बहर गुलमोहराचा

Submitted by टवणे सर on 10 November, 2008 - 12:40

गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..

तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:

*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"

*********************

मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्‍यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.

*********************

माता:

दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.

ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.

*********************

गजानन देसाई:

सोमवारचा शाप

लांबुडका गोल
एक डोंगर

छिद्र त्यास
एका सोंडेस

त्यातून गोवली
बलदंड शृंखला

खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय

रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून

*********************

पुन्हःश्च मीनु:

ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा

*********************

वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:

@मीनु...

छान कविता होती...:ड
**************

@मीनु...

छान कविता आहे...:-प
*********************

आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:

एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल

एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल

एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल

*********************

पुन्हा एकदा मीनु:

कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'

काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?

*********************

हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:

इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही

काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.

*********************

आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः

जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला

का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला

मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला

असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला

*************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीनू, नंदिनी. Lol

मुलांच्या करीरचे काय >>> Proud हा टायपो नसेल, तर महान आहे..!

ते दृ आणि धृ महान आहे आणि!

टण्या | 28 April, 2010 - 14:00
त्याकाळी लोकांना शब्दाच्या लिंगाबद्दल अतिशय उत्सुकता होती.. तसेच रोजच्या जीवनात देखील ते व्यक्तिच्या लिंगावरुन वागणूक ठरवत. अश्या असमान वागणुकीवरुन बाफबाफंवर मारामार्‍या होत. आता हे लोक भिन्नलिंगी व्यक्तीस हीन वागणूक का देत हे अजून समजलेले नाही. बाफ म्हणजे काय ह्यावर महामहोपाध्याय साजिराडाशास्त्री संशोधन करत आहेत. महामहोपाध्यांयाच्या मते बाफ हे एक मैदान असून तिथे अनेक लोक आपल्याला काहिही गती नसलेल्या व संबंध नसलेल्या विषयांबद्दल एकत्र येउन वेगवेगळ्या गटांत विभागून भांडत. अश्या भांडणांचे पर्यवसन कधीकधी मृत्यु (प्राचीन शिलालेखांनुसार वेबमास्टर अश्या विचित्र नावाचा राजा खूप भांडणात शारिरीक वा भाषिक हानी पोचवणार्‍यांना हद्दपार करत असे असा उल्लेख आहे. ही हद्दपारी म्हणजे मैदानात मृत्यु असे महामहोपाध्यांचे मत आहे), कधी कधी राजीनामा तर कधी एकाच व्यक्तिची अनेक रुपे होण्यात होत असे (एकच व्यक्ति अनेक रुपात कशी येत असे ह्यावर महामहोपाध्याय साजिराडा आणि वितंडपंडित इडलिंबू ह्यांच्यात तात्विक सलोखा असला तरी प्रत्यक्ष कृतीबाबत मात्र टोकाचे मतभेद आहेत.)
अश्याच लिंगभेदभिन्नता वादात काही लोक चहूबाजूंनी बोलत. चहूबाजूंनी बोलणे कसे जमत असे ह्याबाबत मात्र महामहोपाध्यायांनी हार पत्करली आहे. अश्या प्रश्नांकित वैधानिक मतांवर लिंगनिश्चिती करणे ही उद्याच्या संशोधनाची दिशा असू शकते असे प्रतिपादन नुकतेच प्रकांडपंडित रिकामटणोकडेशास्त्रींनी नीच्चपदवीपरिक्षाअनुत्तीर्णविद्यार्थीस्नातक समारंभात केले.

मीनू | 28 April, 2010 - 14:01
इचारात सुद्दा डावं उजवं करत्यात लोकं आजकाल... सुद्द लेखणाचं इचाराल तर तेचं अस्सं हे.. जेच मण सुद्द जो लाइफबाय नं हात धुन लितो तेच लेखण सुद्दच असणार असं लाइफबायच्या नुकत्च्यच वल्या जैरातित लिलय

टण्याशास्त्री ही लिंगभेदाची परंपरा इतकी पुरातन आहे हे ऐकुन विस्मय जाहला. "बाफ" या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल मी संशोधन केलं त्यानुसार हा हिंदी शब्द असून त्याचा अर्थ वाफ असा आहे. "तोंडची वाफ दवडणे" हा वाक्प्रचार आपणास ठाऊक असेलच. तर वेगवेगळ्या मैदानात जाऊन लोक गट करुन बाष्फळ भांडणे करत अर्थात आपल्या तोंडची वाफ दवडत असत आणि यावरुनच अशा मैदानांना बाफ म्हणण्याची प्रथा रुढ झाली असावी.

