Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
?? भाजी शिजल्यावर त्यात मीठ
?? भाजी शिजल्यावर त्यात मीठ टाकणे किती योग्य आहे???
मी अगोदर[माहेरी] कांदा टोमॅटो परतल्यावर भाजीत एकत्रच तिखट -मीठ घालायचे तेव्हा शिजायची....
हे हवय
हे हवय का?
http://www.maayboli.com/node/15433 (पांढरा रस्सा)
या पेक्षा काही वेगळ हव असेल तर लालु ला विचारा.
अदिती, ह्याच रायत्यात दही
अदिती, ह्याच रायत्यात दही घालू नकोस. आंबटपणासाठी लिंबाचा रस घाल.
एका तामीळ मैत्रीणीने डब्यात
एका तामीळ मैत्रीणीने डब्यात एकदा भेन्डीचे वरण / दाल आणलेली..खुपच मस्त होती. कोणाला माहित असेल तर क्रुती द्या प्लीज.
धन्यवाद सिंडरेला आणि मिनोती.
धन्यवाद सिंडरेला आणि मिनोती. आज करते चटणी.
सोनपरी हेच हवय का? भेंडिच
सोनपरी हेच हवय का?
भेंडिच सांबार
भेंडी १/२ किलो (चिंच गुळाची भाजी करताना जसे थोडे मोठे तुकडे करतो तसे करायचे)
ओल खोबर मोठे ४-५ चमचे
लाल तिखट २ चमचे (कमी जास्त चालेल)
मिठ अंदाजे, गुळ अंदाजे
चिंचेचा कोळ अंदाजे
सांबार मसाला ३ चमचे भरुन (कमी जास्त चालेल)
नेहमी प्रमाणे फोडणी करुन त्यात भेंडी, मिठ, लाल तिखट घालायच. कढईवर झाकण ठेवुन त्या झाकणात पाणि टाकुन शिजवायची भाजी
मिक्सरवर चिंचेचा कोळ, सांबार मसाला, खोबर थोड पाणि घालुन वाटुन घ्यायच. हे वाटण जवळ जवळ शिजलेल्या भाजीत घालायच. झाकणात टाकलेल पाणिच मिक्सर मधे घालुन मिक्सरच्या भांड्याला लागलेल्या मसाल्या बरोबर भाजीत घालायच. गुळ घालायचा. थोड आटवायच. (हवा तेव्हढा रस ठेवायचा. भाता बरोबर हवी असेल तर रस जास्त ठेवायचा, रस पाणिदार होऊ नये म्हणून खोबर्याच प्रमाण वाढवायच.
____________________________________________________________________________
सौजन्य : नवर्यांची कविता
पाणचट आंब्याच काय करता येईल?
पाणचट आंब्याच काय करता येईल? बरेच आहेत. रस नकोसा वाटतो आहे. फोडी करुन खाता येतील अस वाटत नाही.
साखर+दही घालून लस्सी साखर +
साखर+दही घालून लस्सी
साखर + दुध मिल्क्शेक
आंब्याचं रायतं/पंचामृत
आंब्याचा साखरआंबा
सायलीमी, लस्सी आणी पंचामृत
सायलीमी, लस्सी आणी पंचामृत झाल आज ! धन्स ग !
मनिषा धन्यवाद..हो असलेच केले
मनिषा धन्यवाद..हो असलेच केले होते तीने. मी जरा सर्च केले पण इथले अनुभवी सल्ले ऐकल्यावर छानच होते सगळे
आता करतेच १-२ दिवसात.
मनिषा, या पाकॄ ला वेगळ्या
मनिषा, या पाकॄ ला वेगळ्या धाग्यावर का हलवत नाहीस? इथे नविन कृती लिहिल्यास शोधणे कठीण होईल.
भोपळ्याची कोवळी पाने बाजारात विकायला आलेली पाहिली. त्याची भाजी कशी करायची?
अमि, शेपु + भोपळ्याची भाजी
अमि, शेपु + भोपळ्याची भाजी मस्त लागते.
मिनोती, त्वरीत उत्तरासाठी
मिनोती, त्वरीत उत्तरासाठी धन्यवाद.
शेपूचे नाव काढले तरी नवरा जेवणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेपूशिवाय भाजी करता येईल का?
http://www.loksatta.com/old/d
http://www.loksatta.com/old/daily/20060722/ch08.htm
या लिंकवर भोपळ्याच्या पानांच्या भाजीची कृती आहे. इतरही पावसाली भाज्याची कृती दिली आहे.
