लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा?

Submitted by मदत_समिती on 30 March, 2008 - 20:23

HowToGiveImageLink.GIF

"माझे सदस्यत्व" या विभागांतर्गत असलेल्या "खाजगी जागा" या उपविभागात तुम्हाला प्रकाशचित्रांना साठवण्याची सोय आहे. लेखन करताना जिथे प्रकाशचित्र हवे असेल, तिथे मजकुराच्या खिडकीखाली "मजकुरात image किंवा link द्या" असा दुवा आहे त्यावर टिचकी मारा. उघडलेल्या नवीन खिडकीत वरील भागात तुम्ही साठवलेली सर्व प्रकाशचित्रे दिसतील. त्यातील हवे ते निवडून अगदी उजवीकडील 'Send to text' हा दुवा वापरा.

आता तुमच्या मजकुरात Image tag येईल. लेखाचे अवलोकन [preview] करताना किंवा लेख साठवून ठेवल्यावर (Save केल्यावर) तुम्हाला प्रकाशचित्र दिसेल.
खाजगी जागेत साठवलेली प्रकाशचित्रे काढून टाकली तर ती ज्या लेखात टाकली आहेत तिथून दिसेनाशी होतात. यावर उपाय शोधणे चालू आहे.

खाजगी जागेत २० एम्बीपर्यंत जागा उपलब्ध आहे. २० एम्बी भरल्यावर अजून प्रकाशचित्रे चढवण्यासाठी नको असलेली प्रकाशचित्रे उडवून जागा रिकामी करणे आवश्यक आहे.

प्रकाशचित्रांचा आकार हा शक्यतोवर ४०० पिक्सेल असावा, जेणे करून फोटोंचे पान लगेच दिसेल, तसेच मायबोलीवरच्या जाहिराती दिसतील.

पिकासा लिंक कशी द्याल

पिकासामधील चित्राची लिंक येथे देण्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी गुगलच्या माहिती संकलनात पहा

फ्लिकरवरून येथे लिंक देण्यासाठी फ्लिकर FAQ मध्ये पहा

फोटोंचा साईझ कमी करण्यासाठी mspaint, irfanview, acdsee ते फोटोशॉप पर्यंत अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. तसेच मायक्रोसॉफ्टची पॉवरटॉय सिरीजदेखील आहे. फ्लिकरसारखी संकेतस्थळे ही सुविधा विनामूल्य देतात. आपल्याला जे सोयीचे वाटते ते आपण वापरू शकता.

सूचना: शक्यतोवर ८०० पिक्सेलच्या प्रकाशचित्रांची लिंक देऊ नका. असे प्रकाशचित्रांचे पान दिसण्यात वेळ लागतो, [डायल अप कनेक्शन असेल तर जास्तच ...] आणि मायबोलीच्या जाहिरातींवर प्रकाशचित्र पसरते.

अत्तापर्यंत तीनदा असे झाले की मी प्रतिसाद मा.बो.वर टाकला . तो काहीवेळ दिसला नंतर काय झाले माहीत नाही तो गायबच झाला. प्रतिसाद दिल्या नंतर खाली सेव व प्रतिसाद तापासा असे आहे. नेमके तेथे काय कारायचे हे माहित नाही.

.

,

.

दुसरीकडे असलेल्या लिन्कची माहिती प्रतीसादात देता येते, पण विनोद विभागात मला काही फोटो टाकायचे आहेत ते कसे टाकायचे? हे इमेज प्रकरण मला अजीबात समजत नाही, कारण मला कम्प्युटरचे बेसिक ज्ञान आहे, तान्त्रिक कळत नाही. जरा सोप्या पद्धतीने कुणी समजावेल का? आगाऊ ( आय डी नव्हे) धन्यवाद!

गुगल वर लोड करायचे आणि नंतर "save image as" करुन फोटो परत आपल्या कम्पुटर वर घ्यायचा नंतर पेंट ब्रश मध्ये ७०% नी " resolution " कमी करायचे आणि अपलोड करायचा. फोटो ची क्वालिटी निट येत नाही पण फोटो अपलोड तरी करता येतात.
आजुन काही चांगला उपाय असेल तर माहित नाही.

फ्लिकर खूप ऑफिसात banned आहे त्यामुळे माबोवरील चित्रे पाहता येत नाहीत. फ्लिकारवरून फोटो टाकले कि अर्धे पब्लिक फोटो दिसत नाहीत म्हणून ओरडायला लागते. पिकासाचे तसे नाही.

