शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:27

काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्‍या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - वाहतुकीचे साधन

शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.

2010_MB_Zabbu-Vehicles-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेगावाहून गोमाजीबाबा संस्थानला जाताना मोबाईल च्या कॅमेर्‍यातून टिपलेली ही बैलगाडी. इरफान व्ह्यू वापरून सेपिया मोड अप्लाय केला आहे.

संयोजक, हा सिंगापूरमधला टू-इन-वन फोटू (रोप वे + स्टार क्रूझ) चालेल ना?
त्याचं काय झालं, सिंगापूर मेन लँडहून सेंटोसाला जाताना आम्ही रोप वे चा फोटो काढत होतो तर नेमकी ती स्टार क्रूझ मधे कडमडली Proud

4041-10-compressed.jpg

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.

Pages