मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऑफिस मदे असताना केलेला वेंधळेपणा

मला एक मैल लिहायचा होता टीमला मी काय लिहिला असेल ....
" Go to Conference room after your Shit"
मला "Shift" लिहय्च होत पन लिहिल "Shit"...
पुर्न मझ्हि टीम हसत होति अनि तरिहि मला कळाल नहि.
नंतर सन्गीतल मला..
तो पर्यन्त ह ह पू वा.....

मी आत्ता माझ्या एका कलीगच्या मशीनवर काम करत होतो... काही टेक्स्ट तिथे Ctrl + C ने कॉपी केले. मधुनच माझ्या मशीनवर गेलो आणि माझ्या पेस्ट करन्यासाठी Ctrl + V प्रेस्स केले.. Sad हाय रे दैवा.... काहीच नाही पेस्ट झाले स्क्रिनवर. आपण काय केले हे कळायला २ सेकंद गेले... Proud

हसू कि रडू Sad -- काल भर वीकडे मध्ये जेवायला येणार होते .. जरा लवकर निघू म्हणून बस पकडली.. हातात कधी नव्हे ते मिळालेले "शारदा संगीत" पुस्तक ..स्टेशन कधी आलं कळलंच नाही .. उतरल्यावर खूप विचार गाडी कुठे आहे .. कुठे पार्क केली.. काही सुचेना .. हाततिच्या !!!.. सकाळी उशीर झाला म्हणून दुसर्याच पार्क न राईड वर जावून बस पकडली होती.. येताना दुसरी बस पकडून यायची होती .. ती न घेता नेहमीची घेतली. !!
आता तिथे परत कसे जायचे ... १५ मिन्तानी तिकडे जाण्यासाठी बस होती .. ह्या ठेशनावरून त्या ठेसनावर आणि तिथून गाडी घेवून घरी रोज पेक्षा ३० मीन उशिरा पोहोचले.. Uhoh

मी ऐन लग्नात केलेला खास वेंधळेपणा......... Lol

लग्न ठाण्यात होते....... पहाटे गोरेगावहुन निघालो. ठाण्याच्या हद्दित आल्यावर आजिने विचारले, अरे काय उखाणा ठरवलास का....का नेहमिसारखे काही स्वरचित......
बोम्बला, शेवटच्या दिवसापर्यन्त पत्रिकावाटप आणि इतर कामात हे लक्षातच नाही आले आणि आजिने पण आठवण केली ते हॉलच्या जवळ आल्यावर.... Sad
माझे दोन्ही मामा पौरोहित्य करतात त्यामुळे त्यानी धीर दिला....त्यान्च्या कानावर रोजच उखाणे पड्तात. ते म्हणाले आम्ही सान्गतो रे...... :हुश्श:

लग्न होऊन उखाणा घ्यायची वेळ आली.....मोठ्या मामाने काहीतरी प्राजक्त्फुलान्चा उखाणा सांगितला तो काही मला झेपला नाही...मग दुसर्‍या मामाने एक सान्गितला तो सुट्सुटित होता..... झाले. मी तयार.
वरच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम, खालच्या हॉलमध्ये लोक पन्गतिला बसलेत्...आणि स्पिकर सिस्टिम्...त्यामुळे भटजीनी डायरे़क्ट हातात माईक दिला..... आणि मग मी तो उखाणा घेतला तो असा....

औरन्गजेबाच्या दरबारात (अं...अ‍ॅअ....ऑआआ...) अकबराच्या दरबारात तानसेन होता गवई
अनुष्काचे नाव घेतो झालो पटवर्धनांचा जावई......... Rofl

मी, अनुष्का आणि अख्खे गोखले सभाग्रुह दोन मिनिटे हसत होते.......माझी अवस्था बिकट होती..... हा औरन्गजेब मधेच आला कुठुन तेच मला उमगत नव्हते....... Lol स्पिकर्वर हा माझा असा पंचनामा झाला होता.........मग स्टेजवर येणारे सगळे तेच सान्गत होते......
अनुष्काच्या मैत्रिणी तुझ्या ह्यांचा इतिहास दांडगा आहे हा असा टोमणाही मारुन गेल्या......
तर काहीजण, अरे कशाला चुक सुधारायला गेलास्....तसेच म्हणतास तरी कोणाला कळले नसते की अकबराच्या जागी औरन्गजेब आलाय्......:हहगलो: आणि हे सांत्वन ते लोक हसत हसत करत होते.

