क्रिकेट

Submitted by महागुरु on 28 April, 2008 - 21:07

सर्व क्रिकेटप्रेमींचे स्वागत !
- महागुरु

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओझा चे ओझे महाग पडणार. कसोटी मध्ये २ फालतू (ईशान, अभिमन्यू) आणि २ कामचलाऊ (भज्जी, ओझा) गोलंदाज घेवून धोणी ला काय सिध्ध करायचे होते? पेक्षा नविन गरम रक्ताच्या गोलंदाजांन्ना घ्यायचे.. निदान विकेट घ्यायला हपापलेले असतात आणि चेंडूचा वेगही बरा असतो.> म्हणजे कोणाला नक्कि ? जे आहेत त्यातले त्यातल्या त्यात बरे निवडलेत ना.
ईशान, मिथुन, मुनफ, उनाडकट, तो एक विदर्भचा बॉलर : ह्यात खरच फारसा चॉईस मला तरी दिसत् नाही राव. (मिथुन गेल्या रनजी मधे leading wicket taker होता ना, परत नवीन आहे. ईशान ह्या सर्वात fast आहे ना ?)
भज्जी, ओझा, मिश्रा : Take your pick.

मूळात आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ?

अरे इतक्या दिवसांनी येथे आलो आणि एवढे निराशाजनक विचार्/भाकिते? या पहिल्या टेस्ट मधे कामगिरी चांगली नाही हे खरे आहे पण आयपी एल सुरू झाल्यापासून साधारण बघितले तर भारताने गेल्या दोन वर्षांत २० पैकी १० मॅचेस जिंकलेल्या आहेत (३ हार). तीन वर्षे धरली तर १४ जिंकून ७ हरलेत. यात जवळजवळ सर्व संघांना हरवलेले आहे. टेस्ट्स मधे अत्यंत चांगली कामगिरी सध्या होत आहे - गेले काही सीझन्स धरले तर.

मला वाटते सर्वात परिणाम झहीर नसल्याचा होतोय. कारण तो जुन्या चेंडूवर सुद्धा विकेट्स काढतो आणि इशांत बरोबर त्याची जोडी एकदम जमते. हरभजन ला कोणीतरी डिवचण्याची गरज आहे असे दिसते. बाकी फलंदाजी अजून रस्टी वाटत होती पहिल्या मॅच मधे. सचिन दोन्ही वेळेस क्रॉस खेळून आउट झाला, पण असा आक्रमक सचिन केव्हाही बरा.

का अजून तिसरी कसोटी आहे की? ही ड्रॉ केली आणि ती जिंकली तर मालिका वाचेल.

रवी शास्त्रीने म्हटले होते की इशांत शर्माला कसोटीच खेळवायला हवे...मला वाटते श्रीसंतला पण.
प्रवीणकुमार , आरपी सिंग, इर्फान,नेहरा एकदिवसीय आणि २०-२० मधे बरे. एक झहीर कसोटी+एक दिवसीय मधे हवा. २०-२० मधे त्याला मार खायला पाठवायची काय गरज?

भारताने गेल्या दोन वर्षांत २० पैकी १० मॅचेस जिंकलेल्या आहेत (३ हार). तीन वर्षे धरली तर १४ जिंकून ७ हरलेत.>>बरोबर पण ते काही ठराविक खेळाडूंच्या जोरावर. त्यांचे कुठेहि substitute (मला हे पटते कि पूर्णपणे substitute असू शकत नाही पण थोडाफार भरवसा धरता येईल असेही कोणि नाही) नाहित. ज्यांना पुढे अआणले गेले ते एव्हढे patchy दिसतात कि ... Sad

>>ही खेळपट्टी नेमकी ऊद्यापासून "फिरणार".. म्हणजे भारतीय फिरकी सोडून ईतर कुणीही त्यावर चेंडू वळवणार.

