लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

आता free image sharing sites फारच थोड्या उरल्या आहेत. गूगलच फक्त १५ जीबी फ्री स्टोरेज देत आहे आणि शेअरिंग सुद्धा. इतरांनी शेअरिंग लिंकचा देणे बंद केले आहे आणि स्टोरेजही कमी करून टाकले आहे. काही साइट्स बंदही झाल्या आहेत.

Pages