चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अश्विनीमामीजी, इथं इन्सेप्शनवर फारसे लिहिले गेलेच नाही. आता तर तो ऑल द टाईम क्लासिक मध्ये गेला पण! मला पाहाण्यापूर्वी इथल्या रिव्ह्यूची खूप अपेक्षा होती पण फारसे कोणी लिहिलेच नाही. इथे फक्त चित्रपटावर टीकाच जास्त चालते. पण चांगल्यावर भरभरून लिहिलेही पाहिजे. बहुधा बाकी लोकाना जसा तो लवकर कळत नाही तसे इथल्या रसिकांचे झाले का? मला तर अजून एक दोन वेळा पाहिल्याशिवाय कळणारच नाही. प्लॉट डोक्याचा भुगा करून टाकतो. काय मांडणी. !काय सत्य आणि काय स्वप्न कळतच नाही. मला सारखी हातीमताईच्या कॉम्लिकेशनची आठवण आली. पेन्दसे गुरुजीनाच कळला असता हा चित्रपट ..

तो मुलगा जर एवढा बिझ मॅन असेल तर त्याचे प्रायवेट प्लेन पाहिजे नाही का? तो कमर्शिअल फ्लाइट कसा घेइल? >> अश्विनीमामी , त्यासाठी ते त्याच Private Plain Maintainance साठी बन्द पाडतात . आणी तो कोणत्या प्रकारचे विमान वापरेल (First Class Pilot खाली असलेले ) याचा विचार करून ती अख्खी Airlines च विकत घेतात .

मामी तुस्सी ग्रेट हो !! काय मस्त लिहिलत . मी सिनेमा न पहाताच डोळ्यासमोर भव्य चित्र उभ राहिलं
तुमचा व्यासंग ही मोठा आहे keep it up आणि आम्हा पामराला त्याचा लाभ घडवून आणल्याबद्द्ल धन्स!!

त्यासाठी ते त्याच Private Plain Maintainance साठी बन्द पाडतात . आणी तो कोणत्या प्रकारचे विमान वापरेल (First Class Pilot खाली असलेले ) याचा विचार करून ती अख्खी Airlines च विकत घेतात .>>
मला वाट्ले होते हो असेल असेल. आपल्यात नाही का इमरजन्सीत फ्युनरल अटेंड करण्यासाठी लोक कोणतीही फ्लाइट घेतात तसे असेल. very cunning I must say. But that Saito character is not all dark. only gray shades. Sometimes such things need to be done for survival. In the end the father suggests that son should go for alternative energy sources such as wind energy right? That idea should be implanted in a lot of minds. Friedman is always suggesting that.

ते पहिले हेलिकॉप्टरचे शॉट्स बघताना मला तुम्हा सर्वांची खूप आठ्वण झाली. कारण मी तर पक्का देसी, मुंबै स्टॉक एक्स्चेंजची बिल्डिंगच सर्वात उंच इमारत मी पाहिलेली. त्यामुळे मला ते अमेरिकन / वेस्टर्न शहरांचे मोठे पॅनिन्ग शॉट्स खूप आवड्तात. सर्व किती पिक्चरस्क दिसते. आखीव रेखीव रस्ते. शिस्तीत चाललेल्या गाड्या ( ऑटो नाहीत Happy ) मॅट्रिक्स मध्ये पण ती एक मजा होती. मला ती एक अजून गंमत अनुभवायला मिळते. तुम्हाला ते रोजचेच असेल नाही का? त्यात काय एवढे असे वाट्त असेल. कॅसल मध्ये पण एखादा तसा बिल्डिंगच्या रूफ्स वरून घेतलेला शॉट असतो. ब्रिज चा शॉट असतो. अगदी नयनरम्य दिसतो तो .

क्लायमॅक्स मधील बिल्डिन्ग एक कॅनेडिअन माउंटन रिझॉर्ट होता म्हणे. माझी एक आवड्ती गेम होती रिकॉइल त्यात चौथ्या लेव्हल वर असलीच बिल्डिन्ग होती. त्याची आठ्वण झाली. क्लायमॅक्स लै डेड्ली आहे. त्यात किती लेव्हल्स ते लिंबोत जाणे, व्हॅन चे हळू हळू पड्णे. जबरदस्त!

