कथा अथवा लेख दिसत नाही

Submitted by मदत_समिती on 26 June, 2010 - 15:08

मायबोलीवरील लिखाण हे त्यावरच्या प्रतिसादांच्या वेळेनुसार क्रमवारित असते. त्यामुळे नविन आलेले साहित्य बर्‍याचदा 'नवीन लेखनात' मागच्या पानांवर जाते. आपले लिखाण तिथे आहे का पहा. तसेच तुमचे लिखाण तुमच्या सदस्यत्व खात्यातही दिसते. माझे सदस्यत्व >> पाउलखुणा >> लेखन या क्रमाने दुव्यांवर गेल्यास आपले सर्व लिखाण दिसेल.

एखादे लेखन बरेच दिवस अप्रकशित ठेवून मग प्रकाशित केले तर ते लेखन नवीन लेखन मध्ये पहिल्या पानावर न दिसता ज्या दिवशी लिहायला सुरूवात केली आहे त्या तारखेनुसार बर्‍याच मागच्या पानावर सापडते सबब आपले लेखन प्रकाशित झाले नाही असे लेखकांना वाटते.
लेखन ज्या दिवशी प्रकाशित केले त्यादिवशीच्या लेखनात ते येत नसल्याने ते 'नवीन लेखना'च्या पहिल्या पानावर दिसत नाही. त्यावर जर कोणी प्रतिसाद दिला तरच ते प्रतिसादाच्या वेळेनुसार क्रमवारीत येते.

एखाद्या कथेत/लेखात जर परिच्छेद खूपच मोठा असला त्यावेळेसही असे होते आहे. कथेत/लेखात योग्य ते परिच्छेद दिल्यास कथा/लेख दिसू लागेल. शक्यतो कथा/लेख ही सलग, परिच्छेद न देता लिहीणे या प्रमुख कारणास्तव ती दिसत नाही. बदल करूनही कथा/लेख दिसत नसल्यास मायबोली प्रशासकांशी संपर्क साधावा.

मि ईतीहास- हितगुज मध्ये माझे लिखाण "परग्रहवासी आणि मनुष्यजन्म" प्रकाशीत केले परंतु ते दिसत नाही........ कृपया मदत करा.

गुंड्याभाऊ लेख दिसतो आहे. तुम्ही माझे सदस्यत्व --> पाउलखुणा --> लेखन या क्रमाने लेखन दुव्यावर गेलात तर तुम्हालाही तो दिसेल.

धन्यवाद...... पण माझा लेख मी हितगुज -->ईतिहास मध्ये लिहीला आहे........आणि नवीन सभासदास जर तो पहायचा असेल तर आणि त्याने जर हितगुज -->ईतिहास वर क्लिक केले तर तो दिसत नाहि.....असे का? Sad

admin माझ्या कथेची लांबी खुपच आहे..!! (खुप म्हणजे साधारण १३७ पानं..!!)
मैत्री .... तो.. अन ती.. दोघांमधली...
ही कथा दिसत नाहीये..!!
कृपया कहीतरी इलाज सुचवा..!!

महेश घुले.

गुंड्याभाऊ,
तुम्ही तो लेख ग्रूपच्या सदस्यांपुरता मर्यादीत ठेवला आहे. त्यामुळे वाचण्यासाठी नवीन सभासदाला त्या ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्हाला तो सर्वाना वाचण्यासाठी करायचा असल्यास "सार्वजनीक" या checkbox निवडा.

mahesh_engpune,
तुम्हाला कथा वेगवेगळ्या भागात टाकावी लागेल, अन्यथा ती दिसणार नाही.

admin मी कथा वेगवेगळ्या भागात टाकुन पाहिली पण तरीही ती दिसत नाही..!!
एका भागाची साधारण memory किती असावी..? ही १३७ पानांची कथा मी कादंबरी या विभागात प्रसिद्ध केल्यास ती दिसु शकेल काय..?
कृपया ही कथा "कथा" या विभागातच प्रकाशित करता येईल अशी तजवीज करता येईल का ते पहा.
कथेची एकुण memory, rich text format मधे २.०३ mb आहे.!! ती pdf मध्ये बदलल्यास तिची memory 720 kb पर्यंत कमी होत आहे..!! कृपया मार्गदर्शन करा..!!
मला कथा सलगच प्रकाशित करायची आहे..!!

महेश घुले.

admin.....धन्यवाद.... आभारी आहे. आत एकच सांगा.....नविन लेख लीहिताना त्याच्या विषयाच्या पुढे "नविन" असे लीहिल्या वर ते लाल रंगात हायलाईट कसे करावे. का ते माबो करते ?

admin मी कथा वेगवेगळ्या भागात टाकुन पाहिली पण तरीही ती दिसत नाही..!!
एका भागाची साधारण memory किती असावी..? ही १३७ पानांची कथा मी कादंबरी या विभागात प्रसिद्ध केल्यास ती दिसु शकेल काय..?
कृपया ही कथा "कथा" या विभागातच प्रकाशित करता येईल अशी तजवीज करता येईल का ते पहा.
कथेची एकुण memory, rich text format मधे २.०३ mb आहे.!! ती pdf मध्ये बदलल्यास तिची memory 720 kb पर्यंत कमी होत आहे..!! कृपया मार्गदर्शन करा..!!
मला कथा सलगच प्रकाशित करायची आहे..!!

