मार्केट टॉक - आउटलूक

Submitted by केदार on 27 January, 2010 - 13:28

सेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय?

१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.
२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)
३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.
४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)
५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.

ह्या सर्व डेटाचा टेक्नीकल अ‍ॅनॅलिसिस केला तर बर्‍याच कन्फुझिंग लेवल्स सापडतात. पण नेमका ह्यावेळी मग इतिहास लक्षात घेऊन मागे मार्केट मध्ये काय घडले ह्यावर विचार केला. दर जानेवारीत गेले ५-६ वर्षे मार्केट पडते.

दिड-दोन आठवड्यांपूर्वी मी आणि उपास बोलताना त्याने विचारले की नंतरच्या लेवल्स काय असतील. त्याचाशी बोलताना मार्केट लवकरच खूप पडुन फर्स्ट सपोर्ट लेव्हल १६२०० वर जाईल असे सांगीतले होते. तेंव्हा मार्केट १७,७०० च्या आसपास होते, व १६,२०० कुठेही बोर्डवर येतील असे दिसत नव्हते. पण आज मार्केट १६,२८९ ला आहे.

उद्या एक्सापरीचा गुरुवार असल्यामुळे त्याचाही परिणाम होणार.

पुपुवर गेल्या आठवड्यात लिहीले होते की पैसे गोळा करा. आता ती वेळ येऊ घातली आहे. कालचा फॉल १६,२०० ला टच झाला नाही म्हणजे ह्या सपोर्ट लेव्हल तो थांबेल का? हे पाहायला आणखी दोन तीन दिवसांची गरज आहे पण इथे जर लगेच सपोर्ट मिळाला नाही तर नंतरचा सपोर्ट साधारण १५,३०० ते १५,५०० आहे असे वाटते.

पैसे असतील तर अनेक चांगले सेक्टर्स - मेटल्स, इन्फ्रा आणि फार्मा हे चांगले वाटत आहेत, जर अजून खाली घसरले तर नक्कीच ह्यात नक्कीच गुंतवणूक करायला सुरु करावी.

* हे सर्व माझे अंदाज आहेत, जे चुकीचेही असू शकतात. (असतात) आपले पैसे निट विचार करुन गुंतवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुषार,

फंडामेंटल अ‍ॅनॅलिसीस - माझे शिक्षणच फायनान्स रिलेटेड आहे. P &L बॅलन्स शिट वाचून रेशोज डोळ्यासमोर नाचायला लागतात. Happy

टेक अ‍ॅनॅलिसीस - हे पण मी सवयीने शिकलोय. डेटा साठी फ्री सॉफ्टवेअर म्हणजे finance.google.com पण माझ्याकडे एक विशिष्ट सॉफ्टवेअर आहे. जे bse / nse ला कनेक्ट करुन डेटा प्रोसेस करतं. ज्यातून मला चार्टिंग सोपे पडते. पण हे ऑफलाईन अ‍ॅनॅलिसिस साठी उपयोगी आहे, लाईव्ह डेटा फिड नाही. जेंव्हा मी भारतात असतो, तेंव्हा मात्र लाईव्ह डेटा फिड साठी अ‍ॅनाग्राम सिक्युरिटीज चा टर्मिनल वापरतो. (आयसिआयसिआय सारख्या साईटस वर लाईव्ह डेटा तेवढा लाईव्ह नसतो. Happy )

या पध्दती सिस्टिमॅटिकली कशा शिकता येतील? >> फंडामेंटल व चार्टिंग हे दोन्ही शिकायला विविध पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत, पण केवळ सरावानेच त्या अंगी पडू शकतील. शिवाय चार्टिंग मध्ये अनेक ईंडिकेटर्स असतात, ते देखील वेगवेगळ्या पद्धतीने पडताळून पाहता येतात.

लाँगटर्म साठी टेक अ‍ॅनॅलिसिस करु नये. तो व्हॅल्यू बेस्ड असावा, तर ट्रेड अन शॉर्ट टर्म साठी चार्टस वापरावेत.

हो आज बंद आहे.

मान इंडिया ही परफ्युम कंपनी बद्दल बोलत असाल तर ती फ्रेंच मल्टिनॅशनलची भारतातील एंटिटि आहे.
त्यांची उत्पादने चांगली आहेत व कंपनी खूप मोठी आहे. लॉन्ग टर्म साठी घ्यावी कारण परफ्युमरी उद्योगाला भारतात अति स्कोप आहे.

