मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दहावीला चांगला रिझल्ट लागला म्हणून पेढे वाटत होते. माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या आईवडिलांना पेढे देऊन खाली वाकून नमस्कार केला आणि मग तसाच हातासरशी मैत्रिणीला पण केला .......

दहावीला चांगला रिझल्ट लागला म्हणून पेढे वाटत होते. माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या आईवडिलांना पेढे देऊन खाली वाकून नमस्कार केला आणि मग तसाच हातासरशी मैत्रिणीला पण केला .......>>>>

याच्या उलटा प्रकार आमच्याकडे झाला होता. धाकट्या काकांच्या लग्नानंतरची गोष्ट. लग्नानंतर दोघे नवराबायको घरातल्या मोठ्यांच्या पाया पडत होते. मी आई आण्णांच्या शेजारीच बसलो होतो. काका काकु माझ्या आई-आण्णांच्या पाया पडून पुढे सरकले आणि मी लगबगीने माझे पाय मागे ओढून घेतले. ते बघितल्यावर नवी काकू जी काही पोट धरून हसायला लागली....
मग माझ्या लक्षात आले काय झाले ते... Proud

मी एकदा मित्राच्या घरी (दसर्‍याला) सोने द्यायला गेलेलो. मित्राला सोने दिले, नि गळाभेट घेतली. नंतर काकुंना, म्हणजे मित्राच्या आईला सोने दिले. नि....... तुम्हाला कळलंच असेल. पण मलाही लगेच कळ्ळ्याने मी आवरतं घेतलं Proud पण हे मित्राच्या बहीणीला जाणवल्याने ती खो खो हसत सुटली. आजही त्याच्या कडे गेल्ल्यावर ती आठवुन आठवुन हसते. पाया पडणे, एक वेळ ठिक आहे हो, पण गळाभेट... Uhoh

मी गडबडीत काल माझी छत्री रिक्षात विसरलो....आज जाताना एका ऑफीस कलीगची उधार घेवुन गेलो... आज ती पण रिक्षात विसरलो..

मला फारच बोर होतय..

अयाईगं ! मल्ल्या...त्या मित्राने तुला पुन्हा घरातच कसे घेतले हा प्रश्न आहे.... Rofl

अयाईगं ! मल्ल्या...त्या मित्राने तुला पुन्हा घरातच कसे घेतले हा प्रश्न आहे...
कदाचीत त्याने माझा वेंक्यु आधीच ओळखला असेल.. Uhoh

मल्ल्या, तुझा वेंकिस्सा वाचून मला काही महिन्यांपूर्वी माझा झालेला असाच एक वेंकिस्सा आठवला. पुण्यातील एका कार्यक्रमाला मला माझे नाशिकचे बरेच दोस्त लोक भेटले. त्यात माझ्या जुन्या मित्र मैत्रिणींचाही समावेश होता. तिघीजणी तर खूप दिवसांनी भेटल्यामुळे गळ्यातच पडल्या. त्यापाठोपाठ मुंबईच्या दोघी मैत्रिणी भेटल्या. त्यांचीही ''हाssssय'' करत गळाभेट झाली! मग त्यांच्याबरोबर आलेल्या, जुनी ओळख असलेल्या दोन - तीन फारिनर्स (आंग्ल युवती) भेटल्या. त्यांनी त्यांच्या पध्दतीप्रमाणे गळ्यात पडून माझ्या गालांवर आपले गाल टेकवून तोंडातून ''एअर किसेस'' चे आवाज काढले.... आता कल्पना करा, मी सलग सात-आठ मैत्रिणींच्या गळ्यात पडल्यामुळे माझा 'गळ्यात पडणे मोड ऑन' होता. नेमका आठवा माणूस समोर आला तो एक जुना मित्र होता, गावाकडचा, अगदी साधासुधा. कधी शेकहॅन्डदेखील न करणारा. मी गळ्यात पडणे मोड ऑन असल्यामुळे त्याचीही गळाभेट घेतली व एअर किसेस दिले!!! बिच्चारा.... इतका कानकोंडा झाला तो एकदम! आणि मलाही मग जाणवलं, अर्रर्रर्र!!! काहीतरी घोळ झाला इथं!!!! Uhoh Proud

अर्रर्रर्र!!! काहीतरी घोळ झाला इथं!!!!>>>>>.

