माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅलडच्या पानांमधे जी जाड शीर असते तिच्यामुळे कधी कधी कडवटपणा येतो. मी बहुतेकवेळा ती काढून टाकते. ह्या कोशींबीरीमधे लिंबूरसापे़क्षा टोमॅटो चांगला लागतो.
सॅलड (रोमेन लेटस -- हेड लेटस नको) +काकडी बारीक चिरुन +टोमॅटो बारीक चिरुन + मीठ + साखर + आवडीप्रमाणे दाण्याच कूट, कांदा, मिरची

माझ्या भाजणीच्या थालिपीठांना चिकटपणा येत नाही त्यामुळे अर्थात बर्‍याचदा ती मोडतात. कुठे चुकतं कळत नाही त्यामुळे मग आवडत असली तरी करायचा कंटाळा येतो. माझं कुठे चुकतंय?

भाजणी खूप जुनी नाहीये. भाजणी कालवताना मी गरम पाणीच घालते. तरीपण आई करताना जसं चिकट असतं तसं होत नाहीये एवढं खरं.

भाजणी आणि फ्रिजमध्ये? Uhoh कालही केली थालिपीठं आणि एपिसोड रिपीट झाला. आता पुढच्या वेळेस वरील उपाय करून बघेन.

मेघना सो स्वीट. प्यार में कभि कभी ऐसा हो जाता है. छोटीसी बात का फसाना बन जाताहै. एक वाडगा खीर आम्हाला पण हवी.

मामीसाहिबा यावरून अत्र्यानी माधव ज्युलिअन यांच्या कवितेचे विडम्बन करून केलेली कविता आठवते.
'घे माडगे, घे गाडगे | घे गुलचमन घे वाडगे,
ताम्बूल घे , आम्बील घे,| घे भाकरी घे खापरी!

मी घरी जेली बनवली. तिला अतिशय उग्र वास आहे (स्ट्रॉबेरी ). नुसती खाणे अशक्य आहे. तिचे दुसरे काही करता येइल का? की टाकुनच द्यावी लागेल?

मला वाटत गुठळ्या होतात ते कारण बरेच जण पाण्यामधे रवा घालतात.
याऊलट जर तेलात्/तुपात रवा लालसर होईपर्यन्त परतला आणि त्यामध्ये उकळलेला पाणि घातल तर नाहि होत... मी नेहमी असच करते.. मला कधीच हा problem नाही आला...

अश्विनी, जेलीला उग्र वास आहे, तो का ते बघा. घरी केली म्हणजे फळांपासून कि पावडर पासून ?
ताज्या फळांपासून केली असेल तर ती खाली लागली असण्याची शक्यता आहे. किंवा प्रिझरवेटीव्ह जास्त झाले असेल.
पावडर पासून केली असेल, तर ती कदाचित एक्स्पायर झालेली असेल. वाईट वास येत असेल तर खाऊ नये.

दिनेशदा,
पावडरपासून केली. वाईट वास नाही, पण इसेन्सचा वासच भयानक आहे. टाकुन देणेच ईष्ट! Sad

धन्यवाद.

मी काल मनःस्विनी यांनी दिलेल्या कृतीने मुगडाळ शिरा केला.मुगडाळ दुधात भिजवुन्,वाळवुन मग
कोरडी मुगडाळ [तुपाशिवाय ] भाजली. ती जरा जास्त भाजली गेली.
मग त्याचा रवा काढुन तुपावर भाजला. मग त्यात उकळीचे दुध टाकले.
त्याचे प्रमाण किती घ्यायला हवे? मिश्रण कोरड वाटत होत म्हणुन मी दुध टाकत गेले.
आनि साधारण गोडाचा शिरा शिजवतो तितका वेळ शिजवलं.
मग साखर टाकल्यावर ते सैलसर झाल. आता त्याला थोड जास्त भाजल्यावर येतो तसा
वास येतोय. नवरा म्हणाला हे कच्च राहिलय. मला काहीच कळत नाहीये.
एवढ भाजल्यावर कच्च कस राहीलं?
की दुध घालुन बराच वेळ शिजवायला हव होत?
ह्यात काही सुधारणा होउ शकते कि सरळ टाकुन देउ ते?
अजुन मी त्यात वेलची/जायफळ, ड्रायफ्रुट्स वगैरे काहीच नाही घातलय.म्हणुन वेगळी
चव येत असेल का?तुप जास्त घालायला हवे होते का?
अर्धा वाटी मुगडाळ रवा असेल तर २ मोठे डाव तुप हे प्रमाण बरोबर आहे का?
प्लीज मला मदत करा.

कुणाला पर्फेक्ट रसगुल्ले करता येतात का?
मी २ वेळा केले, पहिल्यान्दा पाकात घातल्यावर विरघळले...खिरीसारखे खाल्ले
दुसरयान्दा कोर्न फ्लोर चे प्रमाण वाढवले तर चव बिघडली.
रसअगुल्ल्याला म्हशीचे दूध चालत नाही का?

Pages