२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*हल्लि माझ्या मुलाला (वय २२ महिने) ब्रेकफास्ट ला ब्रेड हवा असतो, सध्या मी त्याला ब्रेड भाजुन त्यावर लोणि आणि केचप लावुन देतेय, मध्ये एकदा जॅम लावुन ब्रेड दिला तर त्याने खाल्ला नाहि, जॅम मध्ये पोषण मुल्य काहिच नसल्याने मी हि नंतर प्रयत्न केला नाहि. त्याला ब्रेड ला लावुन देता येतिल असे हेल्दि स्प्रेड सुचवाल का?

पिहू , अग मि हि त्याला राईस सिरीयल देत होते पन आता खातच नाही तोंड गच्च बंद करुन घेतो. मि आता मूग डाळीचे पाणी देते (कधि कधि माझ्याकडून जास्त शिजल्यामुळे मि ते गाळणीतून गाळून घेऊन मग देते.) मि हे सकाळी देते आणि दुपारी फ्रुट्स देते द्र्राक्षे, मोसंबी डाळींब असे त्या जाळीत घालून द्ते, त्याला आवड्ते ते चोखायला. सफरचंद नाही देता येत त्या जाळीतून .आता थोडे थोडे व्हेजिटेबल सुरु करनार आहे.

तु किती वेळेस देते सिरीयल? आता खिमटी द्यायला हरकत नाही ना? तीचे प्रमाण कसे आहे मि विसरले?१वाटी मूग डाळ आणि २ वाट्या तांदूळ असेच आहे ना?

मल एक वर्शा मुलग आहे. तो एक - दोन पेन्द्खजुर खातो. चालेल का ... आरोग्या साथि चान्गले आहे का त्याच्या.

आता खिमटी द्यायला हरकत नाही ना? तीचे प्रमाण कसे आहे मि विसरले?१वाटी मूग डाळ आणि २ वाट्या तांदूळ असेच आहे ना? >>
चंपी, तुझं बाळ आता ५ महिन्यांचं आहे ना! मग हळू हळू पातळ अशी खिमट करून खाऊ घालायला हरकत नाही. पन फार दाट नको. शिवाय मिक्सर मधून वाटून घेशील तर उत्तम.
मी तरी मूग आणि तांदूळ यांचे समान प्रमाण घेतले. प्रमाण आपल्या मनावर चालते. फक्त डाळ जास्त आणि तांदूळ कमी असे नको. कारण डाळ पचायला तांदळापेक्षा जड असते आणि वातकरही!

मल एक वर्शा मुलग आहे. तो एक - दोन पेन्द्खजुर खातो. चालेल का ... आरोग्या साथि चान्गले आहे का त्याच्या.>>
मैथिली, तुमच्या मुलाला दात आले आहेत का?? चावून खाऊ शकतो का तो आता? तसे असेल आनि त्याला आवडत असेल तर खजुर (स्पेशली काळे खजुर. यात लोह जास्त असते आनि हा खजुर मऊ ही असतो) खायला द्यायला काहीही हरकत नाही. थंडीच्या दिवसांत खजुर चांगलेच!

याच धाग्यावर कुठेतरी ओट्स ची खजुर घालून केलेली खीरही दिली आहे. ती सुद्धा देऊ शकता.

hi

मला २६ dec ला baby angel पण तिचे वजन खुपच कमि आहे २.५ किलो

मला तिला टुमटुमित बनवायचे आहे

plz help

भाविका तुमची मुलगी खूपच लहान आहे . या वयात आईचे दुध हेच तिच्या साठी पुर्णान्न आहे.
तुम्ही यासाठी सकस आहार घ्या , म्हणजे तिला ही त्यातील सर्व घटक दूधातून मिळतील

भाविका,
रोजच्या जेवणात भरपूर भाज्या, फळे, दूध, चालत असेल तर अंडे / मासे / चिकन यातले एक काहीतरी असू द्या. व्हाइट ब्रेड / पास्ता /मैद्याचे प्रकार टाळावेत.