अकु, अगदी मल्ल्या झाला असेल त्या बिचार्‍याचा Wink

<<अरे, मला फोन का नाही केला ?>>>

हे वाक्य मामींचे पेटंट आहे........ ये मामी नही "चाची" है.........
"चाची के पास मुश्किलों की सारी चाबियां है.........." Lol Biggrin

अमा Proud

@ चिमणराव

अमा नई यारो ... मैइ जैन्यादादाकु नई ... सलीम हौर जहांगीर कु मिलके आरु !
इस्माईलभाई के टेबल पे बैठे थे हम लोगा ... चारमिनारपे .. पिलानिंग चलरी थी उदर.
तीन टेम तो दियाच मैने .... जहांगीर की दुकान फूट गई मालूम ??

MallinathK | 12 August, 2010 - 15:03
मी एकदा मित्राच्या घरी (दसर्‍याला) सोने द्यायला गेलेलो. मित्राला सोने दिले, नि गळाभेट घेतली. नंतर काकुंना, म्हणजे मित्राच्या आईला सोने दिले. नि....... तुम्हाला कळलंच असेल. पण मलाही लगेच कळ्ळ्याने मी आवरतं घेतलं पण हे मित्राच्या बहीणीला जाणवल्याने ती खो खो हसत सुटली. आजही त्याच्या कडे गेल्ल्यावर ती आठवुन आठवुन हसते. पाया पडणे, एक वेळ ठिक आहे हो, पण गळाभेट...

प्रतिसादमी_आर्या | 12 August, 2010 - 15:26
अयाईगं ! मल्ल्या...त्या मित्राने तुला पुन्हा घरातच कसे घेतले हा प्रश्न आहे....

प्रतिसादअरुंधती कुलकर्णी | 12 August, 2010 - 16:00
मल्ल्या, तुझा वेंकिस्सा वाचून मला काही महिन्यांपूर्वी माझा झालेला असाच एक वेंकिस्सा आठवला. पुण्यातील एका कार्यक्रमाला मला माझे नाशिकचे बरेच दोस्त लोक भेटले. त्यात माझ्या जुन्या मित्र मैत्रिणींचाही समावेश होता. तिघीजणी तर खूप दिवसांनी भेटल्यामुळे गळ्यातच पडल्या. त्यापाठोपाठ मुंबईच्या दोघी मैत्रिणी भेटल्या. त्यांचीही ''हाssssय'' करत गळाभेट झाली! मग त्यांच्याबरोबर आलेल्या, जुनी ओळख असलेल्या दोन - तीन फारिनर्स (आंग्ल युवती) भेटल्या. त्यांनी त्यांच्या पध्दतीप्रमाणे गळ्यात पडून माझ्या गालांवर आपले गाल टेकवून तोंडातून ''एअर किसेस'' चे आवाज काढले.... आता कल्पना करा, मी सलग सात-आठ मैत्रिणींच्या गळ्यात पडल्यामुळे माझा 'गळ्यात पडणे मोड ऑन' होता. नेमका आठवा माणूस समोर आला तो एक जुना मित्र होता, गावाकडचा, अगदी साधासुधा. कधी शेकहॅन्डदेखील न करणारा. मी गळ्यात पडणे मोड ऑन असल्यामुळे त्याचीही गळाभेट घेतली व एअर किसेस दिले!!! बिच्चारा.... इतका कानकोंडा झाला तो एकदम! आणि मलाही मग जाणवलं, अर्रर्रर्र!!! काहीतरी घोळ झाला इथं!!!!

प्रतिसादप्राची | 12 August, 2010 - 16:51
मल्ली, मित्राच्या बहीणीला सोने दिलेत की नाहीत?

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

वरील सर्व Biggrin Biggrin Biggrin

@ निळू हैदराबादी..

क्या बाता कर्रे मियां
बैठे इम्साईलभाई के टेबला पे अन दुकाना फोडी जहांगीर की,,
किधर के किधर जारे ने तुम...
_____________________________________________

रच्याकने एखादा मालवणी सारख हैदराबादी पान चालु कराव का निळ्या... उगाच आपल टेम्पास

किधर के किधर जारे ने तुम...>>>

तबीच तो उनो हैदराबादी बोलते ना चिमणमिया, येइच तो खासियत होती ना उनाकी, अब अमाकोच लेव तो, अकुके बी पिच्छू पोच गयी ना उनो... Wink

मा की किरकरी...
इदर तो मैफिला बनरी...
मेकु तो खबराच नई थी इदर अप्ने इत्ते लोगा हुंगे करके...
क्या कत्ते विशाल चचा... खोलते क्या हाटेल अपनी भी एक... उदर बैठाकु जरा डिसकशना करींगे ..

