मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी........... Rofl
वेंक्युच्या या शत्रुसंगे युध्द आमुचे सुरु........
वेंक्यु वाढवत फिरु......वेंक्यु वाढवत फिरु...... Proud Biggrin

हाय लोक्स, इथे माझ्या बद्द्ल झालेली चर्चा वाचुन मी खुश झाले, वेपणा च्या दरबारात सगळ्यांना सलाम Happy आता सादर करते मझा काल मध्य (मध्य!!!!! मद्य नाही, वाचणार्‍यांनो जरा निट वाचा उगी अर्थाचा अनर्थ नगा करु Happy ) रात्री चा वेपणा

काल रात्री १:२७ मी. ला मी झोपेतुन ऊठुन अंघोंळी साठी पाणी तापवायला ठेवल सकाळचे ५:०० वाजलेत अस समजुन Proud

मी केलेला प्रकार आठवुन अजुन मला हसु येतय Happy त्याच झाल अस:

मी रोज सकाळी ५:०० च्या सुमारास ऊठुन ओंघोळ करते, माझ्या नंतर मग दुसर्‍या रुम-मेट चा नंबर असतो, आमच्या रुम मध्ये अंघोळी चा मान सगळ्यात प्रथम मी घेते Wink . काल रात्री माझ्या नंतर अंघोळ करणार्‍या रुम-मेट चा सेल वाजला आणी तीने ऊठुन अंघोळीच्या पाण्याच भांड भरायला लावल, तीचा सेल वाजला तसा मलाही जाग आली, ती पाणी भरतेय समजल्यावर मी आज आपल्याला ऊठायला उशीर झाला, सकाळचे ५:३० झाले असतील असा विचार करुन ताडकन ऊठले आणी पाणी गरम करायच दुसर भांड घेऊन तीच्या मगे पाणी भरण्यास नंबर लावला, मनात विचार करत होते, "आज आपला अलार्म कसा नाही वाजला? हिचा अलार्म वाजण्याच्या आधी आपला अलार्म वाजतो,रात्री सेल पर्स मध्येच राहिल्याने कदाचीत अलार्म एकु आला नसावा वै. वै. " तोच परत रुम-मेट चा सेल वाजला, ती भांड बाजुला ठेवुन सेल घ्यायला गेली, मी झोपेत तीथेच उभी होते, रुम-मेट लगेच आली आणी मला म्हणाली "रात के एक बजकर २७ मी. हुए है" मी कपाळाला हात लावला पण मग ऊठलोच होतो म्हणुन आम्ही भांड्यात पाणी भरुन ठेवल आणी परत झोपलो Happy

<<<काल मद्य रात्री चा वेपणा>>>>

मद्याचा प्रभाव पडलाय लिखाणावरसुद्ध्हा........ Rofl

समु, चालु दे तुझे.................... "उतु नको मातु नको घेतला वसा टाकु नको" Proud
भरत, अ‍ॅस युज्वल Lol

हे काय!!!!! माझी गोस्ट पुरी व्ह्ण्या अगोदरच प्रतिक्रीया!!!!! ये हमे मंजुर नहीं, पण हम खुश हुए कि हमने अंजानेमे एक और वेपणा किया Proud

भ्रमर उद्या करंजी खा तेच टॉनीक.

मी करंज्या करायला सामानाच्या यादीत एक नारळ मागविला. बाकी सर्व सामान एक किलो म्हणून
कोकोनट एक किलो लिहिले वेंधळेपणे. त्याने लगेच १ किलो सुके खोबरे पाठिवले. ( जे माझ्याच्याने एक वर्शात पण संपणार नाही) ते परत पाठवून एक नारळ मागिवला. आता उद्या करंज्या केल्याच पाहिजेत.

अर हो! सगळ्यांना माझ्या कडुनही ना. पु. च्या शुभेच्छा!
ऊद्या इथे मेल-आय-डीज दांडी मारणार वाटत, जस शाळेत मुल दांडी मारतात Wink

समु.. Rofl मद्यरात्री!!!!!!!
अश्विने.. आता करंज्या करताना काय घोळ घालणारेस गं बाई???

समु, अग फक्त नारळीपुनव नाही त्याबरोबर रक्षाबंधन असते ना...... आणि रक्षाबंधनाच्या दिवशी कॉलेजात दांडी मारतात्...शाळेत नै कै...... Proud

अश्विनीमामी, ओल्या नारळाच्या करंज्या पाठवा.......सुके खोबरे संपवायला करंज्या नकोत.......!