धन्यवाद केदार.
मामी - मान इंडिया नाही, आम्ही मान इंडस्ट्रिज (aluminium extrusions and saw pipes manufacturer) बद्दल बोलतोय.

ह्याच बाफवर मी २८ जानेवारीला भारती एअरटेल बद्दल सेल रेटिंग दिले होते. तेंव्हा त्याची किंमत ३२५ प्रति शेअर च्या आसपास होती. आज भारती २८९ ला मिळतोय. (११ टक्के घसरन)

भारती एअरटेलला मी आज परत रिव्हू केले. आता मी त्याला "स्ट्राँग बाय" ही रेटींग देत आहे. टारगेट साधारण ३५०, ६ ते ९ महिने.

भारतीने अफ्रिकेमधील Zain Group ह्या कंपनीला $ १० बिलियन मध्ये विकत घेतले. नायजेरिया वगळता उर्वरित अफ्रिकेत ही एक मोठी कंपनी आहे. सध्या ह्या कंपनीचा सब्सर्कायबर बेस ४० टक्के आहे, त्यामुळे ग्रोथ पोटँशियल भरपुर. शिवाय ह्या अ‍ॅक्विझिशनमुळे भारती ग्लोबल जायंट बनली ते वेगळेच. एप्रिलच्या सुरुवातीला पूर्ण पैसे द्यायचे आहेत. भारती १ बिलियन कॅश मध्ये वर उर्वरित लोन घेऊन देणार. लोन घेतल्यामुळे व्याज खूप द्यावे लागेल व त्याचा परिणाम बॉटम लाईन मध्ये दिसेल. पण त्या मार्केटमधील ग्रोथ व एकंदरीत पुढचे भविष्य पाहता ही एक छोटी फेज आहे, जी लगेच निघून जाईल. स्टेट बँक कदाचित ८ बिलीयन देईल. तसे झाले तर SBI ला पण अर्निंग मिळून त्याचे व्हॅल्यूएशन पण थोडे बदलेल. सध्या भारती २०१० च्या अर्निंग्सच्या १२.१ PE वर ट्रेड होत आहे. पण गेले काही वर्षे हा स्टॉक सेन्सेक्सच्या सोबत ट्रेड होतो. सध्या सेंसेक्स Fy11 च्या अर्निंग्सच्या १५.३ % ने ट्रेड होत आहे.
FY11E EPS २०.७ आहे. जर भारती १५ ने ट्रेड झाला तर किंमत ३११ च्या आसपास जाते. ह्या किमतीत परत अफ्रिकेमधील सर्व देशांचे उत्पन मिळविले तर किंमत आणखी वर जाण्याची शक्यता आहे. + BTIL चे उत्पन साधारण २० ते २१ घेतले तर हा समभाग ३५० सहज क्रॉस करेल.

टेलकॉम सेक्टर मध्ये स्ट्राँग बाय. कालावधी ६ ते ९ महिने.

केदार, तू हे जे फ्युचर व ऑप्शनबद्दल लिहीलंयस, समजा कोणाला ह्यात ट्रेड करायचं असेल तर त्याकरिता कोणतं वेगळं अकाऊंट असतं कां?

नाही, ते शेअर्सच्याच ऑनलाईन अकाऊंट मधून ट्रेड करता येते. तिथे एक वेगळा सेक्शन असतो. पण आत्ताच सुरुवात असेल तर प्लिज ट्रेड करु नका. कारण पैसे जाण्याची भिती जास्त आहे. त्यासाठी सगळे ग्रिक (डेल्टा, बिटा, गॅमा) व त्यांचे उपयोग माहीती पाहीजेत. मी हळुहळु ते लिहीत जाईन. पण ऑनलाईनही हे सगळे आहे. नीट आकलन झाल्याशिवाय ह्यात कोणीही पडू नये. Happy

भारत सरकार आत्ता 3G साठी निविदा मागवणार आहे एप्रिल पर्यंत व भारती संपूर्ण भारतातील बँड साठी निविदा दाखल करेल असा अंदाज वर्तवला जातोय. या ३जी साठी पुन्हा भारतीला फंड लागतील, मग अशा वेळी हा शेअर घ्यावा काय?
मला ही माहिती मिळाली माझ्या ब्रोकर कडून
* Government plans to complete 3G auctions by mid-April; three slots in 17 circles and four slots in five circles to be auctioned
* We do not rule out further delays in 3G spectrum auctions
* Expect Bharti to bid for pan India 3G spectrum and believe RCOM and Idea Cellular will be selective.

