२ वर्षांपर्यंतच्या मुलांचा आहार
बाळ ५-६ महिन्यांचे झाले कि हळू हळू आपण त्याला दूधाव्यतिरिक्तचे अन्न पदार्थ द्यायला सुरुवात करतो. घरात वडीलधारी माणसे असतील तर नक्की कशापासून आणि किती प्रमाणात सुरुवात करायची या बाबतीत मार्गदर्शन मिळते. पण बर्याच आयांना (विशेषतः सेपरेट कुटुंबातील) ते कसे करावेत याची माहीती असेलच असे नाही. अन्यथा मैत्रिणी / पुस्तके / आंतर्जाल इ. वर हवाला ठेवावा लागतो.
मूल साधारण १ वर्षाचे झाले की त्याला आपण जेवतो ते सर्व अन्न पदार्थ (भाजी + वरणभात + पोळी etc) देता येतात. अर्थातच कमी तिखटाचे. ५ महिने ते २ वर्ष काय काय पदार्थ देता येतील, ते करण्याची कृती काय, कोणत्या वेळेला काय काय देता येईल, काय काय पचू शकेल,अजून दात न आलेल्या, किंवा २-३ दात आलेल्या १ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीचे स्पेशल खाऊचे प्रकार, मूल २ वर्षांचे होईपर्यंत हळू हळू आहारात बदल करून मोठ्यांसारखे सर्व अन्नपदार्थ खायला लागणे इ. बद्दलची माहीती व प्रश्नोत्तरांची देवाण-घेवाण करण्यासाठी हा बीबी! उपयुक्त टीप्स, खाऊ ज्यातून भरवायचा ती utensils etc या विषयीची माहीती ही शेअर करु या.
सर्व would be mothers ना आणि ज्यांची बाळे ५ महिने ते २ वर्ष या वयोगटात मोडतात त्या पालकांना हे फायद्याचे ठरेल असे वाटतेय.
माझी मुलगी पण आधी छान खायची.
माझी मुलगी पण आधी छान खायची. पण आता पहीला वाड्।दिवस झाल्यापासुन जरा नखरे सुरु केलेत.
खेळण्यात लक्श जास्त आणि खाण्यात कमी.
यावर एक उपाय म्हणजे थोड्या थोड्या वेळानी काही ना काही खायला देत रहाणे.
काहितरी खूप आकर्षक दिसणारे
काहितरी खूप आकर्षक दिसणारे फिंगर फूड देउन बघ.. म्हणजे साळीच्या लाह्या आणि बडीशेपेच्या गोळ्या एकत्र करुन.. किंवा तुपावर किंचित हळद -मीठ घालुन परतुन साळीच्या लाह्या, गाजर, बीटाचे उकडुन तुकडे, वेगवेगळ्या शेपची छोटी बिस्किटे म्हणजे सॉलिड खायची ईच्छा होईल..
आणि भात वगैरे एकदम खूप भुकेच्या वेळेला देउन बघ.. काहिवेळा फारशी भूक नसेल तर मग जास्त त्रास देतात मुले..
कधी कधी खुप भुक लागे पर्यन्त
कधी कधी खुप भुक लागे पर्यन्त वाट पहावी. आपल्यालाच वाटत रहात की किती वेळच उपाशी ठेवल आपण. पण त्याकडे दुर्लक्श कराव लागत. खुप भुक लागली की खातात मुल पटापट.
Mi ya site war navin sadyas
Mi ya site war navin sadyas aahe, khup chan mahiti aahe ithe
mazi mulgi 5 mahinyachi aahe, mala khup madat hoil ya mahitichi, sarvana dhanywad
>>>>>मला वाटतंय, मुळात
>>>>>मला वाटतंय, मुळात रांगायला यायला लागल्यापासून व एकंदरीत खेळणं वाढलंय तेव्हापासून भूक तर लागते, पण खाण्याइतका पेशन्स राहात नाहीये. कसं मॅनेज करावे? ७-८ महिन्यांचा होईस्तोवर इतका मस्त खात होता हा मुलगा
डीट्टो.
मी त्याला आयफोन वर युट्युब वर नर्सरी rhymes वै. लावून exaggerated हावभाव करून distract करते आणि मग तो खातो. ८०% वेळा हे काम करतं. नाहीतर मग काहीतरी नवीन वस्तू, जी त्याने आधी कधी पाहिली नसेल ती द्यायची. मग त्याच्याशी खेळत खेळत तो खातो, पण खूप भूक लगली असेल तरच.
जर तू त्यच्या पोटात काहीच जात नाहीये म्हणून थोड्या थोड्या वेळानी काही द्यायला लागलीस तर त्याला नीट भूकच नाही लागणार.
