मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार,
Thank you very much.you are really great.
मी आज Reliance Capital cover केला. आत्ता माझ्याकदे Titan Industrie आहे, 1860 ला घेतलाय, तुमचे काय मत आहे. आज तो कमी झालाय, साधारन कधी cover करावा?

सई

हो हे Futures बद्दल आहे.

केदार,
माझे तुझ्याकडे एक काम होते. तुझ्या डेटाबेसवरुन मला माहिती मिळेल का की अशा कोणत्या रिअल इस्टेट कंपन्या आहेत ज्यांच्याकडे मजबूत लँड बँक आहे आणि विशेषतः उत्तर भारतातील शहरांत जमिनींचे पट्टे आहेत.

अहो ग्रेट वगैरे नका म्हणू ! (दोन चार आकडे कन्सिस्टंटली लागले इतकेच. Happy

परवाच्या दिवशी मी डो जोन्सला ऑपश्नस विकत घेतले आहेत. १०५ ( म्हणजे १०५००) साठी. तेंव्हा डो १०३५० च्या आसपास होता. ७० सेंटला मिळाला. आज २.०५ आहे. हे ठेवून आता १०३ चा एप्रिल पुट घेतोय.

प्रयोग नाही रे. अशी माहिती नाही मिळणार, पण ह्या बाबत मी शोधून तुला सांगेन. माझ्यामते HDIL आणि India bulls अश्या कंपन्या नक्कीच आहे. HDIL ह्यावरुनच २००८ मध्ये १४०० पर्यंत गेला होता.

रिलायन्स इन्फ्रा - चांगला आहे. १०७२ ला शॉर्ट टर्म रेसिस्टन्स आहे. तो जर पार केला तर ११५० सहज दिसत आहेत. एप्रिल मध्ये आंध्रप्रदेश सरकारची हैद्राबाद मेट्रो संदर्भात मिटिंग आहे. जर ते बिड रिलायन्स इन्फ्राला मिळाले तर डिसे एन्ड पर्यंत तो १४०० पण क्रॉस करेल. ( साधरण ५४००० लोकांना ह्या प्रोजेक्टमुळे काम मिळणार आहे, ह्यावर लक्ष ठेवा.)

साऊथ इंडियन बँक -
टेक्निकल्सच्या दृष्टिकोनातून वाफ संपली. १५०-१५१ ला खूप मोठा रेसिस्टंस आहे. आणि हा शेअर आत्ताच १५० आहे. त्यामुळे इथून दोन चार दिवसात वर गेला तरी खाली परत येऊ शकतो. शॉर्ट टर्म व्हियू असेल तर काहीच उपयोगी नाही, कारण आता रिव्हर्सला येऊ शकतो. पण ..
फंडामेंटल - मस्त बँक. YOY ही नेहमीच खूप नफ्यात पण कमि PE वर असणारी बँक आहे. २०१३ पर्यंत अजून ३०० शाखा सुरु होतील. दक्षिण भारतात ह्या बॅंकेचे भरपुर नाव असल्यामुळे त्याचा फायदाही होईल. आजही व्हॅल्यूएशन चांगले आहे. २०१० चा प्रोजेक्टेड EPS 24.8 आहे. अगदी आजच्या ६.९१ इपिएस वर ही ट्रेड झाली तरी टारगेट १७२ येत आहे. २०११च्या प्रोजेक्टेड EPS 29 ला जर ट्रेड झाली तर नक्कीच १९० + जाऊ शकते. लाँग टर्म साठी गुंतवणार असाल तर नक्कीच गुंतवा.

Zicom Electronic Security Systems चांगली कंपनी दिसतेय. पण काल बहुदा सटोडियांमुळे वर गेली. सध्या ओव्हरब्रॉट आहे. १०६-८ च्या रेंजला एन्टर करा. किंवा आता घेऊन दोन चार एक दिवसात पडला तर अ‍ॅव्हरेज करु शकतो. ह्या कंपनीची फंडामेंटल माहिती मिळाली नाही, ती मिळवून सांगतो.

मारुती सुझुकी कसा आहे ? मी १४६५ ला घेतलाय Happy

आणि टाटा स्टील च भवितव्य कस असेल? शॉर्ट टर्म मध्ये ?

Zicom Electronic Security Systems च्या Security युनिट ला Schenider India ने विकत घेतले आहे. हिंदुस्तान times ची बातमी आहे.