The government issued notices today inviting bids from private telecom players to participate in the auction of 3G spectrum. Three slots will be auctioned in 17 circles and four in five states including Punjab and Bihar. The base prices for pan India 3G spectrum and BWA spectrum are estimated at cUSD750m and cUSD375m.
We expect Bharti to bid for pan India 3G auctions; Vodafone, Tata's, RCOM and Idea
Cellular should be selective.

केदार
धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाचा खुप उपयोग होतो
DLF बद्दल तुमचे काय मत आहे? DLF घ्यावा का?

ह्या तिन्ही बद्दल लिहीतो.

२८ तारखेला सईंच्या प्रश्नाला उत्तर देताना शॉर्ट टर्म साठी रिलायन्स अन SBI बद्दल लिहीले होते. सई तुम्ही घेतले का?
SBI अजून २० रु वर जाईल असे वाटत आहे. (आधी लिहील्याप्रमाणे २०४० रेंज). आज कव्हर करुन घ्या.
रिलायन्स चे फ्युचर ३७ रु प्रतिशेअरच्या फायद्यात आहे, १०३० पर्यंत आजची रेंज दिसतेय. फायदा योग्य वाटत असेल स्क्वेअर ऑफ करा. Happy

रंगाशेट 3G चे बोलने मागील वर्षभरात तीन वेळेस लांबनीवर पडले आहे. आता एप्रिल मध्ये परत एकदा बैठक आहे. MTNL & BSNL ला 3G ऑलरेडी दिले आहे. ती सर्व्हिसही सुरु झाली आहे, भारतीने पूर्ण भारतासाठी अप्लाय केले आहे, आणि तो त्यांना अ‍ॅलॉट होईल. त्यामुळे त्याचा फायदा भारतीला होईलच.

पण मला वाटतं भारतात 3G येऊ नये तर आता 4G ऑलरेडी आले आहे, ही टेक्नॉलॉजी भारतात आली तर भारत टेलकॉम मध्ये अजून पुढे जाईल.

बॉस तुमच्या बीबी वर वाचून पैसे टाकले व फायद्यात आहे. आयुश्यात पहिल्यांदाच. मेनी धन्यवाद.
केदार झिन्दाबाद

मला एक ब्लु चिप कंपनीज चा पोर्टफोलिओ लॉन्ग टर्म साठी डेवलप करायचा आहे. जसे लोकांचे ऐकतो ना अहो रिलायन्स १० रु ला घेतला होता.......
इन्फोसिसचे शेअर विकले अन बेन्गलोर ला फ्लॅट घेतला. ......
मुलीला गुगल चे ३ शेअर मिळाले.( लग्नाचा खर्च निघेल) .........

पण माझे ज्ञान लिमिटेड आहे. येथील वाचून धडपड करत आहे. जे पट्टीचे करणारे आहेत ते त्यांचे शेअर्स
सांगत नाहीत. फक्त कशात लै भारी प्रोफिट केला ते सांगतात. अन मी माझी एन एस सी / पोस्ट्ल एमायपी वगैरे बघत बसते. Proud

मामी Rofl

मामी, तुम्हांला इकॉनॉमिक टाईम्सच्या साईटवर तुमचा पोर्टफोलिओ बनवता येतो हे माहितीये कां?

Ranbaxy Laboratories - मॉडरेट सेल.
१.मार्केट गाईडन्स पेक्षा कमी रिटर्न्स.
२. अमेरिकेत त्यांचे काही ड्रग विकायला बंदी,
३. फार्मा सेक्टर मध्ये तुलनेने महाग शेअर. जर इतर कंपन्यांसोबत अलाईन केले तर दुसर्‍या कंपन्या जास्त अ‍ॅट्रॅक्टिव्ह दिसत आहेत.

सिप्ला - मॉडरेट सेल. असला तर प्रॉफिट बुक करा. ३०० च्या आसपास परत येता येईल.