उर्जा संवर्धन व जतन मंत्रालयाच्या अहवालानुसार.. एका बाफवर जितकी वाफ दिवसाला दवडली जाते त्यावर डेक्कन क्वीन एकदा मुंबईला जाऊन पुण्याला परत येऊ शकते. तसेच काही काही जाचक बाफवर जितकी उर्जानिर्मिती होते त्यावर डेक्कन क्वीन तीन वेळा मुंबईला जाऊन पुण्याला येऊ शकते.

उत्खननात झिरझिरीत गळे सापडले. गळ्यांमधून (पान) खाली जाताना पान दिसते. काय मस्तानी खरी होती? >>>>>> झिरझिरीत गळे म्हंजे तिच्या पंजाबी ड्रेसाचे असतील. आता ड्रेस असतील तर बाई खरी असणारच. अर्भाटसर, तुमच्या संशोधनाची वाट पाहात आहो.

प्रतिसादअसुदे | 5 May, 2010 - 11:36
मस्तानी पंजाबी होती ?

प्रतिसादनंदिनी | 5 May, 2010 - 11:38
असुदे... पंजाबी ड्रेस काय फक्त पंजाबच्याच बायका घालतात काय रे????

प्रतिसादसाजिरा | 5 May, 2010 - 11:44
सापडले ते गळा नसून गळे आहेत- याचा अर्थ मस्तानी एकच नसून अनेक होत्या अशी आशा करणेस वॉव आहे काय? कारण एकाच व्यक्तीस अनेक गळे बहुधा रामायणच्याच काळात असावेत. त्यातही दहा गळ्यांवर दहा तोंडे, एकाच गळ्यावर दहा तोंडे, एकाच तोंडा-गळ्याखाली दहा हात, एकाच गळ्या-तोंडामागे दहा सर्प अशी अनेक गोंधळजनक चित्रे आमच्या लहाणपणाच्या भिंतींवर बघितल्याचे स्मरते.

काय उत्खननाबद्दल अधिक माहिती देऊ शकता अरभाट? काय चालले आहे तिथे आणि लोकांना काय वाटते आहे?

Knock knock!
Who's there?
Justice!
Justice who?
Justice I thought! You won't let me in!!

प्रतिसादनंद्या | 5 May, 2010 - 11:42
भूतकाळातल्या मस्तानीबद्दल अर्भाट्सर चिल्लर माहिती सांगतीलच. पण वर्तमानकाळातल्या [ मान आली इथे ] मस्तानीबद्दल सुजातामध्ये जास्त माहिती मिळेल !

प्रतिसादअसुदे | 5 May, 2010 - 11:42
झिरझिरीत गळे असलेला पंजाबी ड्रेस तरी पंजाबच्या गळेकाढू बायकाच घालत असतील. अधिक माहितीसाठी कृपया वस्त्रप्रावरणे विशेषज्ञा बाईंना पाचारण करावे

प्रतिसादअसुदे | 5 May, 2010 - 11:44
साजिरा, लहानपणींच्या भिंतीवरील उद्बोधक विद्रोही वाङमयाविषयी अजून काही आठवणी ?

प्रतिसादनंदिनी | 5 May, 2010 - 11:54
अरभाट, इथे आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न असा पडलेला आहे की, मस्तानीचे झिरझिरीत गळे सापडले म्हणून मस्तानी अस्तित्वात होती असे म्हणणे बुद्धीप्रामाण्यवादास धरून आहे का???
कारण आपल्याला अख्खी मस्तानी अजून सापडलेली नाहिये. त्यामुळे मस्तानी सापडण्याचे चान्सेस आहेत का??

याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आप्ल्या स्टुडिओत आज आलेले आहेत. श्री. साजिराडा, प्रख्यात इतिहास संशोधक आणि मीनूदी, पुलाव एक्स्पर्ट, तसेच ह.भ्.प. टण्याशास्त्री मिरजकर.
तसेच. फोनवरून विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीशी आपण चर्चा करणार आहोत या विषयावर.
प्रेक्षकानो, फोन करत रहा. आजचा विषय आहे, मस्तानी आणि तिचे झिरझिरीत गळे.

प्रतिसादअनीशा | 5 May, 2010 - 11:59

प्रतिसादसाजिरा | 5 May, 2010 - 11:56
अरे उद्बोधक विद्रोही भित्तीवाङमयाचा विषय वेगळा. भारी भारी पर्सनॅलिटी असलेल्या १५-२० देवांचे फोटु रांगेत मांडलेले असायचे ना आजोबांच्या काळात, त्याबद्दल बोललो.

बाकी गळ्यातून पान दिसणे याला एकच साळसूद अर्थ होता का, याबद्दल काही पुरावे?

प्रतिसादटण्या | 5 May, 2010 - 11:57
हॅलो हॅलो.. हां ऐकू येतय का? आँ आँ.. हॅलो हॅलो.. नाही मला काय म्हणायच.. मस्तानीला गळा होताच हे अजून सप्रमाण सिद्ध झालय का? तसे असेल तर झिरझिरीत का काय ते बघू पुढे? आँ.. हॅलो..

(आज पुपुवर 'पुण्याचे बामण हरी, बावन्नखणी हो बवन्नखणी' खेळ दिसतोय.. )

प्रतिसादअरभाट | 5 May, 2010 - 12:00
साजिरा, आताच पाच जणांनी असा दावा केला आहे की ते मस्तानी पेशवे यांचे वंशज आहेत. त्या वंशजांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांची नावे अशी - हैदर अली गुलबक्ष, नितीन विनायक भट, मनोज कांबळे, जॉन कटारे आणि हिज हायनेस सरदार विक्रमराव सर्जेराव भट-भोसले. ही नावे कळताच इथे चर्चेला उधाण आले असून मस्तानीबाईंच्या काळात फक्त गळेच नाहीत, तर सगळेच झिरझिरीत असावेत असा एक मतप्रवाह या ठिकाणी दिसून येत आहे.

प्रतिसादनंदिनी | 5 May, 2010 - 12:02
टण्याशास्त्री... तुम्ही फोन ठेवा खाली!!! स्टुडिओमधून लाईव्ह टेलीकास्ट चालू आहे सध्या...

बरं.. मस्तानीला गळा होताच की नव्हता हे सिद्ध कसे करता येइल? कोकणात जसे मानकापी भुतं असतात तसे मस्तानी गळाकापी होती का???

जर तिला गळाच नवह्ता असे आपण मानले तर तिच्या गळ्यातून पान खाली जाताना दिसायचे या दंतकथेला काय अर्थ उरतो??

प्रतिसादआशूडी | 5 May, 2010 - 12:03
हॅलो, मला एक प्रश्न आहे.. मुळात मस्तानी पान खाण्याविषयी फेमस होती तर आजच्या काळात घट्ट आमरसाला तिचे नाव देण्यामागे काही विशेष हेतू आहे का? कारण हिंदू धर्मात तरी आंब्याचा आणि पानांचा शुभदिनाशिवाय झाडाव्यतिरिक्त कुठेही संबंध येत नाही. ज्यांच्या प्रणय कहाण्या वाचून आम्ही रोमांचित होत मोठे झालो त्यांच्या प्रेमजीवनात पानाला इतके महत्त्व असतानाही बाजीराव्-मस्तानी नावाचे एकही पान का प्रसिध्द नाही यावर शौकीनांनी जरुर विचार करावा. इतिहासकार, संशोधक यावर उजेड फेकतील का?

प्रतिसादहिम्सकूल | 5 May, 2010 - 12:09
तुम्हाला दुसरी वेळ मिळाली नाही का असा टीपी करायला..

