मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वविज्वर सचिन राव दुसरे कांय.

भ्रमर वेंक्यू: १५
मल्ली: ५ स्टेडी जसे राहुल द्रवीड.
सचिनः ३ लै कामाचे साहेब.
चिमुरी: २

मामी वेंक्यू वाढवण्याच्या टिप्स घ्याव्यात काय? inferiority complex आला हो बाकिच्यांचे वेंक्यू बघुन Happy

आज सकाळी एका interview ला गेलेले, बॅकपॅक आणी पर्स दोन्ही घेऊन गेलेले, interview कॅबिन मध्ये जातांना तीथल्या लोकांना विचारुन बॅकपॅक बाहेरच ठेवली आणी पर्स आणी फाईल घेऊन आत गेले, मुलाखात झाल्यावर (interview ला मुलाखात शब्द कसा वाटतो नाही :फिदी:), बाहेर आले आणि पटकन जायला हव नाही तर बस चुकेल आणि सध्याच्या कामाच्या ठीकाणी फुल डे सुट्टी लागेल या विचारात बॅगपॅक तीथेच विसरु बाहेर आले Angry लक्षात आल्यावर परत मागे जाव लागल हे सांगायला नकोच पण तीथले लोक मी अशी बॅग न घेताच जोरात बाहेर गेले हे बघुन थोडे चकितच झालेले Proud

परत आल्यावर सांगितलस ना त्यांना, "अय्या, माझी बॉम्बची बॅग तर इथेच विसरले" म्हणून...

काल कंडक्टर ने क्षक्षक्ष स्टॉप वाल्यांनि पुढे या सांगीतल तर मी पुढे जाऊन बस मधुन सरळ ऊतरुन गेले Sad १ स्टॉप आधी Sad

समू वेंक्यू: ३ हो आत्तापुरते एवढेच.>>>>>> नहीं ये २३ का ३ कब और क्युं हुआ Sad

"अय्या, माझी बॉम्बची बॅग तर इथेच विसरले">>>> आयला अस सांगायला पाहिजे होत Wink

समू आलि की धाव फलक पुढे पळू लागला.
त्यात आपले आगलावे अंपायरही आले. घरच्या घरी आगगाडी दुरुस्त करायचा सल्ला देणारे. दिवे दिवे असुदे.
समू: ४ नॉट आउट.

मामी Rofl

<<<आर्यातै नुसते हसायचे नैकै. लिहा लिहा.<<<
मामी, मी आतापर्यंत म्हणजे सांगण्यासारखा एकच वेंधळेपणा केलाय, इथे पान नं ४ वर टाकलाय! एकच पण इतका जबरदस्त की एक घाव नि.... त्यामुळे आता कानाला खडा!
तुमच्या माहितीसाठी पुन्हा पेस्ट करते इथे:

मी_आर्या | 22 April, 2009 - 14:38
काय एक से एक किस्से आहेत...! ह. ह. पु. वा.

यासर्वांवर कळस म्हणजे माझा वेंधळेपणा ...ऐका..
ऑफीसमधे माझी बॉसीणबाईचा चांगलाच वचक( चांगली ६० वर्षाची आहे ती) ! ती जिथे बसते त्या केबिनबाहेरुन जायला सुद्धा लोक घाबरतात. कायम गुर्मीत असायची... ! तिची एक सवय आधीच सांगते..तिला मधेच काहीतरी आठवतं मग मला बोलावुन एका वेळेसे ४-५ काम, ४-५ मेल ड्राफ्ट करायला अस एकदम देते. आधीच सेक्रेटरी म्हटल्यावर फोन, अपॉइंटमेंटस, मिटिंग ची धांदल असते.

तर मागच्या वर्षीची गोष्ट..! माझ्या बॉसचे ज्यांच्यासी पटत नाही असे कॉर्पोरेट हेड एच आर, त्यांचे वडील वारले तिकडे पश्चिम बंगाल मधे ! आणि माझ्या बॉसने मला verbally २-३ वाक्य सांगितली .... condolence letter पाठवायचे मेलवरुन ..झाल मी घेतलं ड्राफ्ट करायला! अन घाईघाईमधे जे टाइप केल ते इतक हॉरीबल होतं की...तीच काय कोणीपण थयथयाट करेल्...पण अहो आश्चर्यंम, तिने इतके शांत नजरेने माझ्याकडे पाहिले की...मलाच माझी कीव आली...मग ते धरणीमाता पोटात घेइल वै वै!