फिंगर फूड बद्दल सहमत. चीझ चे तुकडे, फळांचे तुकडे त्यांना आपलंआपण खायला आवडतं.
अजून एक म्हणजे, दात येताना त्यांना गार अन्न जस्त आवडतं, कोमट किंव गरम पेक्षा. आणि (आमच्या वरून सांगते )
आपली खिचडी, मऊ केळी किंवा घोटली तर ती त्याला गॅग होते. पण खिमटी नाही होत / उप्पीट नाही होत.
थँक्स सगळ्यांना.. करते ट्राय
थँक्स सगळ्यांना.. करते ट्राय सगळ्या गोष्टी.
काल तरी पालक मुगाची भाजी व भात जर्रा आवडीने खाल्ला. बघुया.
मी असं ऑब्झर्व केलय की जसा
मी असं ऑब्झर्व केलय की जसा ओमकार मोठा होतोय तसा त्याला जेवणात फार वेळ घालवायचा नसतो. लवकर जेवण संपवून खेळायचं असतं. भात नाही खात तोपण. मग मी तांदूळ पीठात डाळींची पिठं एकत्र करुन धिरडी करुन देते मऊ मऊ. ती पटकन संपतात मग महाशय पळायला मोकळे. तसं करुन पाहू शकतेस. सारखं नवीन काहीतरी शोधत रहायचं अजून काय. जाम कठीण आहे बाई.
आमच्याकडे सध्या "तुझ्याच
आमच्याकडे सध्या "तुझ्याच ताटातलं मला भरव" असा हट्ट आहे. त्यामुळे मी चपातीचा एक एक तुकडा भरवत भरवत जेवते.
चपाती हातात दिलीतर खाते. पण तूप साखर पोळी वगैरे नको, नुसती चपाती. एकदा स्वत:च जेवायला शिकव असा आईचा सल्ला ऐकून तिला छोट्या प्लेटमधे चपाती जॅम घालून दिला.
-
-
-
-
-
-
सर्वांगाला जॅम माखलेले फोटो काढून ठेवलेत.
पण खरंच तिला स्वतःच स्वतः खायला आवडतं चुरमुरे, पॉपकोर्न, लाह्या असलं काही देऊन बसवलं की मला आपला पंधरा मिनिटे निवांतपणा
नंदिनी कालच मी थोडं
नंदिनी कालच मी थोडं खाल्ल्यावर, वरण्भात सोपवला त्याच्याकडे.. पूर्ण वरणभात फेशियल व मसज केला त्यानी.. वाया तसंही जातंच एरव्ही, काल त्याने एन्जॉय केलं जाम!
वरदा धिरडी चांगली वाटत आहेत. करून बघते.. आता जरा बरा खायला लागलाय. निदान आ करतो तरी!
वरदा ह्याच धिरड्यांमधे
वरदा ह्याच धिरड्यांमधे पालेभाजी चिरून घालत जा. पोराच्या पोटात भाजी गेल्याचं तेवढंच समाधान मिळतं
पालक, माठ वगैरे भाज्या घालते मी धिरड्यात. कधी भोपळा किसून...
नंदिनी पॉपकॉर्न अत्ताशी देऊ नको. पटकन कधी गिळलं गेलं तर चोकिंग साठी किंवा इतक्या लहान वयात डायरेक्ट लंग्स मधे जाऊ शकतं म्हणून पॉपकोर्न, शेंगदाणे,द्राक्ष अशा आकाराने छोट्या आणी पटकन तोंडात न विरघळणार्या पदार्थांना आमच्या पेडीने मनाई केली आहे अजून तरी.द्राक्ष बारीक चिरून दिली तर चालेल म्हणाला.
धिरडयात डाळी, तांदुळ
धिरडयात डाळी, तांदुळ ह्याबरोबरच गहु,ज्वारी पिठ मिसळायच छान होतात आणि मुलांच्या पोटात सगळ्या गोष्टी जातात. मी पालेभाजी बरोबर बारीक चिरुन टॉमेटो,लसुण टाकायची (अगदी लहान असताना ह्याची पेस्ट टाकत होते)
आठवड्यातुन १-२ डब्यात लागतोच हा खाऊ आमच्या कडे.
आणि लेक लहान असताना दुध प्यायची नाही म्हणुन धिरड्याच पिठ दुधात भिजवायचे खूप छान चव येते ह्याने पण.
वय ८-९ महिन्यापासुन आता ६ र्षाची होईल अजून १महिन्यानी तरी धिरड हा आवडता पदार्थ आहे. (कोणत्याहि भाज्या घातल्या तरी आवडत)
हो हो कधी मधी दूध प्यायला
हो हो कधी मधी दूध प्यायला खळखळ केली तर मी पण धिरड्याचं पीठ दूधात मिसळून घालत असे धिरडी.वर्षाचं पीठ करून आणते मी. व्यवस्थीत टिकतं.