Titan Industries - फारच व्होलटाईल झाला आहे, त्यामुळे प्रिडिक्ट करणे अवघड झाले आहे. आता घसरला तर १७१० वर शॉर्टटर्म सपोर्ट दिसतोय. पण कालची घसरण बुलिश इन्गल्फिंग आहे पॅटर्न मध्ये आहे. (हायर टॉप) त्यामुळे तो उद्या वरही जाईल असे फार वाटत आहे. तो एनिवे १८३२ ला आला आहे. उद्याचा दिवस लक्ष ठेवा. OI वाढतोय असे दिसू लागले तर कव्हर करा. कारण गेल्या एक महिण्यात १५१० ते १९०५ एवढा चढ झालेला आहे. ( मनातले सांगायचे, तर मी दोन दिवस वाट पाहीन, कारण काल पडुनही १९०५ पर्यंत वर गेला होता.)

फंडामेंटली हा समभाग फारच जबरी आहे. २००९ मध्ये १००% डिव्हीडंड दिला आहे. एकदम स्ट्राँग बॅलन्स शिट व P&L. माझ्यामते २२००,२३०० तो सहज पार करेल. ज्यांना लाँग टर्म गुंतवणूक करायची आहे त्यांनी तो दरवेळी पडला की घ्यावा. गुंतवणूक कालावधी साधारण ९ महिने.

केदार,
माहीती बद्द्ल आभारी आहे.

सोन्याबद्द्ल काय मत. हा माझ्या आईचा प्रश्न आहे. तिला सोनं विकत घ्यायचं आहे.

निकी घे घे. आता भाव कमी आहे कारण लग्नाचा सीजन पुढे ढ्कलला आहे. तेव्हा भाव १९५०० परेन्त जाइल. मी परवाच पाच तोळ्याचे तोडे घेतले. वामन हरी पेठे सन्स मधून. चांगला अनुभव आला मला. तिथे ते लोक सांगत होते. वेब्साईट पण आहे.

वा. ह. पे.: ०२२- २५४३६८८१/८२/८३ ठाणे

अर्थात जाणकारांचे मत घे. आम्ही काय इमोशनल इन्वेस्टर आहोत. : )

आम्ही काय इमोशनल इन्वेस्टर आहोत. >>> Lol मामी.

बरं SBI स्टोरी कंटिन्यू - मी गुरुवारी टारगेट २०६५ दिले होते. ते ऑलरेडी पार झाले आहे. (फ्युचर्स मध्ये २०७१). आज पॅटर्न मध्ये "शुटिंग स्टार" आला आहे. म्हणजे ओपन हाय, इन्ट्राडे व्हेरी हाय, आणि मार्केट बंद होताना ओपनच्या जवळपास बंद. ( ओपन २०६५, हाय २११४, लो, २०३२, क्लोज २०७० ). असे असते तेंव्हा "शॉर्ट टर्म मध्ये विकनेस" हा सिग्नल असतो. उद्या जर ट्रेड वाढत असेल तर पोझीशन कव्हर करा.

येत्या काही दिवसात मात्र तो २१५० पर्यंत जाईल. ट्रेलिंग स्टॉप लॉस २०२० टेवून ट्रेड करायला हरकत नाही. रोज लक्ष ठेवा.

(मी ह्या टर्म मुद्दाम वापरत आहे, जेणे करुन चार्ट वाचताना ह्याचा उपयोग होईल, पब्लिक डिमांड असे तिरपागड्या भाषेत लिहू नका, अशी असेल तर मी असले काही भयानक शब्द वापरणार नाही. Happy )

जे फ्युचर्स मध्ये येऊ इच्छितात त्यांचासाठी - फ्युचर्स हे शेअर्सला मार्जिन मनी ठेवूनही घेता येते. लाँग फ्युचर्स त्यातल्यातात बरे. (शॉर्ट आपण ट्रेंड बदलला की करुया.) म्हणजे वेगळा एकही पैसा न गुंतवता असलेल्या पैश्यांवर जास्त पैसे कमविने.

उदा. मी माझ्याकडे असलेले रिलायन्स आणि लार्सन मार्जिन मनी म्हणून डिपॉझिट केले. प्रत्येक शेअरचा हेअर कट जाउन उरलेली रक्कम शेअर्स अ‍ॅज मार्जिन म्हणून वापरली जाते. म्हणजे जर पोझीशन लॉस मध्ये जात असेल तर ते पैसे तुमच्याकडून घेण्यासाठी ब्रोकर तुमचे मार्जिन म्हणून ठेवलेले शेअर्स विकेल. पण विकत घेताना (तुम्ही) तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.
मग तुम्ही ट्रेंड पाहून एखादे फ्युचर्स विकत घ्यायचे ठरविले. SBI चा एक लॉट १३२ शेअर्सचा आहे, त्याला गुणिले आजची किंमत म्हणजे २७३,२४० पण मार्जिन केवळ ३९,००० च्या आसपास लागते. म्हणजे तेवढे पैसे नसताना देखील तुम्ही २७३,००० रु फुचर्स मध्ये गुंतवू शकता.