सर्वात कळस म्हणजे हा सगळा प्रकार सीडीमध्ये रेकॉर्ड झालाय्......कायमचा पुरावा म्हणुन..... Sad

भ्रमर तुझ्या सारखाच किस्सा माझ्या मित्राच्या लग्नात झालेला. त्याच्या सो कॉल्ड म्हेवण्यांनी त्याल नाव घ्यायला सांगितलं तर पट्ठ्यानं मला विचारलं. मी हळुच त्याच्या कानात एक उखाणा सांगितला. बिच्यारर्‍याने माझ्याकडे पहीलितल्या मुलाला त्रैमसीक गणित शिकवावं तशी नजर टाकली. वैतागुन मी मग सोप्पा मेथीवाला उखाणा सांगित्ला "भाजीत भाजी मेथीची, xxx माझ्या प्रितीची"
त्यानं तो असा घेतलाअ..

"मेथीत मेथी भाजीची, xxx माझ्या प्रितीची"...
मी कप्पाळाला हात मारुन घेतला, हहपुवा झालं, तरी त्याला कळलं नाही त्याने काय घोळ घात्ला ते...

अरे प्रितीच्या उखाण्यात मी २. मी xxx नाही म्हटलं..पण 'प्रिती माझ्या प्रितीची' असं म्हटलं. माझ्या बायकोचं नाव प्रिती आहे ना! Happy

भ्रमरा .. अरे रे काही खरे नाही तुझे .. जन्मभर ऐका आता...काय तरी पोरांनी उखाणे घ्याचे म्हणजे मजाच मजा ..
आमच्या ह्यांना मागून सांगत होते तरी सुद्धा
नाशिकची संत्री आणि नागपूरची द्राक्षे
xxx माझी गृह मंत्री म्हणे.. परत घ्या मग चूक सुधारून .. तोपर्यंत सगळे हसून हसून बेजार.. ह्यावरून नवीन बाफ चालू केला पाहिजे नै..

नाव घेण्यावरून चाललय ना ...कशात तरी वाचलं..( पहा हाही वेंधळेपणाच!)
चंद्रभागेत पडली मंदिराची सावली
मंगलाताई माझ्या राहूलची माऊली
असं नाव घ्यायचं होतं तर
नाव घेणारीने स्वता:च्या साबांना चंद्रभागेत ढकलून दिलं!
चंद्रभागेत पडली माझ्या राहूलची माऊली........
काय झालं असेल कल्पना करा!

मानुषी......... Rofl डोळ्यातुन पाणी येईपर्यंत हसलोय...... त्या माऊलीची काय अवस्था झाली असेल..... Biggrin

हळदीकुंकु किन्वा मंगळागौर असेल तर मग पार ईज्जतीचा ईस्कोटच झाला असेल सगळ्या बायकांसमोर्....:हहगलो:

रस्त्याने जात होतो..
एके ठिकाणी रस्ता पार करायचा होता.. म्हणून समोर पाहिलं.. पण आरसा(rear view mirror) काही दिसेना..
मग पेटली की आपण गाडी ने नाही तर चालत चाललो आहोत..

~~~~~~~~~~~~~~~~~~~
चालत्या माणसाला आरसा कशाला..

>>औरन्गजेबाच्या दरबारात (अं...अ‍ॅअ....ऑआआ...) अकबराच्या दरबारात तानसेन होता गवई
अनुष्काचे नाव घेतो झालो पटवर्धनांचा जावई........

भ्रमर ___/\___ Rofl Rofl Rofl Rofl Rofl

जयंत, तुम्हाला चष्मा आहे का?
असल्यास त्याला एक छोटा आरसा(rear view mirror) बसवून घ्या Wink Proud

मानुषी, सासूचा असाही "जाच" Lol

काल रात्री झोपताना चष्मा काढून ठेवला होता, आज सकाळी त्यावर पाय दिला
फ्रेम मोडली Sad

सुदैवाने काचांना काही नाही झालं.
आणि एक अतिरिक्त चष्मा होता तो तासभर (मोडलेल्या चष्म्याची एक काच हाताने एका डोळ्यवर धरून)
शोधाशोध केल्यावर सापडला Proud

नाय्तर आज सुट्टी टाकावी लागली असती.

मला नव्हत वाट्ला हा वेंधळेपणाचा रोग मला इतका भयंकर होइल ते

आत्ता अगदी ताजा ताजा वेंधळेपणा केलाय.. ओव्हन बेकड आहे...

आत्ता मी क्लायंट कडे बसलेलो आहे एक प्रोजेक्ट करत.... त्यालाच एक मेल आणी फाइल अटॅच करुन पाठवायची होती... मी मस्त मेल लिहीला आणी फाइल अटॅच न करताच पाठवला..
चुक लगेच लक्षात आली आणी उगाच आपल अपोलॉजी वगैरे म्हनुन मेल टाइप्ला आनी पुन्हा बिना फाइलचाच पाठवला...निवांत काम करत बसलो... बॉसचा फोन आला... काय चाल्लय म्हणाले बॉस....पुढे काय शिव्या खाल्ल्या ते सांगणे नको... पण आमची हाऊस भागली नव्ह्ती .... आता तर चक्क गुगल करुन अपोलॉजी मेल लिहिला. फाईल आठवणीने अटॅच केली... हुश्श केल आणी मेल भलत्याच क्लायंट्ला दिला पाठवुन...

एव्हाना बॉस ने कंटाळून स्वतःच तो फॉर्म अटॅच करुन दिला पाठवुन..... आता काय तोंड लपवुन बसलोय काय सांगु.......जाम टेन्शन आलय

जयंत, तुम्हाला चष्मा आहे का?
असल्यास त्याला एक छोटा आरसा(rear view mirror) बसवून घ्या
मंदारराव या वर्षीचं आंत्रप्रेन्युअर ऑफ द ईयर अ‍ॅवॉर्ड /न्यू इन्व्हेंटर ऑफ द ईयर तुम्हालाच!

मी भ्रमर...
आहे ना तुम्हाला काँपिटिशन? साबांना चंद्रभागेत ढकलणार्‍या सुनबाईंची!

चिमणराव माझी तुम्हाला सहानुभूती . या सगळ्यातून बॉसला तुमच्यावर कामाचा खूप ताण आहे असे वाटो. मे एकदा ऑफिसच्या झिरो डायलवरून सलग तीनदा शाखा प्रबंधकाच्या केबिनच्या डायरेक्ट लाइअनवर सलग तीनदा फोन केला,आमच्या बँकरचा नंबर समजून.

एकदा इंटरनेट चालत नव्हते म्हणून मी आमच्या इंजिनीअरला फोन केला. तो जरा दोस्तीतला असल्याने
"अरे ए, काय झोपा काढायला पैसे देते का ऑफिस तुम्हाला, कामं करायला नकोत,"
अशी सुरुवात केली.
तिकडून आवाज आला... "मे आय नो हू इज स्पीकींग"
आवाज ओळखीचा वाटला आणि जीभ तुटेपर्यंत चावली.
मी फोन इंजिनिअरच्या १२१ या एक्टेंशनऐवजी आमच्या बॉसच्या केबिनमध्ये २१२ लावला होता.
आईशप्पथ, मी पटकन ठेऊन दिला फोन आणि कुणाला काही कळायच्या आत बाहेर गेलो. तो निवांत अर्ध्या तासाने सगळे काही शांत आहे असे पाहून परत साळसूद चेहरा करत कामाला सुरूवात केली.

ashuchamp >> तुमचा बॉसच घाबरला असेल, म्हणला असेल (स्वतःलाच) ह्याला कस कळालं. Happy

हाय लोक्स,
इथे काय काय भन्नाट वेंधळे पणे चाललेत २-३ दिवसात बहरलाय हा बा. फ. Happy
एक से एक औरंगजेब, चंद्रभागा, मेल , फोन, चष्मा, आरसा .... Rofl वरच्या तुलनेत माझे वेंधळेपणे काय बी न्हाय Happy

परवा रात्री ईज गेली तेव्हा लय धमाल केली आम्ही समद्या सख्यांनि असच गप्पा मारता मारता मी एक किश्शा सांगु लागले त्यात म्हणले "सुनोना बचपन में जब मैं छोटी थी तब" ईतक्यात एक मैत्रीण "अच्छा हमें पता हि नहीं था तुम बचपन में छोटी थी! " नंतर सगळ्या खो खो हसायला लागल्या Proud

थोड्यावेळाने आमच्या टि. व्हि. वर गप्पा सुरु झाल्या आम्ही काही जणी झी वरच ८ वा. च झांसी कि रानी बघतो पण परवा आजींना स्टार वरची ८ वा. ची चाँद छुपा ....मालिका बघायची होती म्हणुन त्यांनि आम्हाला झी लाऊ दिल नाही. रात्री एका मैत्रीणिने विचारल आज राणी त काय झाल मी म्हणाले "आज अपने यहाँ रानी नहीं स्टार का खोया खोया चाँद आया था ८ बजे. सगळ्या "खोया खोया चाँद" Uhoh

काल परत बॅगेचा गोंधळ डॉक्टर कडे बॅग बाहेर रीसेपशन वर ठेऊन मी आत डॉ. च्या कॅबिन मध्ये गेले, तपासणी झाल्यावर तीथेच बॅग शोधतेय मग लक्षात आल बॅग तर बाहेर ठेवली आहे Happy (डॉ. हि हसायला लागले हे सांगणे नकोच :))

Pages