माझी कन्या ९ महिने पुर्न आहे
माझी कन्या ९ महिने पुर्न आहे मी तिला माझ्या आई कडे ठेवते.
मि तिच्या बरोबर सकाळि ९.३० पर्यंत आसते .तिच्या खाण्यात मला पोस्टीक पदाथ्र आणायचे आहे
सध्याचे तिचे टाईम टेबल
सकाळी उठल्या उठल्या
पेज..
मग आंघोळ- पेज किंवा खिमट;;;;;;;;;;;;;;;;९.३०
आई कडे चपाती वरण+ खिमट+ भात +ई
घरि ७.३० ला परत पेज -खिमट किंवा भात वरण
{९ महिन्याच्या बाळाचा आहार एक कामावर जाणार्या आई ने कसा छान बनवावा म्हणजे ति सुधरुड बनेल}
वर कोणि तरी लिहिले आहे भुकेले
वर कोणि तरी लिहिले आहे भुकेले ठेवा पण जास्त वेळ नका ठेवु. आमच्याकडे हा प्रयोग पुर्ण फसला आहे. खुप भुक लागल्यावर लेक एवढा चिडतो की फक्त दुध पितो. मग त्याला हि सवय लागली होती. कळाले होते की काही नाही खाल्ले की दुध मिळते सोप्पे काम. बर्याच प्रयत्नाने मी ति सवय मोडली मग.
प्रॅडी, पॉप कॉर्न देताना
प्रॅडी, पॉप कॉर्न देताना चुरूनच देतो तिला.
धिरड्याचं पीठ कसं बनवता? मी महिन्याची किंवा पंधरा दिवसाची भरडी करून ठेवते. डोसा/इडली/आप्पे असे पदार्थ ती बसून खाते. पण वरण भात किंवा पोळी ती अजिबात खात नाही.
फळामधे केळी आनि संत्र (ज्युस) चालतं पण अॅपल तिला कसंही दिलं तरी लगेच उलटी होते.
आता वर्षाची झाल्यानंतर तिला रोज किती वेळा आणि किती प्रमाणात दूध देणं अपेक्षित आहे?
मोनाली हेच होतं सेम नीलबरोबर.
मोनाली हेच होतं सेम नीलबरोबर.
Apple लहान मुलाना देताना
Apple लहान मुलाना देताना कालजी घ्या. It can cause diarrhea. I had given 2 spoons of apple juice to my eight months old daughter and she had a severe diarrhea. So wait for another six months.
दूधाच विचाराल तर, बाल मागेल तितक दूध द्या. अगदि ४/५ वेला. My pediatrician had advised up to 2000ml for 1 year old. Also, don't worry too much about lunch and dinner. One full meal in two days for one year old. Avoid junk food like biscuits chips etc. Don't feed them forcefully.
Don't follow diet charts given on the web sites. I think they are too aggressive,
Try different menu everyday. रोज वरन भात नाको, पोली दुधात कुस्करुन द्या. त्यात मध आनि तुप घालुन
चव छान लागते. रवा खीर, दलिया, भाज्यान्चे सूप.
Try to make tasty food for kids. We also like to eat tasty food, so how kids will eat food with less sugar or salt???
I am a mother of twins. They are now two year old. I have double headache when feeding them, so I keep trying different things and would like to share the same.
मला जरा सांगा किती द्यायचं.
मला जरा सांगा किती द्यायचं. पोळी दिली तर एका वेळी एक वर्षाच्या बाळाला किती पोळी देऊ. एक छोटी पोळी आणि दूध खाल्लं तर ३ - ३१/२ तास बाकी काही खात नाही हे बरोबर आहे का? का चत्कोरच पोळी देऊन त्याने प्रत्येक जेवणात भात आणि पोळी दोन्ही खायला हवं? सध्या तरी सकाळी पोळी संध्याकाळी भात असं चालू आहे हे बरोबर आहे का?
My typing mistake...not
My typing mistake...not 2000ml..It should be up to 800ml or 20 OZ ( as per baby's demand )
Its absolutely fine,if your
Its absolutely fine,if your baby eats roti in the morning and rice in the evening. Little baby may not be able to eat full meal like us. They are fuzzy eaters. माझी मूल कधी अर्धी पोली खातात तर कधी एक. मोजमाप नाहि, depends on appetite.
Also try fruits like banana, chikoo or boiled potato, carrot, brocoli.
@ वरदा कानिटकर, माझा मुलाला
@ वरदा कानिटकर, माझा मुलाला पण सकाळी पोळी संध्याकाळी भात असच चालू आहे. तो सुधा पोळी आणि दूध खाल्लं तर ३ - ३१/२ तास बाकी काही खात नाही. मला वाटत प्रत्येक जेवणात भात आणि पोळी दोन्ही दोन्ही खाउ शकत नाही.
