चित्रपट कसा वाटला? (जुना धागा)

Submitted by admin on 2 June, 2008 - 02:50

आपण नुकताच पाहिलेला एखादा नवीन अथवा जुना चित्रपट आपल्याला कसा वाटला? आपले परिक्षण "नवीन लेखनाचा धागा" वापरुन लिहावे.

या आधीची समिक्षा इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'बेबेल' , 'माय सॅसी गर्ल' आणि 'फ्रॉस्ट-निक्सन' पाहिले.

बेबेल (की बॅबेल) मध्ये चार कथानकांचे एकमेकांवरचे अवलंबित्व दाखवलय.
एका अफगाण मेंढपाळ कुटुंबाकडे एक रायफल येते, ज्याचा वापर त्यांना कोल्ह्यांना मारण्यासाठी करायचा असतो पण त्यातील लहान मुले त्याची चाचणी करायला एका प्रवासी बसवर गोळी मारतात आणी मग विविध अप्रिय घटनांची मालिका सुरू होते. या घटनात मनुष्यस्वभावाचे विविध पैलू आपल्या समोर येतात.

'माय सॅसी गर्ल' हलकाफुलका मनोरंजक चित्रपट वाटला. मस्त मजा आली बघताना. शेवटच्या प्रसंगात हिरवीण व एक आगंतुक म्हातार्‍याचे संवाद आवडला. आवडेबल संवाद एकदम आणि हिरवीण फार गोड Happy

'फ्रॉस्ट/निक्सन' हा वॉटरगेट प्रकरणात निलंबित झालेल्या अमेरिकन राष्ट्रपती निक्सनची 'डेविड फ्रॉस्ट' याने घेतलेल्या मुलाखतीवर आधारित आहे. पहिला हाप या दोन्ही पात्रांच्या ओळखी, वॉटरगेट प्रकरण उघडकीस आल्यानंतरचे निक्सनचे दिवस , फ्रॉस्टचे यशस्वी टिव्ही करीअर यांनी व्यापलाय तर उर्वरित हाप निक्सन-फ्रॉस्ट यांच्या जुगलबंदीने रंगलाय. या मुलाखती एकदम खिळवून टाकणार्‍या वाटल्या Happy
दोन्ही मुख्य पात्रांनी, फ्रँक लँगेल (निक्सन) व रिचर्ड शीन (फ्रॉस्ट) उत्तम काम केलेय. भारदस्त संवाद हे आणखिण एक वैशिष्ट.

श्री. चिमणराव...

धन्यवाद ! "पॅनिक रूम" ची माझ्याकडे डिव्हीडीच आहे आणि तिच्या परंपरेतील एक खास म्हणून या चित्रपटाची गणना होते. खरोखरी फार गुणी अभिनेत्री आहे ज्युडी फॉस्टर. मी तिला प्रथम "टॅक्सी ड्रायव्हर" मध्ये पाहिले होते आणि अर्थात त्यावेळी तो चित्रपट पाहण्याचे प्रमुख कारण म्हणजे "रॉबर्ट डी नीरो" आणि "मार्टीन स्कोरसेसे". सार्‍या जगभर गाजलेला हा चित्रपट नीरोमुळे स्मरणात राहतो आणि त्यातील १३-१४ वर्षाच्या ज्युडी फॉस्टरमुळे. फार नावाजली गेली होती तिची "स्ट्रीट पिम्प" ची ही भूमिका.

प्रत्यक्ष तिचे वैयक्तिक नाव झाले ते मात्र "सायलेन्स ऑफ द लॅम्ब" मुळे. बाप रे ! काय चित्रपट आहे हा देखील, विशेषतः "अ‍ॅन्थोनी हॉपकिन्स" नावाच्या दिग्गजामुळे ! याचाच दुसरा भाग "हॅनिबल" आज रात्री मी पाहणार आहे. मात्र यात ज्युडी फॉस्टरच्याऐवजी "ज्युलियाना मूर" आहे.

श्री. रंगासेठ....

मी देखील "बॅबेल" असाच उच्चार करतो या चित्रपटाचा. पण उच्चार काही असला तरी चित्रपटाचे सादरीकरण जबरदस्तच आहे. आपल्याकडील कितीही प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या कल्पनेतही असे कथानक येणे शक्य नाही. मोरोक्को, अमेरिका, जपान, मेक्सिको या चार दिशांना फाकलेल्या देशात एकच कथानक गुंफायचे आणि त्यातही एकाचा संबंध दुसर्‍याशी येवू द्यायचा नाही, ही कसरत त्या दिग्दर्शकाने कशी केली ते पडद्यावर जवळजवळ अडीच तास पाहणे रोमांचक आहे.

