पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

म्हनुणंच इतकं चांगले लिहितोस...
मलाही चंद्र्शेखर गो. आवडत असल्याने त्यांचा खुप प्रभाव आहे माझ्या चारोळ्यांवर...

असं म्हणतात...
प्रेमाला मर्यादा नसतात...
मग 'तुझ्यावर मी इतकं प्रेम करतो'
असं लोकं का म्हणतात?

हे.. छान चारोळि आहे अविनाश ..आणि तु हिन्दित पण लिहि.. कलेसाठी विशेष संकेतस्थळांची आवश्यकता नाही.. बस आमच्यासारखे रसिक महत्वाचे Lol

पाऊस बघून चारोळ्यांचा
मलाही भिजावंसं वाटलं...
शब्दांचे रेनकोट पांघरताना..
माझं थेंबांशी मात्र फाटलं...! Proud

फाटक्या थेंबाला कुठे रे अस्तित्व
या गर्दितल्या पावसात,
जपलस त्याला ओंजळीत तर,
उपयोग होईल विरहाच्या ग्रिष्मात..

आपलं त्याच्याशीच जमायचं,
गर्दीत नाही मन रमायचं...
फाटका असला तरी...,
ओंजळीत तेवढंच मावायचं..! Proud

छान

फाटका थेंब होण्यापेक्षा
पानावरचं दव होऊन बघ
भ्याड असशील तर बस सावरून
हिंमत असेल तर ओघळून बघ

निंबुडे ... हा तर आप्पारप्पीचा एक दणका दिलास गं सॉलीड सही चारोळी.

चिमूरे... सहीच तुला उत्तर..

आज बांध फुटला पापण्यांचा,
अन अश्रूंचा पुर अनावर झाला,
वाहण्यासाठी काहीच उरलं नाही तेव्हा,
चल रे आता तु सुद्धा एक थेंब रडून म्हणाला...

पुरात सगळेच अश्रु वाहुन गेले
एकटाच तो मग त्यांच्यामागुन निघाला
तिथल्या आठवणी बरोबर होत्याच
आठवण म्हणुन स्वतःचे अश्रुच मागे ठेवुन गेला

एकदा सरणावर निजल्यावर,
अश्रूंना काहीच मोल नसते,
डोळे मिटलेले असतात कायमचे,
तरी पापण्यांवर गुलाबजल हसत असते..

मरण्याची ती बात कशाला
जगण्याच्या या रम्य दिनी
सदाफुलीसम फुलत रहा अन्
जगा आनंदे प्रतिक्षणी Happy

हसत हसत जगण्याचे स्वप्न,
नकोशे झालेय गं आता,
पोट फुटून विस्कटल नशिब,
तरी किती हलवून मी हा भाता...

बाप्रे, किती ही निराशा Sad
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया....

याचं मराठी चारोळीत रुपांतर कर नं, सुकी Happy

उंची गाठायची म्हणून,
एवरेस्टचं वरदान मागू नये,
विषारी असतो साप म्हणोनी,
त्याच्या विषाचा डंक आपल्या तोंडून देवू नये..

फक्त जगायचंय म्हणून मी,
आयुष्याचा घेतला मी आधार,
अर्थ नव्हताच कशाला इथे,
म्हणून कायमचाच पत्करला होता अंधार ...

फक्त सुखं हवं होतं म्हणून,
जिंदगीला रखेल केलं होतं,
त्या प्रत्येक अडचणीला मी,
फक्त वळचणीला बांधल होतं...

निंबुडे दोन प्रयत्न आहे बघ कसे आहे ते ?

भव्यदिव्य स्वप्नं बघावीत
ते पुर्ण करण्यासाठीच
अगदीच नकोशी झाली तर

पटकन झोपेतुन जागं व्हावं
आणि परत झोपी जावं
नवी स्वप्नं बघण्यासाठी Happy

नाही रे,
थोडा असा अर्थ अपेक्षित आहे: "जीवनाने आशा-निराशा, हार्-जीत काहीही दिलं तरी मी तितक्याच निर्मयपणे पाहिलं. काहीही झालं तरी जीवनावर प्रेम करत गेलो. त्याची साथ करत गेलो. प्रत्येक काळजी/चिंता/संकटे/अडचणी यांना 'चल गेलास उडत' असा attitude देत आलो."
आता बघ बरं. तुझ्या चारोळ्या जमल्यात का? मला फारशा नाही पटल्या. Sad

मी स्वत: ट्राय करून पाहिलं. मला नाही जमतै!

चिमूरी.. चार ओळी फक्त..

जावे स्वप्नांच्याहो गावा,
परतीच्या त्या तिकीटाने,
मैलाचा हो दगड ठरवावा,
आपल्याच त्या कर्मजिद्दीने...

अनेक आले अडथळे स्वप्नं पूरी करताना
पदरी कधी यश तर कधी आलं अपयश
यशापयशाची पर्वा होतीच कोणाला
जगण्यावर प्रेम करण्याशिवाय फुरसद होतीच कशाला

जाळत असेल रोज जिंदगी,
म्हणूनी मी कधीच थांबलो नाही,
असेल रोज एक आघात नवा,
म्हणून मी काही उन्मळून पडलो नाही..

आयुष्य म्हणजे सुंगध
जितका मोकळा तितका दरवळेल,
साठवायचा प्रयत्न केला तर,
अक्षरशः गुदमरून कळवळेल..

Pages