मी ड्राफ्ट केलेले असे होते..!

we deeply mourned.... about your father's demise...the entire staff of.. share your grief deeply.
आणि शेवटी ते भयंकर वाक्य... May his sole rest in Piece!!!

आर्या यांना गोल्ड वेंक्यू करंडक. १०० फट्कवल्याबद्दल. जोरदार टाळया. लगे रहो. अश्या बॉसला असंच केलं पाहिजे. म्हातारी येत नाही ना इथे ? नैतर तुला सासुरवास करेल. अगे मी इंग्रजी कॉपी रायटर आहे. काही मदत लागल्यास सेवेस हजर.

काल आमच्या कॉलनीमधल्या दोन छोट्या छोट्या पोराचा आणी माझा एकत्रित वेंधळेपणा.

पार्थ आणि साक्षी, (दोघंही पहिलीमधे) सकाळी सात वाजता आमच्या घरी आले. मी गार्डनमधे फुलं काढत होते. मला आधी वाटलं त्याना शाळेत न्यायला वगैरे फुलं हवी आहेत की काय?

पार्थः दीदी, घोरपड हवी आहे.
मी: काय?
पार्थः घोरपड.

(पार्थचे वडिल जनावराचे डॉक्टर आहेत, पण म्हणून घोरपड?)

मी: कशाला? कुठल्या गडावर चढायचं आहे का?
साक्षी: नाही, पार्थला पाह्यजे.
मी: घोरपड कशाला?

साक्षी: हिरवी असते ना.
मी: हिरवी घोरपड. Uhoh
पार्थ: हो. तुमच्याकडे भरपूर आहे.

(आमच्या कॉलनीमधे घोरपड दिसलेली नाही.. सरडा, खार, साप, गांडूळं भरपूर. पण घोरपड???)

पार्थः डोक्याला लावायला पाह्यजे.

(माझ्या हातातल्या फुलाची बुट्टी खाली Uhoh )
मी: डोक्याला लावायला घोरपड???? (काहीतरी गडबड आहे हे नक्की!!)
पार्थ: आमच्या कडे भरपूर होतीपण रान साफ केलं तेव्हा काढून टाकलं.
साक्षी: हातातून असं असं करून काढतात (हाताने टूथपेस्टमधून पेस्ट काढत असल्याचा अभिनय)आणि डोक्याला शेंबूड लावतात.
मी: क्काय्य्य??
(काहीतरी गडबड आहे हे नक्की.

इतक्यात आई आली. आणि दोन्ही पोराच्या हातात तिने "कोरफडीची" पाने दिली. Proud

नंदिनी असाच किस्सा माझ्या एका मित्राने केला होता. गणपतीत मांडवाचे काम सुरू होते आणि गोणपाट शिवायला मोठी सुई हवी होती. एका मित्राला त्याच्या घरी जाऊन दाभण आणायला सांगितले.
तो धावत धावत घरी गेला आणि वहिनीला म्हणाला
"वहिनी आपल्या घरी गाभण आहे ना?"
वहिनीला उभ्या जागी एकदम चक्करल्यासारखे झाले. ती किंचाळली
"काय आहे आपल्या घरी?"
त्याला एकदम जाणवले की काहीतरी चुकले. पण म्हणून गप्प बसेल की नाही.
"अगं ते लांब असते ना, धामण ते पाहिजे,"
शेवटी तीने कशासाठी पाहिजे विचारले आणि ड्रॉवरमधून दाभण त्याच्या हातात ठेवली. Happy

(interview ला मुलाखात शब्द कसा वाटतो नाही>>>> योग्यच वाटतोय. त्यासाठी थोबाड ताणल्याची स्माईली कशाला टाकायची.