फक्त १० वर्षाचा एक मुलगा फुकट मिळालेली बंदुक हवेत चालवितो काय, अन पुढ्चे अशक्यप्राय वाटणारे रामायण घडते काय, सारेच आक्रीत.

"बॅबेल" चा अर्थ "गोंधळ" अन खरच एका अजाणतेपणी झालेल्या गोंधळावरच हा अविस्मरणीय चित्रपट आहे. सर्वांनी पाहावा.

'बॅबेल'शब्दामागे बायबलमधली एक गोष्ट आहे. एकदा जगातील सर्व माणसांनी एकत्र येऊन स्वर्गापर्यंत पोचणारा 'बॅबेलचा मनोरा' बांधायला घेतला, हे पाहून देव वैतागले आणि त्यांनी सगळ्यांच्या भाषा वेगवेगळ्या केल्या.माणसांमधला संवाद संपला आणि मनोरा कोसळला.
या कॉन्टेक्स्टमधेतर हा सिनेमा फारच समर्पक वाटतो.

होय. बायबलमधील ही कथा मला माहित आहे जी "टॉवर ऑफ बॅबेल" नावाने उल्लेखिली जाते. दिग्दर्शकाला हाच अर्थ अभिप्रेत आहे की दुसरा ("गोंधळ") याचा बोध होत नाही, पण कथेत चार ठिकाणाची चार वेगवेगळी भाषा मात्र जरूर आहे कारण ती कथेची गरजच आहे. पात्रे मात्र एकाच धाग्याने परस्पराशी गुंफले गेले आहेत. असे असूनही या चौघात एकमेकाशी संवाद नाही, ही विलक्षण गोष्ट आहे, जी त्या दिग्दर्शाकाची कमाल म्हणावी लागेल. शिवाय चित्रीकरण त्या त्या देशातच जावून केले असल्याने सादरीकरणाला अस्सल जातिवंतपणा आला आहे.

फॉस्टरचा, अ‍ॅना अँड द किंग पण छान आहे. बाबेल गोव्यातल्या फिल्म फेस्टिवल मधे पहिल्यांदा दाखवला होता, तो त्यावेळी लोकांना तितका आवडला नव्हता. पहिल्यांदा त्या सगळ्या पात्रांचा काय सबंध आहे ते कळतच नाही, आणि शेवटी तो संबंध जूळताना, बघितल्यावर सगळ्याची संगती लागते. शेवटही एकसुरी नाही.

होय. "अ‍ॅना अँड द किंग" मधील ज्युडीची अ‍ॅना मी पाहिली आहे आणि मूळ "किंग अँड आय" हाही युल ब्रायनरमुळे (व विशेषतः संगीतामुळे) गाजलेला चित्रपटदेखील पाहिला आहे.

ज्युडी फॉस्टर ही अशी एकमेव अभिनेत्री आहे की, जीने बाल कलाकार ते अभिनयकुशल कलाकार असा प्रवास अत्यंत यशस्वीरित्या संपन्न केला आहे. नाहीतरी बाल कलाकार म्हणून नावाजलेले कित्येक मुलेमुली तारूण्यात आले की विस्मरणात जातात, उदा. तिकडील शर्ले टेम्पल व आपल्याकडील डेझी इराणी वा "मासूम" चित्रपटातील तो घार्‍या डोळ्याचा मुलगा (नाव विसरलो).

केवळ लागोपाठ ऑस्कर्स मिळविणारी अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर इंग्लिशबरोबरच फ्रेन्च, इटालियन, जर्मन भाषा लिलया बोलणारी, वाचणारी, पोस्ट-ग्रॅज्युएट विद्यार्थिनी या नात्यानेदेखील ज्युडी फोस्टर सर्वज्ञात आहे.

प्लीज ! प्लीज मला कुणी सांगेल का की hugh jackman, woody alan आणि scarlett johnson चा " scoop " मला कुठे आणि कसा बघायला मिळेल ? पुण्यात कुठेही त्याची vcd /dvd मिळत नाहिये ? anky ?

अस्मानी स्कूप सिनेमा स्टार मुवीज वर लागतो कधी कधी. मी शेडयूल बघून तुम्हाला विपू टाकेन.
जुलैत परत सगळे बाँड पट येणार आहेत पण रोज रात्री ११ वाजता. शक्य तितके बघीन.

