मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निफ्टीचे स्प्रेड लेग्स काढल्यावर एक ४५३७ वर येत आहे. मला स्वतःला नाही वाटत की तो तितका खाली जाईल. काल हाय ४९५१ ला टच केल्यावर लो मध्ये ४७६६ इतका खाली गेला. व नंतर परत बुलीश मध्ये जाऊन तो ४८३० ला क्लोज झाला. ४७०० रेंज मध्ये भरपुर सपोर्ट मिळतोय असे दिसत आहे.

आता मात्र मार्केट व्हॅल्यूला आहे. खरेदी करायलाच हवी. बाय ऑन डिप्स फॉर लाँग टर्म - (रेंज डिसे २०१०)

काही दिवंसापूर्वी मी लुपीन घ्या असे म्हणालो होतो, तो ऑलरेडी ११ टक्कांनी वाढला आहे. माझी टारगेट रेंज १६५० आहे. पण जर घेतला असेल तर प्रॉफिट बु़क करुन परत १४६० रेंज मध्ये वापस खरेदी करा.

LNT काल जाने ६ च्या हाय पासून १९ टक्के करेकश्न झाले आहे. काल नॅशनल फर्टीलायझरचे २१५५ करोड रु चे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. आधी लिहील्याप्रमाने अर्निग्सं चांगल्याच राहणार. स्ट्राँग बाय.

NTPC एकदम व्हॅल्यू रेंज मध्ये. कॅपॅसिटी ४५००० च्या वर जाणार. टारगेट २५० ( सप्टे - डिसे २०१० ) स्ट्राँग बाय.

सध्या निफ्टी ४८०० ते ५००० रेंज बाऊंड असेल असे वाटत आहे.

------------------------------------------------------
व्होलटाईल मार्केट स्ट्रॅटेजी.
उद्या जर मार्केट सकाळच्या ट्रेडिंग मध्ये वर गेले तर ....

निफ्टी ...

ऑप्शन मध्ये स्ट्रँगल

लाँग ऑन कॉल ४९००
लॉंग ऑन पुट - ४८००
--------------------------------------------------------

मी टिप्स देण्या पेक्षा तुम्ही, तुमचा आवडता स्टॉक सांगा त्यावर मी टेक अन फंडामेंटल अ‍ॅनॅलिसिस करेन.

केदार Cipla, IOC, ONGC, ABB कसे वाटतात ह्या लेवलला विकत घ्यायला?

केदार, इन्फोसिस, भेल,एचडीएफसी, या लेवल ला मला महाग वाटतात. तुमचे मत?
सुझलोन बद्दल ही मत सांगा.

केदार,
मला लाँग टर्म साठी शेअर्स विकत घ्यायचे आहेत. कोणत्या कंपनीचे घेऊ? मला शेअर्स बद्द्ल फारशी माहिती नाही.

मी आधीच सांगितल्याप्रमाणे मला शॉर्टटर्म मध्येच इंटरेस्ट आहे जसं जास्तीत जास्त महिना. केदार अगदी खरं सांगायचं तर मी रोज जाऊन मार्केट वर नजर ठेऊन बसते असंही नाही, त्यामुळे त्याचा काही अभ्यासही नाहीये. अर्थात आता रोज घरूनच मी मार्केटचं अपडाऊन चेक मात्र करू शकते.

काल निफ्टी घेतला का मग? असे दिवस नेहमी येत नसतात. Happy थोडा रिसर्च करुन दुसरा स्प्रेड टाकतो.

शॉर्ट टर्म मध्ये इट्रेस्ट असला तर त्यासाठी मार्केट रोज पहावे लागेल, कारण शॉर्ट टर्म ट्रेडिंग हे व्हॅल्यू वर न चालता चार्टिंगवर चालते त्यामुळे ह्या मार्केट मध्ये फार चौकस असावे लागते. व शॉर्ट टर्म हे सिस्की सेगमेंट असल्यामुळे अभ्यासाशिवाय पर्याय नाही. (सॉरी मी असे इथे लिहीतोय, पण त्यामागची भावना निर्मळ आहे, त्या शेअर मध्ये अभ्यास नसताना अल्प मुदतीसाठी पैसे गुंतवले तर नुकसान होण्याची प्रॉबेबिलीट जास्त आहे. )

सिप्ला - शॉर्ट टर्म बियरीश. हॅमर नंतर बियरीश इनगल्फींग पॅटर्नस तयार झालेत. २०१० बजेटेड EPS ला तो फुल्ली प्राईज्ड आहे. काही न्युज असल्याशिवाय वर जाणार नाही. गो शॉर्ट २ ऑप्शन विकून १ विकत घ्या. (लॉस अन लिमीटेड , प्रॉफिट लिमीटेड.)