तडमडायला आत्ताच ऑनसाइट बरोबर कॉल चालू आहे..

प्रतिसादनंदिनी | 5 May, 2010 - 12:22
आशूडी, बहुतेक तुमचा प्रश्न आमच्या तज्ञमंडळीना नीट समजलेला दिसत नाहीये. त्याना सोपी मराठी कित्येकदा समजत नाही. आपण हाच प्रश्न जरा "किचकट" नावाच्या भाषेत विचारू शकाल का?

प्रतिसादटण्या | 5 May, 2010 - 12:31
मस्तानी ही मुसलमान युवती व हिंदू धर्मात शुभ मानले गेलेले आंबा हे फळ ह्यांची सांगड भारतीय समाजजीवनात अश्या काही सहजतेने जुळलेली आहे की त्यावरुन भारत हा पुरातन कालापासूनच सहिष्णु व सर्वधर्मसमभावक देश होता ह्यावर शंकाच राहत नाही..

प्रतिसादसाजिरा | 5 May, 2010 - 12:40
सगळेच झिरझिरीत..
वंशजांकडे पान दिसत असल्याचे पुरावे नक्की असतील. पान गळ्यातून दिसत होते याचा अर्थ मुळात गळा होताच- असे प्रमेय आधी खोटे मानून गणिताने ते सिद्ध करावे, त्याप्रमाणे करणेत आले आहे. बुप्रावाद्यांनी पायजे तर वेगळे उत्खनन करावे. पण या बहुमुल्य उत्खखनात अडथळे आणू नयेत.

आशुडी आताशी गळेच सापडले आहेत. तुम्ही म्हणता त्या नावाचे एखादे पान असेलही इतिहासात धारातीर्थी अवस्थेत. प्रेमकथेने कसे वळण घेतले, त्यावरही अवलंबून असल्याची शक्यता आहे. पानाच्या गादीवर भांडण, बाजीरावाने एक्शेवीस्तीन्शेफुल्चंदमार्के पान खाल्ल्यामुळे वास सहन न होणे, मस्तानीचे सारखे गिळणे आणि बाजीरावाचे सारखे थुंकणे हा विरोधाभास, प्रेमकथेत तिसर्‍याच कुणाचा प्रवेश असे काही तरी. तुमचा प्रश्न सध्याच्या परिस्थितीत किमान सामुहिक कार्य्क्रमात घेता येत नसला, तरी पुढे त्यास अचानक महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहेच.

प्रतिसादअश्विनीमामी | 5 May, 2010 - 12:58
हलो हल्लो.... ऐकुयेताय्काएक फंडाप्रश्नआहे.

"पण पान खाणार्‍या बाई बरोबर अफेअर कसे होऊ शकते?"
----------------------------------------------------------

Sponsored by Listerine Mouth wash.

प्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 12:59
सगळेच झिरझिरीत..

>>

झिरझिरीत म्हणजे असून नसल्यासारखे की नसून असल्या सारखे. नसून असल्यासारखे असेल तर पंजाबी काय अन आसामी काय कुठल्याही गळ्याला काय अर्थ राहतो मी म्हंटो? असून नसल्यासारखे असेल तर त्याची दखल घेण्याचे कारणच काय? आनि त्याचा उपद्रव तरी काय? आं?

संपादनप्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 13:02
बाकी विषय उत्तम हां. शिंचे दात असते ना तर हा विषय बर्फासारखा कडाकडा फोडून खाल्ला असता !

बाकी फावल्यावेळी खलबत्त्यात कुटून चघळायला बहरात जाव द्या साजीराजी...

संपादनप्रतिसादडुआय | 5 May, 2010 - 13:02
= काहीही लागत नाही..

असो लोक्स सदु.

प्रतिसादसंकल्प द्रविड | 5 May, 2010 - 13:04 नवीन
>>मस्तानीचे सारखे गिळणे आणि बाजीरावाचे सारखे थुंकणे हा विरोधाभास,

या वर्णनामुळे डोळ्यांपुढे एक हास्यचित्र तरळून गेलं.

प्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 13:05 नवीन
"पण पान खाणार्‍या बाई बरोबर अफेअर कसे होऊ शकते?"
>>>

अफेअर करनारी बाई पान खाऊ शकते ना पण !

