२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५-६ महिन्यांच्या बाळांकरीता या टीप्सः

१) solid food कधीपासून चालू करावे या साठी hard n fast rules नाहीत. तरी ५व्या-६व्या महिन्यापासून चालू करायला हरकत नाही.

२)बाळासाठी अन्न ज्यात बनवायचे व ज्यातून भरवायचे (उदा. पातेलं, डीश, वाटी, भांडं, चमचा, बाटली etc) याबाबतीत आत्यंतिक स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. बाळाचे अन्न बनविण्यापूर्वी व बाळाला भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जी व्यक्ती भरवणार त्या व्यक्तीने नखे कायम कापलेली ठेवावीत.

३) बाळासाठी भांडी उकळून घेतलेली कायम चांगली. बाळाला दिवसभरात भरवण्यासाठी जी डीश, चमचा, बाटली, वाटी etc लागत असेल ते सर्व बुडेल इतके पाणी एका मोठ्या पातेल्यात घेऊन मिनिमम ३० ते ४० मिनिटे उकळणे आवश्यक आहे. (माझ्या डॉ. च्या म्हणण्याप्रमाणे इतका वेळ उकळले तरच पाण्यातील बॅक्टेरीयाज पूर्णपणे नामशेष होतात.)

४) बाळासाठी सूप, ज्यूस वै. ज्या पाण्यात बनवायचे असेल ते पाणीही मिनिमम ३० ते ४० मिनिटे उकळून गार केलेले व गाळून घेतलेले असावे.

५) लहान बाळांचे अन्न प्रवासात कॅरी करण्यासाठी हल्ली बाजारात बरेचशी utensils मिळतात. आकर्षक / दिखाऊ व स्वस्त वस्तुंची खरेदी करू नका. स्टील किंवा फूडग्रेड मटीरीयल प्रेफर करा. (याबाबत कुणाला नीट माहीती असेल तर शेअर करा प्लीज. मी स्वतः शक्यतो अजूनतरी चांदीचे भांडे व चमचा वापरतेय राजसला भरवण्यासाठी.)

६) बाळाला कुठलाही नवा पदार्थ देण्यासा चालू करताना सुरुवातीला १ टी-स्पून पासून देण्यास सुरुवात करावी. मग हळू हळू दर दिवशी प्रमाण वाढवत न्यावे. त्यामुळे बाळाला नवीन introduce केलेला पदार्थ पचतोय की नाही हे कळू शकेल. Apply '4 day' rule. म्हणजेच सलग ४ दिवस तोच पदार्थ देऊन अ‍ॅलर्जी आणि पचणे याची परीक्षा होईल. तसेच एकाच वेळेला एका पेक्षा जास्त नवे पदार्थ introduce करू नका.

७) बाळासाठी ताजे बनवलेले अन्न कधीही चांगले. परंतु काही कारणांनी दिवसभराचे अन्न सकाळीच बनवून ठेवावयाचे झाल्यास (विशेषत: आपल्या बाळांना पाळणाघरात सोडणार्‍या आईंच्या केसमध्ये) केल्या केल्या लगेच गार होऊ द्यावे व फ्रीज मध्ये ठेवावे. बाळाला भरवायच्या वेळेला गरम करून द्यावे.

८) बाळाला भरवून झालेला पदार्थ उरल्यास नंतर थोड्या वेळाने भरवण्यासाठी तसेच राहू देऊ नये. त्या पदार्थाचा बाळाच्या लाळेशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे त्यात बॅक्टेरीया introduce झालेले असतात त्यामुळे ते अन्न तसेच preserve करून ठेवल्यास बॅक्टेरीयांची वाढ होते. कुणीतरी लगच्या लगेच संपवून टाकल्यास उत्तम. instant food (जसे की नेस्टम किंवा सेरीलॅक etc) तर मूळीच असे ठेवू नये. उरले तरी फेकून द्यावे.

९) बाळाला solid food भरवायला सुरुवात केल्यानंतर बाळाच्या शी चा रंग व वास बदलू शकतो, जे नॉर्मल आहे. एखाद्या अन्नपदार्थाने खडा होतो आहे असे वाटले तर लापशीसारख्या पदार्थांचे प्रमाण आहारात वाढवावे. उकळून गार केलेल्या पाण्यात थोडी साखर विरघळवून ते पाणी अधून मधून चमचा-२ चमचे (टी-स्पून) असे पाजावे. अर्थात आपल्या डॉ. चा सल्ला घ्यावाच.