ह्या मजकुरात मोबाइल द्वारे image कशी द्यायची. मी image वर क्लिक केले नंतर नवीन विंडो ओपन झाला त्यात अपलोड ह्या option वर क्लिक केले.choose file हे option ओपन झाले नंतर ते क्लिक केल्या वर document मधुन image select केली ती अपलोड पण झाली.तसे खाली मेसेज पण दिसते आहे पण ते नवीन विंडो मधुन पुढच्या विंडो वर कसे आणायचे.म्हऩजे send to text area कसे करायचे तो option दिसत नाही.

वर चे उत्तर लवकर मिळेल तर बरे होईल मला मायबोली मास्टर शेफ मधे रेसिपी पोस्ट करायची आहे.मी ग्रुप ची नवीन सदस्य आहे.

.

.

इमेज अपलोड झाल्यावर त्याच ( दुसऱ्या) विंडो मध्ये अपलोड लिहिलेल्या लिंक च्या जवळच सेंड टु टेक्स्ट एरिया असे लिहिलेली लिंक आहेती लिंक क्लिक केल्यावर परत पहिल्या विंडोमध्ये ( जिथे तुम्ही टेक्स्ट लिहिले होते जा. ( दुसरी इमेज अपलोडींग वाली विंडो मिनिमाइझ करुन परत पहिली विंडो उघडा.) तिथे टेक्स्ट एरिया मध्ये तुम्हाला इमेजची लिंक आलेली दिसेल. तो मेसेज सेव्ह केल्यावर प्रतिसादात इमेज दिसेल.
I hope whatever i wrote is understandable.

.

मोबाईलवरून मायबोलीवर लॉग ईन झाल्यानंतर माझे सदस्यत्व मध्ये जा. तिथे खाजगी जागा असा पर्याय दिसेल. त्यावर टिचकी मारा. आता Choose File या पर्यायावर टिचकी मारा आता तुमच्या मोबाईलमधील जो फोटो तुम्हाला द्यायचा आहे तो निवडा आणि Upload या पर्यायावर टिचकी मारा. जर तो फोटो १५० KB एव्हढ्या साईजचा असेल तर तो अपलोड होईल.

त्यानंतर तुम्ही जो लेख अथवा पाककृती लिहित आहात त्यामध्ये तुम्हाला जिथे हा फोटो टाकायचा आहे. त्या लेखाच्या चौकटी खाली असलेल्या मजकूरात image किंवा link द्या या पर्यायापैकी image या पर्यायाला निवडा. दुसरी विंडो ओपन होऊन तुम्ही पुन्हा तुमच्या खाजगी जागा या ठिकाणी पोहचाल. नंतर जो फोटो द्यायचा आहे तो निवडून वरती दिसणारा send to text area हा पर्याय निवडा. तुम्हाला तुमच्या लेखात त्या फोटोची लिंक दिसेल जी वर्डमध्ये असेल. सेव्ह केल्यानंतर तो फोटो दिसेल.

तुमच्या खाजगी जागेत जाऊन कुठला फोटो टाकायचा आहे त्या फाइलचे नाव एक्स्टेन्शन सहित नोंद करा.
तसेच त्याची width आणि height नोंद करा.

img src="/files/u62671/filename.jpg" width="600" height="600" alt="filename.jpg" /

आता वरची लिंक कॉपी करुन त्यात
१. सुरवातीला < symbol टाका. म्हणजे < img असे करा पण < आणि img मध्ये स्पेस न देता.
२. शेवटी ">" symbol टाका. म्हणजे शेवटी "filename.jpg" /> असे करा.
३. filename.jpg च्या जागी ते खोडुन तुमच्या फोटोच्या फ़ाइलचे नोंद केलेले नाव जसेच्या तसे टाका त्याच एक्स्टेन्शन सकट. कुठे CAPs आहे कुठे नाही अगदी जसेच्या तसे. (filename.jpg हे दोनदा आहे दोन्ही ठिकाणी बदलून तुमच्या फाईलचे नाव द्यायचे.)
४. width आणि height 600 नसतील तर ज्या आहेत त्या टाका.
५. हे बदल करताना कुठेही ज्यादा स्पेस, कमी स्पेस होणार नाही याची खबरदारी घ्या.
झाली तुमच्या फोटोची लिंक तयार. (तुमचा user id ऑलरेडी दिलाय या लिंक मध्ये).

वाटल्यास इथेच असा एक फोटो टाकुन बघा येतो का.
बेस्ट लक.

< img src="/files/u62671/MG-20160908-WA0003.jpg" width="899" height="1200" alt="MG-20160908-WA0003.jpg" />

Pages