पुण्याहुन येताना, देसाई
पुण्याहुन येताना, देसाई बंधुंकडुन केशर्-वेलची सिरप आणले होते. मस्तच होते. पण आता ते संपले. आता परत देशात डिसेंबर मधे. तोपर्यंत कोणाला माहित असेल हे सिरप घरी कसे करायचे तर सांगाल का प्लिज. लेकीला जाम आवडते दुधात, खीरीत, दह्यात घालुन खायला. घरी करुन बघेन. शुद्धतेची पण खात्री राहिल मग
लाजो, मला ह्या लिंकवर मिळाली
लाजो, मला ह्या लिंकवर मिळाली बघ केशर वेलची सिरपची पाकृ : http://www.taste.com.au/recipes/9482/milk+dumplings+in+saffron+syrup+gul...
तुला हेच सिरप म्हणायचं आहे का?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/17230
अमि, इथे लिहिली आहे बघ.
अरू, हा तर गुलाबजामचा
अरू, हा तर गुलाबजामचा पाक...
मी म्हण्त्येय ते सिरप जरा घट्ट असत आणि टिकाऊ असतं... साखरेचा पाकच तो पण चव सही असते.
तरी मेहेनत करुन शोधलस म्हणुन धन्स गं
लाजो मी २ वर्ष आधी आणलेला
लाजो मी २ वर्ष आधी आणलेला अज्जिबात वापरला गेला नाहिये तुला कुरिअर करु का?
ओह्ह, लाजो, बरं झालं
ओह्ह, लाजो, बरं झालं सांगितलंस, न्हायतर मी आज घरी फुशारकी मारणार होते, मला माहीत आहे केशर वेल्ची सिरप कसं बनवतात ते म्हणून!
मी मागे धिरड्याची रेसिपी
मी मागे धिरड्याची रेसिपी वाचली होती इथे. १ किलो जाडे तांदुळ , १ वाटी -गहु, चणा , तूर , मुग डाळ भरडसर दळून आणायचे व धिरडी करताना तिखट मीठ घालून सरसरीत भिजवायचे. नीट प्रमाण आठवत नाहीये पण . कोणाला माहिती असल्यास सांगावे.
खूप शोधाशोध केली, पण मिळाली नाही कूठेच.
मी १ वाटी बारीक रवा, १ वाटी
मी १ वाटी बारीक रवा, १ वाटी तांदळाची पिठी, अर्धी वाटी बेसन अशी पीठं घेते. मग त्यात तिखट्,जिरे,मीठ, कोथिंबीर.. हवे असेल तर कांदा,आल्याची पेस्ट इत्यादी घेते..
फार छान होतात धिरडी.. बिघडत नाहीत कधी..
http://www.surekhathosar.com/
http://www.surekhathosar.com/content/view/48/39/
उजु मी आईला विचारून टाकीन तिचं प्रमाण. तूर्तास इथे बघ. हे प्रमाण पण चालेल.
मला फोडींचा [कैरीच्या] मुरंबा
मला फोडींचा [कैरीच्या] मुरंबा करायचाय पण यंदा हेच आठवत नाहीये की फोडी वाफवुन कशा घ्यायच्या?
कोणी कृती सांगेल का?
त्यात फोडी कशा आणि किती वेळ वाफवुन घ्यायच्या आणि शिट्टी लावायची की नाही हे पण जरा सविस्तर लिहा लिज.
आगाऊ धन्यवाद!
मनिषा - मी लिहीलेली रेसिपी
मनिषा - मी लिहीलेली रेसिपी मायबोलीवर पण आहे. आणि इथे पण आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/07/blog-post_19.html
किंवा सशनले अननसाचा मुरांबा लिहिला आहे तिच पद्धत वापरुन तू साखरांबा करू शकतेस.
मला तळलेली मुगडाळीची रेसीपी
मला तळलेली मुगडाळीची रेसीपी हवी आहे ( हल्दीरामची मिळते तशी मुगडाळ)
आगाऊ धन्यवाद!
मनुस्वनीने इथे नव्या मायबोलीत
मनुस्वनीने इथे नव्या मायबोलीत दिली होती एका दिवाळीत.
वर्षा, इथे बघ :
वर्षा, इथे बघ : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/57700.html
सिंड्रेला, मनुने नाही मी
सिंड्रेला, मनुने नाही मी दालमूठ दिलेली इथे - http://www.maayboli.com/node/4247. मुगाची डाळ पण तशीच करतात.
मनुने पण दिली होती ना ? तू
मनुने पण दिली होती ना ? तू दालमूठ दिलेली आठवत होती मला.
Pages