टायटॅनिक मधील लिओ मॅच्युअर झाल्यासारखे वाट्ते अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅक्टर.

बाळू अण्णा तुम्ही कुणाच्या मनाचे प्रोजेक्शन आहात?

पीपली लाईव्ह पाहून ६३वा स्वातंत्र्यदिन 'साजरा' केला. त्यातल्या ज्या प्रत्येक विनोदावर थिएटर हसत होतं त्या प्रत्येक विनोदानंतर मन जास्त जास्त खिन्न होत गेलं. खूप वर्षांपूर्वी दूरचित्रवाणीवर सत्यजित रेंचा सद्गतीमधे तो पोट आणि पाठ एकत्र झालेला ओम पुरीचा शेतकरी.. त्याचं ते मुकाट मरुन जाणे पाहिलं होतं.हादरुन जायला झालं होतं मनातून.
आज पीपली लाईव्ह बघताना त्या मरण्याचा तमाशा झालेला आपण पाहत आहोत इतकाच फरक जाणवून गेला.आणि हे होतच रहाणार अशा मनाच्या निर्लज्ज स्वीकारामुळे आपली हादरुन जाण्याची संवेदनशिलता सुद्धा संपली आहे हाही एक फरक! बाकी शेतकरी अजूनही तसाच आहे.

अमा, टू गुड! Lol

मीसुद्धा पाहिला पीपली लाइव्ह. जबरदस्त इफेक्ट. कोणी स्टार्स नसताना सगळे लहान मोठे कलाकार आपापल्या रोल मधे भाव खाउन गेलेत!
शर्मिला, रैनाने म्हटलंय त्याप्रमाणे हसतानाही चीड, दु:ख हे वाटलंच. पण शेवटी शेवटी वाटलं, अरे त्या मीडियाच्या मूर्खपणाच्या नावाने आपण हसतोय पण जसे त्यांनी आत्महत्येला स्टोरी बनवून विकली तशी या सिनेमानेही त्या विकण्याच्या स्टोरीला विकलं का ?! कन्फूज होऊन आले बाहेर!

'तेरे बिन लादेन' पाहिला. मस्त, धमाल चित्रपट ! पीपली लाईव्ह बघावा की लादेन ह्या विचारात होतो. पण 'हसता हसता पोटात तुटत होतं' अशा अर्थाचं कुणीतरी लिहिलेलं वाचलं आणि जायचा धीर नाही झाला.

हापुस बघितला. खुप दिवसांनी एक चांगला मराठी चित्रपट बघितला.

व्यावसायिक दृष्टीकोनातुन बनवलेला एक चांगला चित्रपट.

मला पण funny नव्हता वाटत पीपली लाइव्ह :(, गरीब शेतकर्‍याच्या ट्राजेडीची राजकारणी आणि मिडियानी केलेली कॉमेडी!
चित्रपट पकड चांगली घेतो पण मधे मधे थोडा स्लो , तेच तेच चालुये असं वाटलं .
तरीही उच्च अभिनय, दिग्दर्शन , गाणी पण फिट्ट बसणारी , गुड टिम वर्क !
ऑस्करवारी नक्की पीपली ची :).

पीपली लाइव्ह. एक उच्च चित्रपट आहे. सगळ्यात शेवटचे गाणे लागल्यावर माणूस एक क्षण चित्रपटागृहाबाहेर जाण्यासाठी उठायचा थांबतो. हॅटस ऑफ.
पण काही काही गोष्टी टाळता वा नीट मांडता आल्या असत्या, ह्याच विषयावरचा गाभ्रीचा पाऊस जास्त चांगला वाटला.