मूठभर शेंगदाणे / ३-४ बदाम /८-१० पिस्ता / ३-४ अक्रोड हे नियमित खा . फारसे तिखट / मसालेदार चमचमीत खाणे टाळा. दिवसभरात ८-१० ग्लास पाणी / ताक / जूस असे फ्लुइड्स घेतले पाहिजे. डॉ च्या सल्ल्याने मल्टि व्हिटामिन घेउ शकता.

निमिष आता ७ महिन्यांचा झालाय. Happy
खिमटी किती दिवस देतात? आता तुरीची डाळ दिलि तर चालेल का?
ड्राय्-फ्रुट्स ची पावडर खीरी मधून कधी पासून देऊ?
हळद्-तूप्-मिठ येवढेच टाकते मि सध्या . जिरे-पूड न ते कधी पासून टाकू?
चिकन- मासे कसे देऊ त्याला? चिकन्-सूप देते कधी.
अ‍ॅव्हॅकोडा आणि केळी सकाळी देते एकत्र मिक्सरमधून काढून. दुपारी खिमटीत भाज्या (लाल भोपळा, पालक, गाजर) घालून देते , ४ वाजता नाचणिची खीर साखर न घालता किंवा रव्याची खीर केळी- अ‍ॅपल घालून. रात्री काय देऊ ? मि द्राक्षे , डाळिंब देते जाळीत घालून.
मला रात्रीसाठी सुचवा ना वेगळे आणि पचायला हलके??
खालचे दोन दात ही आलेत त्याला Happy

चंपी दोन दात आलेत म्हणजे कसला गोड दिसत असेल ना...:)
तु आता खिमटीत ओवा, जिरे घाल. संध्याकाळी भाज्यांच सुप पण देता येइल अजुन काही सुचेल तर सांगते.

खिमट/डाळ तांदुळाची भरड करताना तु त्यात आता १-१ चमचा कडधान्य १चमचा ज्वारी/गहु अस घालुन भरड कर ह्या वयात ती पचते आणी जरा वेगळी चव पण येईल. पण डाळ-तांदुळाचे प्रमाण नको बदलु.
कधीतरी गुरगुटभात तुप,मीठ आणी थोडस मेतकुट घाल

मी लेकीला भाज्यांचे सुप देताना सगळ्या भाज्या आणी त्यात चमचाभर तांदुळ घालुन कुकर मध्ये शिजवून घेत होते आणी ते मिक्सर मधुन काढुन त्याला थोडस तुप-जिरेपुड ची फोडणी करुन घालत होते. छान लागत खुप.

थँक्स अनु Happy
मि सुरु करते आता घालायला जिरे -ओवा.
दात अजून खूप मोठे नाहीत झाले .छोटे-छोटे हेत.
भाज्यांचे सूप जरा दाट्सरच ठेऊ ना?

हो दाट ठेव म्हणजे पोट भरत
मी सुप करताना त्यात घरात असलेल्या भाज्या, टॉमेटो-बटाटा १-१ फोड आणी वर सांगितल्या प्रमाणे थोडेसे(१चमचा) तांदुळ दाटपणा येण्यासाठी. (कधीतरी चवित बदल म्हणुन भाज्यांमध्ये १ कांद्याची चकती घाल) हे सुप तु २-३ वर्षा पर्यंत देऊ शकतेस सगळ्याच प्रमाण वाढवुन. कुठे बाहेर जाणार असु तर गरम राहणार्या भांडात घेउन जाऊ शकतेस पोटभर होत.
आणि वर सांगितल्या प्रमाणे २-३ वर्ष वयात मधल्या वेळेला किंवा कधी संध्याकाळी काही हेवी खाल्ल असेल तर झोपायच्या आधी १ बोउल भरुन देता येत.

चंपी,
आम्ही हळुहळु खिमटी वरून खिचडीवर आलो होतो. म्हणजे पचते आहे असे कळल्यावर. पण मुग/तांदुळाचीच खिचडी, त्यात पालक आणि बीट किसून (लोहासाठी). साधारण ८व्या महिन्यापासून दुधात शिजवलेला मऊ भातही (त्यावर तूप) चालू केला.
तुरीच्या डाळीचे वरण/भात आणि कढी साधारण वर्षापासून सुरू केले होते.
दात लवकर आले. जसजसे दात येत गेले तसतसे सर्व फळं आणि सॅलड देत गेलो.
पोळीही देत गेलो. पण तिला कधीच कुस्करलेली पोळी आवडली नाही. मग सवय व्हायला पोळीचा एखादा तुकडा द्यायला लागलो. मग तीच हळुहळु पोळी खायला लागली.