इंडियन ऑईल - लॉस मेकींग कंपनी. - आजच पारीख रिपोर्ट आला आहे. जर सरकारने ऑईलवर कंट्रोल कमी करुन फ्री कमोडिटी केले ( यु एस वगैरे सारखे) तर जास्त फायदा ह्या कंपनीला होईल पण ते होणे काही दिसत नाही. रेंजबाऊंड - बियरीश ऑटलूक. रेसिस्टन्स लेवल ३२८-३० , सपोर्ट २९९-३०२.

ONGC - डि रेग्युलेशन मध्ये हा शेअर परफॉर्म करेल असे वाटते. सध्या मागच्या कन्सॉलिडेश रेंज ला हिट करेन. १२१० पर्यंत शॉर्ट टर्म टारगेट. (निफ्टी ५००० क्रॉस झाला तर). बजेट वर लक्ष ठेवावे लागेल.
IOC पेक्षा ONGC चांगला वाटतोय.

भेल - २२०० ला मोठा सपोर्ट आहे. सध्या असेल तर होल्ड. व्हेरी शॉर्टटर्म मध्ये बुलीश. आणखी ५० रु तरी वाढेलच असे वाटत आहे. पण जर आठ दहा महिने ठेवणार असाल तर नक्कीच विकत घ्या. इंडेक्स जेंव्हा वर्षाअखेरीस १८००० क्रॉस करेल तेंव्हा त्यात भेलचा मोठा हात असणार. भेल वर परत सेपरेट लिहीन.

इन्फी - Q on Q ग्रोथ ६.५%, FY11 ला FY1० पेक्षा ३.५ टक्के वाढ अपेक्षित. डिसे अखेरिस टारगेट -२८०० पर्यंत जाऊ शकतो. शॉर्ट टर्म - असला तर होल्ड. घ्यायचा असेल तर सॉफ्ट बाय. आजच रिव्हर्स हॅमर पॅटर्ण दिला आहे, त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात तो वर जाऊ शकतो.

युनिटेक - बॅन्डच्या लोअर रेंजला आहे. ८० ते ९० ह्या त्याच्या जुन्या रेंज मध्ये यायचा प्रयत्न करत आहे. पण तिथून घसरला तर ६७ ला मेजर सपोर्ट आहे. सध्या असेल तर होल्ड, नसेल तर नका घेऊ. पण ६५-६७ लेवलला परत रि एन्टर करा.

महेश इथे बरेच लाँग टर्म शेअर्स दिले आहेत, आणखी काही लिहीतो. Happy

बाकीचे अपडेट करतो थोड्या वेळात.

माझ्या पोर्टफोलियो मधील एक आउट परफॉरमर.
ABG.png

गेल्या काही महिन्यात १५३+ टक्के रिटर्नस.

मी इथे लिहीताना विश्वास असावा व उगीच काहीही टाकावे म्हणून टाकतोय असे वाटू नये म्हणून हे टाकले. शेवटी पैसे आहेत. Happy

बलरामपुर चिनी सध्या १२० ला आहे. तो FY११ अर्निंग्स वर १७० च्या आसपास जाईल. लाँग टर्म साठी मला आवडला व मी आजच घेतला.

मनिष,
अरे कसला मुव्ह होतो तो शेअर, एकदम अफाट आहे. चार्ट एकदम गोंधळात टाकतोय. पण बरेचदा हेड न शोल्डर्स पॅटर्न मध्ये आहे, आता शोल्डर वर त्यामुळे शॉर्ट टर्म बुलीश. बाकी ह्या कंपनीबद्दल जास्त काही माहिती नाही. शोधतो.

@ केदार, तसा मी whirlpool ७९ ला घेतला आणि १४५ ला विकला. (अर्थात एका मित्राकडून मिळालेल्या खात्रीलायक माहीतीवरून). ४-५ महिन्यात चान्गले रिटर्न्स मिळाले.

मी IVRCL Infra घेतले आहेत ४१४ ला, तेव्हापासून तो जो खाली यायला आहे, फारच नुकसान नको म्हणून मी अजून काढला नाहीये, काही होप्स आहेत का ?