आज थिएटर ला १५-२० तरी अमेरिकन लोक आले होते ( कुठलय देशी मित्रां बरोबर नाही), इथे रिव्हु आलेत का कुठे ?
स्पॉयलरः
नत्था ला सरकार १ लाख देणार अनाउन्स करते तेंव्हा बदललेल्या हेडलाइन्स आणि नंतर हे रक्कम सरकार कॅन्सल करते त्या वेळी हेअडलाइन " नथ्था अब फिर मरेगा' वाचून हसु आलं याच खरच गिल्टी वाटलं :(.

पण काही काही गोष्टी टाळता वा नीट मांडता आल्या असत्या, ह्याच विषयावरचा गाभ्रीचा पाऊस जास्त चांगला वाटला.>> इंडिअन एक्स्प्रेस च्या रिव्यूत हेच म्हटले आहे.

"पीपली लाईव्ह" पाहीला. चित्रपट सुंदर आहे. पण मनाला भावत नाही...विनोदाचा अतिरेक की....!!!

नत्थाच्या मरण्याची घोषणा झाल्यावर भरणारी पत्रकारांची जत्रा.. आणि शेवटी झालेल्या अपघातात नत्था मेल्याची समज करून पत्रकार पीपली सोडून गेल्यावर उरलेलं भकासपण....आवडलं.

"पीपली लाइव" पाहिला, वर लिहिलय त्याप्रमाणे हसताना खिन्न व्हायला होतं. ब्रेकिंग न्यूजसाठी हपापलेला मिडिया कुठल्याही थराला जातो, आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारणी लोक कसे रंग बदलतात हे आपल्याला माहितचं असतं पण पडद्यावर पाहताना भीषणतेने जाणवतं. एखादा माणूस मरणार हे कळाल्यावर पण बाकीच्यांना विशेष वाटत नाही हे मरण स्वस्त झाल्याचं दर्शक आहे काय असं वाटतं.
पोट आणि पाठ एकत्र झालेला शेतकरी, जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा दिग्दर्शिकेने त्याचा वापर एक 'सिंबॉल' म्हणून केल्याच जाणवतं, चित्रपट पाहताना लोकांच्या लक्षात पण येत नाही की आपण नत्था मरेल की जगेल या काळजीत असताना आपल्या डोळ्यासमोर एक माणूस दररोज हळूहळू मरतोय. Sad
शेवटी तर हा शेतकरी स्वतः खणलेल्या खड्ड्यात मरतो आणि त्याच्या अंत्यविधीला मोजकेच लोक येतात तेव्हा भयाण वाटतं.

आपल्या सरकारतर्फे शेतकर्‍यांसाठी असणार्‍या योजनांची खिल्ली उडवलीय. नत्था मरू नये म्हणून त्याला एका योजनेचा फायदा दिला जातो तो प्रसंग म्हणजे त्याच्या मरणाची चेष्टा उडवली जाते सरकारतर्फे असं वाटतं.

सर्वच कलाकारांनी कामे मस्त केलीत. नत्था, रघुवीर यादव, नत्थाची बायको, त्याची आई, पत्रकार राजेश व ती इंग्लिश चॅनेलची वार्ताहर मलीक, सगळ्यांचीच कामे मस्त.

ही एक ब्लॅक कॉमेडी असं मला वाटलं. चित्रपटाचा शेवट पण कित्येक लोकांना झेपला नाही हे नक्की. इथे सांगत नाही , कारण अजून भरपूर लोकांनी हा चित्रपट पाहिला नाहीय. पण किती लोकांनी त्यातल्या विनोदाला केवळ विनोद म्हणून घेतलं व किती लोकांना त्या विनोदा मागची टोचणी जाणवली यावरच या चित्रपटाच यशापयश (आर्थिक नव्हे) अवलंबून आहे हे माझे मत.

गॉदफादर सॅटरडेज सुरु आहे झी स्टुडिओवर.
ह्या शनिवारी गॉडफादर कन्फेक्शन्स झाला.
पुढच्या शनिवारी पुढचा पार्ट अस आहे.
मला निम्माच पहाय्ला मिळाला. Sad
आहे हेच माहीत नव्हत.
नीरजा लक्षात ठेव. शनिवार रात्री झी स्टुडिओ.

