचा सिद्धांत मान्य आहे. त्यामुळं जपानी अमिबा पासुन गॉडझिलापर्यंत सगळ्यांचे डोळे बारिकच! Wink

देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान ! कितना बदल गया इन्सान !! ONE ROOM KICHEN FOR SALE .... AREA INFINITE... NO WALLS NO ROOFS. TERES, KICHEN , HALL, BEDROOM ALL IN ONE.... @ RS. ZERO PER SQUARE FOOT........( HUMANS PLEASE DON'T APPLY..) (dOMBIVALI , March 2009, at 12.30 AM)

dog.jpg

कोल्हापूरचं वडाप नाही का कुणाकडे ? राजस्थानमधील उंटाची गाडी. कल्याण भागातल्या सिक्स सीटर्स. रागडावरचा रोप वे, पंढरपूर सवारी (टपावर बसलेली माणसे.) फार्फार आठवण येतेय...

अभार गिरीविहार. याचा एक वेगळा प्रकार पुर्वी कल्याण भागात वापरात होता. साधारण टेंपोसारखाच दिसायचा तो. (त्याला म्हणायचे कॉक्रोच !!)

दिनेशदा, तुम्हाला डुक्कर रिक्शा म्हणायची आहे का जी कल्याण-उल्हासनगर मार्गावर चालायची....

Pages