रात्री फक्त द्राक्ष/डाळिंबांनी पोट भरतं त्याचं? दूधही देतेस का?

रैना, मला ही तेच वाट्तय त्याच पोट भरतय कि नाही म्हनूनच दुसरे काहीतरी द्यावे असे वाटतेय.
फिड करते ना नंतर.
योडी तु आणि इकडे? Happy जबरदस्त लिंक . थँक्स.

योडी Happy
अजून काही आयडीया द्या ना कुनी..संध्याकाळीकाय चांगल आहे?
अनु , काल दिले मि सूप, पन दुपारी आणि संध्याकाळी सेमच होते ना मग?

चंपी तु योगर्ट देतेस का? मी सुरु करणार आहे आता.
त्यांच्या आहारामधे सिरीअल्,फळे,वेजी,डेअरी असा पाहिजे.
मी तिला नॉन वेज सुप देत नाही तर दुसरे काय देता येइल?
मधुरा खुप छान आहे लिंक, थँकस अ लॉट Happy
आणि मधुरा तु त्याप्रमाणे प्युरी स्टोअर करतेस का?

परवा टिव्हीवर नव्यानेच बेबी फूड मिक्सी आणि त्याबरोबर स्टोअर करायला कंटेनर्स अशी अ‍ॅड पाहिली. ह्या कंटेनर्सला तारखांची डायलही होती ज्यायोगे कधी फूड स्टोअर केलंय ह्याचा ट्रॅक ठेवणं सोप्पं जाईल. पुन्हा आली अ‍ॅड तर नाव टाकते इथे.

मधुरा, छान लिंक थॅम्क्स.
पिहू, मि रेडीमेड प्युरीज मधलेच दिले त्याला अजून सेपरेट असे नाही. मि ही ट्राय करते आता.
हे संध्याकाळी दिले तर चालेल ना??
पिहू तु गुटी देतेस का अजून?

पिहू अगं माझं बाळ आता साडे चार महीन्यांचं आहे. मी तो ६ महीन्यांचा होईपर्यंत थांबणार आहे. शक्यतो रोज फ्रेश करण्याचा विचार आहे. कसे जमते त्यावर अवलंबून आहे.
सायो हे का? (मॅजिक बुलेट चे बेबी वर्जन)
http://www.babybullet.com/

चंपी योगर्ट रात्री देउ नकोस,
गुटी द्यायला वेळ नाही मिळत म्हणजे वेळ असतो पण ती रडते बर्यच वेळा मग सगळा पसारा ठेव्उन तिला घेउन बसावे लागते....गुटि अर्धवट्च रहाते.
मधुरा मी पण ताजे देतेय..खुप वेळ जातो त्यात.

सायो ये 'थँक्यु' मेरे लिये ? Uhoh

योगर्ट वगैरे शक्यतो सकाळी किंवा जास्तीत जास्त ४ वाजेपर्यंत द्यावे..म्हणजे त्रास होत नाहि..

रात्री साठी जरा मउ भात अगदी पाणी हि नाहि आणि शितेही नाहि असे करुन दे..म्हणजे छान पोट भरेल आणि मस्त झोपहि लागेल..

भात करताना त्यात रोज काहितरी (उडीद, मुग डाळ, भाजी) असे काहितरी एक घालावे म्हणजे दाट पणा पण येतो आणि सगळे घटक ही मिळतात

रात्रीसाठि नाचणी सत्व द्यायचे...त्याने खुप वेळ पोट भरलेले रहाते आणि कॅलशियम पण भरपुर मिळते ज्यामुळे दात येताना त्रास होत नाहि. माझ्या मुलीला गोड अजिबात आवडायचे नाहि तीला मी जिर्‍याची फोंडणी दिलेले नाचणी सत्व द्यायचे. नंतर तिखटपणासाठि ओवा वैगरे टाकायला सुरवात केली. मस्त खायची. तीला दातांचा अजिबात त्रास झाला नाहि.

Pages