पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

thanks, malavika

घरात बर्‍याच दिवसांपासून कस्टर्ड पावडरचं एक पाकीट पडलंय. ते वापरून काही डेझर्ट सुचवू शकता?
त्यात वापरण्यासाठी घरात असणारे अजून काही पदार्थ सांगते.
कंडेन्सड मिल्कचा डब्बा, अमुलचे डेअरी व्हाइटनर, ड्रिंकींग चॉकलेट, चॉकलेट सिरप, स्ट्रॉबेरी सिरप..
आणि हो खूप दुध उरलंय म्हणून आटवत ठेवलेली बासुंदी.
सोप्पं काही सुचवू शकाल का? रात्रीच्या जेवणात डेझर्टसाठी.

अल्पना, कस्टर्ड तयार कर फक्कडपैकी, आणि त्याबरोबर जेली, फळांचे काप, केकचे तुकडे, वेफर कोन्स (आईसक्रीम कोन), आईस्क्रीम असे कॉम्बो करून जम्बो डेझर्ट तयार करता येईल. त्यात चॉको/ स्ट्रॉबेरी सिरपही वापरता येईल. हे सर्व एकत्रित आकर्षक रचून ग्लास बोलमध्ये सर्व्ह केल्यास खूपच मस्त दिसते व अतिशय यम्म्मी लागते!!! Happy

कस्टर्ड सेट करावे लागेल का आणि किती वेळ? लहानपणी आम्हाला कस्टर्डची चव आवडत नसल्याने आईने कधी घरी केले नाही किंवा मी पण भानगडीत पडले नाही.
पण नवर्‍याला आवडत असावं (त्याशिवाय का न सांगता घेवून आला :फिदी:) त्यामूळे त्याच्यासाठी अन लेकासाठी करून बघायचा विचार आहे.

कस्टर्ड तसे लगेच सेट होते. गार करून फ्रीजमध्ये थंडगार व्हायला लागतो तेवढाच वेळ! सर्व्ह करताना ते गारेगार असावे! Happy

कष्टर्ड मधे, पाकिटावरच्या सूचनेपेक्षा कमी दूध घालून शिजवले तर त्याचे छान क्यूब्ज करता येतात. इन फॅक्ट हवा त्या आकारात कापता येतात. मोल्ड असतील तर त्याचाही छान वापर करता येतो.

व्वाव! दिनेशदा, हे माहितच नव्हतं..... आता नेक्ष्ट टायमाला मोल्डेड कस्टर्ड!!!

असे कष्टर्ड एका ट्रे मधे सेट करायचे. मग त्याचे पत्त्याच्या आकाराचे तूकडे कापायचे. मग त्यावर लाल रास्बेरी जेलीचे (चॉकलेट मोल्ड्स वापरून ) केलेले वेगवेगळे आकार ठेवायचे. (बदाम, किलवर वगैरे )
दिसायला मस्त दिसतो हा प्रकार. आणि अर्थात्च खायला मजा येते.

slurrrrrrrrp!!! Proud

धन्स मुकुला आणि अरुन्धती
मुकुला त्या लिन्क मधल्याप्रमाणेच केला मी चीझ पास्ता आवड्ला सगळ्याना.

बहुतेक साठवण विभागात असतील.
पण सोपी कृति आहे. अर्धा किलो बटाटे (चिकट असावेत ) उकडून कुस्करावेत. त्यात मीठ, तिखट वा वाटलेल्या मिरच्या आणि जिरे टाकावे.
त्यात अर्धा किलो भिजवलेला साबुदाणा मिसळावा. मग सोर्‍याने चकल्या पाडून कडकडीत उन्हात वाळवाव्यात. (चकल्या न करता, लांबट तूकडे केले तरी चालतात. ) आयत्यावेळी मध्यम आचेवर तळाव्यात.

इथे कोणी बेक करुन स्प्रिंग रोल्स करायचे ट्राय केलय का? करता येतिल का? कसे करायचे? काही कल्पना?

मी केलेत ट्राय. पण फ्रोझन जे मिळतात इं.ग्रो. मधे ते बेक केलेत. मजा नाही येत. तळुनच छान लागतात स्प्रिंग रोल्स.

ड्राय/सुके गुलाबजाम कसे करायचे? फ्रिजशिवाय किती दिवस राहातील? माझ्याकडे चितळेंच गुलाबजाम मिक्स आहे. प्रवासाला हे गुलाबजाम नेता येतिल का?

मी काला जामून ची कृति लिहिली होती. प्रवासात हवे अस्तील तर ते नेता येतील, पण तेही २ दिवसच टिकतील.
साधे गुलाबजाम केले तर पाकात मुरल्यावर, निथळून ताटात पसरून फ्रिजमधे दोन दिवस तरी वाळवावे लागतील. वरती साखरेचे कण दिसले पाहिजेत. पण तेही दोन दिवसांवर फ्रिजबाहेर टिकणार नाहीत.

phyllo dough वापरुन बेक करता येण्याजोगे स्प्रिंगरोल्स करता येतात पण त्यासाठी सारण कोर
डे असायला हवे आणि त्या शीट नीट हाताळता यायला हव्यात.

मिनोती, तुला फिलो पेस्ट्री शिट्स म्हणायचय का? पण त्या वापरल्या तर खुप पापुद्रे नाही का सुटणार?
मला तळण अजिब्बात आवडत नाही म्हणुन बेक करुन बघायचे आहे.

ज्वारीच्या लाह्याच पीठ >>> यम्म Happy
ताकात भिजवून फोडणी, लसूण, तिखट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालूनपण मस्त लागतं.

मला २५ जणान्साठी व्हेज बिर्यानी करायची आहे. साधारण किती तान्दुळ घ्यावेत?

मी मस्तानी, माझ्या मावशीने सांगितलेला हा सोपा उपाय : जेवढी माणसे असतील जेवायला तेवढ्या संख्येत नैवेद्याची छोटी वाटी भरून तांदूळ घ्यायचे. म्हणजे जर २५ माणसे असतील तर नैवेद्याच्या २५ वाट्या तांदूळ. तिचे हे प्रमाण इतके सही आहे की आतापर्यंत एकदाही तिचा अंदाज चुकलेला नाही!

लाजो, मी Costco मधून आणलेले स्प्रिंग रोल्स बेक केले आहेत. ३५० वर ओव्हन ठेऊन बेक करायचे. दर ५ मिनीटांनी उलटायला लागतात. साधारण १/२ तास लागतो. मस्त क्रिस्पी होतात. बाकी घरी from scratch करायच्या स्प्रिंग रोल्सचं नाही माहित. ट्राय नाही केले कधी.

Pages