तू सुर छेडले की माझी बोटे सळसळायला लागायची...
तुझ्या गळ्यातले अमृत..., नसानसात चैतन्य फुलायचे ...
तू गात राहा... माझ्या मात्र सतारीची तार निखळलीय.....!
>>>निंबुडा, दुसर्याच्या चारोळ्या चोरुन इथे पोस्ट करु नका ! <<
कोण म्हणतंय दुसर्याच्या चारोळ्या आहेत म्हणून्.............माझ्याच आहेत त्या............ ज्या कुणाच्या आहेत असं तुम्हांला वाटतंय, त्या वक्तीचं नाव तरी सांगा............. म्हणे दुसर्याच्या
मार्ग तुझा माझा वेगळा बोलुन
मार्ग तुझा माझा वेगळा बोलुन सखे निघून गेलिस
नकळत येउन बोचणारी एक आठवण ठेउन गेलिस
आठवण तुझी आली की मनं प्याला
आठवण तुझी आली की मनं प्याला भरतं
शेवटी दोघं रितेच हे त्याला देखिल कळतं
मिठु,चारोळी चार ओळींचे असते.
मिठु,चारोळी चार ओळींचे असते.
हो पण माझं सारं दोन मधेच
हो पण माझं सारं दोन मधेच भागतं आहे
बाकी आवडल्या नसतिल तर लगेच हालवतो......
अरे चांगल्या लिहील्या
अरे चांगल्या लिहील्या आहेस..त्याबद्दल नाही काही. दोनमध्ये भागतं आहे,तर चांगले आहे. पण याला चारोळी नाही म्हणता येणार.चु.भु.द्या.घ्या.
आम्ही आजकाल प्रार्थनाही
आम्ही आजकाल
प्रार्थनाही करतो
नाहीच जमलं तर
आईला आठवतो ...!
******************************
आम्ही रोज त्याला पाहतो
त्याने म्हणे देव पाहीला ....
आम्ही माणुसपण सोडले
आणि तो म्हणे संत झाला ..!
*********************************
सोडून मला जातांना तु वळुन का
सोडून मला जातांना तु वळुन का पाहिलं
खरं सांग माझ्याकडे तुझं काय राहिलं
माघारी तू आलिस की भेट माझी
माघारी तू आलिस की भेट माझी टाळतेस
न दिलेलं वचन तू अजुनही पाळतेस
स्क्रीनकडे बघता बघता डोळे
स्क्रीनकडे बघता बघता डोळे दुखू लागले
मानेचा काटा ढिला हात आखडू लागले
पाठीतुनी कळ धावे तरीही व्यसनी सारे
व्हिडियो गेमिंगचे बळी ठरू लागले.....
इथे आपल्या दाता खाली आपलेच
इथे आपल्या दाता खाली
आपलेच होट,
अन् आपल्या चुकांवर मात्र
भलत्याचेच बोट.
----- धनेष
मिठु, प्रकाश >>>मार्ग तुझा
मिठु, प्रकाश
>>>मार्ग तुझा माझा वेगळा
बोलुन सखे निघून गेलिस
नकळत येउन बोचणारी
एक आठवण ठेउन गेलिस
आठवण तुझी आली
की मनं प्याला भरतं
शेवटी दोघं रितेच
हे त्याला देखिल कळतं
सोडून मला जातांना
तु वळुन का पाहिलं
खरं सांग माझ्याकडे
तुझं काय राहिलं
माघारी तू आलिस
की भेट माझी टाळतेस
न दिलेलं वचन
तू अजुनही पाळतेस <<<
असं टायपलं की चारोळी होइलच ना
चढे आभा़ळा काजळी वीज चमके
चढे आभा़ळा काजळी
वीज चमके आकाशी
होई वर्षा ही अवेळी
करी जीवाची काहिली
मावळतीच्या प्रवासात पुन्हा
मावळतीच्या प्रवासात
पुन्हा एकवार आलीस
आमावस्येच्या पिठूर चांदणी
उगवतीचे सूर होशील?
स्वतःचीच मान ठेवावी आपल्याच
स्वतःचीच मान
ठेवावी आपल्याच खांद्यावर
विश्वासाचा किती
सहजसाध्य आधार !
स्पर्श तुझा पहिला अजूनही
स्पर्श तुझा पहिला अजूनही आठवतो
नकळत का होईना कंठ दाटवतो
तुला माझी होताना, एकदा तरी
तुला माझी होताना,
एकदा तरी पहायचे होते,
एकदा का होईना पण,
तूझ्या मिठीत विसावायचं होत.
तुझं मिठीत येणं म्हणजे, दुधात
तुझं मिठीत येणं म्हणजे,
दुधात साखर विरघळणं,
ओठांवरच्या स्पर्शाने तर,
मधांच नित्य ओघळणं...
तुझं मिठीत येणं म्हणजे, दुधात
तुझं मिठीत येणं म्हणजे,
दुधात साखर विरघळणं,
ओठांवरच्या स्पर्शाने तर,
मधांच नित्य ओघळणं...
सुख आणि दुख हे रस्त्याचे दोन
सुख आणि दुख हे रस्त्याचे दोन अलग अलग मार्ग आहेत,
एक सुखा कडे जातो तर दुसरा दु:खा कडे येतो,
पण कोणी कोणत्या मार्गाने जायचे हे दैवच ठरवते.