१. रेंज ३०० ते ३२४ मध्ये अडकला आहे.
२. वर जाण्यासाठी कुठलिही चांगली बातमी ह्या शेअर बाबतीत येत नाही.
३. वर जाण्यासाठी लागणारा व्हॉल्यूम देखील नाही.

DLF - दिर्घकालीन गुंतवणूकीसाठी चांगला वाटत आहे, साधारण ३४० ते ३५० रेंज दिसतेय. पण ट्रेड करायसाठी फारच विक. काल मार्केट वर गेल्यावरही हा बेटा ढिम्म. Happy स्टे अवे. किंवा अगदी ट्रेड करायचाच असेल तर बटरफ्लाय किंवा स्ट्रँगल ने करा.

बॉस तुमच्या बीबी वर वाचून पैसे टाकले व फायद्यात आहे. आयुश्यात पहिल्यांदाच. >>> असं नाही चालणार. हैद्राबादला आल्यावर बिर्याणी देणार असेल तर मग काही उपयोग. Happy

मामी, मी रिलायन्स १६५ रुला असताना देखील घेतला आहे. १९९८ च्या शेवटास. पण तो विकला. नाहीतर मी ही भविष्यात कधीतरी लिहीले असते की माझ्या पोरीच्या लग्नाचा खर्च त्यातून काढला म्हणून. त्याच काळात तेंव्हा zee telefilm नावाचा एक शेअर फार जोरात होता, व्हेटरन लोकांना आठवत असेल.

पण गेल्यावर्षी RPL ने मला टॅग हॉयर चे घड्याळ मात्र घेउन दिले आहे. Happy

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फायदा व्यवस्थित दिसत असताना माणूस, 'आणखी थोडा वाढल्यावर विकू' असे करत बसतो व दिसणारा फायदा नाहीसा होतो. शेअर कुठे जात नाही, तो परत खाली येतो, त्यामुळे जास्त हाव न करता व्यवस्थित प्रॉफिट बुकिंग पण शिकले पाहीजे. ( मी लिहतोय इथे, पण काही काही वेळेस मी देखील अडकतोच. आज मी icici वर प्रॉफिट बुक करणारच. Happy )

केदार, जसं मी मागे इथे लिहिलं होतं बहुधा. ACC घेतला ७६८ च्या आसपास व ८२० झाल्यावर विकला. आज तो ९५० च्या आसपास आहे. Sad ही गोष्ट १ १/२ महिन्यापूर्वीचीच आहे. मी मार्केट थोडं खाली यायची वाट बघतेय, काही शेअर्स घ्यायला.

नम्स्कार केदार
धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाचा खुप उपयोग होतो
Dredging corporation बद्दल तुमचे काय मत आहे? 592 bought 1 year back. Disinvestment chances were there. Moneycontrol वर चर्चा आहे १००० ते २००० होईल. तुमच मार्गदर्शन please.

केदार,
मी SBI 1985 ला घेतले होते ,आनि आज मी SBI आनि Reliance दोन्ही Cover केले.
आत्ता माझ्याकदे Reliance Capital चे आहेत, 793 ला घेतले आहे,तुमचे काय मत आहे? साधारन कधी cover करावे?
मला एखादा चान्गला शेअर सान्गाल का? की मला ज्याचे Fututes घेता येतिल.
Reliance Ind.,SBI परत घ्यावे का? काय range मध्ये घ्यावे ?
Thank You,
saee

zee telefilm नावाचा एक शेअर फार जोरात होता, व्हेटरन लोकांना आठवत असेल.>> केतन पारिख च्या टॉप टेन मध्ये होता ना तो?

