मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच किस्से!

माझा ताजा ताजा वेंधळेपणा.
संध्याकाळचे जेवण आवरुन लहान मुलीला झोपवत होते. माबोवर चक्कर टाकण्यासाठी आयपॉड सुरु केला आणि दिवे गेले! सात वर्षात २-३ वेळाच गेले आहेत. त्यामुळे लगेच येतीलच असा विचार करुन परत आयपॉडवर लक्ष केंद्रित केले. साईट का उघडत नाहीये म्हणुन विचार करु लागले. लाईट गेले तरी आयपॉड आहे ना टीपी करायला हा विचार होता मनात. काही वेळ विचार करुन लक्षात आले की मॉडेम बंद झाला आहे.
जवळ जवळ एक तास दिवे नव्हते. तेव्हढ्या वेळात पुढील गोष्टी करुन त्या का होत नाहीयेत असा विचार करुन 'अरे! लाईट नाहीयेत' असे स्वतःला समजावले -
१. बेड हीटर सुरु केले
२. डक्टेड हीटींग वाढवले
३. दुध गरम करण्यासाठी मावे मध्ये ठेवले
४. वॉल माऊंटेड अवन मध्ये किती वाजलेत हे बघण्याचा प्रयत्न केला

असे सगळे प्रयत्न केल्यानंतर मनाने लाईट नसल्याची नोंद घेतली. भारतात लाईट गेल्यावर आपण काय काय करायचो हे आठवुन आणि मी पाणी भरुन ठेवु लागले. ईथे फक्त १ बादली आणि २ मोठे पातेले येवढीच साधने आहेत म्हणुम बाथ टब मध्ये स्टॉपर लावुन पाणी सुरु करणार येवढ्यात नवरा बाहेरुन आला. त्याला काही कळेचना काय चाललय? त्याला सांगितले पाणी भरतेय, लाईट गेलेत ना...... तो आवाक. त्याने मला खुर्चीत बसवले आणि सांगितले की ईथे लाईट गेले तरी पाणी येतेच कारण पाणी वर चढवावे लागत नाही वगैरे वगैरे Biggrin

लाईट जाण्यावरुन आठवलं. हा वेंधळेपणापेक्षा शुद्ध बावळटपणाच म्हणायला हवा खरं तर.
मी शाळेत असताना एकदा आइ वडिल कुठे तरी दिवस भराकरता बाहेर गेले होते. संध्याकाळी मी मित्राला घरी बोलवलं होतं. मित्र संध्याकाळी आल्यावर आमचं पिकचर ला जायचं ठरलं. मी त्याला म्हंटलं की मी पटकन अंघोळ करुन येतो. तो पर्यंत तो बाहेर हॉल मध्ये काहीतरी वाचत बसला.
मी अंघोळ करुन बाहेर येता येता आतल्या खोलीतून त्याच्याशी बोलत होतो आणि दोन मिनीटांनी डोक्यावर टॉवेल घेऊन केस पुसत बाहेरच्या खोलीत आलो. माझ्या तोंडावर टॉवेल होता आणि मी आपला डोळे मिटून खसाखस केस पुसत होतो बोलता बोलता. नंतर मी केस पुसुन झाले म्हणुन टॉवेल डोकं आणि तोंडावरुन बाजुला घेतला अन बघतो तर एकदम अंधार गुडूप्प!
मी आपलं डोळे एकदम जोर जोरात मिचकावून बघायला लागलो, तरी अंधारच. मग नंतर दोन-तीन वेळा डोळे चोळले तरी अंधारच. मग मी मित्राला सांगितलं की अरे मला काहीच दिसत नाहीये.तर तो ही "अरे दिसत नाही म्हणजे काय?" असं म्हंटला. मग तर माझी जामच टरकली. जरा आणखिनच घाबरुन "अरे मी आता खुप जोरजोरात डोकं आणि डोळे पुसले त्या नंतर मला आता काहीच दिसत नाहीये" असं सांगायला लागलो. त्याला ही काही कळलं नाही पण मी जरा जास्तच वेड्यासारखं करायला लागल्यावर त्याला नेमकं लक्षात आलं की काय झालं ते. त्यानी माझी मान्गुट धरली आणि हॉल मधली गॅलरीकडे माझें तोंड करुन तिथला दरवाजा उघडला आणि विचारलं की "आता दिसतय काय रे ढापण्या?" मला समोरच्या बिल्डींग मध्ये चमकणारे दिवे दिसले आणि जीव भांड्यात पडला. Proud
मी केस पुसत असतानाच एकदम लाइट गेले आणि टॉवेल काढल्यावर, घरात सगळी दारं, खिडक्या बंद असल्यामुळे आणि डोळ्यावर चष्मा नसल्यामुळे एकदम अंधार झाला आणि मला वाटलं की फक्त मलाच काही दिसत नाहीये.त्या मित्रालाही नेमकं मी असं काय बडबडतोय हे कळालं नसल्यामुळे तोही चटकन लाइट गेले आहेत असं म्हंटला नाही.... एकंदरित सगळीच गंमत... Lol

वैद्य, जरा तपशील स्पष्ट करुन लिहा >>>>> तुम्ही एरवी नाक मुरडता अन नेमक्या वेळी भाबडेपणानी लिहीलेल्या मजकुरात वाट्टेल ते तपशील स्पष्ट करायला लावता! हे काय बरोबर नाय! Proud
अहो, कमरेचा टॉवेल सोडुन मला अंधार दिसायला मी काय दादांचा विनोद सांगतोय का इथे?