केदार,
IDFC and IFCI बद्दल काही?... IDFC ७० ला घेतला आहे आणि IFCI ३० ला.....काढावे का ठेवावे ?

IFCI मागच्या पाणावर लिहीले होते तो ५५ ला जाईल म्हणून. आज ५२ आहे. Happy असूदेत किंवा खूप असतील तर थोडा प्रॉफिट बुक कर. ४७ ला मेजर सपोर्ट आहे. रेसिस्टन्स ५७ ते ६० ला आहे. तिथे तो नक्की जाईन पण निफ्टी नोज डाईव्हची शक्यता पाहता. १२-१५ तारखेपर्यंत वाट पाहून प्रॉफिट बुक करुन घे. जर निफ्टी खाली गेलेच तर परत एन्टर.

IDFC - मेजर सपोर्ट लेव्हलला आला. १४८-१५२. पण ७० ला घेतला आहे तर सेल करुन प्रॉफिट बुक कर. Happy परत रि एन्टर कधीही करत येते.

IVRCL - काही दिवस वाट पाहा. काढू नका. दोन इंडिकेटर्स परत तो वाढेल असे दाखवत आहेत. आणखी २०-३० रु मिळतील असे दिसते. तेवढा गेला की परत विचार करु. पण तो परत ४१४ ला जाईल की नाही ह्याची शंका आहे. कारण तुम्ही घेतला तेंव्हा तो जवळ जवळ ५२ विक हाय वर होता. पुढच्या रिझल्ट मध्ये कदाचित परत तो ४०० क्रॉस होईल.

केदार धन्यवाद..
IFCI चा प्रॉफिट बुक केला होता जेन्ह्वा तो ९० च्या आसपास होता.. करतो सगळे काढुन भेल घेतो..भेल १००० करण्याचे टारर्गेत आहे..

केदार,

मी मधे IDEA घेतला होता ६३ ला. नंतर वाढलाच नाही बहुतेक. काय करु?
सुझलोनबद्दल पण सांगा. आहेत माझ्याकडे ८३ ला घेतलेले.
फार डीटेल्समधे अभ्यास नाहीये माझा.

मला वाटते की आयडिया किंवा इतर टेलिकॉम कंपन्यांचे शेअर (भारती सारखे) २०१० मध्ये फारसे वाढणार नाहीत. आयडिया ६३ च्या पुढे जाणे अवघड वाटते. आयडिया ५८ ते ६२ या narrow range मध्ये बरेच दिवस राहील.

NTPC ची current market value २०६ च्या आसपास असल्याने २०१ फी ऑफर किम्मत खूपच जास्त वाटते. घ्यायचाच असेल तर नवीन शेअर लिस्ट झाल्यावर २०० च्या खाली भाव आल्यावर घेता येतील.

srei infra बद्दल काय मत आहे तुमच केदार? मला घ्यायचे आहे परंतु QUIPO च्या घडामोडि मुळे confuse झालो घ्यायचे कि नाहीत?

हो यु. एस मार्केट मध्ये पण गुंतवतो. ( प्रिफरन्स भारताला आहे कारण परतावा भारतात जास्त आहे.) पण येथील मार्केट साठी दुसरा धागा काढतो. तिथे अशीच चर्चा करता येईल.

थोड्या वेळाने लिहीतो, आज जाम बिझी आहे. Happy

L & T हा Blue Chip शेअर आहे. तो तात्पुरता खाली आला तरी काही काळातच प्रचंड वाढतो. तो खाली आला तर ही संधी समजून त्याच्यात झटकन पैसे गुंतवावेत.

आय आय पि चान्गलेच आलेत ग्लोबल मार्केत सुद्धा ग्रीन मधेच आहेत पण बजेट जवळ्च आहे पुड्च्या विक च्या निफ्टी लेवेल्स काय असु शकतिल ?

NTPC ची current market value २०६ च्या आसपास असल्याने २०१ फी ऑफर किम्मत खूपच जास्त वाटते. घ्यायचाच असेल तर नवीन शेअर लिस्ट झाल्यावर २०० च्या खाली भाव आल्यावर घेता येतील.>>>>

मला तर वाटते की १९०/- च्या लेवल ला येइल... कारण १९३/- एम्प्लोयिना ऑफर दिली आहे.

Pages