चिमणराव धन्यवाद मला ही एक्स मेन भानगड काहीच माहीत नव्हती पण बेकार बॉलीवूड सिनेमा राज रोहित वगैरे चा जाम कंटाळा आहे. स्टोरी इज द क्वीन फॉर मी.
प्रतिक देसाई धन्यवाद. ज्युडी खरेच ताकदीची अभिनेत्री आहे व प्रोड्यूसरनी पण. सायलेन्स ऑफ द लँब्स व पूर्ण हानिबाल सीरीजच मला आवड्ते. मी ती सर्व पुस्तके पण वाचली आहेत. अगदी काटा येतो अंगावर.

अस्मानी, टिव्हीवर स्कूप असल्याची बातमी लागली की लगेच कळवू! टोट्ल करमणूक आहे तो!
'आय हेट लुव(!) स्टोरी' पायला का कोणी?

दिनेशदा, आगाऊ इंडियन एक्स्प्रेसमध्ये आय हेट लव्ह स्टोरीचं परीक्षण वाचलं.... त्यानुसार तो फारसा दम नसलेला पिक्चर आहे! इम्रान खानच्या पंख्यांसाठी ठीक आहे पण बाकी सो सो! Uhoh

आय हेट लव्ह स्टोरी बघितला... काहीच नविन नाही..तीच ती स्टोरी.. आधी सिर्फ फ्रेंड्स, नंतर प्यार का एहेसासा.. मग धावाधावी वगैरे वगैरे.. गाणी चांगली आहेत.. इम्रान खान आणि सोनम बरे आहेत.. दिल चाहता है मधल्या आमिर खानची बर्‍याचदा आठवण येते. काही काही पंचेस सही आहेत.. एकदा बघायला टाईमपास चांगला आहे.

'आय हेट लव्ह स्टोरीज 'ट्रेलर वरून टिपिकल प्यार-दोस्ती-दोस्ती-प्यर टाइप चा वाटतोय.. अगदी घीसापीटा धर्मा प्रॉडक्शन पट असणार !
आणि ट्रेलर मधे ही नायिका ' चोप्रा' पटांची फॅन दाखवलीये, हिरो त्या विरुध्द !
म्हणाजे थोडक्यात आधी स्वतःच्याच चित्रपटांवर टिका आणि नंतर त्याच चित्रपटांची महानता दाखवणार. !

@ दिनेशदा >> "जुगल हंसराज", आभारी आहे. कसे काय नाव आठवले नाही मला याचे आश्चर्य वाटते. अर्थात नायक रूपात तो फारसा पुढे आला नाही मात्र "मासुम" मध्ये त्याच्या बहिणीचे काम करणारी ती छोकरी "उर्मिला मातोंडकर" मात्र अगदी टॉपच्या हिरॉईनच्या पंक्तीपर्यंत पोहोचली होती (आता "होती" असेच म्हणावे लागेल. रामूदेखील आता तिला आपल्या चित्रात घेत नाही असे दिसते.)

@अश्विनीमामी >> धन्यवाद, ज्युडी फोस्टरच्या टिपणीबद्दल. "हॅनिबाल" ची ती सीरिज केवळ अंगावर काटा येणारी नसून अ‍ॅन्थोनी हॉपकिन्सने ज्या ताकदीने तो "डॉ.लेक्टर हॅनिबाल" उभा केला आहे त्याला तोड नाही. ज्युडी जरी दुसर्‍या भागात नव्हती तरी "ज्युलियाना मूर" ने क्लॅरिस स्टार्लिंगला १०० टक्के न्याय दिला आहे यात शंका नाही. अर्थात चित्रपटाचा गुणवान दिग्दर्शक रिड्ली स्कॉटला चित्रपटाच्या वेगाबाबत आणि हाताळणीबद्दल पूर्ण गुण दिलेच पाहिजेत.

मामी, आगाऊ, टीव्ही चा काही उपयोग नाही हो ! केबल डीश वगैरे सोडा, माझ्याकडे दूरदर्शन सुद्धा नाहिये. आमच्या टीव्हीचा उपयोग फक्त cd / dvd बघण्यापुरता करतो आम्ही !

हापूस पाहिला. कुटुंबप्रधान करमणूक ..... एकदा तरी पाहायला छान आहे. हलकाफुलका आहे. कथानकात फार दम नाही, पण निखळ करमणूक हवी असेल तर अवश्य पहा. मला सर्वांचे अभिनय आवडले. हसण्यासाठी भरपूर पंचेस आहेत. ज्यांना घटका दोन घटका डोक्याला काहीही ताण न घेता करमणूक हवी आहे त्यांनी नक्की बघावा.