अगदी. पिचखाली लंकेच्या लोकांनी एक कंट्रोल रूम ठेवलेली आहे. तिथे जाऊन ते पिच सेटींग फिरवणार.
Proud

>>पिचखाली लंकेच्या लोकांनी एक कंट्रोल रूम ठेवलेली आहे. तिथे जाऊन ते पिच सेटींग फिरवणार.
शक्य आहे... ऊद्या कळेलच. Happy

असो. एकंदरीत दुसर्‍यांदा लंकेला गोलंदाजी करायची ईच्छा आपल्या अख्ख्या संघाला नसणार आणि आपल्या संघाला दोनदा बाद करण्याएव्हडी आग लंकेच्या गोलंदाजीत दिसत नाही. मुर-लिंगा नसल्याने लंकेची गोलंदाजी देखिल आपल्याएव्हडीच केविलवाणी भासते आहे. तेव्हा निर्णय अटळ आहे. आपले किती लोक १०० करतात एव्हडीच काय ती उत्सूकता. नंद्या म्हणतो तशी सेटींग असेल तर अवघड आहे पण नसेल तर या बिरला सिमेंट खेळपट्टीवर द्रविड, साहेब, लक्षमण यांकडून शतके अपेक्षित आहेत. विजय पण करेल असे वाटते. सेहवाग मनात आणले तर ३०० करू शकतो. बाकी रणदीव चा पहिला कसोटी सामना असल्याने साहेब आपली विकेट त्याला बक्षिस म्हणून देतीलच! Happy (हा रणदीव मात्र रणदीवे आडणाव बदलून आपल्या संघात सहज खपून जाईल.. कुठल्याच अँगल नी लंकेचा वाटत नाही.)

निव्वळ खेळाच्या दृष्टीकोनातून फार बोरींग सामना आहे. दिवसभर धावपळ करणारे क्षेत्ररक्षक सोडले तर कुणाचाच कस लागत नाही. ३५०+ करायला अवघड असणारी खेळपट्टी बनवली तर कसोटी सामने बघायला अधिक मजा येईल. ईंग्लंड मध्ये खेळवा राव ही मालिका..

>>मूळात आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ?
मान्य!
तरिही श्रीशांत (वेग) अन मिश्रा (फ्लाईट) परवडले असते.

धोणी ला मात्र गंज चढतोय बहुतेक. (लग्न-ईफेक्ट असावा) कारण लंकेच्या खेळाडूंन्ना बाद करायचे कुठलेही डावपेच त्याने आखलेले दिसले नाहीत. प्रत्येक फलंदा़जात काही तरी कमतरता असतेच त्यानुसार गोलंदाजी अन क्षेत्ररचना किमान करायला हरकत नव्हती. (जसे आज सेहवाग ला गली, डीप पॉईंट, थर्ड मॅन अशी क्षेत्ररचना लावून मॅथ्यूज अन ईतर मुद्दामून ऊजव्या यष्टीबाहेर ऊसळते चेंडू टाकत होते- वीरूने चांगलाच चंग बांधलेला दिसून आला- पठ्ठ्य्या त्याच्या वाटेला जात नव्हता.) खर्‍या अर्थाने क्रिकेट्मधिल नं १ ऑसी ईथेच आपली कल्पकता अन धूर्तपणा दाखवतात. बरोबर सापळा रचून त्यात फलंदाजाला अडकवायचे. भारतीय संघाची देहबोली जिंकायला ऊत्सूक दिसत नाही.

तरिही श्रीशांत (वेग) अन मिश्रा (फ्लाईट) परवडले असते. >>पहिला केरळात आहे injury मुळे नि दुसर्‍याने सराव सामन्यामधे जे केले ते बघितल्यावर त्याने फारसा काहि फरक पडला असता असे वाटत नाही. जेंव्हा तुमचा मुख्य ऑफ स्पिनर मिडल नि लेग वर बॉलिंग करतो तेंव्हा बाकिच्यांकडून काय अपेक्षा करणार Happy

>>मुख्य ऑफ स्पिनर मिडल नि लेग वर बॉलिंग करतो तेंव्हा बाकिच्यांकडून काय अपेक्षा करणार
अगदी खरय...
कालचा पहीला चेन्डू त्याने half pitch and wide of off टाकला, तो सन्गकाराने सीमापार पाठवला..

कसोटी सामन्यांच खच्चीकरण करून आयपीएलसारख्या स्पर्धाच जिवंत ठेवायचा बीसीसीआयचा कपटी डाव आहे, ही कसोटी मालिका म्हणजे ![हा नोबॉल असू शकतो, वाईडही असेल .. किंवा .. ]

>>जेंव्हा तुमचा मुख्य ऑफ स्पिनर
हे काही खरे नाही.. आपला मुख्ख्य ऑफ स्पिनर सेहवाग आहे. Happy

आणि बा़कीचेही तसेच करतील कशावरून? संशयाला वाव हवा (benefit of doubt!)

