पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

कपाळी चंद्राची बिंदी लावून,
पदरावरच्या चांदण्या वेचायच्या,
रातीच्या या सौंदर्याला,
आणखी उपमा कुठून आणायच्या !

झुरणं तर मला,
सांजेने होतं शिकवलेलं,
आठवणींच्या गोंगाटाने मात्र,
उगाच माझ्या रात्रींना जागवलेलं...

अनाम ओढीचं स्वप्न,
नेमकंचं पहाटे पहाट पडलं,
नशिब माझं चांगलं म्हणून,
उगवतीच्या किरणात तुझं दर्शन घडलं...

हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्यासारखं वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते

निंबूडे छान चारोळी आहे Happy

तू जागत बसतेस म्हणून,
स्वप्नात यायचं सोडून दिलयं,
थेट भेटीचं ठिकाणही आता,
दुर कुठेतरी वाहून गेलयं...

निंबूडे चांगो ची चारोळी का गं ? ??

चांगो कोण?? Wink

नाही माझी स्वतःची आहे. बादवे इथे स्वतःच्याच चारोळ्या टाकायच्या असतात ना! मग असं का विचारतोस?

बाय मिस्टेक गं , मला चांगोची चारोळी आठवली अगदी अशीच आहे. पण आता मी पाहिली तेव्हा ती अन ही वेगळी आहे. क्षमा असावी.

वेड्यासारखी ,पहाट उंबर्‍याला,
आज खिळून बसली रात,
असचं काहीसं होतं ना,
सुर्याच्या संपुर्ण ग्रहणात...

पंख बळावले की,
एकदा तरी झेप घ्यावी,
अशक्य असलं म्हणून काय झालं,
भास्कराची भेट नेमकी सांज कलताना व्हावी..

थेंबाच आयुष्य मी,
फक्त एका शब्दात मांडलेलं,
बंद शिंपल्यातला मोती तर,
भुईवर पडताचं ठिपक्यात विरलेलं...

थेंबाथेंबाचं आयुष्य
पानापानापानावर दाटलेलं,
ओघळुन गेलं एकदा तरी
तळहातावर साठलेलं...

जे तुझ्या ओठांवर येत नाही
ते तुझ्या डोळ्यांत वाचता येतं
म्हणूनच तू न सांगता सुद्धा
मला तुझ्या मनातलं कळतं

आठवणीचं तर फक्त,
एक निमित्ताचं जाळणं असतं,
तुझ्या माझ्या विरहाग्नीला,
अजून दुसरं कुठलं इंधन असतं..

Pages