२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

Submitted by निंबुडा on 6 August, 2010 - 00:49

२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार

बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्‍याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.

मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.

सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरदा, पोळीच्या ऐवजी कधी धिरडे, पराठे करुन बघ. पोळ्या करतानाच एखाद्या पोळीत भाजीचे सारण , बटाटा कधी पनीर, चीज भरुन पराठा कर, अगदी साग्रसंगीत पराठे नाही करायचे. मुले १/२ किंवा जास्तीत जास्त १ पराठा खाणार एका वेळेस.

मी शक्यतो जेवताना अथवा भरवताना टीव्ही लावून देत नाही. त्याऐवजी मीच वेगवेगळी बडबडगीते म्हणत तिला भरवते. मी खायला बसले की तिलापण एका प्लेटमधे तिला खाता येइल असे पदार्थ वाढून देते. पसारा करत का होइना तिचं ती खाते, त्यामुळे तिला आपण काहीतरी ग्रेट काम केलय असं वाटत राहतं. Happy त्यानंतर मी भरवलं तरी चालतं तिला.

तिला तिच्याच हाताने खायची सवय कर, असे मला माझ्या पेडीने निक्षून सांगितले होते. यामुळे मुलाना हँड आय कोऑर्डिनेशन जमायला लागतं म्हणे. मी प्लेटमधे चुरमुरे, उकड्या तांदळाचा मोकळा भात, पोळी/डोसा/पराठा इत्यादिचे तुकडे, बटाट्याची भाजी, बिस्कीटे, ब्रेड, जिलेबीचे तुकडे किंवा स्ट्रॉबेरीसारखी फळं घालून देते. अंगभर खाणं खाऊन झालं की मग तिला भूक असेल त्याप्रमाणे नंतर दहा मिनिटानी भरवते.

अजून एक, जबरदस्ती करून मुलाना कधीच भरवू नका. भुक असेल तित्केच मुले खातात. आज अर्धी पोळी खाल्ली तर उद्या चतकोरप खातील किंवा अख्खी पण खातील.

तुमच्या तिघींच्याही आयडीया ट्राय केल्या. २ दिवसापासून आवडतायत पराठे. २ त्रास देणारे दात बाहेर आलेत त्यामुळे पिल्लू एकदम रिलॅक्स आहे. पराठे मनापासून हाताने खातोय. काय धन्य वाटतय मला. तुम्हा सगळ्यांना धन्स.

सहीच वरदा! गुड जॉब !!! Happy

आमच्याकडे आता पोळी भाजीचे तुकडे खाणे सुरू झाले. भाताचे वेड कमीचे अजुन.. चालतंय!

वरदा, सही. आता त्याला स्वतःच्या हातानेच खायला एन्करेज कर. भरवत जा॑ऊ नकोस. आमच्याकडे वरणभात हाताने खाल्ला की स्वारी भयंकर खुश असते.

मी या महिन्यापासून सिपी कपची सवय तोडली आहे. ग्लासने दूध प्यायला देते. किर किर करत नाही, पण थोडा वेळ लावत लावत पिते.

बरं मला एक सांगा या वयात दुधाचं प्रमाण किती ठेवलय तुम्ही? आणि दिवसातून किती वेळा देता?

बाप्रे वरण भात हाताने म्हणजे कठीण काम पण हो पराठे हाताने जमतय. म्हणूनच कदाचित त्याला ते जास्त आवडतायत. बस्के सेम पिंच. भाताचं काही दिलं की दोन घासात जेवण संपतं. Happy
आमच्याकडे दातामुळे जेवण कमी म्हणून दूध ३ वेळा देते मी. ६ औंस चं फिडींग. बिचार्‍याला दूधाच्या अ‍ॅलर्जी मुळे बाकी प्रोटीन रिच फूड कमी मिळतं मग मी सोया मिल्क देते जास्तं थोडं. सकाळी उठल्या उठल्या एकदा, मग संध्याकाळी ५ -५.३० ला आणि मग रात्री मागेल तेव्हा. नीट जेवला तर उशीरा मागतो. अरे आमच्याकडे सिपी कप वर पण मजल जात नाहीये. त्याला त्याने अज्जिबात पिता येत नाही. अजून बाटली लागतेच. सिपी कप ने प्यायला दिलं तर स्पाऊट जोरात चावत बसतो. ते कसं काय जमवलय तुम्ही?

वरदा आता किती मोठा आहे ओंकार? आर्या साधारण सव्वा वर्षाची झाल्यावर मी तिला स्ट्रॉ द्यायला सुरवात केली होती. आधी पाण्यापासून सुरवात करायची. स्ट्रॉ ची गम्मत वाटते लहान मुलांना. शंभरचे पॅक मिळतात दुकानात. रोज स्वतःच्या हाताने पॅक मधून काढायला दिली स्ट्रॉ की आनंदच व्हायचा अगदी. आम्हाला कलर शिकायला पण मदत झाली.