गेल्या आठवड्यात १९९० ला असताना समजा तुम्ही एक लॉट घेतला, तर आजचा निव्वळ नफा ( १३२ X (२०७०-१९९०) - कमिशन म्हणजे साधारण ३९,००० गुंतवणूकी वर १०५०० च्या आसपास नफा. ( ७ दिवसात २६ टक्के !! ) आणि ते ही एका लॉट ला. १० लॉट असले असते तर १००,००० रु कमाई. Happy

जर हा समभाग पडला असता तर मात्र तेवढा तोटा. पण फ्युचर्स मध्ये डिलेव्हरी घेऊन रिअल लॉसला पैसे असतील तर पेपर लॉस मध्ये बदलता येते, म्हणजे जणू काही ते तुमचे शेअर्स होते, काही कालानंतर तो लॉस भरुन निघू शकतो.

हे सगळे लिहायचे कारण .. बहुतेक लोक फ्युचर्स मार्केटला घाबरतात, इतके घाबरायची बिलकुल गरज नाही.

बाकी शेअर्स बद्दल वेळ मिळाला की लिहेन.

ह्या बाफवर मी बरेच इंग्रजी शब्द लिहत आहे, ते नक्कीच टाळता येतील पण मग मला 'शुटिंग स्टार' ऐवजी ' निशाणी तारा' असे काहीसे करावे लागेल. जे लिहायला व पचनी पडायला थोडे अवघड आहे, कारण मग 'निशाणी तारा' हा नविन शब्द फक्त मायबोलीवर येणारे लोकंच वापरतील. पण केवळ मायबोली म्हणजे, 'शेअर बाजार' नव्हे. आता बघा ना, 'शेअर बाजार' मध्ये पण शेअर आहेच ! 'समभाग बाजार' असे नाही. म्हणून इथेही चालवून घ्या ही विनंती !

केदार,
इंग्रजी शब्द चालतील. कारण बाकीची माहीती इंग्रजीमध्येच उपलब्ध असते. रेफरन्स लावायला खुप अवघड जाईल. जर हरकत नसेल तर कृपया आवश्यक आहे तेव्हा इंग्रजी शब्दच वापर .

छान माहिती देतो आहेस. Happy

स्टेट्मेन्ट मधील अन रीअलाइज्ड प्रोफिट व रीअलाइज्ड प्रॉफिट असे दोन कॉलम आहेत ते कसले असतात?
त्यातील आपला प्रॉफिट कोणता धरायचा?

डिव्हिडंड आणि कॅपिटल गेन डिस्ट्रीब्युशन हे Realized profits मध्ये येतात आणि शेअर्सच्या किंमती वाढल्या असतील आणि ते अजून विकले नसतील तर ते पेपर गेन्स Unrealized profits मध्ये येतात.

Realized profit हा खरा झालेला प्रॉफिट, म्हणून तो आपला धरायचा.

Unrealized profits म्हणजे हा तुमचा फायदा होऊ शकतो असे व Realized profits म्हणजे हा फायदा होऊन पैसे हातात आले आहेत असे.

ह्या बाफवर जास्त करुन महिलाच कार्यरत आहेत. हा नक्कीच एक + ट्रेंड आहे. Happy

Unrealized profits - वर लिहीलेच आहे सर्वांनी, पण थोडक्यात म्हणजे बुक न केलेला प्रॉफिट जो शेअर पडला तर कमी होतो. पेपर गेन. Happy आज मी स्वतः बियरिश. बरेच शेअर्स विकून प्रॉफिट रियलाईज करतोय. त्यात माझे आवडते LNT, ICICI, SesaGoa - गेल्या काही दिवसात भरपुर रिटर्णस दिले ह्या सर्वांनी.