छुरीपर खरबूजा गिर्‍या क्या या खरबूजेपे छुरी गिरी क्या , नतीजा एकच ना ?

संपादन

मंजूडी | 5 May, 2010 - 13:09
- हॅलो....... हॅssलो

- हॅलो, आवाज जरा हळू करणार का?

- अहो हळूच बोलतेय

- अहो, तुम्ही नाही, टिव्हीचा आवाज हळू करणार का?

- मग मला ऐकू कसं येईल?

- फोनवरून येईल की

- वरून कसा येईल? फोनच्या वर फुलदाणी आहे. फुलदाणीत फुले आहेत. फुले ताजी राहण्यासाठी त्यात पाणी ठेवले आहे. फुले कोमेजू नयेत म्हणून एक क्रोसिनची गोळी पाण्यात घातली आहे. वरून येताना आवाजाचा धक्का लागून फुलदाणी पडली तर ती फुटून क्रोसिनचं पाणी घरभर होईल.

- अहो, तुमचा प्रश्न विचारा हो...

- हां, तर पान खाताना मस्तानीला तंबाखू लागायचानाही का? आम्हाला मेली सुपारी पण लागते. लागते म्हणजे घशात अडकते. मग वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खालीच राहतो..

- हॅलो, हॅलो......... काहीच ऐकू येत नाहीये. धन्यवाद!!

संपादनप्रतिसादसाजिरा | 5 May, 2010 - 13:17
अहो गळ्यातून पान दिसले पायजे, हा बाजीरावाचा अफेअरासाठीचा क्रायटेरिया. छत्रसालास पहिली अट घातली ती हीच. पान न खाऊन सांगते कुणाला? वड्डे लोग, वड्डी बाते. शूरांना शौकीन असणे परवडते. तुम्हाआम्हाला नाही.

प्रतिसादश्रद्धा | 5 May, 2010 - 13:18
आधी पान दिसत होते, मग मतप्रवाह दिसत आहेत. चालू द्या.

मस्तानीची काही डॉक्युमेंट्स उत्खननात सापडली आहेत. त्यात हा उखाणा दिला आहे;
हिर्व्या हिर्व्या ड्रेसाचा झिर्झिरीत गळा.
बाजिरावांनी भेट दिला मला पानमळा.
तसेच,
अस्सा झिर्झिरीत गळा गं बाई
पाण जाई पर जहर ना जाई
असे दोहे लिहिलेले आहेत. याबद्दल संशोधकांचे काय मत आहे?

प्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 13:25
हर चेहरा यहां चांद , हर जर्रा सितारा

तसे इथला प्र्त्येक जण संशोधक आहे....

चिन्या१९८५ | 5 May, 2010 - 13:25
जय महाराष्ट्र!!!

अरे यार माबो वाल्यांनी पाउलखुणा दिसायच्या त्या काबनंद केल्या आहेत?

tonaga | 5 May, 2010 - 13:31
मन्जु.डी बदल केला आहे . सिलेक्ट करताना जरा गोंधळ झाला होता.

चिन्या , अरे विषय काय, तू प्रश्न काय विचारतोय्स . छे छे न जाने कहां से आते है.

रच्याकने, काबनंद म्हणजे काय?

प्रतिसादसाजिरा | 5 May, 2010 - 13:35
इतिहास आणि उत्खननाचा वास आल्या आल्या रशियन चिन्याभाई आला बघा! कसा आहेस रे भो? किती दिसांनी?

टोणग्या, त्याला कानबंद तर म्हणायचे नसेल?

श्र, मस्तानीस मराठी वाचा-बोला-लिहावयास येत होते का, यावर अजून उजेड नाही. मग हे दोहे-उखाणे काशीबाईंनी शिकवले असावेत का? पण पान, झिर्झिरीत आणि जहर यांच्याशी काशीबाईंचा संबंध नसल्याचे आम्हांस ज्ञात आहे. उत्खननात काही निराळे सापडले आहे का?

