स्वयंपाकाची भांडी आणि उपकरणे

Submitted by मंजूडी on 6 March, 2009 - 00:34

स्वयंपाकासाठी वापरायची भांडी आणि उपकरणे ह्याबद्दल आपण इथे हितगुज करूया.

जुन्या हितगुजवरची चर्चा इथे होती.

स्वयंपाकात वापरायचे निरनिराळे तवे आणि त्यांची घ्यायची काळजी, निगा इत्यादीविषयी इथे पहा, विचारा, लिहा - http://www.maayboli.com/node/25369

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्सा, मी थोड्याच दिवसापूर्वी स्टीलचा फिल्टर घेतला. त्या आधी टाटा हिंदुस्तान लिव्हर वगैरे प्रॉड्क्ट्स पाहिले होते. या सर्व प्युरिफायर्सचा असा विचित्र आकार का ठेवलाय?? आणि हे प्युरिफायर्स प्लास्टिकचे असल्याने थोड्या दिवसानी त्यामधे पाण्याचा वास येतोच ना???

प्राची, अक्वा गार्डचा डायरेक्ट नळालाच बसवायचा फिल्टर आलाय, तो पाहिलास का? आईने विहीरीच्या पाण्यासाठी बसवून घेतलाय. (जरी ते पाणी प्यायला वापरले नाही तरी स्वयंपाकाला आता वापरले जातय)

रायवलचा क्रोकपॉट घेतलाय - त्यात करता येण्यासारख्या फक्त शाकाहारी रेसिपीज कुणी सांगू शकेल का? जुन्या मायबोलीवरचे पान चाळून झाले आहे. त्यावरच्या लिंक्स पण पाहिल्या आहेत. क्रोकपोट अडीच क्वार्ट साईजचे आहे.

हे चुकीच्या ठिकाणी आहे का? असेल तर ते ही सांगा - मला थोड्या रेसिपी हव्या आहेत.

अमी

आहे ना. मायक्रोवेवच्या जमान्यात मी अजुनही ओटिजी वापरते Happy पण माझा ओटीजी मला वॉटर प्युरिफायरबरोबर फुकट मिळालेला. केनस्टारचा प्युरिफायर सोबत लाईफलाँगचा ओटीजी.. १९९९ मध्ये घेतलेला. दोन्ही गोष्टी बहुतेक लाईफलाँग टिकणार आहेत. मी केक, चिकन, मासे वगैरे करते त्यात...

मी इन्डक्शन कुक आणला.. प्रेस्टिज चा आहे.. भाम्डी फुकट अची स्कीम संपली असे म्हणाला.. पण भांडी फुकट दिलीत तरच कुक घेणार असे निक्षून सांगितल्यावर तीन भाम्डी मिळाली... उपयोगी आहे... सध्या फक्त वरण भात खीर असे पदार्थ सुरु आहेत.. चपाती, भाजीचा अजुन नाद केला नाही..

फक्त पदार्थ शिजतो, भाम्डे गरम होत नाही, हे फक्त दुकानात एक मिनिटात पाणी गरम करतानाच होते... घरात २० मिनिटे काही शिजवले तर भांडे गरम होणारच... Happy

विजेचे बिल अजून आले नाही... शॉक बसत नाही... ( शॉक बसत नाही, हा भांड्याचा अनुभव, अजुन बिलाचा अनुभव आलेला नाही.. )

मला ओटीजी घ्यायचाय कारण मला फक्त बेकींग, ग्रीलींग कराययचे आहे. चार माणसांसाठी किती लिटरचा घ्यावा? कोणत्या ब्रँडचा घ्यावा?

धन्यवाद साधना, प्राची.

साधना, तुझा ओटीजी बद्दलचा अनुभव कसा आहे?

किती लिटरचा घ्यावा, या बद्दल कोणि सांगेल का?

माझ्याकडे आता त्याचे मॅनुअल आहे त्यात पाहिले तर १६ लिटर लिहिलेय. बाजारात दिसणा-या स्टंडर्ड साईजचाच आहे हा. थर्मोस्टेट snap action bimeTallic , single phase 230 v आहे.

