मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनीमामी...........तुस्सी ग्रेट हो............. Rofl Biggrin
काल करंजी टॉनिक काय दिले तब्बल दिड महिन्यानी इथे काहितरी लिहिण्यासारखे झालय Happy
अघोरी आनंद.............!

आता जेवायला बाहेर पडलो हापिसातुन. चाव्यांचे २ सेट आहेत. एक माझ्याकडे असतो आणि एक बाजुच्या हापिसात. जेवुन परत आलो. मधल्या वेळात माझा पार्टनर येऊन हापिसात बसला होता बाजुची चावी घेऊन त्याने हापिस उघडले. माझ्याबरोबर नव्याने जॉईन झालेला मुलगा होता.
जेवुन आलो आणि सवईप्रमाणे खिशातुन चाव्या काढल्या. मेन डोरचे लॅच आणि कडीचे कुलुप जे उघडे होते ते व्यवस्थित बंद केले आणि मग धक्का मारुन दार उघडु लागलो. अर्थात हे सर्व बोलत बोलत चालले होते....... नवा गडी हसत हसत म्हणतो, सर काय करताय...... तुम्ही कुलुप उघडायचे तर बंदच केलेत........ आणि मरिसमर हसायला लागला......... Rofl
आतुन पार्टनर आला आवाज ऐकुन आणि आतुन दार खेचतोय तर बाहेरुन कुलुप्........:हाहा:
अशक्य हसतोय आम्ही.......... त्या नव्या मुलाच्या मनात काय आले असेल त्यालाच माहीत.....!

अश्विनीमामी.......हे सगळे तुमच्या करंजी आणि "समु एफेक्ट" मुळे बरे का..... Biggrin

भुंगा.... Lol

Lol

Lol

वर्षू, अकू, भुंगा चालू दे. असाच वेंक्यू वाढतो बरं! प्रॅक्टिस मेक्स मॅन पर्फेक्ट!
अकू वर्षू तुम्हाला एक जोक माहिती आहे ना....
साखरेच्या डब्याला मुंग्या लागतात ना तर मुंग्यांना फसवायचं. कसं? तर तिखटाच्या डब्यावर ''साखर'' अशी चिठ्ठी लावायची. आणि साखरेच्या डब्यावर ''तिखट!''

अरे वा, सगळ्यांचा चहा चाललाय वाटतं......मग माझा पण एक चहाचा किस्सा ऐकवतेच कशी .....

अमेरिकेत साखर पुडिच्या स्वरूपात मिळाते. तर बहिणीकडे सुट्टीत गेले असताना मीच रोज चहा करत असे. मधेच एक दिवस अनवधानाने (आणि डबे बदलले गेल्यामुळे) साखरेऐवजी मीठ टाकलं. शिवाय मी स्वतः बिनसाखरेचा चहा पिते. त्यामुळे बाकिच्या लोकांची फजिती पहात मी आरामात माझा चहा संपवला.

भ्रमराची उत्क्रांती होऊन भुंगा झाला की काय???? .... Happy Happy Happy

हो बाई आणि ते दिवे घ्यायला विसरू नका!

Proud Proud Proud

गाडीच्या मागे आणि पुढे लिहिणार आहे..... "अश्विनीमामीचा आशिर्वाद" >>>>
असंहि लिहि... "गोट इंटु एनि प्रोब्लेम ? मग नक्किच कोल करा...९०२३८४०२८३४२९४५४४ अश्विनि मामि"

तसे बरेच आहेत पन हा रिसेन्त....
राइस कुकरला तान्दुळ पाणी घातले आनि सुरु केला.... २ तासाने नवर्यानविचार्ल बिरबलाची खिचदि झालि का? ......काहि कलेना.....बघीतले तर राइस कुकर keep warm वर होता..... cooking वर करायचा विसरले होते....................

माझे ताजे ताजे वेंधळेपणाचे किस्से :

चार दिवसांपूर्वी पेपरातील एक बातमी वाचून मोठ्या तिरमिरीत संपादकांना पोस्टकार्ड खरडले ( मला आवडते पोस्टकार्ड लिहायला, ईमेल करण्या ऐवजी कधी कधी) आणि त्याच दिवशी मोठ्या इतमामाने पोस्टपेटीत घातले. आज त्याच इतमामाने बिल्डिंगचा रखवालदार ते पोस्टकार्ड मला परत द्यायला घेऊन आला होता. पोस्टमनने ''To''
च्या ठिकाणी मी कोणताच नाव-पत्ता न लिहिल्यामुळे (पण पत्रात माझा नावपत्ता आठवणीने लिहिल्यामुळे) वाजत-गाजत ''काय पण शिकलेली माणसं असा वेंधळेपणा करतात!'' च्या थाटात ते पत्र परत आणले होते!!
रखवालदार देखील कुजकट हसत होता नुसता!!! मी खरेच पत्र टाकायच्या घाईगडबडीत पत्त्याची जागा कोरी ठेवून ते तसेच पोस्ट केले होते!!!

आज सकाळी आंघोळीला गेल्यावर शिळे कपडे साबणाच्या पाण्यात भिजवण्याऐवजी मी चुकून, तंद्रीत आंघोळीनंतर घालायचे, ताजे - धुवून खडखडीत वाळवलेले कपडे समारंभपूर्वक त्या पाण्यात भिजवले आणि मग लक्षात आले, अर्रर्रर्रर्र!!!

भरत जी ना अनुमोदन..........

समु, हे कसे चालेल??? चल सावर स्वतःला आणि कर जरा दोन चार वें पणा....... Rofl

अश्विनीमामींची "करंजी टॉनिक" पाठवु का...... नुसत्या नावानेच मला गुण आला होता चांगलाच..... Lol
पण मामींच्या करंज्या काही आल्या नाहीत अजुन्......कुरिअरवाल्याने खाल्या की काय????? Biggrin

अरे....हे काय? गेले कुठे सगळे?(अगदी मराठी नाटकातलं वाक्य वाटतंय ना?)
समू....अश्विनीमामी...आणि काय रे भुंग्या ......मामीला सांगते करंजीचं तेवढं मनावर घ्यायला.....आलेला इफेक्ट जायला नको.
नाहीतर पहा बरं का.....करंज्या खाऊन कुरिअरवाल्याचा वेंक्यू वाढला तर पंचाईत!

आज माबोवर आल्याआल्या यादीत प्रथम "गप्पागोष्टी" शोधला ,
त्यात पाहिलं तर आज एकही (नविन) प्रतिसाद दाखवत नव्हता ...
मी आपला अस कसं म्हणुन विचार करतोय .....!!
....
..
नंतर लक्षात आलं ...
अरे , मैं लॉगइन करनाच विसर्‍या था !!
Lol

Happy अनिल..

काल दुसर्‍यांनी केलेले वेंधळेपणा चे किश्शे वाचतांना मजेने हसत सर्व विसरून गेले.. आणी गॅस वर चिवड्यासाठी भाजायला घेतलेले चुरमुरे जळल्याचा वास आला तेंव्हा भान आलं Angry
श्या..आताशी ठरवून टाक्लय.. किचन मधे काम करत असतांना मुळीच यायचं नाही बाफ वर !!
अर्ये द्येवा!!परत कसला वास हा???????????

Pages