शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. २

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:27

काळ बदलला तशी वाहने बदलली. जुना मुंबईकर ट्रामच्या आठवणी काढून हळहळतो पण रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात त्याला लोकलशिवाय पर्याय नाही. तर या झुकझुकगाडी पासून ते २ तासात मुंबईहुन दिल्लीला नेणार्‍या विमानापर्यंत असंख्य वाहतुकीच्या साधनांचा वेळोवेळी आपण उपयोग करतो. या वाहतुकीच्या साधनांची काही छायाचित्रे तुमच्याकडे असतील तर चला तयार व्हा झब्बूसाठी!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - वाहतुकीचे साधन

शक्यतो एकाच साधनाचे छायाचित्र हवे, एकापेक्षा अधिक नसावीत. यात कोणतेही साधन येऊ शकते. सायकलपासून होडीपर्यंत, विमानापासून घोड्यापर्यंत.

2010_MB_Zabbu-Vehicles-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार मस्त फोटो सर्वांचे. नी, ट्रेनचे फोटो म्हणजे कल्ला आहेत.

From First Anniversary @GOA!!

हे जहाज त्सुनामीच्या वेळेस वाहत गोव्याला कंडोलीम बीच (बहुतेक हां. )येऊन थडकलं आहे म्हणे. ते जितकं पाण्याच्या वर दिसतंय त्याच्या दीडपट खाली रुतलंय. आणि गेली चार (?) वर्ष ते तिथेच आहे कारण त्याला समुद्रातून काढून Dismantle करायला कारखान्यात न्यायचाच खर्च कोटीच्या घरात आहे आणि कुणीही हे कंत्राट घ्यायला तयार नाही. अशी माहिती तेथील स्थानिक लोकांनी दिली.

रतनगडावरुन परत येतना...भंडारदराच्या दुर्गम भागात...
आम्ही तर मजेखातर गाडिच्या टपावर बसलो होतो.पण ही माणसे रोज आपला जीव मुठीत धरुन रोज प्रवास करतात.................

Picture 471.jpg

आशुडी, तुझ्या जहाजाच्या माहितीमुळे त्या फोटोला एकदम वजन प्राप्त झालय बघ. नीध, तुझ्या कोकणरेल्वेचा फोटो म्हणत असेल ती. तुला तो अँगल मिळाला तरी कोठुन? फारच आवडला मला पण तो.

धन्स सुनिधी..
अगं ब्रिजवरून जात होतो लांबून ट्रेन दिसली येताना. गोव्याकडून येत होती. गाडी थांबवली आणि काढला. गाडी आपल्या पायाखालून जाताना सही वाटतं. तिथे विसरले शूट करायला. Happy मग ब्रिजच्या दुसर्‍या बाजूला पळत गेले.
आणि गाडी लांब जाताना काढला. पाठमोरी गाडी आणि बांधकाम चालू असलेलं झाराप स्टेशन. सही वाटत होतं. आणि रूळांचा Y पण. Happy

हो अग. २००४ सालचा फोटो आहे तो. सही धमाल येते असली सायकल चालवायला.
हा अगदी गेल्या विकांतातला फोटो. ६ जणं बसलेलो आम्ही. Happy

अजुन एक टाकते मधे कुठला आला तर. Proud

हा अगदी गेल्या विकांतातला फोटो. ६ जणं बसलेलो आम्ही. बाकीचे उतरलेत. Proud

cycle.jpg

तिथेच एक ९ जणांसाठीची सुद्धा सायकल होती. गोल आकारात. म्हणजे सरळ जाताना काही माणसं उलटी पण बसलेली असु शकतात.
पण फोटो काढायला विसरले Sad

.

लोकहो, तुमच्या उत्साहाला मोडता घालयंच असं अजिबात नाही. पण सगळे नियम पाळले जावेत.
एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

'भुकेला कोंडा, निजेला धोंडा आणि फिरायला कायनेटिक होंडा' :p (हे बळंच ... असंच कुठेतरी ऐकलेलं... :p )

टिळक रोड, पुणे

IMG_0205.JPG

.

Pages