माझा अनुभव चांगला आहे. केक वगैरे मस्त होतात. बेकिंग, ग्रिल्लिंगसाठी ही साईज योग्य. वापरायलाही सुटसुटीत. माझ्या घरात ३नच माणसे आहेत Happy

बजाजचा माझ्या वहिनीकडे होता. तोही चांगला होता. तिने काढुन आता मावे घेतला. पण केकसाठी मला मावे पेक्षा ओटिजी बरा वाटला.

http://mumbai.quikr.com/Best-Sale-price-for-Oven-Toaster-Grill-Barely-Us...

हे बघ... Happy असलेही असते माहित नव्हते...

हम्म्म.... सुरूवातीला जुना वापरून सवय झाल्यावर नविन घेण्याचा ऑप्शनही आहे Happy

धन्यवाद गं. मला किती क्षमतेचा घ्यावा, हे कळत नव्हतं. कारण ४ माणसांच्या द्रूष्टीने मावे ३० लिटरचा घ्यावा लागतो, असे ऐकुन होते. ओटीजी सुद्धा तेवढाच घ्यावा का, असा संभ्रम निर्माण झाला होता.

ओटीजी आकाराने लहान असतो, मावे पेक्षा. तेही एक कारण आहे तो घेण्याचे.

फक्त बेकिंग आणि ग्रिलिंग करायचेय तर ओटिजी बेस्ट.

मावेत ब-याच गोष्टी झटपट करता येतात. बटाटे वगैरे दोन मिनिटात उकडुन होतात. मुलांना आई नसताना नुड्ल्स वगैरे करुन खाता येतात..इ.इ.. त्या तुलनेत ओटीजी पेक्षा मावे बरा वाटतो. अर्थात मी अजुन घ्यायचा विचार केलेला नाहीये...

मावेचे आपल्यावर काही वाईट परिणाम होतात असे वाचलेले, पण आपण कुठे इतका वापरतो???

उपयोग नाही मनिषा....आपल्याकडे हातानी केलेल्या पोळ्यांची सवय असते...या पोळ्या नाही आवडत घरातल्या मंडळींना. (आमच्या गोव्याच्या घरात पडून आहे. )

मनिषा, याचे तंत्र जमणे अवघड आहे. आणि त्या मनासारख्या भाजल्या जात नाहीत, तव्यावर परत थोड्या भाजाव्या लागतात. पण लाटण्यासाठी मला तो आवडायचा. त्यावर लाटून थोड्या शेकून, तव्यावर भाजत असे मी.

रोटी मेकर वेस्ट आहे. पैसे वाया घालवू नये.
ओटीजी पेक्षा मावे आधुनिक तंत्रज्ञान आहे व फस फ्री. शॉक बसण्याची शक्यता कमी. वगैरे बघितले तर ओटीजीवर पैसे घालवू नये. ब्रॉड बँड सोडून जुने डायल अप कनेक्षन घेण्यासारखे आहे.
जामोप्या मी हपिससाठी घेणार आहे इंडक्षन सिस्टिम.

प्रेशर कुकरचा व्हाल्व खराब झालाय हे कसे ओळखावे?
माझ्याकडे हॉकिन्स चा ३ लिटरचा कुकर आहे, गेली ५ वर्षे वापरतेय. गेले काही दिवस शिटी नीट होत नाही. पहिली शिटी होताना नुसतीच वाफ बाहेर जाते, चमच्याने किंवा कशाने तरी शिटी दाबली की मगच शिटी होते. कशामुळे होत असेल? व्हाल्व गेला असेल का?

दुसरा एक प्रश्नः
इथे अमेरिकेत तुम्ही डाळी, मसाले, पीठे वगैरे ठेवायला प्लास्टिकचे डबे वापरता की आणखी कसले?
मला प्लास्टिकचे डबे रिप्लेस करुन त्याऐवजी काचेचे आणायचे आहेत (३०-४० तरी लागतील). इथे अमेरिकेत कुठे स्वस्त आणि चांगल्या बरण्या मिळतील? मागे डॉलर ट्रीमध्ये मध्यम आकाराच्या बरण्या प्रत्येकी एक डॉलरला मिळाल्या होत्या. किंवा अजुन काही पर्याय वापरत असाल तर तेही सांगा.