१०) बाळाला अन्न भरवण्यापूर्वी त्याची चव आणि तापमान याचा अंदाज घ्यावा. विशेषतः चांदीचा चमचा जास्त पटकन तापतो व बाळाच्या ओठांना तसेच जीभेला पोळू शकते.

बाळ १ वर्षाचं झालं की तो आपल्या बरोबर खायला लागला पाहीजे ,

शिरीन ज्या पाळणाघरात असते तिथे सगळं खाते ( डोसा ,इडली , पोहे , उपमा , मॅगी , धिरडं , घावन , थालीपीठ , पोळी-भाजी , पराठे , वरण-भात , पुलाव , खीर , अप्पे , भेळ , शेव-पुरी , लाडू)

त्यामुळे आम्हाला आता तिच्यासाठी असं वेगळं काही करावं लागत नाही.

भांडी उकळणं आम्ही नाही करत , प्रतिकारशक्ती वाढायला हवी हळूहळू , पाणी फक्त उकळून देतो तिला

भांडी उकळणं आम्ही नाही करत >>> येस्स. मी पण राजस १ वर्षाचा झाला की भांडी उकळणं बंद करणार आहे. पण अगदी लहान बाळासाठी भांडी उकळलेली बरी.

नाचणीची खीर/नाचणीचं सत्व (कॅल्शियम साठी हे उपयुक्त आहे):
दूधात नाचणीचं सत्व (सुरुवातीला १ चमच्यापासून सुरुवात करून १ वर्षाचे होईपर्यंत ३ चमचे घ्यावे) व अंदाजे १-२ चमचे साखर घालून व्यवस्थित ढवळून घ्यावं. गॅसवर मंद आचेवर ठेवून सतत ढवळत रहावं. २-४ मिनिटांत दाट होते. यात शिजवताना ड्रायफ्रूटची पावडर + वेलची पावडरही घालू शकता. पण अगदी ५-६ महिन्याच्या बाळाला प्रथम हा पदार्थ introduce करताना नुसतं नाचणीचं सत्व व साखर चालेल. पचायला लागले की ड्रायफ्रूटची पावडर + वेलची पावडर ट्राय करायला हरकत नाही.

नाचणीचं तयार सत्व बाजारात मिळतं. आमच्या इथे २ उत्पादकांचं मिळतं
१) सोहम चं साखरविरहीत नाचणीचं सत्व - याची चव दूधट लागते. व दाटपणा चांगला येतो.
२) पूर्णानंदचं साखरविरहीत नाचणीचं सत्व - याची चव जरा चॉकलेटसारखी लागते. हे दाट होत नाही पटकन.

मी ही दोन्ही सत्वे आणून मिक्स करून ठेवलीत. ते राजसला आवडतंय.

निंबुडे, कणकेची खीरही अतिशय पौष्टिक असते. साखरे ऐवजी गूळ घालून खमंगही लागते, नाचणीच्या खीरीसारखीच करायची.
तसंच, मुलांना ६-७व्या महिन्यानंतर अवश्य पंचामृत द्यावे (दही-अगदी शास्त्रापुरतं, दूध, मध, तूप, साखर)... चांदीच्या वाटीत किमान अर्धा तास तरी करून ठेवावे आणि शक्यतो दुपारच्या झोपेनंतर द्यावे.. हाडं बळकट होतात. आणि हे तुम्ही पुढे कायम चालू ठेऊ शकता. Happy

मुलांना मध वर्षापर्यंत देउ नये असे इथे (अमेरिकेत) डॉ सांगतात. का ते नक्की माहित नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

डेलियाला अनुमोदन. मध, साखर किंवा साखरेचे Composites देऊ नका असे अमेरिकन पुस्तकांत What to expect the first year वगैरेंमध्ये आवर्जून सांगीतलेले असते.
आणि आपल्या इथे अंग्ठीने मध चाटवण्याची परंपरा आहे.

मी वर्षानंतरच सुरु केल होत पंचांमृत द्यायला... सेम कारण .... इथे ही तेच सांगितले होते का मध देऊ नये म्हणुन..

अमेरिकेतल्या आणि आपल्या भारतातल्या पद्धतीमधे खूपच फरक आहेच...

तिथे बाळ जन्मल्याच्या पहिल्या तासापासूनच डायपर वापरायला लावतात, आपल्याकडे अगदी गरज असेल, म्हणजे काही समारंभ, बाहेर जाणं तरच डायपर्स वापरतात.