पीपली लाइव्ह हा एक थोर चित्रपट आहे. एकेक फ्रेम, संवाद अफलातून आहे..
पाठ आणि पोट एक झालेला तो हरि महातो नावाचा शेतकरी हा प्रेमचंदच्या गोदानचा नायक.. Sad

थोर नाही वाटला मला. street smart वाटला. त्याच्या हेंतूंबद्दल शंका घेण्याइतके glib presentation वाटलं थोडसं.

गरीब शेतकर्‍यांना केंद्रस्थानी ठेवुन एक चांगला सिनेमा तयार केला असेल तर एक कलाक्रुती म्हणुन नक्कीच कौतुक. त्या विनोदांवर (कुठलीही टोचणी न लागता )फक्त हसणार्‍या लोकांचे मी समर्थन नाही करणार.
पण गरीब बिचारा शेतकरी/गेला बाजार कामगार किंवा कुठलाही असंघटीत अडाणी अन्यायग्रस्त घटकावरचे हे एकांगी चित्रण फक्त चित्रपटच नाही तर कथा कादंबर्‍यांमधेसुध्दा कुठवर चालणार? खरेच एव्हडी अडाणी/निरागस असतात का ही माणसे?मग मलाच कशी नेमकी भेटतात ती ड्यंबिस,इरसाल,आळशी,आगाऊ,उध्दट,अहंकारी,हेकेकोर,गुटखा खाउन पचकन थुंकणारी असतात? एखाद्या घटनेने संवेदनाशील माणसाच्या डोळ्यात पाणी येते,मन हेलावते म्हणुन त्यालाच किती ते encash करणार? पोष्ट अस्थानी आहे अगदीच मान्य पण ह्या so called issue based filmakersना डोक्यावर घेणे बंद करुन जरा ,बदललेल्या वास्तवाला सामावुन घेणार्‍या कलाक्रुती निर्माण व्हाव्यात ही अपेक्षा.

पीपली... छान वाट्ला. DJने लिहील्याप्रमाणे मलाही काहीवेळा slow आणि repeatative वाटला. लोक काहीवेळा सर्वसाधारण विनोदावर उगीच हसत होती. मला तरी चित्रपट सिरीयस वाटला. महत्वाचे म्हणजे चित्रपट आटोपशीर आहे. उगाच लांबवला नाही. शेवट सहीच!!

मलाही एकदम आवडला पीपली. नक्कीच बघण्यासारखा आहे. गाभ्रीचा पाउस, टिंग्या प्रमाणेच बघताना प्रचंड वाईट वाटते. सुरूवातीच्या त्या गाडीच्या शॉटपासून ते शेवटपर्यंत खिळवून ठेवतो असे वाटले.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या, त्यांची परिस्थिती यावर कोठेही टीकात्मक किंवा टर उडवण्याचा सूर दिसला नाही. त्याचबरोबर ते नथ्था, बुधिया वगैरे आवर्जून अगदी निरागस वगैरेही दाखवलेले नाहीत. सामान्य माणसे वागतात तसेच वागताना दाखवलेले आहेत. (आर्क, तुझा पॉईंट कळाला, पण येथे तसे वाटले नाही). गावातील सामाजिक परिस्थिती, तो ठाकुर, पोलिस व इतर लोकांची नथ्था वगैरेंबद्दलची तुच्छता खूप अचूक दाखवली आहे. तसेच तेथील दलित नेताही त्यात राजकारणच बघतो हे ही दाखवलेले आवडले. अशा एरव्ही सर्रास दिसणार्‍या पण आत्तापर्यंत चित्रपटात दाखवल्या न जाणार्‍या गोष्टी दिसल्या की लेखक्/दिग्दर्शकाच्या हिंमतीला दाद द्यावीशी वाटते.

खेड्यातील "डीटेल्स", गाणी, लोकांचा अभिनय सगळे एकदम जबरदस्त आहे. यातील खेड्यातील लोक खरे वाटतात.

