लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

नंद्या ते पिकासाची लिंक कशी द्यायचे हे जे लिहीलयस ते वर मदतपुस्तिकेच्या पानावरच टाक ना म्हणजे मग सापडायला सोपे सगळ्यांना.

नंद्या, धन्यवाद. काल याचप्रकारे करून बघितलं होतं मी पण प्रतिसाद तपासा मध्ये बघितलं तर चित्र दिसतच नव्हतं. आज परत एकदा प्रयत्न करून बघते मी.

<<सायबर कॅफेत जावून प्रॉब्लेम माझ्या पी.सी.चा आहे कीं माझ्या अज्ञानाचा, ते एकदा पडताळून घेतो व मगच पुन्हा तुम्हाला त्रास देतो.>> नंदूसाहेब, सायबर कॅफेतल्या कम्प्युटरवर कांहीच अडचण आली नाही ! [फुट्बॉल वर्ल्डकपच्या धाग्यावर शेवटी पहा]. आता पहातो माझा पी.सी. कां रुसलाय ते !धन्यवाद.

भाऊ - धन्यवाद, कदाचित, कुकीज आणि कॅश उडवल्यावर प्रॉब्लेम जातो का पहा.
कुठला न्याहाळक आणि ऑपरेटिंग सिस्टीम आहे?

<<कुकीज आणि कॅश उडवल्यावर प्रॉब्लेम जातो का पहा.>>नंदूसाहेब, हें केलं व मग माझं रांगडं लॉजिक वापरलं. ज्याअर्थी पूर्वी पीसी हे निमुटपणे करत होता त्याअर्थी मध्येच कुणीतरी, किंवा मींच, काहींतरी कुरापत काढली असणार; सर्व "सेटींग्स" पुन्हा मूळ "डीफॉल्ट"वर आणली. माझा पी.सी. खुदकन हंसला. आता सर्व सुरळीत झालंय ! तत्परतेने मदतीचा हात पुढे केल्याबद्दल पुन्हा आभार.

मदत समिती, नविन पाककृती लिहीताना छायाचित्र द्यायचे असल्यास तिथे 'मजकूरात image किंवा link द्या.' हा पर्याय उपलब्ध नाही. अन्य बाफवरील लेखनखिडकीत ती कमांड देऊन तिथून कत्-पेस्ट करावी लागते. कृपया पहणे. Happy

हे मी 'नविन मायबोली असे सुधारता येईल' मध्ये पण लिहीले होते.

मला माबोवर फोटो अपलोड करायचे आहेत. साइझ <१५३केबी आहे. तरी माझ्या खाजगी जागेत अपलोड करताना ते रिसाइझ(<५०केबी) का होतात?
क्रुपया मदत करा.

फोटोंची लांबी आणि रुंदी बदलली गेली असल्याने त्यांचा साईझ कमी होत असावा.
फोटो ६००X६०० पिक्सेलचा नसल्यास रीसाईज केला जातो. हे पहा हेल्प मेन्यू.


पण माबोवरिल बरेच फोटो > ६००X६०० साइझ चे असतात. ते कसे अपलोड होतात?
मला जे फोटो अपलोड करायचे आहेत ते मोठ्या साइझमध्ये छान दिसतील म्हणून हि धडपड..

आता या सगळ्या रामायणानंतर रामाची सीता कोण ? हा प्रश्न.
मी आतापर्यंत बरेच फोटो अपलोड केलेत. ते मला चांगलेच जमते, कारण नेहमी मी इमेज हा पर्याय वापरतो.
आता मला लिंक हा पर्याय वापरायचा आहे. दोन्ही शब्दावर क्लीक केले कि एकच विंडो उघडतेय.
लिंक टु धिस फोटो वाली विंडो उघडतच नाही ? हे का होत असावे ?

नंद्या, काय चक्रम आहे हो मी ? मी ती विंडो, मायबोलीवर ओपन व्हावी अशी अपेक्षा करत होतो.
पण ती तर पिकासा मधे ओपन होते !!!

पिकासावरून प्र.चि. पोस्ट करण्याची वरील पद्धत अवलंबूनही माझ्या संगणकातून प्र.चि. पोस्ट होत नाहीत कारण 'एम्बेड'खालची लिंक कंट्रोल "सी" व कंट्रोल "व्ही" वापरून फाईल ब्राउझर मधे पेस्टच होत नाही [ इतरत्र कंट्रोल "सी" व "व्ही" ऑपरेट होतं] ! कां होत असावं असं ? प्लीज .

माझा प्रॉब्लेम सुटलाय. मी खुळ्यासारखा मजकूराच्या चौकटीऐवजी 'फाईल ब्राऊझर'मधे लिंक चिकटवू पहात होतो ! [ नंद्याजीनी मी इतका खुळा नसेन असं समजून वि.पु.त माझी अडचण समजून घेण्याचा प्रयत्नही केला !].
धन्यवाद.

मी इमेज टॅग वापरुन खालीलप्रमाणे लिंक टाकतो
< img src="http:\\www.picasawebcom/user/photo.jpg" width="600" height="480" />

"< img" नंतरची स्पेस काढुन वापरावे. अर्थात सविस्तर माहिती वर आहेच.

दामोदरसुत - नमस्कार

ऑडिओ फाईल इथे मायबोलीच्या कुठल्याही बाफवर लावता येत नाही. त्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी [जसे की esnips.com किंवा divshare.com ] ती फाईल ठेउन इथे त्याची लिंक देता येईल. किंवा प्रशासकांशी संपर्क साधून त्यांना विचारणा करावी लागेल.

-मदत_समिती

पाककृती या प्रकारात मला प्रकाशचित्रे कशी टाकता येतील? तिथे मला खाली 'मजकूरात image किंवा link द्या.' अशी option दिसत नाही, म्हणून प्रश्न.

अव्यक्त नमस्कार !,

पाककृती लेखनात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा
इथे माहिती सापडेल बघा. त्यानंतरही काही प्रश्न असतील तर कृपया मला विचारपूसमध्ये लिहा.

नंद्या,
धन्यवाद! जमले!!
मी प्रतिसादाची खिडकी उघडली व image tag पण html मधे "Send to textarea" वापरुन convert केला परंतू काहि कारणांमुळे copy/paste होत नव्हते.

Pages