मला वाटत प्रत्येक जेवणात भात
मला वाटत प्रत्येक जेवणात भात आणि पोळी दोन्ही दोन्ही खाउ शकत नाही.>> नाहीच खात. त्यापेक्षा एक वेळेला पोळी आणि एक वेळेला भात बरं पडतं. दोन्ही वेळेला काहीतरी वेगल्या भाज्याघालून देता येतं.
सखुबै मी परेशानच झाले दोन
सखुबै मी परेशानच झाले दोन लिटर दूध वाचून
ट्विन्स ना कसे बरे संभाळता तुमचे अनुभव लिहा ना.
किती दमत असाल सारखे करून. टेक केअर.
Apple लहान मुलाना देताना
Apple लहान मुलाना देताना कालजी घ्या. It can cause diarrhea. I had given 2 spoons of apple juice to my eight months old daughter and she had a severe diarrhea. So wait for another six months.>>>>>>>>>>>> माझा मुलगा ६ महिन्याचा असल्यापासुन १ सफरचंद रोज जवळजवळ रोज खातो.मी सफरचंद उकडवुन चमच्याने बारिक करुन देते.त्याला कसलाच त्रास नाहि झाला.कधी जास्त शीला होत असेल तर मी त्याला १ चमचा दहि देते. लगेच फरक पडतो.
Try to make tasty food for kids. We also like to eat tasty food, so how kids will eat food with less sugar or salt???>>>>>>>सखूबाई,मी थोडी असहमत आहे ह्यावर्.लहान मुलांना साखरेची सवय नसलेलीच चांगली. जर ते गोडच खायला मागत असतील तर फळं द्यावीत
@वरदा ... मी माझ्या मुलिला १२
@वरदा ... मी माझ्या मुलिला १२ वाजता १ पोळी (मेडीयम साइज) ची +दूध्+थोडी साखर्+तुप देते. आणि ३.३० किंवा ४ वाजता यो बेबी योगर्ट देते.ती जास्त वेळ झोपली तर ५ वाजता. तु ट्राय करुन बघ. चपातीतुन त्यांना जास्त कॅलरीज मिळतात त्यामुळे २-३ तास भूक लागणार नाही असे मला वाटते.
@Bhan I am not saying don't
@Bhan
I am not saying don't give apple to kids. I have shared my experience as I had no idea that apple can cause diarrhea. I tried to start apple juice as one of my friends suggested me. Her son is also eating apple at the age of six months. I gave it to both kids, but only my daughter had a severe diarrhea. She took two months to cure. So my point is if apple doesn't suit your kid wait for few more months. ( nandini's daughter is also having a problem with apple )
Regarding less sugar & salt: My brother in law is one of the top most pediatricians in Mumbai.।e He asked me ‘Would you like to eat food which doesn’t have enough sugar or salt? Then how can you expect your baby to eat it?’ Babies and toddlers are highly active and they definitely need sugar (1 or 2 teaspoons). Babies up to 1 year may eat whatever we feed, but toddlers refuse such food. My kids don’t eat food at all if they don’t like it.
Note: I am not advising anything, just sharing my experience.
अश्विनिमामी, अशाच चूका होतात,
अश्विनिमामी, अशाच चूका होतात, दोघाना सम्भालूण लिहीताना.

आणि मराठी फोन्त वाप्रायला नाकी नऊ येताहेत.
@Bhan I am not saying don't
@Bhan
I am not saying don't give apple to kids. >>>>>>>>> ते मला कळलं गं,मला पण हेच् सांगायचं होतं कि काहि बाळांना सफरचंद सूट होतं तर काहिंना नाहि.
माझ्याकडे नोव्हेंबरमध्ये
माझ्याकडे नोव्हेंबरमध्ये एक्सपायर होणारं नाचणी सत्वाचं एक पॅक आहे. सोहम उद्योगचं. आणल्यापासून फ्रीझमध्ये ठेवल्याने चांगलं आहे. इथे अमेरिकेत कुणाला हवं असल्यास संपर्कातून पत्ता पाठवा. मी आज किंवा सोमवारी पोस्टात टाकेन.
थॅन्क्स गं सगळ्यांना. हो हो
थॅन्क्स गं सगळ्यांना. हो हो अगदी ३ तास तर तो काहीच मागत नाही पोळी खाल्ली की. पोळी चावता मात्र अजून येत नाहीये. मग दुधात कुस्करुनच द्यावी लागतेय. काही गोड नाही असा ऑप्शन आहे का? वरणात कुस्करुन कुणी देऊन पाहिलेय का?
Pages