प्रीती आणि अहंकार भिन्नलिंगी
प्रीती आणि अहंकार
भिन्नलिंगी असतात
म्हणुनच त्यांची नाती
फ़ार लवकर जुळतात !
**********************************
कधी उन्मादाच्या भरात
तिला चंद्राची उपमा देतो
विसरतो नकळत, चंद्रही
स्वत:च शापित असतो !
***********************************
चकोरालाच विचार
वाट पाहणं काय असतं?
चंद्रदेखील सांगेल ...
हे त्यालाही जमलं नसतं !
************************************
काय लिहावे सुचतच नाही हात
काय लिहावे सुचतच नाही
हात मात्र लिहीतच आहेत
तुझ्या माझ्या प्रेमाची गोष्ट
कुणालाही ती कळलीच नाही
फुलाचा गंध कुणासाठी
माहीतच नाही फुलाला
मधाच पोळ कुणासाठी
माहीतच नाही माशीला
तुझ्या माझ्या जन्माच कारण
माहीत नाही आईला
तुझ्या माझ्या जन्माच कारण
आता कळलय प्रेमाला
तू लिहीना कविता.. ती
तू लिहीना कविता..

ती म्हणाली...
तू लिहीच आता..?
ती पण म्हणाली !
चार ओळींच्या
चार ओळींच्या कवितेत,
तुझ्याबद्दल लिहावं तरी कसं,
अप्सरेला धरतीवर बघतानां,
पापण्यांना मिटावं तरी कसं...
त्रिवेणी (तिनोळ्या ) बस्स..,
त्रिवेणी (तिनोळ्या
)
बस्स.., नको आता खुप कंटाळा आलाय..
कविता लिहायचा..., खर्डेघाशी करायचा...
एखादी कविता जगुन बघावी म्हणतो..., कस्से?
**********************************************************************
खुप लिहायचो..., खुप वाचायचो..., अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ....
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून...., खर्रच, तुझी शप्पत !
***********************************************************************
तू सुर छेडले की माझी बोटे सळसळायला लागायची...
तुझ्या गळ्यातले अमृत..., नसानसात चैतन्य फुलायचे ...
तू गात राहा... माझ्या मात्र सतारीची तार निखळलीय.....!
*************************************************************************
खुप लिहायचो..., खुप
खुप लिहायचो..., खुप वाचायचो..., अगदी भरभरून..!
आजकाल सगळंच बंद, वेळच मिळत नाही बघ....
तुला वाचायला सुरूवात केल्यापासून...., खर्रच, तुझी शप्पत !
हे सही अन खरं आहे विशाल
प्रेमात 'पडलं' तरी स्वतःला
प्रेमात 'पडलं' तरी
स्वतःला सावरता आलं पाहिजे
किती ही बेलगाम झालं तरी
मनाला आवरता आलं पाहिजे
हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्या सारखी वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते
आता सवयीचं झालंय मला
मी निघताना तुझं माझ्या डोळ्यात पाहणं
आणि त्या नजरेनं जखडून
माझं सवयीनं काही क्षण रेंगाळणं
तू असाच समोर बसून रहा
मला तुला डोळे भरून पहायचंय
या अबोल, शांत क्षणाला
क्षणभर अनुभवून पहायचंय
तुझ्यावर किती ही राग आला तरी
मला रागावता येत नाही
तुझ्याच बाबतीत असं का होतं
मला सांगता येत नाही
पहिला पाऊस पडला तेव्हा माझ्या
पहिला पाऊस पडला तेव्हा
माझ्या डोळ्यांतही पाऊस होता
कुणालाच कळला नाही तो
इतका बाहेरच्या पावसाशी एकरूप होता
गार गार जलधारांत
चिंब भिजायचं होतं
पहिला पाऊस कसा असतो
ते तुझ्या मिठीतून पहायचं होतं
एक कळी मिटलेली
कायम मिटलेलीच राहिली
पूर्ण उमलण्या आधीच
कुणी तरी खुडून नेली
संध्याकाळ झाली म्हणून
तुळशी पुढे दिवा लावला
बाहेरचा अंधार निमाला
मनातला मात्र तसाच रहिला
मनातला अंधार
आच लागून तप्त झालेला
कुणी फ़ुंकर घालून काजळी दूर करेल
या वेड्या आशेने आसुसलेला
नि... सही आहेत चारोळ्या..
नि... सही आहेत चारोळ्या..
निंबुडा, दुसर्याच्या
निंबुडा, दुसर्याच्या चारोळ्या चोरुन इथे पोस्ट करु नका !
>>>निंबुडा, दुसर्याच्या
>>>निंबुडा, दुसर्याच्या चारोळ्या चोरुन इथे पोस्ट करु नका ! <<
कोण म्हणतंय दुसर्याच्या चारोळ्या आहेत म्हणून्.............माझ्याच आहेत त्या............ ज्या कुणाच्या आहेत असं तुम्हांला वाटतंय, त्या वक्तीचं नाव तरी सांगा............. म्हणे दुसर्याच्या
Pages