सिपी कप ने प्यायला दिलं तर स्पाऊट जोरात चावत बसतो.>> सेम, अथर्व पण असच करतो Sad
मला पण सांगा बाटलीची सवय कशी बंद करु

प्रॅडी, मी पण अशीच सुरूवात केली होती. सिपी कप आणला तो पण स्ट्रॉ असलेला होता. धुण्याचा त्रास जास्त होता पण मग तिला सवय झाल्यावर बाटली बंद केली. साधारण वर्षाची असताना हळूहळू बंद केली.

तिला ग्लासने पाणी प्यायला शिकवलं तेव्हा एक अगदीच पिटुकला ग्लास आणला होता. तिचा ग्लास, तिची प्लेट चमचा असं सर्व तिचं तीच किचनमधून घेऊन येते. (म्हणजे मला समजतं भूक लागली आहे. Happy )

मला वाटतं काही मुलांना दाताचा त्रास कमी होतो काहींना जास्ती. ओंमकार १७ महिन्यांचा आहे पण ८ महिन्यांचा असल्यापासून टीदींग चा त्रास सुरु झालाय तो होतोच आहे. त्याने तो येणारी प्रत्येक गोष्ट वेड्यासारखी चावतो. मी स्ट्रॉ देऊन पण पाहिला पण तेच नुसताच स्ट्रॉ चावतो. दोन आत पाणि भरलेले टीदर चावून तुकडे तोडलेत त्याने. भयंकर प्रकार चालू आहेत. काय करावं काहीच कळत नाहीये.

माझ्या मुलीला ईअर इन्फेक्शन झाल्यामुळे ती सध्या काहीच खात नाहीये. डॉ म्हणाल्या की तिची भूक कमी होईल २-३ दिवसासाठी. अँटीबायोटीक्स आणि पेन रीलीव्हर चालु आहेत तिला सध्या. तिला खायला काय देऊ की ती खाईल?
मी स्टफ पराठे.वरण भात भाजी, नूडल्स्, पास्ता, उपमा,धिरडी सगळे देऊन पाहीले काहीच खात नाही. दूध+चपाती तिला आवडते ते पण खात नाहीये फक्त २-३ घास खातेय.फक्त दूध पीतेय. दही खाईल असा वाटतय पण दीले नाहीये, त्यामुळे जास्त त्रास होईल असे वाटतेय. काहीतरी सुचवा प्लीज

पीहू, तिला फोर्स करू नकोस काहीच खाण्याचा. ईअर इन्फेक्शन भयंकर वेदनादायी प्रकार असतो त्यांना. २-३ दिवस दूध, ज्यूस, खीर, अगदी मऊ भात असं तिच्या कलाकलाने दे. पण नसेल खात तरी काळजी करू नकोस. मूल खात नसेल तर बघवत नाही अजिबात पण ट्र्स्ट मी २-३ दिवसात तिचं खाणं सुधारेल.
दही द्यायला हरकत नाही. अँटीबायोटिक्स चालू असताना दही खावं असं आमचे डॉ सांगतात.

थँ॑क्यु बिल्वा खीर, दही देऊन बघते. हो इथे दही , आईस्क्रीम खाण्याला विरोध नसतो जितका देशात असतो अशा आजारपणाच्या वेळी. पण डोक्यात तेच बसलेले असते ना.

माझी मुलगी दिड वर्शाची आहे. तिच्या डॉक्टर नी तिला दुध बन्द सान्गितल आहे.
त्यामुळे मला तिच्या ब्रेक्फास्ट साठी दुध नसलेले पदार्थ सुचवा.
सद्या ती उकडलेल अन्ड खाते आणी आता तिची खीर बन्द झाली आहे.
धीरड, उपमा, दही पोहे हे सोडुन अजुन काय देता येइल तिला?
- सुरुचि

सुरुची१३, केळं - उकडलेला बटाटा - रताळं - चिक्कू - आंब्याच्या फोडी - द्राक्षे इत्यादी. तिला आवडणारी फळे छोटे छोटे तुकडे करून देऊ शकता. काकडी - गाजर - मुळा इत्यादी भाज्याही किसून / बारीक तुकडे करून किंवा तिला खाता येईल अशा प्रकारे देऊ शकता.

तांदळाची उकड, तांदूळ + मूगडाळीची सरसरीत पेज / भात किंवा गुरगुट्या भात - तूप - मेतकूट घालून.
रवा/ कणकेचा शिरा.
बिया काढलेले खजूर, सुकं अंजीर - मनुका ४-५ तास भिजवून.