वत्सला, वैद्यबुवा Happy

लीफ्ट बंद असली की चार मजले चढावे लागतात आणी ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज लीफ्ट ६ मधुन ४ दिवस वा दिवसातुन २-३ वेळा तरी डाऊन असतेच त्यात मला कोणत्या मजल्यावर काय आहे याची नेमकी ओळाख अजुन तरी झालेली नाही, ३ र्‍या मजल्यावर Admin आहे आणी सध्या ४ थ्या वर मी बसते. काल दुपारी लीफ्ट बंद होती, लंच नंतर (लंच ला बाहेर जाण्यासाठी पहिल्या मजल्यावर जाव लागत Sad ) Admin च जे काम आहे ते करुन मग वर जाऊ म्हणुन आधी ३ र्‍या मजल्यावर Admin मध्ये गेले मग ४ थ्या मजल्यावर जाण्यासाठी जीने चढत होते तर बराच वेळ झाला तरी ४ था मजला येईच ना, मी आपल जीने चढतीय आणी एकदम समोर एक बंद दार आल मग ट्युब पेटली मी चढत चढत गच्ची गाढली होती Uhoh परत २ मजले खाली आले Sad

अगदि नविन होते तेव्हा एकदा दुसर्‍या मजल्यावर पोहचल्यावर तीथेच चौथा मजला शोधत होते , तीथले सगळे जण हि काय शोधतेय ह्या नजरेने माझ्या कडे बघत होते Uhoh Happy

<<<मग ४ थ्या मजल्यावर जाण्यासाठी जीने चढत होते तर बराच वेळ झाला तरी ४ था मजला येईच ना,>>>>

Biggrin अश्विनिमामी आता याला तुमच्या गुणतक्त्यात किति गुण ???? (मला सर्वान्चे वेन्क्यु ठरवणार्‍या अश्वीनीमामी फुबाइफु मधल्या निर्मितिताई सारख्या दिसतात, आणि तसे असेल तर समु तुला आज त्यान्च्याकडुन चॉकलेट... Rofl )

आयला, एकमेव कथाबाह्य आणि बघणेबल शो आहे झी मराठी वरचा.......... फु बाई फु. आणि त्यामध्ये अप्रतिम परफॉर्मन्सला निर्मिती सावन्त (परिक्षक) चॉकलेट देते..... Lol
आता, अश्विनिमामी हे नाव तसे भारदस्त वाटते आणि आपण सर्वानुमते इथे त्याना वेन्क्यु ठरवायचे काम दिलय्.......म्हणुन तसे चित्र डोळ्यासमोर आले...... Biggrin

मला पण हवे चॉकलेट. किमान एक तुकडा तरी.
सात वर्षांपूर्वी इंदूरहून माझी पुन्हा मुंबईला बदली झाली. आधी सामान टेंपोने पाठवून संध्याकाळच्या विमानाने मी येणार होतो. सामान बांधायला ३+१ माणसे आली होती, आणि त्यांनी अगदी कुशलपणे पटापट सगळे सामान खोक्यात सीलबंद केले. शेवटचा पुस्तकांचा खोका बंद झाला, आणि मला लक्षात आले की माझे विमानाचे तिकिट दिसत नाही. तो पुस्तकांबरोबरच गेला असेल या आशेने तो खोका उघडला आणि सुदैवाने त्यातच तिकिट मिळाले. नाहीतर मला टेंपोनेच यावे लागले असते.

भरत Biggrin

वत्सला,
१. बेड हीटर सुरु केले
२. डक्टेड हीटींग वाढवले
३. दुध गरम करण्यासाठी मावे मध्ये ठेवले
४. वॉल माऊंटेड अवन मध्ये किती वाजलेत हे बघण्याचा प्रयत्न केला
?? ??
मला तर वरील पैकी काहीच कळत नाही ,याला "वेंधळेपणा" म्हणाल तर काय म्हणाल ?
Lol
लाईट नसेल तरी पाणी वर येत .....?????
उगाच आम्हाला "गंडवु" नका बरं !!!
अस कुठं असत का ?

अय्या भ्रमर माझा साइज निर्मिती एवढा नाहीये( अजूनतरी)
भरत अश्या टाईपाची गड्बड फ्रेंड्स मध्ये रॅचेलची झाली होती. आज तुमचे पण वेंक्यू खाते उघड्ले आहे : २+१
=३ एक बोनस मार्क सोबत.

