पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं आता आली आहेस तर एक सांगतेस का ? ईटीच्या क्रॅनबेरी ऑरेंज ब्रेडमध्ये सावर क्रीमला पर्यायी काय घालू ? दही घालून बघितले. ब्रेड चांगला होतो पण दह्यात ऑरेंज ज्यूस घातल्यावर ते मिश्रण सगळे नासल्यासारखे दिसते आणि मग मला खाववत नाही Uhoh सावर क्रीम पण आवडत नाही.

ईटीच्या क्रॅनबेरी ऑरेंज ब्रेडमध्ये सावर क्रीमला पर्यायी काय घालू ? >> मी तो ब्रेड करत नाही कारण तो व्हेगन नाहिये. तिला विचारु शकतेस ब्लॉगवर ती पर्याय सुचवतेय का पहा.

अजुन एक http://the-cooker.blogspot.com/2009/03/good-day-sunshine.html ही जशीच्या तशी फॉलो कर आणि त्यात १/२ कप क्रॅनबेरीज घाल. मी केलेला आहे मस्तच होतो. आणि मी लोफपॅनमधे पण केलाय तो देखील छान होतो.

मी हा केलाय तो देखील छान होतो. http://vadanikavalgheta.blogspot.com/2010/03/orange-cranberry-cake.html
अर्थात माझे सगळे केक्स व्हेगन असतात.

या वरच्या सूपमधे आपल्या चवीसाठी म्हणून हि पेस्ट घालून बघा. दहा बारा काश्मिरी मिरच्यांच्या बिया काढून घ्या, त्यात आठ दहा लसूण पाकळ्या (मध्यम आकाराच्या ) मीठ आणि लागेल तसे व्हीनीगर घालून, बारीक वाटून घ्या. हि पेस्ट दिवसभर फ्रिजबाहेर ठेवा, म्हणजे ती मूरते आणि मग फ्रीजमधे ठेवा. व्हीनीगर नको असेल, तर यात चिंचेचा दाट कोळ घाला. कुठल्याही चायनीज पदार्थाबरोबर ही पेस्ट वापरुन बघा. यात किंचीत साखर घातली, तर छान चव येते.

सामान भरताना काश्मिरी मीरची पावडर ऐवजी चूकून अख्खी काश्मीरि मीरची दीली आहे...त्याचे काय करता येईल? जास्त कुटाणा नसलेली एखादी चटणी कुणी सान्गु शकेल का? (कूटाणा म्हणजे वाळवणे वगेरे)...

काश्मिरि मिरची कुठल्याही पदार्थात वापरता येते. ती पाण्यात भिजवून (बिया काढून ) वाटणात घेतली तर छान रंग येतो. मिक्सरमधे एकदाच फिरवून, चिली फ्लेक्स करता येतील. ते कुठल्याहि रस्सा भाजी वा आमटीत टाकता येतात. या पदार्थात तरंगणारे लालभडक तूकडे छान दिसतात.

काश्मिरी मिरची आहे म्हणजे कमी तिखट असेल असे गृहित धरतेय. तर http://www.maayboli.com/node/16450
ही निस्त्याची चटणीसारखी चटणी करता येईल. ही अगदी साठवणीची नसते पण ८-१० दिवस रहाते फ्रीजमधे.

किंवा रंजका http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/ranjaka.html या पद्धतीने करता येईल. तुमच्या मिरच्या सुकलेल्या आहेत तर देठ काढून रात्रभर लिंबाच्या रसात भिजत ठेवुन मग गूळ/साखर आणि मीठ घालून वाटा. तो पण साठवणीचा प्रकार होईल.

हा प्रश्न कूठे विचारावा माहित नाही .... तूप कढवल्यावर खाली जी बेरी उरते ते नक्की काय असते? आणि खाण्यायोग्य असते का? लहान मूलान्ना देखिल देवू शकतो का? आम्ही बेरीची पोळी / पराठा करतो..पण हेल्दी आहे का माहित नाही..

सखी
जर तुझं तूप घरच्या सायीपासूनचं........दूध तापवून, साय बाजूस काढून त्याला विरजण लावून , ते घुसळून जे लोणी निघेल त्याचं कढवून केलेलं जर असेल तर त्याची बेरी उत्तम असते. त्यात कॅलशियम असते. त्यात साखर घालून उत्तम लागते. लहान मुलांना तर द्यायला अगदी हरकत नाही. ही बेरी हेल्दी असते. ही बेरी घालून बेसनाच्या वड्या करतात.
पण लोणी जर का विकतचे असेल तर त्यात काही इम्प्युरिटीज असू शकतात. म्हणून त्याची बेरी शक्यतो न खाल्लेली बरी.
ही बेरी घालून बेसनाच्या वड्या करतात.