नन्दिनी| 5 May, 2010 - 13:36
बाजीरावाच्या काळात काबनंद हा एक पानाचा प्रकार मिळत असे. साधारणपणे आता मिळणार्‍या कलकता मिठा पानाचे हे एक रूप म्हणता येइल. मात्र, या बाबत अजून संशोधन चालू असल्याने त्याबद्दल अजून माहिती प्रसिद्ध करता येणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी.

प्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 13:40
काशी बाई एक होत्या की दोन की तीन? मूळ काशीबाइंसह वाड्यात अथवा महालात दासी, कुनबिणी, नायकिणी, या संवर्गातही काशीबाई नावाच्या स्त्रीलिंगी मानव असू शकतात. त्यातल्या एखाद्या काशीबाईचा उपरिनिर्दिष्ट वस्तुविशेषांशी संबंध असू शकतो. जसे अश्वत्थामा म्हटल्यावर हत्ती की मानव असा विकल्प असू शकतो . काशी बाइ हे नाव त्याकाळी यूझर्स फ्रेंडली असल्याने अशा बर्‍याच व्यक्ती तिथे असणार.

काशीबाईच पण कोणती ? हा पुढचा चर्चेचा विषय असू शकतो...

संपादनप्रतिसादtonaga | 5 May, 2010 - 13:43
अरे इथे स्टुदिओत ऑन्लाईन फोन इन चालू आहे हे सगळे विसरलेले दिसताहेत...

आशूडी | 5 May, 2010 - 16:30 नवीन
हॅलो,माझा फोन डेड झाला होता. पण आता रिटे पाहिला आणि उत्तर समजलं.
तरी पुढे त्यास अचानक महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहेच. >> मग या महत्त्वाच्या कोपर्‍यात लालचुटूक पिंक टाकल्याबद्दल प्रश्नकर्त्यास काही पानधन मिळण्याची शक्यता आहे काय? अगदीच नाही तर गेला बाजार मस्तानीचा एखादा ड्रेस? जो झिरझिरीत नसल्यामुळे तिने गाठोड्यात बांधून ठेवला असावा?
बरं मस्तानीचे कुटूंब सामूहिकरित्या पुढील गाणं म्हणत होते ही माहिती आमच्या डेड्फोनकालावधीत आम्ही खणून काढली ..
(बालचमू कोरस मध्ये)
पान खाए मैय्या हमारो
गोरी सुरतीया होठ लाल लाल
हाय हाय झिरझिरता कुडता
झिरझिरते कुर्ते पे छीट लाल लाल ||धृ||
..
(मग मस्तानी बाजीरावाला उद्देशून)
हमने मांगा सुर ए पैठणी
ले आया जालीम बनारस का कुर्ता
अपनेही वाडे मे खोया रहे वो
हमरे दिल की ना पूछे बेदर्दा.. ||१||

(मग बाजीराव मस्तानीला उद्देशून)
बगीया गुन्गुन पायल छुन छुन
चुपकेसे आई है ऋत मतवाली
खिल गई कलीयां दुनिया जाने
(काशीबाईच्या आठवणीत)
लेकिन ना जाने बगीया का माली.. ||२||

(इंदिवर निळ्या काशीबाईंच स्वगत)
खाके मघई शाम से उघे
सो जाए वो दिया बाती से पहले
आंगन अतारी मे घबराई डोलू
गोरी के डर से दिल मोरा दहले.. ||३||

(बालचमू कोरस मध्ये)
पान खाए मैय्या हमारो
गोरी सुरतीया होठ लाल लाल
हाय हाय झिरझिरता कुडता
झिरझिरते कुर्ते पे छीट लाल लाल..

(या गीताबरोबरच आजचा पानेंद्र येडके सराफ 'हॅलो पुपुकारटी' कार्यक्रम समाप्त होतो. धन्यवाद. )

प्रतिसादपूनम | 5 May, 2010 - 16:28 नवीन
अगगगग! आशू, आज तुला _/\_! प्रणाम ज्युमा!