अरे मेरेकु फोन करना था ना? मै ओल्ड सिटीमें फिर फिर के हलिमां पायां टेस्ट् कररी! आज जबरी वेंधळे पणा

सिनेमाचे तिकिट काढ्ताना त्या तिकीट देणारीला सांगितले आयेशाची दोन उद्याची व इन्सेपशनचे एक द्या.
तिने आयेशाची दोन उद्याची व आजचे एक इन्सेप्शनचे असे दिले हे मला तिथून निघून टर्न घेउन पुढे गेल्या वर कळले. मग ड्रायवर म्हणला मी आणून देतो. त्याला ते एक बदलायचे दिले. त्यांनी तिन्ही परत मागितली. परत त्याची चक्कर. मग त्याला उरलेली दोन तिकिटे दिली. मग त्याने तिथून फोन करवला. मग त्यांनी एक तिकीट दिले. पाच मिनिटाच्या कामाला अर्धा तास. तिथून बँकेत कॅश भरायला. कॅश बॅगेतून काढून आत दिल्यावर त्यांनी आम्ही कॅश घेत नाही म्हणून सांगितले. मग परत तिथून दुसर्‍या बँकेत. तिथे पैसे भरायच्या स्लिप्स संपल्या. डोके सरकणार नाही तर काय? त्यात ५० फोन. २० एसेमेस. डोक्याचे अगदी भजे होउन गेले.
अगदी फ्रायडॅ द १३ साजरा झाला.

अमा, आता काय कॉल सेंटर काढणार आहात वाटते Happy
सब समस्याओ का एकही जबाब कॉल करे १८०० अश्विनीमामी

>>कॅश बॅगेतून काढून आत दिल्यावर त्यांनी आम्ही कॅश घेत नाही म्हणून सांगितले.

कॅश न घेणारी कोणती बँक? त्यांच्या सेफ डिपॉ़झिट व्हॉल्ट मध्ये काय चिंचोके ठेवतात Uhoh

बघ कि नाही माझा चेहरा अगदी बघणेबल झालेला. त्यात श्रावणी शुक्रवार लक्श्मीचा वार. धंदा करणारे सर्व लोक ( मी ही) शुक्रवारी पैसे आले तर अगदी खूष होउन देवीला नमस्कार करतात. ( ओल्ड इकॉनमीचे पाइक)
आणि ही एमेन्सी बँक. बंद पडेल नक्कीच थोड्या दिवसात. सर्व फोन अवघड वेळीच येतात.

१) पैसे ब्यागेत, आपण काउंटरपाशी स्लिप लिहितोय, पैसे काढ्णार्‍या टोकन धारी लोकांची गर्दी चिड्ते आहे
२) लिफ्ट मध्ये सामान ठेवताना/ लिफ्ट मधून उतरताना.
३ ) गाडीतून उतरताना हपिसात जायला दोनच मिनिटे असताना.
४) किराणासामान खरेदी करताना ( अरे ते तरी सुखाने करु द्याकि म्हातारीला पण नाही. नशीबातच नाही)
५) सिनेमाला गेल्यावर सीट शोधून बसताना अंधारात आणि हातात पेप्सी चा मोठा ग्लास व त्याला मॅचिन्ग पॉप कॉर्न्सचा ड्बा असताना.

अगदी फ्रायडॅ द १३ साजरा झाला.<<<<<<<मामी,काल तुमचं बॅड लक एकदमच खराब होतं Proud

Happy

हाय लोक्स!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
पान ८३ पासुन वाचायचेत वेंधळेपणा, माझ्या अनुपस्थितीत चांगलेच वेंधळे झालेत समंदे Wink इथे नोंदता येईल असा एंधळेपणा म्ह्या केला न्हाय बघा इतक्यात, सध्या कामा मंदी लई बिझ्झी बिझ्झी ना Happy

अमामी, अब ये फ्रायडॅ द १३ क्या व्हता है!!! कल तारीख १३ और शुकरवार था इसके वज्जो से क्या??????????????????? Happy

समू, आईशप्पत मला काल तुझी लै आठवण आली. तुझी पाठ दुखी कशी आहे? तू कशी आहेस. तू येईतो किल्ला लढवला बघ. आता सिव्हिण आली आणि गड झोपायला चाल्ला. Happy फोन करू नका रे.

थँक्यु मामी मी बरी आहे पण आजकाल वेपणा जरा नाही होत Sad तुम्ही वेपणा बाबत माझे वर जो ईश्वास दावला ते बद्दल पण थेंक्यु Happy

Pages