बिर्याणी एनी टाइम पण ते खास घड्याळ घालून आले पाहिजे हैद्राबाद गट्ग स्टार गेस्ट. अहो मी हैद्राबाद मध्ये इकॉ टाइम्स लॉन्च झाला त्यासाठी फिल्म बनविली होती. रात्रभर जागून काम केले व सकाळी फंक्षन.
फॉलोड बाय ब्रेकफास्ट. त्या काळी क्रिश्ना ऑबेरॉय असे म्हण्ले तरी माझी स्कूटर पंक्चर होत असे. फिल्म नीट दाखवीली मग टायवाल्यांची भाषणॅ झाली. मग जंगी ब्रेफा. मी इतक्या डिशेस एकत्र नंतर पार्ले बीबी वरच पाहिल्या. वाइट एवढेच वाट्ले होते की लै झोप आल्याने व थकल्याने त्या ब्रेफा ला न्याय देता आला नाही.
मी संडे इको टाइम्स मध्ये आर्टिकल्स ही लिहीत असे. तिथली मुलगी लग्न होउन गेली व सारे थांबले.
मला फायनान्शिअल बातम्या व आर्टिकल्स वाचायची आवड्च आहे. जंकीच म्हणा. तर सांगायची गोष्ट ते
केतन पारीख/ हर्शद वगैरे नीट वाचले आहे. त्याची काय ब्वा लेक्सस आहे. इथपासून सुट्केसीत पैसे सगळे.
ग्लोबल ट्र्स्ट ब्यांकेच्या पण लॉन्च पासून ती मरेपरेन्त. आज तुमने फिर उन दिनों की याद दिलायी.

मामी बिर्याणी बरोबर पत्थर गोष्त, मिरचीका सालन आणि दही की चटनी पण खाउ घाला, निजामी लोकांची मेहमान नवाजगी दाखवुन द्या. Happy

हो. त्यानंतरही तग धरुन होता एक दोन वर्ष. मामी तुम्ही ET मध्ये लेख लिहीत होता म्हणजे लै भारीच. ती GTB तर भारीच होती.

बँकेवरुन आठवलं - मी पंधरा दिवसांपूर्वी ओरियंन्टल बॅंक ऑफ कॉमर्स घेतला आहे. १० टक्के रिटर्न्स मिळाले आहेत. माझे टारगेट ३३० च्या आसपास आहे त्यासाठी.

Reliance Capital - बँकींग मध्ये येईल असे वाटत आहे. सध्या होल्ड. फ्युचरसाठी स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ७८५ च्या आसपास. ८०८ - ८१२ रेंज येत्या काही दिवसात येईल असे वाटत आहे. काल काईन्डा डोजी होता, पण आधीच्या बियरिन इंग्ल्फिंग मुळे जरा चिंतेत. (प्रॉफिट बुक केल्या बद्दल अभिनंदन)

साधारण किती टक्के फायदा पाहावा >> साधना, ह्याचे उत्तर कसे ट्रेड करत आहोत ह्यावर आहे.
शेअर्स असतील तर मी दर १०-१२ टक्यांनंतर परत एकदा अंदाज तपासून पाहतो. जर माझे टारगेट आणखी जास्त असेल तर मी चिंता करत नाही, तितके दिवस तो राहू देतो.
फ्युचर्स असतील तर मात्र रोज लक्ष द्यावेच लागते. मला त्या ट्रेड मध्ये ३०००-४००० जरी मिळाले तरी ती पोझीशन कव्हर करतो, ऑफकोर्स जर ट्रेंड आणखी पॉझिटिव्ह असेल तर मात्र होल्ड करतो.

केदार n All ,
मला काही stocks "Undervalued" आहे असे वाटत ते
Zicom Electronic Security Systems Ltd.
P/E : 6.41
52 week 50.45 : 128.40
Achyut Godbole : Non-Executive Independent Director
>>>Security Systems चे महत्व मी काही सांगायला नको....
Officers and directors ही जमेची बाजू आहे..
ICSA India Ltd.
PE : 4.80(?)
52 week : 48.35 - 229.90
infra + IT sector ची कम्पनी...........

केदार n All.
I have Zicom(only 27), looking for ICSA
like to know more about this 2 stocks...........

SBI टारगेट २०४० अचिव्हड. Happy रिव्हाईज २०६५ परत एकदा फ्युचर घ्यायला काही हरकत नाही.
रिलायन्सची काही मुव्हमेंट नाही त्यामुळे आज नको.

केदार,
south indian bank
Tamilnadu petroprod
3i infotech
बद्द्ल सांगाल?

केदार,
Thank you very much.you are really great.
मी आज Reliance Capital cover केला. आत्ता माझ्याकदे Titan Industrie आहे, 1860 ला घेतलाय, तुमचे काय मत आहे. आज तो कमी झालाय, साधारन कधी cover करावा?

सई

Pages