पुन्हा झुळूक

Submitted by webmaster on 12 July, 2008 - 23:15

ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.

गुलमोहर: 

काल परत एकदा पाऊस पडला
मी त्यावर एक कविता लिहीली
त्या कागदाची मग होडी केली
आणि पाण्यात सोडून दिली

जे मझ॑ अहे ते घेउन जा,
जे तुझ॑ अहे तेही घेउन जा,
पण...
जे मझ॑ नी तुझ॑ आहे
ते मत्र॑ ठेउन जा..
ते मत्र॑ ठेउन जा............

वेदनगन्धा

विचारांचं झालं जोरात भांडण
काही जिंकले, काहींनी तह केला
जिंकले त्यांनी मेंदूचे तख्त घेतले
अन ह्रदयात राहीले तह केलेले

प्रकाशजी, तुम्हाला बरेच दिवसांपास्न वाचतोय. आज अगदी राहवतच नाय म्हणून इथेच दाद देउन टाकतो. फक्त याच नाहि तर तुमच्या सार्‍याच लिखाणाची. Happy

माझि प्रत्येक गोष्ट अशीच
सुरु होण्यापुर्विच संपलेली
ह्रदयाच्या खोल कप्प्यात
जपलेलि..... निरर्थक जपलेलि.....
----पारवा----

आयुष्याच्या वाटेवरुनि
असेच खूप मागे जावे,
तुझ्या वेडया वाटेवरच
आयुष्याचे गाणे व्हावे....
तुझ्या जीवनाशी
असे एकरूप व्हावे,
वेडया नदिने जसे
सागराला मिळावे....
---पारवा---

इथं भेदभवाची
रितच वेगळी
जन्म एका धरतीवर
स्मशाने मात्र वेगळी
........................................
तू आलीस की ,
आभाळ ठेंगण वाटतं
तुझ्या जाण्यानंतर
आभाळ भरुन येतं
...............................
सुख किती लबाड
येतं आणि पळून जातं
दु:ख लहान मुलासारखं
अंगाला लपेटून बसतं.
............................
सुनिल पाटकर

वो आये हमारी कब्र पर
और दो आंसु बहाकर चल दिये
वो आये हमारी कब्र पर
और दो आंसु बहाकर चल दिये
ऊनको आते देख हम फिरसे जी ऊठे थे
पर रोते देख फिर से मर गये...
-पारवा-

----------------------------------
तुझे डोळे पाहिल्यापासुन
आरसाहि मजवर रागावला आहे
कारण आरश्यात पाहण्याचा वेडा नाद
मि आता सोडला आहे... ---पारवा---
---------------------------------

******************
कधि कधि माझे शब्द
माझ्यावरच रुसतात
कविता करता आली नाहि
कि गालातल्या गालात हसतात....
******************
---पारवा---
******************

*******************
झोपेत माझे स्वप्न
माझ्याशीच लपंडाव खेळतात
माझ्या झोपेत एकदाच येऊन
तिच्याच कुशीत कायमचे विसावतात....
-------------------------------
---पारवा---
*******************

दिवस
रोज स्वप्ने उशाशी घेउन झोपतो
अपेक्षांची सकाळ ऊगवते
परिस्थितीची टळटळीत दुपार भाजून काढते
फिकट रंग संध्याकाळचे आशा मालवतात
आकांक्षा हरवतात रात्रीच्या अंधारात
पण पापण्यात पुन्हा स्वप्ने अश्रुंसोबत दाटतात
-आदिकवी

आयुष्याच्या वाटेवर अनुभवले खुप काहि,
पण त्याचे आवलोकन करायला वेळच नाहि,
मायबोलीच्या सहाय्याने का होईना,
आता तरी 'आयुष्यावर बोलु काहि'.

तुझ्या नि माझ्यातले अंतर
एका अबोल्याएवढेच उरले आहे...

दोन किनाऱ्यांची भेट आता नाही
शब्दावाचून दोघांनी हे हेरले आहे...

नुसते शब्द किंवा सुर नाहित हे,
ही आहे सिंहाची आरोळी,
समद्या विश्वाला उजळुन टाकेल,
माझ्या मराठी मायेची चारोळी.
गंगाधर मुटे

=====================

आठवनीचे सुमन तुझ्या पदरात ओवालु कीती...
सगराची वालु ओन्जलित घट्ट करु कीती...

तुझ्या अथवनीचा प्रवास मज एक्तर्फी वाटे..
कारन, जाने मज शक्य, अनि येने मज वीसरु वाटे..

=====================

Amitabh.jpg
तो बोलला, तो जिंकला
मी मराठी हे आवर्जुन म्हणला
पुन्हा मराठी सारे भुलले
मराठी कोणाला म्हणाव हेच विसरले

साहित्य असो वा नाट्य असो
संमेलनाचं असं का होतं?
भक्तांचं आणि पुजार्‍याचं लक्ष
देव सोडून भलतीकडेच असतं.

(डोम्बिवलीतील नाट्य संमेलनात AB ला लवकर जायचेय म्हणून अध्यक्षांचे भाषण गुंडाळले गेले. आताचे तर बोलायलाच नको. तरी बरं सचिन तेंडुलकर नाही मिळाला त्यांना कविता वाचायला.)

भुललेल्या लोकांची सांजभूल स्वप्ने
मावळत्या किरणांनी अस्फुटशी याद आली

पाशांच्या विळख्यांनी विध्द मनही माझे
किरणांच्या स्पर्शाने पेटल्या मशाली.....

ही जागा चारोळ्यांसाठी आहे.
आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा
नाही जमले काही तर
कट पेस्ट करुन तेच तेच परत लिहा

हे समीरला उद्देशून नाही आहे. पण मराठी फॉन्ट मधे लिहिता न आल्याने ते जपानी मणसाने मराठी बोलावे तसे वाटते आहे. पुलंनी पूर्वरंग मधे नमुना दिला आहे - तिथे परुळेकरचे पालुरिकल कसे होते..सहज आठवले ते फक्त गम्म्त म्हणून देत आहे.

Pages