तसंच असेल मधाच्या बाबतीत... आपल्या आज्या-पणज्यांपासून सोन्याच्या अंगठीने मध चाटवण्याची प्रथा आहे जन्मल्यापासून ३र्‍या दिवशी.... आत्तापर्यंत तर कुणाला त्या गोष्टीमुळे धाड भरली आहे असे ऐकिवात नाही. Happy

तिथले डॉक्टर्स तर बाळगुटी चं नाव ऐकून च झीट येऊन पडतील पण आपल्या इथली बाळं गुटी पचवून अगदी सणसणीत असतात. Happy

माझ्या माहितीत मधा मधे बोट्युलिझम चे बॅक्टेरियल एंडोस्पोअर्स असतात. बाळाच्या नाजूक पचनसंस्थेवर त्याचे दुष्परिणाम होतात. पण आयुर्वेदात जन्म झाल्या झाल्या मध चाटवायला सांगतात. ( मला ह्यावर आयुर्वेद तज्ञांकडून जास्त माहिती मिळवायला आवडेल्.म्हणजे मधाचे स्वतःचे असे काही गुणधर्म आहेत का जे उपयुक्त असतात की मध हे एक व्हेहिकल म्हणून वापरलं जातं गुटी किंवा सुवर्ण हिरक ईत्यादी औषधांसाठी? कारण जर व्हेहिकल असेल तर बाळाच्या खाद्यातूनही जसे की दूध ईत्यादीतून देता येईल.)

मंजे Happy
मला वातत, वेगवेगळ्या मध प्रोसेस करण्याच्या पद्धती, मधाचे मिळणारे विविध प्रकार (इथे किमान १०-१२ प्रकारचे मध बघितले आहेत), त्या त्या देशातिल हवामान, जीवनप्रणाली इ इ वर हे सगळे डिपेंडंट असावे.

आम्ही, 'उगाच का विषाची परिक्षा घ्या?' या तत्वानुसार डॉक्टरचे म्हणने ऐकले आणि नाही दिला मध पहिले वर्षभर Happy

आम्ही पण उचकी लागली की मध चाटवतो राजसला. Happy
शिवाय दूधातल्या खीरी साखर नाही तर काय घालून बनवणार?

वर दिलेली नाचणीची खीर साखरेऐवजी गूळ आणि दूधाऐवजी पाणी घालून पण देता येते.

कणकेची खीरही अतिशय पौष्टिक असते. साखरे ऐवजी गूळ घालून खमंगही लागते, नाचणीच्या खीरीसारखीच करायची. >>> मंजे, नेहेमीची पोळ्यांची कणीक घ्यायची का? Uhoh मी बाजारात मिळते ते तयार गव्हाचे सत्व आणले आहे आणि तू दिलेल्या पद्धतीने पाणी + गूळ घालून बनवते. पण थोडेसे आंबट लागते. कारण गहू भिजवून नंतर वाळवून वै. बनवलेले असते ते गव्हाचे सत्व . त्यामुळे गूळ जरा जास्त घालावा लागतो.

मध न देण्याच कारण तिथल्या बाळांच्या अ‍ॅलर्जीशि आहे. मधात कुठलेसे बॅक्टेरिया असतात ते तिथली मुल पचवु शकत नाहित म्हणुन. आपल्या इथल्या मुलांना तो प्रॉब्लेम नसावा /नाही.
अजुन कुणि इथे लिहिल नाही म्हणुन लिहिते सगळ्या भाज्या (म्हणुजे एका वेळि एकच) उकडुन किंचित कुस्करुन द्यावी मुलांना. अगदि कारल सुद्धा चाटवाव कधि कधि. त्यामुळे नविन चवींचि ओळख होते. लहानपणिच नवनविन चवि चाखवाल तितक बाळाच्या वाढिसाठि चांगल.
१ वर्षा पर्यंत फार मीठ साखर न घालता द्याव, म्हणजे ओरिजिनल चवि घेण्याची क्षमता वाढते.
फळ सुद्धा अगदि गाळुन रस न करता कुस्करुन अगदि मऊ करुन द्यावी
बाळ काहिहि खाताना नेहेमी समोर बसावे.

मध आणि हळकुंड उगाळुन मी येशा ३ महिन्यांची असल्यापासुन द्यायचे खोकला आला जी. गुटी मात्र वर्षभर दिली.
सिरियल्स (अ‍ॅपल आणि राईस) मुले आवडीने खातात. मेतकुट भात, मऊ खिचडी पावसाळ्यात चांगली. शक्यतो जड पदार्थ पोळी भाकरी सारखे टाळावेत पावसाळ्यात.
हिवाळ्यात दुध्-हळद द्यावी रोज.