आत्ताच, टॉम क्रुझ आणि कॅमेरुन दियाझ चा Knight & Day बघितला. तसे दोघेही आवडते. पण हा सिनेमा अजिबात चालला नाही म्हणे. कथेत काहि नाविन्य नाही. दोघांचेही वय झालेय,(आणि दिसतेही) पण सगळ्यात वाईट म्हणजे कुठलाच स्टंट खरा वाटत नाही. तंत्र फारच स्वस्तातले वापरल्यासारखे वाटतेय.

"नाईट अ‍ॅण्ड डे" ~~ बरं झालं तुम्ही ही प्रतिक्रिया इथे दिली. एका स्थानिक मित्राने दोनच दिवसापूर्वी चित्रपट पाहिल्यावर वैतागून या कथानकाला शिव्या हासडल्या होत्या, त्यावेळी मला थोडे वाईट वाटले होते, कारण अर्थातच कॅमेरून दियाझ. यातील विमानात टॉमने सर्व प्रवाश्यांना मारणे म्हणजे प्रेक्षकांना मूर्ख बनविण्याचाच एक प्रकार आहे असे मित्र म्हणाला. सगळे काही "चीप" पातळीवर घेतले आहे असे त्याचे मत. त्यामुळे मीही याची डिव्हीडी घेतली नाही.

त्यापेक्षा आज "ग्रीन झोन" पाहीन ~~ "बोर्न" वाला मॅट डेमॉन आणि दिग्दर्शकदेखील "बोर्न अल्टीमेटम"चा आहे, त्यामुळे एक विलक्षण आणि वेगवान कथापट असणार याची खात्री आहे.

After watching "I hate love stories" one can say, I hate, I hate love stories Happy ... बोले तो नही देखा तो भी चलेंगा... Happy

रावण पाहता पाहता मी झोपले केव्हा मला हि समजल नाही Happy ...झोप येत नसेल तर बघायचा रावण... पण कॅमेरा वर्क जबरी (जेवढा पाहिला त्यातला) Happy

आजच 'लाहोर' बघितला. भारत-पाकिस्तान या कट्टर वैर्‍यांत शांती प्रस्थापित व्हावी व सलोखा निर्माण व्हावा यासाठी क्रिकेट, हॉकी बरोबरच किक-बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या अपरिचित अश्या खेळाने दोन्ही देशांना खेळाची ओळख होईल व शांततेच्या दिशेने एक पाऊल टाकले जाइल असा विश्वास दोन्ही देशातील सरकारांना असतो.
मग संघाची निवड करणे, त्यात असणारे राजकारण इ. बाबी दर्शवल्यात. पहिल्यांदा संघ आशियाई स्पर्धेत खेळणार मग नंतर लाहोरला भिडणार असा कार्यक्रम ठरतो. आशियाई स्पर्धेत भारतीय बॉक्सर 'धीरू' (सुशांत सिंग) व पाकिस्तानी बॉक्सर 'नूर' ( मुकेश ह्रुषी ) यांच्यात मुकाबला होतो. नेहेमी प्रमाणे मार खात-देत भारतीय बॉक्सर जिंकतो, पण पाकड्या चिडून त्याला चेहेर्‍यावर किक मारतो आणि नेमकी ती किक जिव्हारी बसून सुशांतचा मृत्यू होतो.
एवढे सगळे घडूनपण आपला भारतीय संघ लाहोरला जातो व तिकडे सामने खेळतो. आत्ता हिरोची रिप्लेसमेंट म्हणून हिरोच्या भावाला घेतले जाते, जो प्रत्यक्षात एक रणजी क्रिकेटर असतो आणि भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळण्याची शक्यता असते व त्याला रस्त्यावर मारामारी करताना पाहिल्यावर प्रशिक्षकाला त्याच्या सुप्त गुणांची ओळख होते.