असो. आज काय होतय बघायचं.

>>हे काही खरे नाही.. आपला मुख्ख्य ऑफ स्पिनर सेहवाग आहे<< Lol अगदी, सेहेवागच जास्त चेंडू वळवतोय. भारत्-श्रीलंका सौजन्य सप्ताह सुरू आहे वाटतं. पहिली कसोटी श्रीलंका जिंकणार (कारण मुरलीचे ८०० बळी होणार), दुसरी ड्रॉ आणि तिसरी भारत जिंकणार. सगळे खुश. श्रीलंका मुरलीचे ८०० बळी झाले म्हणून व बलाढ्य, प्रथम क्रमांकाच्या (????) भारतीय संघाला बरोबरीत रोखल्यामुळे तर, कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यामुळे व तिसरी कसोटी जिंकून बदला घेतला म्हणून भारतीय संघ खुश. Wink

इकडे सेहवाग-विजयने रतीब घालयला सुरू केलयं.

शतकाच्या जवळ आल्यावर सुद्धा धुलाई करणारे फलंदाज स्वतःच्या शतकाची फिकीर न करता खेळतात हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा गैरसमज आहे. हे आज सेहवाग च्या विकेट ने पुन्हा दिसून आले. स्वतःचे शतक व्हावे याचे टेन्शन सर्वांनाच असते, फक्त ते नीट होण्यासाठी काय करावे याचे मार्ग प्रत्येकाचे वेगळे असतात. आपल्याला जास्त टेन्शन येउ नये म्हणून आपण फटकेबाजी करून ते लौकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो असे सेहवागनेच मागे एका मुलाखतीत म्हंटले होते.

आज त्याचे शतक ही गोष्ट अजिबात महत्त्वाचे नसताना त्याने उगाचच पुढे येउन मारण्याचा प्रयत्न केला - जो तो एरव्ही योग्य बॉल असेल तरच करतो. त्या नादान १६५-० वरून एकदम दोन विकेट्स गेल्यात.

तेंडुलकर आधी शतकाजवळ आला की फटकेबाजी करायचा, आता सावध खेळतो (आणि गावसकर जवळजवळ नेहमी). इतर काहीजण (गांगुली ई.) पटकन करायचे आणि लोक समजत की यांना स्वतःच्या शतकाची फिकीर नाही Happy

>>पिचखाली लंकेच्या लोकांनी एक कंट्रोल रूम ठेवलेली आहे. तिथे जाऊन ते पिच सेटींग फिरवणार.
खरच आहे वाटते..१७३/३ Sad

>>शतकाच्या जवळ आल्यावर सुद्धा धुलाई करणारे फलंदाज स्वतःच्या शतकाची फिकीर न करता खेळतात हा क्रिकेट जगतातील सर्वात मोठा गैरसमज आहे. हे आज सेहवाग च्या विकेट ने पुन्हा दिसून आले.
बरोबर! मी पुढे जावून असेही म्हणेन की There is fine line between stupendity and stupidity. Sehawag crossed over to the wrong side at the wrong time.
द्रविड बद्दल महान आश्चर्य! ईतका मोठा अनुभव गाठीशी असताना रणदीव सारख्या गोलंदाजाला (उंचावरून आत घुसणारा, क्वचित ऊसळणारा चेंडू,) बॅकफूट वर जावून खेळण्यासारखा आत्मघात नाही. अती डीफेन्सीव मोड मध्ये द्रविड गेला की असल्या शुल्लक चुका करतो. खेळपट्टीत अजूनही कुठलेही भूत दिसत नाही. मेंडीस ला फिरकी गोलंदाज म्हणणे म्हणजे विनोद आहे. लग्नात अक्षता ऊधळल्यागत निव्वळ बोटांन्नी तो चेंडू ऊधळत असतो- अर्थातच अक्षतांईतकीच प्रेडिक्टेबिलिटी असल्याने फलंदाजाला कधी कधी चकायला होते. मेंडीस च्या या अक्षता पाय पुढे टाकून ऊधळवून टाकणे हेच श्रेयस्कर.

तूर्तास राम अन लक्षमण खोदतायत.

