२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.
मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.
सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
वरदा, वरणात दे पोळी कुस्करून.
वरदा, वरणात दे पोळी कुस्करून. थोडं तूप घालायचं त्याच्यात. माझ्या मुलांना आता सुद्धा आमटीत पोळी कुस्करून भारी आवडते.
Vegetable soup किन्वा कोनतहि
Vegetable soup किन्वा कोनतहि सूप मधे पोळी कुस्करून देता येते.
चालेल आता करतेच मी ट्राय
चालेल आता करतेच मी ट्राय वरणात पोळी घालून.
हो वरणात / + तुप + लिम्बु +
हो वरणात / + तुप + लिम्बु + आमटीचे पाणी असे कॉम्बीनेशन देता येतील. शिवाय दुधात, कढीत , ताकात अशी पण पोळी देता येईल.
शक्यतो पो ळी रात्री द्यावी म्हणजे मुले शांत व बराच वेळ झोपतात, शिवाय आयुर्वेदात ही रात्री पांढरे वर्ज्य सांगितले आहे. अर्थात मुलाना हा नियम पाळणे कठीण
वरदा, माझ्या पेडीने सांगितलय
वरदा, माझ्या पेडीने सांगितलय की, एकदा खाल्ल्यानंतर पुढची भूक तीन ते चार तासानंतर लागायला हवी म्हणजे पोट व्यवस्थित भरतय.
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वरणात पोळी दिली तर मस्त खातोय एकदम. वर सूप म्हणून वरण थोडं थोडं पितोय सुद्धा. जमेल तशा भाज्या त्यात कुस्करुन देतेय. थॅन्क्स. नंदिनी बरोबर ३-४ तास जातातच.
माझा मुलगा आता १.२ वर्शा चा
माझा मुलगा आता १.२ वर्शा चा आहे, अजुन हि तो रात्रि एकदा तरी उठतो, तेव्हा आम्हि त्याला दुध पाजवुन परत झोपवतो. पण मि कुठेतरी वाचल होत कि रात्री दुध पाजु नये झोपेत त्यामुळे दात खराब होतात, मग तो उठल्यावर त्याला काय देउ? या वयाचि मुल उठत नाहित का रात्री भुकेने?
माझ्या मुली ला गाइचे दुध
माझ्या मुली ला गाइचे दुध बिलकुल आवडत नाही. आणी योगुट बाधते आहे. सध्या इथे खूप थंडी आहे. आता कसे दुध देउ? एवढ्या सार-र्या चीझ मधले लहान मुलाना कोणते देता येते? माझी लेक आता २१ महीन्याची आहे.
हळद घलुन दे , घट्ट पेज बनव
हळद घलुन दे , घट्ट पेज बनव त्या घाल,
अवंतिका, झोपण्याआधी पोट भरेल
अवंतिका, झोपण्याआधी पोट भरेल असे जेवण दे. चपाती/भात्/वरण्/भाजी असे.
तुझ्या बाळाला बाटलीची सवय आहे का? असेल तर ती सवय सोडवणे गरजेचे आहे. बहुतेक मुलं भुकेने नाहीतर बाटलीच्या हुक्कीन उठतात
,
चालेल आता करतेच मी ट्राय
चालेल आता करतेच मी ट्राय वरणात पोळी घालून. >>> हरकत नाही. पण रोज रोज खाऊन बाळाला कंटाळा येईल. १ वर्षाच्या बाळाला घरी बनवलेले तुम्ही खात असलेले - बिनतिखटाचे किंवा किंचित तिखट चालेल) - पालकाची पातळ भा़जी(बेसनाऐवजी वरण घातलेली), रसदार भाज्या, इ.इ.
ताटलीत चतकोर पोळी काहीतरी लावून तुकडे करून द्यावेत, म्हणजे हाताने उचलून बाळ खाईल, अन टाईमपासही होईल
office सांभाळुन बाळांचा आहार
office सांभाळुन बाळांचा आहार कसा पौषीक बनवावा
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे
सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वरणात पोळी दिली तर मस्त खातोय एकदम. वर सूप म्हणून वरण थोडं थोडं पितोय सुद्धा. जमेल तशा भाज्या त्यात कुस्करुन देतेय>> किती गोड. चांगली सवय आहे ही.
आमची कार्टी नुटेला बाटलीतून डायरेक्ट चमच्याने गट्ट करतेय. तिला सांगते इथली माबोवरची बाळे किती शहाणी आहेत ते.
@नंदिनी, हो त्याला बाटली ची
@नंदिनी, हो त्याला बाटली ची सवय आहे.
पण आता ति कशी सोडवू? आणी हल्ली ४-५ दिवसापासुन तो खाण्याबाबतीत फार त्रास द्ययला लागला आहे. अजुन हि तो चावुन काहि खात नाहि. त्यला पुढचे वर ४ आणि खाली ३ दात आले आहेत. चावुन खाण्यासाठी काय करता येइल??
teether घे त्याच्या
teether घे त्याच्या साठी..
चपाती चे तुकडे, मुळा, गाजर आसे दे त्याला
खेळवत जेवण कर त्याचे नाहि तर खीडकीत बसव न खाउ घाल मी पण आसेच करते
अवंतिका मुलं उठतात रात्री.
अवंतिका मुलं उठतात रात्री. माझाही मुलगा १३ महिन्यांचा उठतो. पूर्वी भरपूर फॉर्म्युला लागायचा रात्रीही. आता उगीच थोडाच पीतो. काही दिवसांनी मी त्याला तो उठल्यावर थापटून परत झोपवणार आहे. (आत्ताही केले असते, पण तो सध्या अजुनही भरपेट जेवत नाही,त्यामुळे रात्री थोडेकाहोईना दूध लागतेच त्याला.) आणि हो दात येत असताना खायला त्रास देतो तो. पण पेशन्स न सोडता देतीय मी त्याला रोज काहीतरी. तूही तसेच कर. खाईल चावून काही दिवसांत.