मीडिया, राजकारणी यांचे वर्तन त्यामानाने ढोबळ वाटले, जास्त खोलात जाउन काही दाखवलेले नाही. या लोकांना सामान्य लोकांबद्दल काहीही वाटत नाही आणि जे काही ते करतात ते त्यांच्या स्वार्थासाठी हा आपला समज आहेच (आणि तो बहुतांशी खराही आहे), पण त्यामुळेच त्यांना व्हिलनरूपात दाखवणे सोपे आहे. पण एका कोणत्याही ग्रूप ला (त्यांच्या जातीवरून, धर्मावरून, व्यवसायावरून किंवा इतर कोणत्याही कॅटेगरीवरून) व्हिलन ठरवणे हा खूप सोपा आणि सोयीचा उपाय असतो. त्यापुढे खोलात जाउन त्या क्षेत्रातील सर्वसामान्य लोक असे का वागतात याबद्दल आपल्याला चित्रपटाने एवढा वेळ त्यासाठी देउनसुद्धा आणखी काही नवीन माहिती मिळत नाही. राजकारणात सत्ता हातात असणे हे एकच कारण त्यासाठी पुरे असेल (power corrupts), पण मीडिया वाले - एरव्ही आपल्यासारखे लोक- एकदम असे का वागत असतील याबद्दल काही दाखवले असते तर आवडले असते.

दुसरे म्हणजे गावात दुसरी कोणतीही सपोर्ट सिस्टीम आस्तित्त्वात नाही? पूर्वी खेडी ही याबाबतीत एकसंध समजली जायची. येथे त्याबद्दल ही काही दिसत नाही (गाभ्रीचा पाउस मधेही नव्हते).

एकूण एकदम बघण्यासारखा आहे. फक्त मूळ प्रश्न सर्व बाजूंनी मांडणे आणि त्यावर काही उपाय सुद्धा सुचवणे हा चित्रपटाचा उद्देशही दिसत नाही. तेव्हा त्याला त्या लेव्हलला चढवायची काही गरज नाही असे वाटते.

इंसेप्शन बघितला, डीटेलिंग फार सही !!!
अश्विनीमामी, एका वेगळ्याच अर्थासाठी तुम्हाला धन्यवाद.
पण शेवट किती ओपन ठेवलाय .......

काल गॉडफादर कन्फेशन्स २ पाह्यला. अर्थातच झी स्टुडिओ वर.
छोटा व्हितो एका रूममधे येऊन बसतो. खिडकीतून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसतोय आणि इकडे खुर्चीवर छोटा व्हितो बसतो. पाठमोरा. आणि एक धून गात रहातो. स्वतःला रमवण्यासाठी. नुकताच त्याने बापाचा मोठ्या भावाचा आणि आईचा खून पाह्यलेला असतो. नंतर सिसिलीहून अमेरिकेपर्यंत डॉन चिचिओपासून पळून आलेला असतो. आणि असा छोटा इमिग्रंट ही धून गात असतो. तीच ती गॉडफादरची सुप्रसिद्ध धून. १०-११ वर्षाच्या मुलाच्या किनर्‍या आवाजात. ...... अंगावर काटा..
रॉबर्ट डि नीरो.... ओहोहोहोहोहोहोहोहोहोहोहोहोहोहो!!!!
कमाल दिसलाय, आवाज, चेहरा...
ब्रॅन्डोचा फ्लॅशबॅक एकदम करेक्ट.
आणि मरिन्स जॉइन करणारा ते बायकोच्या तोंडावर दार बंद करणारा मायकेल अर्थात पचिनो...
फ्रॅन्की पॅन्टेजेलीचा टर्न अराउंड अ‍ॅमेझिंग.
नंतर टॉम हेगन आणि फ्रॅन्कीचा संवाद... उफ्फ कोल्ड ब्लडेड म्हणजे काय याचाच दाखला....
काळाच्या कोलांट्याउड्या महान.