अर्थातच अक्षतांईतकीच प्रेडिक्टेबिलिटी असल्याने >>> योग Rofl

साहेबांची शतकी खेळी Happy

untitledFB2.JPG
मग बाहेर स्टाफला सांगू का कीं त्याला हवं तर "साहेब" म्हणा, पण तुम्हाला मात्र "लिटल मास्टर" नाही म्हणायचं म्हणून !

आजच्या खेळाचे विश्लेषणः
साहेबांन्नी पुन्हा एकदा तारलय. तारू अजून किनार्‍याला लागायचय. २९ वर साहेबांन्ना विरूझटका आला आणि दहाव्या मजल्यावरच्या चेंडूला बॅट लावून झेल दिला- प.जयवर्धनेने तितक्याच आदबीने तो टाकला.
मुळात शिव्या देणं हे लंकेच्या रक्तातच नाही नाहीतर पाकी गोलंदाज असता तर एव्हाना प.जयवर्धनेचं रक्त सांडलं असतं. त्या जिवदानानंतर साहेबांन्नी मान खाली घालून खोदकाम सुरू केले. लक्षमण आणी साहेब एका वेळेस दोघे मिळून १०० चेंडूत ४५ धावा होते- यावरून हे खोदकाम किती भरास आलं असेल याची कल्पना येईल. यातून व्हायचे तेच झाले- लक्षमण पायचित पुन्हा मेंडीस ला. म्हणजे सब कीये कराये पर पानी.
कसोटी पदार्पण करणार्‍या रैनाचे कौतूक करावेच लागेल. कसोटीसाठी आवश्यक मानसिक संतुलन अन सय्यम दाखवत साहेबांच्या जोडीने धावफलक धावता केला. रैना ने सर्व लटके झटके विसरून (युवराज ला ड्रेसिंग रूम मध्ये प्रवेश नसणार अन लंकेत आग लावणार्‍या प्रेक्षिका नसतात) खराब चेंडूची वाट पहात धावा करणे पसंत केले आणि त्यामूळेच तो यशस्वी झाला. त्याचे काही फटके विशेषतः ऑफ, कव्हर ड्राईव्ह्ज्स सुंदर होते.
ईकडे साहेब पुन्हा एकदा nervous 90s मध्ये शिरले की काय असे वाटत असताना चक्क लागोपाठ तीन चौकार मारून थेट 98 वर ऊडी घेतली. त्यावेळी सेहवाग चा चेहेरा पुन्हा पुन्हा दाखवून अपशकून घडवून आणायचा पुरेपूर प्रयत्न कॅमेरामन ने केला पण साहेबांनी त्या दोघांचाही अनुल्लेख करत चौकार मारून थाटात शतक साजरे केले. नेहेमीप्रमाणे साहेबांन्नी आकाशात बॅट दाखवून अन बघून आभार मानले तेव्हा धन्य धन्य जाहले. कठीण प्रसंगी अन समयोचित शतक.
ऊद्या सकाळी पहिल्या तासात दोघे कसे खेळतात्/टिकतात त्यावर पुढील सर्व अवलंबून असेल. नविन चेंडू असल्याने दोघांन्ना विशेषतः सचिन ला खेळायला अधिक आवडेल यात शंका नाही. आणि ऊपाहारापर्यंत दोघे खेळले तर त्या जुन्या चेंडूवर मग धोणी चे धुपाटणे अधिक उत्कृष्ट बसेल. रैनासाठी कसोटी पदार्पणातील शतक हे मोठे मोटीवेशन असेल. साहेबांसाठी स्वताच्या फलंदाजी चा आनंद घेणे हे मोटीवेशन असावे (असले तर लंकादहन शक्य आहे). बाकी ऊरलेल्या भज्जी आणि कं साठी किमान मेंडीस, रणदीव आदी फिरकी गोलंदाजांन्ना तुडवण्याचे मोटीवेशन असायला हरकत नाही.
ऊद्या भारतीय फलंदाज सकारात्मक खेळले तर कसोटी अनिर्णीत हे निश्चीतच आहे. चुकून फॉलो ऑन मिळाला तरी पुन्हा या सर्व दहा जणांना ऊरलेल्या दिड दिवसात बाद करण्याव्हेडा दारूगोळा लंकेकडे नाहीये. आपणच आपली कबर खोदली तर गोष्ट वेगळी आहे. ते मात्र शक्य आहे.
तेव्हा ऊत्सुकता एव्हडीच असेल की समजा आपल्याला फॉलो ऑन मिळालाच तर विरू पुन्हा ९९ धावा करेल काय अन केल्यावर पुन्हा षटकार मारायचा प्रयत्न करून शतक करेल काय? विरू च्या आईचं यावर ऊत्तर नक्की "हो" असं असेल, विरू चं माहीत नाही- तेव्हडीच ऊत्सुकता. Happy
बाकी, नविन चेंडू फिरकी गोलंदाजाच्या हाती देवून (रणदीव) संगक्कारा कुठली प्रयोगशीलता या खेळात आणू पहात आहे हे नंतर कळेल अशी आशा आहे.
*****************************************************
ps: साहेब २९ वर बाद झाले असते तर? द्रविड्-लक्षमण च्या पुनः पुनरागमनासाठी पुन्हा एकदा ऑसीच्या ऑक्टोबर मधिल भारत दौर्‍या पर्यंत वाट पहावी काय? (ते दोघे पहात असतील निश्चीत!) अकरा फलंदाज घेवून खेळलो असतो किंव्वा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली असती तर या कसोटीचा निकाल वेगळा लागला असता काय? कसोटी क्रिकेट मध्ये पॉल्-ऑक्टोपस ला स्कोप आहे का? बाकी आज सेहवाग ९९ वर स्वबाद झाला तेव्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्नीभाय असता तर नक्की म्हणला असता "गाढवापूढे वाचली गीता.. " आणि त्यावर शास्त्रीभाऊनी री ओढली असती "well thats sehavag" थोडक्यात "तो तसाच आहे". Happy
सामना चुकून हरलोच तर प्रेस कॉ. मध्ये धोणी म्हणेल " well you know sri lanka was never an attractive destination to begin with (for our young players) Happy