इथल्या सल्ल्यांचा खूप उपयोग होतोय. नील आता बर्यापैकी खाऊ लागलाय. धिरडी,पराठे,शिरा,उपमा,खीरी,दुधसाखरपोळी,भाजी/वरण्/आमटी पोळी, आमटीभात, इडली-चटणी!.. आज तर तुप साखर पोळीचा रोलही खाल्ला चावून हळू हळू! :प्रचंड खूष बाहुली:

तो तर तोंडात घेतच नाहि काहि
तो तर तोंडात घेतच नाहि काहि सरळ टाकुन देतो. बिस्कीट, चपाती हातात दिली तर टाकुन देणार आणि जबरदस्ती ने भरवलि तर रडणे सुरु किवा उलटी
अगं हो ना.. अशीच करतात मुलं.
अगं हो ना.. अशीच करतात मुलं. आणि ती खात नाहीयेत पाहून आपली झोप उडते.. मी यातूनच गेले आहे रिसेन्टली! डोन्ट वरी.. हॅव पेशन्स!
(वजनाकडे लक्ष ठेव, अगदीच खात नाहीये वाटले तर पेडीयाट्रिशिअनशी बोल..)
माझ्या बाळाला तर गोड आवडतच
माझ्या बाळाला तर गोड आवडतच नाहि , ती फळं पण खात नाहि , जबरद्स्ती केल्यावर उलटी होते,, आज काल तर पित्त पण पडतय
(No subject)
माझ्या ८ महीन्याच्या मुलीचा
माझ्या ८ महीन्याच्या मुलीचा आहार खालील प्रमाणे आहे
सकाळी ६.३० - दुध
८.३०- रव्याची खीर
११.००- खीमटी पालक घालुन
२.००- दूध
४.०० -पोळी +दूध
६.००- ७.०० दरम्यान चिक्कू / सफरचद
८.३०-९.००- भात+वरण
नन्तर मागेल तसे दूध..
प्लीज बरोबर आहे का ते कूणी सान्गू शकेल का?????
दलिया आणि ओट हे ९
दलिया आणि ओट हे ९ महिन्यांच्या बाळाला दिले तर चालतात का? कशा स्वरुपात द्यावे?
सव्वा वर्षाच्या बाळाला
सव्वा वर्षाच्या बाळाला अहळीवाचे लाडू किंवा डींकाचे लाडू दिले ( कमी प्रमाणात ) तर चालतील का?
मधुरा माझी मुलगी सव्वा वर्षा
मधुरा
माझी मुलगी सव्वा वर्षा ची आहे. मी तिला अहळीवाची खीर पाजली ३-४ चमचे. पण ती खीर खाल्ल्यावर पातळ शी करते. म्हणुन मी दिली नाही.
- सुरुचि
मी आता मुलीला स्टफ पराठा ,
मी आता मुलीला स्टफ पराठा , पुरण पोळी, गुळ पोळी ई. देतेय रोज, तसेच ती चपाती वरण पण खाते (बारीक करता).
तिची पेडी. म्हणते की तिला भरवु नका ,ती खाईल पण ती फक्त चतकोर पोळी खाते हाताने.
बस्के, वरदा, मधुरा तुम्ही कुणी हा प्रयत्न करताय का?
काही नवीन खाउ असल्यास शेअर करा प्लीज .
पिहू , तु तिला भाजी पोळी
पिहू , तु तिला भाजी पोळी देतेस का?
जसे भेंडीची भाजी, गवारीची भाजी, टोमॅटोची चटनी , मटकी असे पोळीला लावून देतेस का?
हो चंपी , ती भेंडी , टो.च.
हो चंपी , ती भेंडी , टो.च. खाते.
या वयाच्या (१८ म.) मुलांनी किती खाल्ले पाहिजे १ चपाती /दीड चपाती ?
मी तिला सध्या चार वेळा खाउ देते (जेवण +खाउ) आणि २ वेळा दूध.
पिहू , अर्धी \१ चपाती ठीक आहे
पिहू , अर्धी \१ चपाती ठीक आहे माझ्या मते.(भुकेवर डीपेंड कधी १\ १\२.)
खाऊ घालने हा प्रकार भयंकर आहे ग ..एक -एक तास नुसते जेवनच चालते त्यांचे ...काम करुन इतके थकायला नाही होत जे खाऊ घालून
चंपी अगदी अगदी. खायचेच नसते.
चंपी अगदी अगदी. खायचेच नसते. दाताचा खुप त्रास होतोय त्याला. आता पोळी भात मुशी मुशी नको असतो आपल्यातला हवा असतो पण फक्त ६ दात आहेत त्यामुळे चावता येत नाही. त्यात दुधाची अॅलर्जी असल्याने खूप गोष्टी देता येत नाहीत. रोज पाककलेचा कस लागतो. व्हीडिओ बघत जेवतो तास तास. अगदी कंटाळा येतो. थंडीमुळे पोळी लगेच कोरडी पडते मग ती पण त्याला चावता येत नाही. काय द्यावं समजत नाही.
वरदा कधी कधी धिरड वैगरे देऊ
वरदा कधी कधी धिरड वैगरे देऊ शकतेस...... सगळी पिठ पण पोटात जातात आणि भाज्या पण.
Pages