आजचे बाकी आकडे
समु वेंक्यू : २३
वत्सला : ४ ( होता है होता है )
मामी : ३ चिकन डिफ्रॉस्ट करायला ठेवले. उघडून पाहिले तर ते चिकन सलामी होते.
सलामीचकत्या रागावून माझ्याकडे बघत होत्या.

आर्यातै नुसते हसायचे नैकै. लिहा लिहा.

सर्व वेंधळ्यांना भेट उचला हवे ते.
chocolates.jpg

अनिल७६ असे अस्त कारण city water authority जागोजागि पाण्याच्या टाक्या टप्याटप्याने वेगवेगळ्या उन्चिवर बान्धते.
मग पाणि प्रथम सर्वात उन्च टाकित चढ्विले जाते आणि तिथुन खाल्च्या टाक्यन्मध्ये आणले जाते.
प्रत्येक घर आशा टाकिला जोडले अस्ते जि घरापेक्शा उन्च आहे.

काल बर्‍याच दिवसांनंतर बसने प्रवास केला.. स्टॉप वर उतरल्यावर समोरच चेकर होता.. त्याच्या हातात भरपुर पास होते आणि पासवाले त्याच्या भोवती गर्दी करुन उभे होते.. मी मग माझं तिकीट त्याच्या समोर धरलं.. पण त्याने लक्षच दिले नाही.. Sad म्हणुन मीही हट्टाने तिथेच उभे राहिले त्याच्या समोर तिकीट धरुन, तरिही तो लक्ष देइना.. नंतर लक्शात आले की मागचे उतरलेले प्रवासी तर मजेत निघुन जातायेत.. आणि मग आठवलं की जसं आपण आवर्जुन तिकीट काढतो तसं ते आवर्जुन चेकरला दाखवायची गरज नसते.. त्याने मागितलं तरचं दाखवावं... Happy

काल मी मोबाईलवर रेडीओ लावण्यासाठी कॉर्ड लावला ,पण तरी रेडिओ काही चालु होत नव्हता,
कनेक्शन नाही म्हणुन मेसेज ......
थोडी वायर चेक करण्यासाठी वर उचलला तर बाजुला असलेला चार्जर उचलला गेला ....
Lol

परवा घरी गेल्यावर टि वी चा रिमोट सापडत नव्हता. वैतागुन मोबाईल शोधायला लागलो, तो ही सापडला नाही. बायकोचा तरी मोबाईल सापडतो का पहावं म्हणुन भावाला विचारलं मोबाईल की तुझ्या वैनीचा फोन कुठंय? त्याचा प्रती प्रश्न "कशाला हवाय ? तुझा फोन सापडत नाहीय का ? मिस्कॉल द्यायचाय का ? माझ्यावरुन देतो ना..."
मी... "अबे पण मला रिमोट शोधायचाय, त्याला मिसकॉल दे आधी.... Angry "

अनिल सेम पिंच..........

ऑफिस्मध्ये काल पेन ड्राईव्ह्मधुन एक डॉक्युमेंट लॅपटॉप्वर घेतले....... आणि दिली प्रिंट्ची कमान्ड....... तब्बल ९ वेळा प्रयत्न करुन काहिच होईना........ वैतागुन बघितले तर डेस्कवर कॉम्प्युटर आहे, प्रिंटर त्याला कने़क्टेड......... Sad मग पेन ड्राईव्ह कॉम्प्युटरला लावला........... फुटके नशीब....... मगाशी कॉपी करताना डॉक्युमेन्ट ड्राईव्ह मधुन उडवली होती...... Angry
पुन्हा एकदा डॉक लॅपटॉप्वरुन कॉपी केली........ आता शान्तपणे कॉम्पच्या डॅस्क्टॉपवर सेव्ह केली.... Happy अर्थात लॅपटॉपवर ती ओपेन होतिच.......... मग काय एवढे सगळे करुन पुन्हा लॅपटॉपवरच प्रिंट कमान्ड दिली....... Sad दोन मिनिटे ब्लँक झालो होतो... काय चाललय काय...... Biggrin

दोन दिवसांपुर्वी ग्राहक पेठेत किराणामाल घेण्यासाठी जाण्यासाठी निघालो. Happy मोठी खरेदी होती म्हणुन मावस भावालाही बरोबर घेतले होते. २/३ कापडी पिशव्या बरोबर घेतल्या.

ववि ची बस ठरवायचे पण काम करायचे होतेच. ट्रांन्स्पोर्ट कं चे ऑफिस तिथुन जवळाच होते. ट्रांन्सपोर्ट ऑफिस मधे बराच वेळ चर्चा केल्या नंतर तिथुन बाहेर पडलो.

खिशात हात घातला आणि मग तोच हात कपाळावर मारून घेतला..त्यावेळेस फक्त १० रुपायाची नोट खिशात होती
सगळॅ पैसे / कार्ड घरीच राहिले होते. Proud

Pages