मी घरात बडीशोप + जिरं + थोडासा ओवा यांचे वस्त्रगाळ चूर्ण बनवून ठेवले आहे. त्यात हिंग व सैंधव मीठ घालून एका हवाबंद डबीत ठेवायचे. बाळासाठी मऊ खिचडी (मूग-तांदळाची etc), भाज्यांचे सूप्स इ. बनविताना थोडीशी टाकल्याने चव येते त्या त्या पदार्थाला.

निंबे मी तर पोळ्यांची कणीक तुपावर खमंग भाजुन गुळ घालुन खीर करायचे. गव्हाच्या शेवयांची खीर पण चांगली होते.

मी बाजारात मिळते ते तयार गव्हाचे सत्व आणले आहे आणि तू दिलेल्या पद्धतीने पाणी + गूळ घालून बनवते. पण थोडेसे आंबट लागते. कारण गहू भिजवून नंतर वाळवून वै. बनवलेले असते ते गव्हाचे सत्व . त्यामुळे गूळ जरा जास्त घालावा लागतो. >>>>अग त्या सत्वाच्या पाकीटावर लिहिले असते तसे सत्व पाण्यात आधि १० मि. घालायचे (पाणी थोडे जास्त घालुन) आणी मग नंतर वरचे पाणी काढुन टाकायचे.. त्याने आंबट पणा कमी होतो..आणी वरची फक्त आंब निघुन जाते सो फार असा जीवनसत्वाचा नाश होत नाही..

खीर देताना नाचणी सत्व पावसाळ्यात जरा थंड पडते म्हणुन मी अर्णवला अशा मिश्रणाची खीर द्यायचे..

प्रमाण : ४ वाट्या गहु , २ वाट्या नाचणी आणी १ १/२ वाटी डाळ
गहु - १० तास पाण्यात भिजवायचे आणी नंतर बांधुन ठेवुन मोड आणायचे.. थोडे मोड आल्यावर जरा सुकवुन खमंग भाजायचे (नुसतेच)
असेच नाचणी हि ५-६ भिजवुन, मोड आणुन भाजायची
आणी पंढरपुरी डाळ हि किंचित भाजुन घ्यायचे
मग हे सगळे एकत्र करुन दळुन आणायचे आणी रोज २ चमचे दुधात घालुन खिरी सारखे आटवुन द्यायचे..
याचा वजन वाढायला खुपच फायदा होतो..
ह्या मिश्रणाचा अभय बंगाच्या पुस्तकातहि उल्लेख आहे..ते याचा उपयोग कुपोषित बालकांना जीवन संजीवनी म्हणुन करायचे

पाण्यात आधि १० मि. घालायचे (पाणी थोडे जास्त घालुन) आणी मग नंतर वरचे पाणी काढुन टाकायचे.. त्याने आंबट पणा कमी होतो..आणी वरची फक्त आंब निघुन जाते सो फार असा जीवनसत्वाचा नाश होत नाही.. >>>
नाचणी सत्व पावसाळ्यात जरा थंड पडते >>>

ओहो, हे दोन्ही माहीत नव्हते. धन्स.

वर दिलेल्या नाचणीच्या खीरीच्याच कृतीसारखी सातूच्या पीठाची पण खीर करता येते.

कधी कधी आपल्या थालीपीठाच्या भाजणीच्या पीठात नाचणीचे सत्व अ‍ॅड करून पाणी व गूळ घालूनही लापशी करता येते. थालीपीठाच्या भाजणीत बर्‍याचशा डाळी आणि धान्ये असल्याने पौष्टीक होते ही लापशी. Happy

शिवाय १०-११ महिन्यांपासून नाचणीची भाकरी किंवा पोळीही दूधात कुस्करून साखर घालून देण्यास हरकत नाही.

शिंगाड्याच्या पीठाचे वेगेवेगळे काय काय पदार्थ बनवता येतील कुणाला काही आयडीया आहे का? म्हणजे पौष्टीक लाडू इ. सध्या मी नाचणीचे सत्व + शिंगाडा पीठ + चिमूटभर सोया पीठ + कधी कधी राजगिर्‍याचे पीठ अशी मिश्र पीठांची खीर देते त्याला अधून मधून.

हल्ली हल्लीच एका पुस्तकात वाचून दलिया ही अ‍ॅड करायला सुरुवात केलीये त्याच्या खिचडीत. खूप छान चव लागते या खिचडीची. रेसिपी देते थोड्या वेळात. Happy

मला सांगा दलियाची गोड खीर किंवा लापशी कशी करायची?

पंढरपुरी डाळ म्हणजे कोणती डाळ? >>> डाळं म्हणजे जनरली चिवड्यात घालतात बघ..फुटाण्याच्या दुकानात मिळते..साउथ चे लोक याची चटणी करतात..

Pages