कोपोला हा देव आहे आणि पुझो दुसरा एक देव हे परत एकदा पटलं!!! Happy

एक गंमत. या गंमती मधे मधे इन्सर्टस म्हणून येतात स्क्रीनवर.
गॉडफादर २ शूट करत असताना जो तरूण व्हितो चा काळ दाखवलाय त्यात सगळ्या वर्कर लोकांच्या पॅंटसना आधी झिपर्स होत्या. मग कोणीतरी सांगितलं की झिपर्स या काळात अस्तित्वातच नव्हत्या. हे लक्षात आल्यावर परत नवीन पॅन्टस बनल्या आणि नवीन शूट केलं गेलं. त्यामुळे अर्थातच पॅन्टस वेगळ्या दिसतात.
मला भरूनच आलं हे वाचून. नाहीतर आमच्याकडे मोगल काळ असो नाहीतर स्वातंत्र्यपूर्व काळ असो. ढळढळीत दिसणारं सिंथेटिक वापरायचं आम्ही सोडत नाही. आणि दिग्दर्शकाला त्याची काही पडलेलीही नसते.

पीपली लाईव्ह पाहिला, आवडला. एकदा नक्कीच पहाण्यासारखा. सटायरचा चांगला नमुना आहे. हसूही येत असतं, आणि त्याचबरोबर आपल्याकडे हे असंच होत असतं हे डाचतही असतं. सिनेमात प्रत्येक घटक, व्यक्ती हा स्वतःचा एजन्डा, स्वतःचा संकुचित स्वार्थ लक्षात ठेवूनच वावरतो. मीडिया, राजकारणी, प्रशासक, पोलिस, स्थानिक नेते, नत्था, बुधिया, नत्थाची बायको, आई, गावातील इतर लोक..... प्रत्येकाला स्वतःचे दुकान कसे चालेल, स्वतःच्या हितसंबंधांचे रक्षण कसे होईल ह्याचीच क्षिती आहे. माणसाचं आणि त्यातल्या त्यात गरीबाचं मरण किती स्वस्त आहे हे पाहूनच मन विषण्ण होतं. स्वयंसेवी संस्था व नागरिक नुसते शहरांमधून निदर्शने करतात, स्थानिक पातळीवर काहीच अ‍ॅक्शन घेत नाहीत हे काही पटले नाही. गावकर्‍यांची भूमिकाही नुसती बघ्याची दाखवली आहे. मिळालेल्या संधीचा वापर करून ते उलट चार पैसेच कमावतात. त्यांची ही असंवेदनशीलता किंवा मुकेपणाही खटकतो. बाकी छायाचित्रण, संगीत, अभिनय इत्यादी बाबतीत चित्रपट मस्तच! चित्रपट बघून बाहेर येताना नक्कीच आपल्या भरकटलेल्या सिस्टीमचा, भ्रष्टाचारी नेत्यांचा, टीआरपीच्या स्पर्धेत नैतिक मूल्ये हरपलेल्या मीडियाचा आणि ह्या सर्वात आपल्या रोलचा विचार मनात रुंजी घालत रहातो. आपल्या उपरोधातून अस्वस्थ करत रहातो.

येस्स, मी पण पाहिला गॉडफादर -२
कथा तर अप्रतिम आहेच पण नव्या-जुन्या काळाची जी 'सीमलेस' गुंफण केली आहे,त्या एडीटींगला सलाम.
साधारणपणे सीक्वेल मूळ सिनेमाची उंची गाठू शकत नाहीत पण हा मात्र अपवाद आहे.
माफियावरचा सिनेमा असला तरी कुठेही त्याचे उदात्तीकरण होत नाही, हे सर्व भयाण आणि करुण आहे याची सतत जाणिव होत राहते. अर्थात असं वाटण्यामागे या सिनेमाच्या संगिताचा प्रचंड वाटा आहे.
अल पचिनोला शंभर सलाम, असली काँप्लेक्स व्यक्तिरेखा साकारणे हे निव्वळ अदभुत काम आहे.

Pages