भ्रमर.. Lol तर तू राखीच्या दिवशी कॉलेजला जायचा वेंपणा नाही करणारेस तर Proud

केल एकदाच संपादन आता मुळ वेपणा वाचा सगळे Happy ,

भुंगा भाव आजकल शाळत असतांनाच समद समजत पोरांना Wink

हो कल्पना आहे. बहिणीची एक मैत्रीण समुपदेशन करते आमच्याच शाळेत. एक एक किस्से ऐकुन झीट येते....... Angry

अग कॉलेजचे दिवस केव्हाच संपले............ "गेले ते दिन गेले"
भ्रमर,
अब ये भी दिन जायेंगे ...!
Lol

अंगाश्शी! आता कसं चांगले घसघशीत २२ वेंपणे वाचायला मिळाले. मस्त किकस्टार्ट मिळाला आठवड्याला. अश्विनी करंजी मला पण !

मी काल पुण्यात गेले होते प्रत्येक पीएम्टी बस पाहून यात समु असेल का? हाच विचार करत होते ...समु तुम छा रहे हो यहापर Happy

आज सासूबाई, सासरे गावाहून आले. त्यांच्यासाठी चहा करायला आधण ठेवलं. मस्त आलं, साखर घातलं. उकळतांना तब्बल ५ मि. चहाकडे बघत बसले हा विचार करत की आज चहाला रंग का येत नाहीये...मग लक्षात आलं की चहापावडरच टाकली नाही. Happy
रोजचा चहा नवर्‍याला करायला लावते त्याचा दुष्परिणाम दुसरं काय Uhoh

हा वेंधळेपणा माझा नाही. तरी समूचं मद्य/मध्य वाचून लिहावंसं वाटलं.
माझ्या दिरांचं लग्न ठरल्यावर भावी नवरीला भेटायला दीर निघाला दापोलीला. गाडी घेऊन एकटाच जाणार तर एकाला बरोबर घेऊन गेला. तो एकजण आमच्या एका क्लाएंटच्या हॉटेलात बार टेंडर होता. नोकरीला लागून २/३ वर्षंच झाली होती. खूप हुशार आहे हा एकजण पण भाषा जरा गावरान! तर दीर त्यांच्या भावी सासर्‍यांच्या घरी पोचले. दीर उंच व एकदम तब्ब्येतीत. मिश्या वगैरे! तर हा एकजण अगदी उंदीरमामा. जोडी अगदीच कॉमेडी!
दीरांच्या भावी सासर्‍यांनी यांचं स्वागत केलं ...पाणी बिणी दिलं....खायला काही तरी दिलं. संधयाकाळची वेळ होती...खाणं झाल्यावर भावी वधू ट्रेमधून ग्लास घेऊन आली. तर हा एकजण घाबरला ...पटकन विचारता झाला, '' हे माद्य तर नाही ना?''
आता माझी जाऊ इतकी हसते अजूनही हे सांगताना. कारण हा एकजण जरी बारटेंडर असल तरी त्याचा त्याला गंधही नव्हता. आणि आमच्या गावात बारटेंडर म्हणजे काय अगदी ते मिक्सिंग वगैरे करणारा नव्हे हो...जस्ट मॅनेजर.
आणि हो ग्लासमधून आलेलं काय होतं? अहो दापोलीत कोकम सरबताशिवाय काय मिळणार? पण त्या एकजणाला ड्रिंक म्हणता आलं नसतं....दारू कसं म्हणणार? आणि भाषा त्याच्या दृष्टीने अगदी स्वच्छ व शुद्ध अशी त्याला काळजीपूर्वक वापरायची होती ..... मद्य/मध्य/माद्य..... !
त्यामुळे हा घोळ झाला.

मानुषी Happy
भारतवारीत मैत्रीणीकडे(चष्मा लावायचा कंटाळा केला..) आग्रहाने मीच चहा केला.. छान उकळवून झाकण लावून मुरायला बिरायला ठेवला.. सातएक मिनिटांनी झाकण उघडले तर क्काय??रंगच नव्हता आलेला.. गाळतांना कळ्ळं Blush चहाच्या भुकटी ऐवजी शेजारच्या सारख्या दिसणार्‍या बाटलीतल्या मोहर्‍या टाकल्या व्हत्या मी Sad Sad

लोकं एक सारख्या बाटल्यांमधून चहा,मोहर्‍या,मीठ ,साखर असं लागून लागून का बरं लावून ठेवतात गॅसवरच्या फळीवर Angry
Proud

वर्षू Lol

कालच माझी फजिती होता होता वाचली ..... एकासारख्या दिसणार्‍या काचेच्या बाटल्यांमध्ये ओवा, जिरे, मेथीची पूड इत्यादी साहित्य भरून ठेवले आहे फडताळात..... काल मी ओवा समजून हातात भस्सकन् मेथीची पूड ओतून घेतली. तोंडात टाकणार तोच सहज लक्ष हाताकडे गेले आणि ती कडू कडू पूड तोंडात पडण्याअगोदर नशीबाने पुन्हा बाटलीत परत गेली. नंतर तिच्या चवीच्या कल्पनेनेच मी शहारत बसले होते!!

Proud

Pages