थोडे पाणि घालुन उकळुन, त्यातच कणिक भिजवली तरी चालते. पोळ्य छान मऊ होतात.
पण साखर / गुळ घालुन खाल्लेले केव्हाही चांगले.

परवाच सकाळमध्ये एका बाईंनी लिहिलेले की बेरी काढून झाल्यावर बेरीच्या पातेल्यातच त्या आमटी उकळतात. त्यामुळे पातेले बेरीपासून साफ व्हायलाही मदत होते व आमटीला चवही छान येते.
बादवे नुस्ती बेरी व साखर घालून खायला अतिशय यम्म्म्म्मी लागते! Happy

आपण दुधापासुन (दहि, ताक, लोणि) तुप करण्याच्या प्रक्रियेत प्रोटिन्स आणि फॅट्स सेपरेट करत जातो, प्रत्येक स्टेप ला आपण प्रोटिन्स बाहेर काढत जातो, ताकातुन बरेचसे प्रोटिन्स निघुन जातात. तुप म्हणजे जेवढ दुध आपण विरजण लावायला घेतल असेल त्यातले फॅट्स (१००%) आणि उरले सुरले प्रोटिन्स म्हणजे बेरि.

रमा पण ते प्रोटिन्स तर जळलेले असतात ना ? मग त्यात प्रोटिन म्हणून काहि उरले असते का ? चव चांगली लागते हे ठिक, पण त्यात काहि पोषणमूल्ये नसावीत बहुदा.

गुलकंद हा गावठी गुलाबाचाच करावा लागतो. कलमी लाल गुलाबाचा केल्यास चालत नाही का? कृपया लवकर सांगा प्लीज

वा वा .. गुलकंदावरुन आठवले. माझ्याकडे छान गावठी गुलाबाचे झाड आहे. मला गुलकंद कसा करायचा सांगा ना कुणीतरी Uhoh

हो तो गावठी गुलाबांच्या फूलाचाच करावा लागतो.
गुलकंद करण्यासाठी पाकळ्या कातरुन, त्यात वजनी तेवढीच साखर घालून, भांडे उन्हात ठेवायचे असते. त्याला आधी पाणी सूटते आणि मग ते आटत जाते. (तोपर्यंत उन्हात ठेवतात) मग त्यात प्रवाळ मिसळतात.
आता ऊन नसल्यामुळे, मायक्रोवेव्ह मधे प्रयोग करता येईल (अगदी लो सेटींग असावे)
असाच कोवळ्या भेंड्यांचा भेंडेकंद करतात.

मला वाटत गुलकंदामध्ये साधी साखर न वापरता खडी साखर वापरतात.
दिनेशदा प्रवाळ म्हणजे काय ?

बेरी साखर मी ही लहानपणी खायचे.

गावठी गुलाबालाच वास व स्वाद असतो. अत्तरे ही गावठी गुलाबांचीच करतात. कलमी गुलाबं मंजे फ्याशन मॉडेलं नुस्ती. बव्हेरिया मध्ये एक रोझ फेस्टिवल होते त्यादिवशी सारा आसमंत अगदी गुलाबमय असतो तिथे.
उद्या पहिले त्या फ्लेवर/ फ्रेग्रन्स चा वास घेणार. Happy

गावठी गुलाब म्हणजे कोणता गुलाब? फोटो टाकाल का?माझ्याकडे लालभडक गुलाबाचे रोप आहे. गुलकंद बनवण्यासाठी मी खडीसाखर आणून ठेवलीय. पण शेजारणीने सांगितले की त्या फुलांचा गुलकंद बनवत नाहीत.

मुंबईत गावठी गुलाब मिळणे भारीच अशक्य... माझ्या आजोळी आंबोलीला आईने तिच्या बालपणी लावलेले झाड होते, ते एवढे मोठे आणि विस्तारलेले होते की त्यावर कोणत्याही वेळी कमीत कमी १०० फुले-कळ्या असायच्या... माझ्या बालपणीची गोष्ट ही. आता ते झाड इतिहासजमा झाले Sad तिथेही लोक आता रंगिबेरंगी गुलाब लावतात. गावठी गुलाब हळुहळू नाहिसे होताहेत बहुतेक...

त्या गुलाबांनाही थेट गुलकंदाचाच वास यायचा. मी तर कधीकधी ती फुलेही खायचे... Happy

Pages