चारू शर्मा महाभयंकर विनोदी प्राणी आहे. आज सकाळी त्याच्या ac studio मध्ये बसून (ten sports)हवेत गोळीबार करत होता. काय तर म्हणे पहिल्या सामन्यानंतर सचिन ने संघाची चांगली २ तास कान ऊघडणी केली अशी बातमी होती. सचिन नेहेमी म्हणतो i let my bat do the talk- so now its time again (?) for sachin to walk the talk. या चारू शर्माला कुणी शिवाजी पार्काच्या निव्वळ फेर्‍या जरी मारताना पाहिला असेल तर माझ्याशी संपर्क साधा.

विरू च्या आईचं यावर ऊत्तर नक्की "हो" असं असेल, विरू चं माहीत नाही- तेव्हडीच ऊत्सुकता.
>>
वीरू चं उत्तर असेल...
आता मुळीच ९९ वरून सिक्सर ट्राय नाही करणार...
९४ वरूनच करीन...

कॉमेंट्री बॉक्स मध्ये सन्नीभाय असता तर नक्की म्हणला असता "गाढवापूढे वाचली गीता.. "
>>
अवघड आहे...
वीरू सन्नीभायचा जाम फेवरिट आहे...

<<कसोटी क्रिकेट मध्ये पॉल्-ऑक्टोपस ला स्कोप आहे का?>> हो, त्याचं मान्सूनचं भाकीत खूपच महत्वाचं ठरेल या कसोटी मालिकेच्या भवितव्याला व आपल्या देशाच्याही !
आता बेदी वि. मुरली "सिंगल विकेट" स्पर्धा सुरू झालीय ! बेदी बरोबर बोलतो कीं चूक यापेक्षां ते बोलण्याची त्याची पद्धत घृणास्पद असते व ती आपला स्पष्टवक्तेपणा असल्याचं सांगून तो मिरवतो, याचा राग येतो [कदाचित, आमचा पद्माकर शिवलकर जागतिक क्रिकेटला त्याच्यामुळेच मुकला, ह्या बेदीवरच्या अकारण रागामुळे मी पूर्वग्रहदुषीतही असेन ]
<< मराठी क्रिकइन्फो चालू करायचं का? तू, मुकुंद, भाऊ आहातच>> "क्रिकइनफन" एव्हढीच माझी तरी मजल आहे !
चला, साहेबांची करामत बघायची सोडून इथे उगीचच घुटमळण्यात अर्थ नाही !

Pages