महेश घुले.

महेश एक विनंती : २/३ पानांचा मजकूर, एक सलग परिच्छेद असल्यास, चार पाच परिच्छेद करून टाकणार का? तो दिसत असल्यास, त्यात एक एक पान वाढवा. परिच्छेद करण्याचे मात्र लक्षात ठेवा. हे सगळे तुम्ही प्रीव्ह्यू किंवा प्रतिसाद तपासा आणि अपूर्ण प्रकाशनस्थिती वापरून बघू शकाल.

मी पण 'वाचु आनंदे' या ठिकाणी एका पुस्तकाबद्दल लिहिले आहे. मी जर येण्याची नोंद केली तरच ते मला दिसते अन्यथा नाही. असे का? इतर सभासदांना ते दिसत असेल का?

madhavi_Nayaneesh : 'फक्त ग्रूप सभासदांसाठी' असं तुमच्या धाग्यावर शेवटी दिसत असेल तर ते पान फक्त ग्रुप सदस्यांसाठी दृष्यमान आहे. ते सार्वजानिक केल्यास सर्वांना दिसेल.
[मी असे धरून चाललो आहे की तुम्ही लिहीलेले पुस्तकपरिक्षण बेनझिर भुत्तो - डॉटर ऑफ द ईस्ट याबद्दलचे आहे. ]

धाग्याच्या संपादन मेन्यूमध्ये गेल्यावर, त्या पानावर सर्वात शेवटी, सेव्ह बटणाच्यावर ग्रुप असा ऑप्शन दिसेल. त्यात सार्वजानिक करायचा चौकोनावर टिचकी मारावी. आणि मग धागा सेव्ह करावा.

माझि कथा देवनागरी म्ध्ये टाईप केली आहे पण ती हीतगुज च्या लेखन ब्लोक मध्ये रोमन मध्ये दिस्ते कसे काय? ती देवनागरीत दीसण्यासाठि काय करावे?????

मी ४ दिवसांपूर्वी लिहिलेली कविता अजून प्रकाशित झाली नाही..ती मला दिसत पण नाही आहे...मला मायबोली admin चा इमेल आला आहे...कदाचित अजून नेमस्तकांनी पाहिली नसेल...साधारण किती दिवसांनी प्रकाशित होते? काही माहिती दिलीत तर बरे होईल...

माझ्या काही कविता आणि एक कथा ४,५ दिवसातच नाहिशा झाल्या.तेंव्हा बखरीत बघितल्या
तर त्या आहेत. आता त्या पुन्हा नविन लेखन मध्ये येणारच नाहित का?
आणि " बदलून " असे लिहिलेले असते पण कथा किंवा कविता तीच असते, हे मल जरा
संगाल काय?

फुल्या
लेखन लिहून प्रकाशित केले की लगेच ते सगळ्यांना वाचनासाठी उपलब्ध होते त्यामुळे तुम्ही म्हणता तसे व्हायला नको. तरीही याबद्दल प्रशासकांना कळवले आहे.

आडमिन,
मी माबो वर एक कथा वाचत होतो, विशाल कुलकर्नि यान्चि पुर्वनियोजित. मला त्याचे सर्व भाग कुठे मिळतिल.
प्लिज लिन्क द्या त्याचि.

मदत_समिती
मी माबो वर एक कथा वाचत होतो त्यात एक खन्जिर चे चित्र होते आनि ३ मित्राचि कथा होति. मला ती कथा आता सापडत नाहि आहे. मी नाव पण विसरलो. प्लिज लिन्क देता का त्याचि? मला ति कथा कोनाचि आहे हे पण आटवत नाहि पण वाचायचि नक्कि आहे. so pls help me & give the link.

सापडले - कथेचे नाव पुर्वनियोजीत लेखक विशाल कुलकर्णी. आतातरि लिन्क द्या.

निलेश म्हस्के
कथेचे लेखक किंवा शीर्षक माहित नसतांना कथा शोधणे अवघड आहे.
खालच्या दुव्यावर सगळ्या कथांची एकत्र यादी सापडेल आपण त्यात हवी असलेली कथा शोधू शकता - http://www.maayboli.com/gulmohar/marathi_katha

रूनी पॉटर,
कथेचे नाव पुर्वनियोजीत लेखक विशाल कुलकर्णी. कथा वाचुन पुर्न केल्यशिवाय स्वस्थ बसु शकत नाहि. आतातरि लिन्क द्या.

निलेश म्हस्के,

http://www.maayboli.com/node/16978 आणि http://www.maayboli.com/node/17213 या धाग्यावर तुम्हाला ही कथा वाचायला मिळेल.

खालील गुगल सर्च मध्ये "पुर्वनियोजीत" दिलंत तरी देखील हा दुवा मिळेल. तसेच लेखकाचं नाव माहीत असेल तर मदत्पुस्तिकेतील मायबोलीकरांची सूचीवर जा. तिथे सभासदाचं नाव शोधून त्यांच्या पाऊलखुणा पाहिल्या तर सर्व साहित्य मिळेल.

निलेश
विशाल कुलकर्णी यांच्या प्रोफाइलमध्ये तुम्हाला त्यांनी लिहीलेल्या कथा, कवितांची यादी मिळेल. त्यात कथेचे सगळे भाग सापडतील.

Pages