टिपिकल बॉलीवूड पध्दतीने अन्-अनुभवी हिरोची दिग्गज नूरशी अंतिम निर्णायक सामन्यात मुकाबला होतो ज्यात हिरो भावाचा बदला घेताना फाउल करत नूरला तुडवतो आणि शेवटी सज्जन (दिलदार, उदार मनाचे, सहिष्णु इ.इ. )बनत तो नूरला माफ करतो आणि सामना हारून हृदये जिंकतो Happy

किक बॉक्सिंगचे प्रसंग मस्त वाटतात. हिंदीतील ढिशूम-ढिशूम पेक्षा तरी नक्कीच. भारतीय प्रशिक्षक म्हणून फारुक शेखने काम चांगल केलय. आत्ता नूर कडून धीरूची हत्या होते त्यावेळी त्याच्यावर बंदी का घतली जात नाही, क्रिकेटर असणारा वीरू (अनाहद) अचानक तय्यार किक बॉक्सर कसा होतो, ८-९ वर्षे राष्ट्रीय विजेता असलेल्या गजाननला (केली दोरजी) नूर विरुध्द न खेळवता अनअनुभवी धीरुला का खेळवतात, पाकिस्तानचे किक बॉक्सर सरावासाठी स्टेडिअम अथवा एखाद्या अ‍ॅकॅडमी मध्ये न जाता पर्वतात का जातात, इ. व इतर प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास एकद बघायला हरकत नाही हा सिनेमा.

'shutter island' पाहिला. भन्नाट आहे. सिनेमाची खरी मजा समजण्यासाठी कमीतकमी दोनदा बघावा लागतो. दुसर्‍यांदा बघताना जास्त आवडला. यावर्षीचे ऑस्कर घेऊन जाईल कदाचित.

आय हेट लव्ह स्टोरी : वाइट असा नाही, पण खुप चांगला असाही नाही.
सुरूवातीची १५-२० मिनिटे सुसह्य पुढे अगदी असह्य..........

कोणी राजीव खंडेलवालचा "आमिर" पाहीला आहे का... खरच फार छान आहे...
आंतकवादाचा एक नविन चेहरा फारच उत्तमरीत्या दाखवला आहे.,

@ दिनेशदा ~ आम्ही दोनतीन मित्र एकत्र डिव्हीडी पाहतो, त्यामुळे "ग्रीन झोन" पाहताना लॅपटॉप बंद करणे अनिवार्य होते, सबब तुमचा संदेश काल पाहता आला नाही. वेल, तुम्ही म्हणता तसे हा चित्रपट "बोर्न" सीरिजशी फटकून आहे, त्याला कारण म्हणजे "इराक आणि अमेरिका" संबंध आणि त्यातील कटु सत्य जे सर्वव्यापी असून एकट्या मॅट डेमॉनला "सेंटर" करणे पॉलला शक्य नव्हते. मला यात जास्त भावले ते चित्रीकरण. बगदादमधील पेटत्या घडामोडीचे अस्सल स्वरूप पाहताना असा भास होत होता की आम्ही जणु काही "फॉक्स हिस्ट्री चॅनेल" वरील एपिसोड्स पाहत आहोत. त्या "फ्रेडी" चे काम करणार्‍या स्थानिक कलाकारानेदेखील तोडीस तोड अभिनय केला आहे.

(चित्रपट पाहण्याचे आणखीन एक कारण म्हणजे कथानक एक भारतीय श्री.राजीव चन्द्रशेखरन या पत्रकाराच्या पुस्तकावर आधारित आहे.)

काल लव्ह सेक्स और धोखा आणि रोड मूव्ही पाहिले...

मला दोन्ही आवडले...
एल.एस.डी. चं दिग्दर्शन जबरी आहे...
तर रोड मूव्ही चे संवाद आणि कॅरॅक्टर स्केचिंग मस्त जमलंय...

दोन्ही सिनेमांमधले अ‍ॅक्टिंग परफॉर्मन्सेसही छान आहेत...
अभय देओल चा प्रश्णच नाही, पण सतीश कौशिकही मस्त काम करून गेलाय...

आय हेट लव्ह स्टोरी >>
हल्ली रावण - काइट्स सारखे सिनेमा पहिले. त्या पेक्षा तरि हा सिनेमा चांगला आहे. थोडीफार हसवणुक तरि आहे. काही काही गाणी छान आहेत. मधे मधे एडिटींगने मार खाल्ला आहे. मझ्यामते तरी एकवेळा पहायला काहीच हरकत नाही.

आमिर पिक्चर चांगला आहे. शेवटपर्यंत चित्रपट प्रेक्षकांवरची पकड ढीली होऊ देत नाही. मी तो टीव्हीवर पाहिला आणि तरीही त्याने खिळवून ठेवले! सुन्न होते मन..... असेही घडू शकते का ह्या विचाराने!

Pages