भाज्या (दुधी, तांबडा भोपळा, घेवडा, टोमॅटो इ. इ.) + मूग डाळ एकत्र शिजवून त्यांचे दाटसर सूप (शोरबा)

कधी कधी बदल म्हणून इडली देऊ शकता. नाचणीची बिस्किटे, वेगवेगळे मऊ लाडू.

आहार पाककृती विभागात बर्‍याच पाककृती आहेत, एक मुलांच्या खाऊचा वेगळा बाफ आहे त्यात बर्‍याच आयडियाज मिळतील तुम्हाला.

इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे, मेदुवडे , भाज्यांचे पराठे , थालिपीठ, पोहे , ब्रेड अन पीनट बटर, ब्रेड अन न्युटेला,
हे सर्व प्रकार आमच्याकडे ब्रेकफास्टला चालतात.
फ्रेंच टोस्ट, पॅनकेक्स, वॉफल्स हे प्रकार पण देऊ शकता

नाचनी सत्त्व म्हणजे काय? मी मा़झ्या बाळाला नाचनीचे पीठ तुपात भाजुन, त्यात गाइचे दुध आणी गुळ टाकुन देते.

धन्स अरुन्धती आणि मेधा.
तांदूळ + मूगडाळीची सरसरीत पेज कशी करायची?

सुरुची१३, तांदूळ + मूगडाळ धुवून भाताला लागते त्यापेक्षा थोडे जास्त पाणी घालून व्यवस्थित शिजवायचे. काही जण अगोदर तांदूळ व मूगडाळ कोरडी भाजूनही घेतात. तांदूळ व मूगडाळ कच्ची राहता कामा नये. चवीला मीठाची कणी, आवडत असल्यास थोडेसे जिरे, तूप घालू शकता. गरम/कोमट पेज चांगली लागते. सोबत चवीत थोडा फरक म्हणून भाज्याही घालू शकतो.
किंवा तांदूळ + मूगडाळ यांचा भरडा काढायचा व त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून शिजवायचा. तूप, चवीपुरते मीठ घालायचे.

दूध प्यायला अजिबात आवडत नसेल तर, कशाकशात घालून ते देता येईल? ( गोड पदार्थ ही अजिबात आवडत नाहीत आणि भातातही घातलेलं कळतं त्याला. ) सकाळी ओटमील मध्ये घालते थोडं. आणि कणीक दुधात मळते. (सव्वा वर्षाचा आहे आत्ता आणि अजून दाढा आल्या नाहीयेत.)

मधुरा, दही, चीज देतेस का ? धिरड्याचं पीठ भिजवताना पण दुध घालु शकतेस.

वरदा, सिपी कप घेत नसेल तर कशाला सवय लावतेस ? बसायला लागला असेलच. हळु हळु छोट्या ग्लासनेच द्यायला सुरुवात कर. आता सवय लावण्यासाठी धडपड मग सोडवण्यासाठी धडपड.

दही, चीझ खातो तो डे केअर मध्ये.
धिरड्यांमध्ये घालून बघते. पण त्यात मी भाज्यांची प्युरे घालते, तर चालेल ना? की अतीच मऊ होतील.?

लहान मुलांसाठी पथ्याचे खाण्याचे प्रकार यासाठी वेगळा धागा उघडू की इथेच शंका विचारू?
राजस आता जवळपास अडिच वर्षांचा आहे. पोट बिघडले की डॉक्टर सांगतात की दूध व दूधाचे पदार्थ सर्वात आधी बंद करा. तांदळाची पेज / तांदळाची भाकरी / तांदळाचे खिमट / साबुदाण्याची वा आरारुटची पेज (पाण्यात बनवलेली - दूधात नाही) / सफरचंद - डाळींब ही फळे असे पदार्थ चालतील.
गहू पचायला जड म्हणून साबा त्याला पोळी भरवू देत नाहीत. पोट बिघडले असेल तर पोळी अजिबात द्यायची नाही का? वांग, बटाटा इ. भाज्या वातूळ म्हणून त्या वर्ज्य, डाळी पचायला जड म्हणून वरण- भात द्यायचे नाही. तांदूळ + मूगडाळ चालेल. शिवाय पालेभाजी खाऊनही पोट बिघडते तेव्हा पालक सूप इ. ही वर्ज्य. तसेच सफरचंद - डाळींब या व्यतिरिक्तची (चिकू तर नाहीच नाही) फळेही म्हणे वर्ज्य!

अशा प्रकारे लिमिटेड ऑप्शनच राहिल्याने दिवसभर वेगवेगळ्या चवीचे काय द्यायचे अगदी प्रश्न पडतो. डॉक्टरांचा औषधाचा कोर्स साधारण मिनिमम ३ दिवसांचा असतो. मग ३ दिवसांकरता हे खाण्याचे पथ्य पाळायचे असेल तर वेगवेगळे खाद्य पदार्थ कुणी सुचवू शकेल का?