अरभाटाने वैनीवर रचलेले काव्यपुष्प. Happy
अरभाट | 11 May, 2010 - 13:45
मी आहे मण्यार, कंस एक घोणस, वैनी, माफ कर आम्हा तू तर एक फणस.
मी आहे साप, कंस एक सुरळी, वैनी, तू तर आख्खी बाग नारळी.
वैनी तू दयानिधी, वैनी तू साक्षात स्वयंपाकविधी
चव आठवू तव हातची जातो तुज शरण, वैनी, अमृतच ते लागे जरी भात आणि वरण
तू युक्तीवान संयुक्ता, वैनी तूच व्हावीस पुढची उपायुक्ता
सिरिअल्स दुधात खातात एवढाच आम्हा गंध, वैनी तू मात्र साक्षात असंभव अनुबंध
तूच जाणशी आमच्या व्यथा, वैनी तू साक्षात पौर्णिमेची कथा
आम्ही असो काका आणि दादा आर्फी, वैनी आम्हीच 'खाऊ आनंदे' तू केलेली बर्फी
वाहतो तव चरणी हे कावोळींचे दीप, जरी जाणतो, कुठे आम्ही कुठे तो मदनबॉण्ड संदीप!

***
महान आहेस अरभाटा! _/\_

या वाड्यावरच्या अजून काही कविता -

श्रद्धा -

'सकाळ'च्या उंबरठ्याआड थांबले वादळ आहे.
झाडावरी लटकला एक खवट नारळ आहे.
शोधावा कुठे नाग नागमणी मिळवण्या,
जमिनीच्या आत खोल मण्याराचे वारुळ आहे.
भिंतीवरी लटकली हजारो प्राचीन जळमटे,
फोनच्या टेबलावरी हिटने मेले झुरळ आहे.
(नारळाशी र्‍हाईमिन्ग शब्द फार नसल्याने गझल थोडी बिघडली आहे पण वेड्यावाकड्या आकाराची आंबाबर्फी समजून गोड मानून घ्यावी. शेवटी मानवाचे दु:ख मानवाला ठाऊक!)

अरभाट -

शेवटी मानवाचे दु:ख मानवाला ठाऊक!), नारळाला यमक केरळ, गा ला त ल्या गा ला त हाहा

मी एकलीच लिहित्ये, रातीच्या अंधारात
नको तिथच क्लिकला अवचित माझा हात (-Please choose-मध्ये कविता)
गुलमोहराखाली नांगी काढून वैरीण ती बसली
ग बाई मला काव्येष्काची इंगळी डसली

येता कविता कळ लई आली
बोटं घामानं भिजली सारी
कविता आली.... झाऽऽली
सांगा ही कळ कसली
ग बाई मला.........

सार्‍या बाफांवर फिरले बाई ग
मला कवी गावला नाही ग
तंवर कुणाची कविता आली
खूण खुन्याला पटली
ग बाई मला.........

या इंगळीचा कळला इंगा
कवीवानी मी घातला दंगा
प्रतिसाद घाला हलका हलका
महान, वा!, भिडली कसली!
ग बाई मला........

अरभाट, श्र.. Lol

वैनी तू मात्र साक्षात असंभव अनुबंध
तू युक्तीवान संयुक्ता, वैनी तूच व्हावीस पुढची उपायुक्ता
आम्हीच 'खाऊ आनंदे' तू केलेली बर्फी
कुठे आम्ही कुठे तो मदनबॉण्ड संदीप! >>>>>>>> Rofl Rofl