ऐका हो ऐका .....ऐन रविवारी केलेला वेंधळेपणा ...
मायबोलिवर जाण्यासाठी ...अड्रेस बार मध्ये अड्रेस टाईप केला आणि इंटर केल ..
पण एरर मेसेज ...
काही समजेना ,काय नेटला प्रोब्लेम असेल का ?
नंतर वरती अड्रेस तपासुन पाहिला ...तर
डब्लुडब्लुडब्लु.मायबिलि.कॉम ....
Lol

काल घरी गेल्यावर पाहिलं तर बिल्डींगच्या गेट समोरच्या रस्त्यावर मांडव टाकुन सत्संग वगैरे चालु होतं.. गाडी न्यायलाच काय चालत गेट मधुन आत जायलाही जागा नव्हती.. म्हणुन गाडी ओळखीच्या दुकानासमोर लावली.. आता बिल्डींगमधे कुठुन जावं म्हनजे कमीत कमी लोकांना त्रास होइल हा विचार करत डिक्कीतलं सामान हाता घेतलं... आणि वळुन बघितलं तर बिल्डींगच्या ४ चाकी गाड्यांसाठी बाजुला असलेल्या पार्किंगच्या गेट समोरच मी गाडी लावली होती. मग लक्षात आलं की आपण आपल्याच पार्किंगमधे गाडी लावु शकतो की.. मग परत तसं त्या दुकानदार काकांना सांगुन (आधीच त्यांची रीतसर परवानगी काढुन तिथे गाडी लावुन त्यांना लक्ष ठेवायला सांगीतलं होतं ना), हातातलं सगळं सामान डिक्कीत कोंबुन गाडी आत नेवुन लावली..आणु तिथुनच छोटा रस्ता आत जायला असल्याने कोनालाही त्रास न देता आतही जाता आलं Happy

आणि आज सकाळी घरातुन निघाल्यावर पार्किंगमधे नेहमीच्या ठिकाणी गाडी दिसलीच नाही.. म्हणुन बिल्डींगमधल्या पार्किंगमधे सगळीकडे शोधली.. आणि वाटलं की काल आपण गाडी सिंहगडलाच विसरलो बहुतेक.. पण माझ्या लक्षात येइना की आपण तिथे गाडी विसरुन मग घरापर्यंत कसे काय आलो (कालच्या अतिश्रम आणि त्यानंतरच्या अतिविश्रांतीचा परिणाम).. विचार करत करत गेटपर्यंत आले, आणि समोर घातलेला कालचा मांडव बघुन कालच्या सगळया घटना आठवल्या आणि माझी गाडीदेखील सापडली....

<< माझी गाडीदेखील सापडली...>>
पार्टी पाहिजे मग..... Proud

पार्टी पाहिजे मग.....>> ती डब्बा गाडी सापडली नसती आणि त्यामुळे मला नवीन गाडी मिळाली असती तर नक्कीच पार्टी दिली असती Happy

<< "वहिनी आपल्या घरी गाभण आहे ना?"
वहिनीला उभ्या जागी एकदम चक्करल्यासारखे झाले. ती किंचाळली >>

आईग्ग.. ह ह पु वा

योग्यच वाटतोय. त्यासाठी थोबाड ताणल्याची स्माईली कशाला टाकायची.>>>> बर बाई या पुढे कुठे कोणती स्माईली टाकायची ते तुम्हाला ईचारुन (कनसल्ट करुन) घेत जाऊ का ? Proud

अच्छा म्हणजे "प्रिया बापट" म्हणायचय ना तुम्हाला >>>>>>>>>>>> मी-भ्रमर आता ह्या 'प्रिया बापट' कोण काय पण एक एक कोड वर्ड आहेत Happy

आजचा वेंधळेपणा, जो या आधी हि मी प्रत्येक वेळा डॉ. कडे गेले असतांना केलाय , डॉ. च्या दवाखान्यातुन बाहेर आल्यावर ऊजवी कडे जाण्या एवजी डावी कडे गेले आणी तीथे डेड एन्ड सारख्या भागात मेन रोड शोधत बसले Sad मागे एकदा असच तीथे बस स्टॉप शोधतांना तीथे उभ्या असलेल्या शाळकरी मुलींना विचारल बस स्टॉप इथेच ना तर त्या खो खो हसलेल्या Happy

Pages