कूकरचा व्हॉल्व्ह खराब झाला म्हणजे तो वितळतो, व त्यातून वाफ बाहेर जाते.(तो तीन घातूंच्या मिश्रणापासून तयार केलेला असतो.)
कूकर ची रींग तपासून पहा. तिला तडा वा चिर असेल तर तिथून वाफ बाहेर जात असेल. झाकण वा कूकरची बॉडी जर आपटल्याने वेडीवाकडी झाली असेल, वा कडेवर झारा वगैरे आपटल्याने तिथे खाच पडली असेल तर असे होऊ शकते.
फॅक्टरीतून बाहेर पडलेली प्रत्येक शिट्टी, हि ठराविक दाबाला टेस्ट केलेली असते.

ज्ञाती
बरण्यांसाठी एकदा IKEA मध्ये चक्कर मार, डॉलर ट्री इतक्या स्वस्त नाहीत पण २ डॉलर ला छोटी ते ५-६ डॉलरला मोठी बरणी अशी रेंज आहे. मी त्याच वापरते. पण मी एकावेळी सगळे प्लास्टिकचे डब्बे रीप्लेस केले नाही, एकदा आयकियाला गेले की ६-८ बरण्या आणत गेले वेगवेगळ्या आकाराच्या लागतील तश्या. टप्प्याटप्प्याने बरण्या आणल्यामुळे मग हा पर्याय खूप खर्चिक वाटला नाही.

ज्ञाती, मी स्नॅपवेअरचे एअर टाईट असे प्लॉस्टीकचे डबे वापरते. कॉस्टकोमध्ये मिळतात बर्‍याचदा.
मला त्या काचेच्या बरण्या नको वाटतात. एक तर मी धसमुसळी आहे, दर वेळी काहीतरी काढतानां काहीतरी सांडणार. शिवाय त्या बरण्या धुवायला ही त्रास. चांगल्या प्रतीचे थोडे महाग असले तरी मला प्लॉस्टीकचे डबे बरे वाटतात.

ज्ञाती,
मी तिखट, हळद, आणि घरगुती गोडा मसाला, कांदा लसून मसाला ( भारतातून आणलेले) ठेवायला, काचेचे डबे ( चऊकोनी, म्ह़णजे नीट रचून ठेवता येतात ते वापरते). मी माझे ContainerStore मधून आणलेले.
त्याच store मधून, गव्हाचे पीठ आणि तांदूळ ठेवण्यासाठी हे आणले :
http://www.containerstore.com/shop/kitchen/foodStorage/bulk?productId=10...
यातल्या मोठ्या size मध्ये, २० पाऊंडाच्या पिशवितले पीठ आणि तांदूळ व्यवस्थीत बसतात.
ईतर डाळी आणि पिठं ठेवायला, मी BPA free plastic चे साधारण असे डबे वापरते
http://www.kohls.com/kohlsStore/landingpages/foodnetwork/pantrywarestora...
काचेच्या बरण्याण्चे वजन खूप असते. त्यात डाळी वैगरे भरल्यानंतर अजून जड होते. शिवाय माझ्या किचन मध्ये tiles आहेत, म्हनून मला हेच सोयिचे वाटते. शिवाय सगळे कोरडेच असल्यामुळे धुवायला त्रास होत नाही.
ज्याल तेल सुटते ( मसाले, चिवडा वै. ) , किंवा ज्याचा रंग लागतो, हळद वै. आवर्जून काचेतच ठेवते, म्हणजे धुवायला सोपे पडते.
चांगले प्लास्टीक चे डबे, जरा महाग असतात पण सेल मध्ये बर्याचदा चांगले डील्स मीळतात. आणि एकदाच घ्यावे लागतात.

Pages