आशूचं संशोधन -

इ.स. नऊ हजाराव्या शतकातील इ. सहावीच्या 'इतिहास एकविसाव्या शतकाचा' पुस्तकातील पान क्र.२९
त्या काळातले लोक फार लिहीत असत. लांब ओळी न लिहीता आखूड ओळीतून मांडलेली अक्षरे तीच कविता. याचे आकलन होताच ते सरळ वाक्य देखील अर्धी तोडून नव्या नव्या ओळीवर लिहू लागले. कागदाच्या उधळपट्टीचा उगम होण्याचा हाच कालखंड असे महामहोपाध्यायांचे मत आहे. तेव्हाचे लोक अतिशय मागासलेले. कुणी असे काही लिहीले की ते वा हे एकच अक्षर दोनदा लिहीत. आता कविता नव्हत्या तेव्हा हे लोक कशाला काय म्हणत यावर संशोधन चालू आहे.
काड्या घालणे हा त्या काळातल्या लोकांचा अतिशय प्रिय खेळ. परंतू तो कसा खेळत असत, त्याचे नियम काय, पंच खेळाडू याबाबतीत ठोस माहिती काड्यांच्या पुराव्याअभावी हाती नाही. शिवाय ते लोक आपल्या कवितेचे इतर भाषेत रुपांतर करीत. या विधीचे नाव भाषांतर असे होते. स्त्रिया व पुरुष दोघांनाही कविता करण्याचा हक्क असे. यावर खटले चालल्याची दफ्तरी नोंद नाही. त्या अर्थानेही हे लोक मागासलेलेच.
तेव्हा विडंबन ही आणखी एक भयानक रुढी अस्तित्वात होती. मुडद्याच्या सापळ्यात प्राण फुंकून तसाच पण भलताच मनुष्य खाडकन समोर उभा राहावा तसा हा आसुरी प्रकार.
तेव्हा अशा लोकांचे एक सामूहिक संमेलन असे. तेव्हा सगळ्यांनी मिळून एक कविता म्हणण्यापेक्षा प्रत्येक जण उठून आपापलीच कविता वाचीत असे. मागासलेपणाचा आणखी एक नमुना. ज्या अर्थी लोक लिहीत त्या अर्थी लोक वाचीतही असावेत हा महामहोपाध्यायांचा अंदाज चूक ठरवता येत नाही. पण तसे असते तर या कवीकुळातील लोकांना आपणच लिहून आपणच कविता वाचून दाखवायचे कारण काय याचे संदर्भ काळाच्या ओघात नष्ट झाले असल्याची शक्यता असल्याने यावर संशोधन चालू आहे.

Light 1 Proud

आशूच्या अलौकिक संशोधनाने स्तिमित होऊन चिंतन करताना सिमातेला सुचलेले हे किंचित काव्यः

एव्हरेस्ट ओलांडून पल्याड जाताना
पूर्णचंद्राची रात्र उगवली तेव्हा.....
बर्फाळ पर्वतावर बसलेल्या माणसाने मला पासपोर्ट विचारला नाही.
अनेक युगांपासूनचे आदिम एकटेपण शब्दांत पेलत
तो म्हटला, 'आर्य उत्तरेकडून आले होते!'

ही कविता वाचून आशू म्हणती झाली -

'उत्तरा'वर श्लेष अपेक्षित. मग पुढे काय झालं? वाट पाहून शिणलेल्या आर्यपत्नींनी एका मंद सुस्कार्‍यासह
त्यांच्यावर तु. क टाकला आणि आपली नजर गवाक्षातून पहाटेच्या अंधुक प्रकाशात दूरवर हिमाच्छादित शिखरांआडून उगवणार्‍या हिरण्यगर्भबिंबाने लालीमा पसरत चाललेल्या क्षितीजावर रोवली.

आशूच्या या दर्दभर्‍या विधानावर अरभाटाने एक कविता केली -

उखडून आर्यपत्नी विचारे, कोण ही उत्तरा सटवी?
त्तत्तपप्प होऊन आर्यपुत्र तिला पटवी
राहून राहून मनात त्याच्या विचार यावे
स्टेशनावर हिला गाडीखाली ढकलून द्यावे
पण विचार थोडीच लगेच कृतीत बदलतो
निमूटपणे आर्यपुत्र भांडी विसळतो

(चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेल की 'कोण उत्तरा सटवी' या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक ओळीच्या आद्याक्षरातून मिळते).

आणि ही आशूची कविता-

विसळता भांडी कडाडे ती विद्युल्लता
आठ वाजत आले आता कधी फरशी पुसता?
रागे भरु नकोस अशी तूच माझी पट्टराणी
पिंप भरुन घ्या दहा मिनिटात जाईल पाणी
असे कसे झाले काल कुठे खाल्ली माती
आठवणींनी त्या अजून धडधडे छाती
आज तुझंच ऐकेन सारं काय काय करु ते सांग,
हवं तर तू जा ऑफिसला मी करेन घरुन काम!

Pages