शुअर. महिला दिनाचा शुभेच्छा ! हे मला गेल्या दोन चार दिवसांपासून लिहायचे होते. शेअर बाजारात अ‍ॅक्टिव असणार्‍या महिला खूप कमी आहेत, त्यातल्यात्यात मायबोलीवर हे प्रमाण जास्त दिसतेय. Happy

उदा. मी माझ्याकडे असलेले रिलायन्स आणि लार्सन मार्जिन मनी म्हणून डिपॉझिट केले. प्रत्येक शेअरचा हेअर कट जाउन उरलेली रक्कम शेअर्स अ‍ॅज मार्जिन म्हणून वापरली जाते. म्हणजे जर पोझीशन लॉस मध्ये जात असेल तर ते पैसे तुमच्याकडून घेण्यासाठी ब्रोकर तुमचे मार्जिन म्हणून ठेवलेले शेअर्स विकेल. पण विकत घेताना (तुम्ही) तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत.
मग तुम्ही ट्रेंड पाहून एखादे फ्युचर्स विकत घ्यायचे ठरविले. SBI चा एक लॉट १३२ शेअर्सचा आहे, त्याला गुणिले आजची किंमत म्हणजे २७३,२४० पण मार्जिन केवळ ३९,००० च्या आसपास लागते. म्हणजे तेवढे पैसे नसताना देखील तुम्ही २७३,००० रु फुचर्स मध्ये गुंतवू शकता.

हे online करता येते का?

सोनं?

अश्विनीमामी..
आई मला मस्त फटकावणार आहे. १६००० होतं तेव्हा मी नाही घेतलं आणी तिला पण म्हणाले जरा थांब

हो. हे ऑनलाईन करता येते. (शेअर्स अ‍ॅज मार्जिन अशी टॅब असेन कुठे तरी)

सोनं --> सोने आणि शेअर बाजार हे सहसा एकमेंकाविरुद्ध असतात. जेंव्हा बाजारात पैसे कमी मिळायला लागतात, तेंव्हा लोक सोनं विकत घ्यायला सुरु करतात. (भारतीय सोडून.) कमोडिटी मध्ये मी अजून सोन्यावर अभ्यास केला नाहीये त्यामुळे उगीच घ्या, किंवा नका घेऊ लिहीने प्रशस्त वाटतं नाहीये. पण तरीही थोडीफार माहीती जमवून लिहीण्याचा प्रयत्न करेन.

केदार ,
खुपच छान माहिती देता तुम्ही. धन्यवाद.
तुमचे Patel Eng. बद्दल काय मत आहे? मी ४५८ ला घेतला आहे.
आनि SBI परत घ्यायचे झाले तर कधी घ्यावा? Reliance Ind. परत १००० च्या आत आला तर घ्यावा का?
सई

सई
रिलायन्सला स्ट्राँग सपोर्ट ९६० च्या रेंज मध्ये आहे, त्यामूळे तो ९८० च्या घरात आला की मी परत त्यावर १०१०-२० पर्यंत लाँग जाईल. स्टॉप लॉस ९६० रेसिस्टन्स १०१५-२०.

स्टेट बँक - प्रॉफिट बुकींग चालू आहे. आज तिसरा, उद्याही कदाचित पडेल, पण परवा पासून परत शॉर्ट अपट्रेंड चालू होऊ शकतो. तो २१५० पर्यंत जाईल असे वाटते.

पटेल - ४१६ ला मेजर सपोर्ट आणि ४६० ला शॉर्ट टर्म रेसिस्टंस दिसत आहे, तो ब्रेक झाला तर परत जानेवारी च्या हाय पर्यंत ४७६-८० पर्यंत जाईल असे चार्ट वरुन तरी वाटत आहे.

तुम्हाला हे विविध स्टॉक कोणी सजेस्ट करतं की तुम्ही स्वतः रिसर्च करुन घेता.

केदार आणि तज्ञ मित्रहो,मला एक दोन वर्षा साठी २ लाख गुन्तवायचे आहेत्.वाढीची अपेक्षा २० टक्क्याच्या आस पास आहे?
कुठे टाकू??माझ्या कडे डी म्याट आहे.

पिक युवर स्टॉक. मला खालील शेअर्स आवडतात.

इन्फ्रा, मेटल्स
लार्सन
सेसागोवा ( थोडे पडल्यावर)
स्टर्लाईट
भेल

बँक

बँक ऑफ बडोदा
स्टेट बँक ऑफ इंडिया
ओरियन्टल बँक ऑफ कॉमर्स

फार्मा- लूपीन
ऑईल - रिलायन्स (एवढी फास्ट ट्रॅक ग्रोथ नसेल.)
टेलकॉम - भारती
शिपिंग - एबिजी शिपयार्ड, मर्केटर लाईन्स

केदार,
अहो मला शेअर मधले जास्त काहि समजत नाही. ईकडे तिकडे वाचुन थोडेफार कळते. मी एक शेअर निवडला(कुणाचेतरी ऐकुन्/कुठे तरी वाचुन) कि तो कधी घ्यायचा आणि कधी विकायचा ते समजत नाही.

Pages