इतक्या लहान मुलांचे पोट बिघडल्यावर कोणते खाद्य पदार्थ द्यावेत व नक्की कोणते वर्ज्य करावेत? साबुदाण्याची वा आरारुटची पेज पोटभरीची होत नाही. व सतत तीच दिली तरी नंतर आवडीने प्यायली जात नाही.

अ‍ॅलोपथी आणि आयुर्वेद यांच्या मते पथ्यातले वर्ज्य आणि चालणारे पदार्थ वेगवेगळे असतात. एक वेळ मोठ्या लोकांसाठी निरनिराळे खाद्य प्रकार एक्स्परीमेंट करणे शक्य आहे. इतक्या लहान मुलांच्या बाबतीत तसे करणे नको वाटते.

निंबुडा,पोट बिघडलय म्हणजे शी जास्त वेळा होतेय का? असं असेल तर केळं दे त्याला २ वेळा. बटाटा,गाजर शिजवुन प्युरी करुन दे. भरपुर पाणी पाज.जर ताप,अशक्तपणा नसेल तर औषधेपण द्यायची गरज नाहि.२-३ दिवसात जुलाब आपोआप थांबतात.
डाळ भात दहि,डाळिंब ,संत्री द्यायला काहिच हरकत नाहि.(उलट मी तर देच म्हणेन) पोटाला चांगलच आहे. चपातीपण कुस्करुन मऊ करुन द्यायला हरकत नाहि.

@निंबुडा,
तांदळाची धिरडी, तांदूळ + मूगडाळ / मूग पीठाची धिरडी, तांदूळ उकड, ज्वारीची उकड, रवा/ नाचणी/ हिरवे मूग डोसे, राजगिर्‍याची वडी/लाडू, लाह्या / लाह्यांचे पीठ लाडू करून, मेतकूट-तूप-भात, मूगडाळखिचडी,
त्याला पथ्याला चालत असणार्‍या भाज्या : उदा. दुधी, तां. भोपळा, भेंडी, घेवडा इत्यादीच्या फोडणी घालून केलेल्या सौम्य भाज्या नुसत्या.
मुगाचे कळण, चालत असणार्‍या भाज्यांची सूप्स / सार. (कोबी, गाजर, घेवडा, कॉर्न, टोमॅटो इ. भाज्यांचे सूप)
भाजणी चालत असेल तर भाजणीचे मऊ थालिपीठ. (भाज्या घालून)
वरईचे तांदूळ.
नाचणीची बिस्किटे.
इडली बहुतेक चालत नसेल. पण चालत असली तर भाज्या घालून, कधी फोडणी घालून इडली.
शहाळ्याची मलई चालत असेल तर ती.

पोट सारखं बिघडतंय का? नाजूक कोठा आहे का?

mazi mulgi 6 mahinyachi ahe 7 chalu zhaka ahe
me tula kay kay khayla dyav?
me tila tanul moogachi bharadi dete,mari biscuit dudhatun dete,kharik ani badamachi pud ghalun dudh dete ani madhe madhe breast feeding pan karate,til sadharan 2 tas jagi aste ani nantar 1 1/2 tari zopte

अकु, ठांकु. तुम्ही बरेच ऑप्शन्स सुचविलेत. Happy

पोट सारखं बिघडतंय का? नाजूक कोठा आहे का? >>> हो. जरा नाजुकच आहे त्याचा कोठा. अजुनही पिण्याचे पाणी उकळून गार केलेलेच द्यावे लागते. मध्यंतरी साध्या पाण्याची सवय व्हावी म्हणून पाणी उकळले नाही. तर लगेच पोट बिघडले. हल्ली तर डॉक्टर सांगतात की रेग्युलर पिण्याचे पाणी घरातल्या सर्वच मेंबर्स करीता उकळलेले चांगले. (घरात अ‍ॅक्वागार्ड नाही. Sad )

निंबुडा, बाळाचा नाजूक कोठा असेल तर घरात / बाहेर अ‍ॅक्वागार्डचे पाणी / उकळलेल्या पाण्याला पर्याय नाही. बाहेरचे पदार्थही शक्यतो टाळत जा. वेळेला ग्लुकोज - पार्ले / मारी बिस्किटे चालू शकतात.
सध्या श्रीजल सारखे पाण्यात घालून पिण्याच्या तयार नारळ पावडरचे पाऊचेस मिळतात. तोही पर्याय चांगला आहे बाहेर/प्रवासासाठी. आणि ग्लुकॉन सी/डी वगैरे तर आहेच. बाळाचे पोट बिघडले असेल तेव्हा बाळाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच खाऊ-पिऊ घाला. Happy

Pages