माजं काय चुकलं...?
येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?
मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं
टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं
पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं
उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं
जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!?
असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..
****************
पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.
माझी एक मैत्रीण भाकरी लाटायची
माझी एक मैत्रीण भाकरी लाटायची पोळपाटावर त्यामुळे तुकडे होत नाहीत. पण सवय आणि आपला अंदाज महत्त्वाचे. मी सवयीनी आता Vitroceramic वरपण भाकरी करते. गरम पाणी is must.
आता Vitroceramic वरपण>>> हे
आता Vitroceramic वरपण>>> हे मी आता Vitroceramic वरण वाचलं, म्हटलं हा कोणता आता नवीन प्रकार भाकरीचा?

आता जेन्युइन प्रश्न- भाकरी उलटून डायरेक्ट गॅसवर भाजताना भाकरीचा तवा बाजूला काढून भाजता, की दुसरा बर्नर चालू ठेवता? हाच प्रश्न फुलके करतानासाठी रीपीट. फुलके भाजण्याची जाळी असते ती चांगली असते का? as in टिकाऊ? ती भाकरी भाजताना वापरली तर चालेल का?
भाकरी थेट भाजताना, डाव्या
भाकरी थेट भाजताना, डाव्या हाताने (डावखोर्यानी उजव्या हाताने ) पकडीने तवा बाजूला करायचा, आणि अनुभवानुसार थेट उजव्या हाताने (डावखोर्यानी डाव्या हाताने ) वा चिमट्याने थेट गॅसवर भाकरी भाजायची. पण फूलक्यांपेक्षा भाकरी जाड असल्याने, धपकन ज्योतिवर टाकली तर गॅस विझू शकतो.
दोन बर्नर चालू ठेवले तर गॅस वाया जातो.
चूलीवर करताना, थोडे निखारे बाजूला काढून त्यावर भाकर्या शेकता येतात. एक निखार्यावर, एक तव्यावर आणि एक परातीत, अश्या तीन तीन भाकर्या, एकाचवेळी प्रोसेसमधे असतात.
मानिनि सिनेमात, रत्नमाला बाई, अरे संसार संसार, या गाण्यात भाकर्या करताना दाखवल्या आहेत. त्या प्रत्यक्षात देखील सुंदर भाकर्या करत असत, असे दूर्गा भागवतानी लिहिले आहे.
अश्विनी के |"हो एकाच बाजूला
अश्विनी के |"हो एकाच बाजूला लावायचं. जी बाजू तव्यावर टाकल्यावर पहिल्यांदा आपल्याला दिसते तिला लग्गेच पाणी लावायचे. आणि लावायचं म्हणजे जरासं नाही, चांगली चपचपीत दिसली पाहिजे भाकरी. मग खालची बाजू भाजेपर्यंत वरच्या पाण्याची वाफ होऊन भाकरी आतून शिजते. मग तवा बाजूला करुन गॅसवर ती बाजू भाजायची."
या तुझ्या पोस्ट प्रमाणे, पाणी लावलेली बाजु तव्यावर भाजायची नाही का? मी आत्तापर्यत ती बाजु तव्यावर भाजायची आणी मग ती गॅस वर भाजायची. गॅस वर भाजता.ना सुद्धा , आधी जी बाजु खाली असते ती भाजते आणी नन्तर ज्या बाजुला पाणी लावले आहे ती भाजते.
प्लीज confusion दुर करा आता. (आणि अनुस्वार कसा द्यायचा?)
अॅडमिन , लाजो च्या पोस्ट्ला अनुमोदन!!!
अनुस्वारासाठी कॅपीट्ल एम M
अनुस्वारासाठी कॅपीट्ल एम M वापरा. चांगली - chaaMgalee
धन्स रुनी !!
धन्स रुनी !!
पाणी लावलेली बाजूपण तव्यावर
पाणी लावलेली बाजूपण तव्यावर उलटून भाजायची ग अमया...थोडी शेकली गेली की मग गॅसवर भाजायची.
पूनम..फुलके करताना मी तरी तवा शेजारच्या बर्नरवर ठेऊन त्याच गॅसवर फुलका भाजते...फुलक्याची जाळी असून सुध्दा ती वापरावी वाटली नाही कधी एवढी उठाठेव कोण करेल?
एकीकडे ती जाळी गॅसवर एकीकडे तवा आणि फुलका लाटणं....मल्टीटास्कींगची सवय असेल तर जमेल हे पण
आमच्याकडे, दुधातली दशमी नावाचा प्रकार करतात तर ही करताना पीठ दुधात भिजवलेलं असतं पण ही तव्यावर टाकताना पीठाकडून तव्यावर टाकायची...आणि मग उलटून भाजायची. पाणी फिरवणं हा प्रकार फार कटकटीचा वाटत असेल तर भाकरी अशी पीठाच्या बाजूनी तव्यावर टाकावी आणि मग उलट्या बाजूने भाजावी...गोंधळ होणार नाही भेगा पडणार नाहित.
पूनम, मी सुद्धा श्यामली
पूनम, मी सुद्धा श्यामली म्हणते तसच करते. फुलका आणि भाकरी दोन्ही त्याच तव्याच्या गॅस वर टाकुन भाजते. हँडलवाला हार्डकोटींगचा तवा असल्याने पटकन बाजुला काढता येतो.
रच्याकने, लोखंडी तव्यावर केलेली थालीपिठं आणि भाकरी नॉन्स्टीक पेक्षा नक्किच जास्त खमंग असते.
धन्स ग शामली.. आता लवकरच
धन्स ग शामली.. आता लवकरच mission.भाकरी..
मी अशी भाजते भाकरी (हमखास
मी अशी भाजते भाकरी (हमखास फुगते..:)..)
१) खाली पीठ पसरून त्यावर खाली न चिकटू देता भाकरी थापायची.
२) थापताना खाली असलेली बाजू (अर्थात जास्त पीठ असलेली - ह्याला बाजू A म्हणू) तव्यावर वरती आली पाहिजे. ह्या वरच्या बाजूवर पटकन भरपूर अगदी कडेपर्यंत पाणी फिरवायचं, ते सुकायच्या आत भाकरी उलटायची.
३) आता बाजू B वर येईल जी थोडी कमी भाजली गेलेली असणार कारण A बाजुचं पाणी सुकायच्या आत आपण उलटली होती. (B कमीच भाजायची कारण नंतर ती थेट गॅस वर भाजली जाणारे)
३) आता अजूनही A बाजू खाली आहे, B बाजू वर आहे. A बाजू नीट पुरेशी भाजून घ्यायची.
४) मग थेट गॅस वर B बाजू भाजायची जी मगाशी कमी भाजलेली....आता भाकरी फुगते.
५) मी A बाजू नाही भाजत गॅस वर (ती तव्यावरच नीट भाजून घेते. क्वचित नीट भाजली गेली नसेल तर गॅस वर भाजते.
लाटून (तांदळाची उकड काढून), थापून (ज्वारीची) कशीही केली तरी अशीच भाजते.
भारतात तवा डाव्या हातात पकडून (किंवा शेजारच्या बंद गॅस वर ठेवून) त्याच चालू गॅसवर भाजते.
इकडे एका coil वर तवा नी एका coil वर जाळी ठेवते त्यावर भाजते कारण एकाच coil वर तवा उचलून जाळी मग जाळी उचलून तवा ठेवता येणार नाही. थेट coil वर भाजता येत नाही गॅस सारखं..लगेच चिकटून करपायला लागेल.
हेच तंत्र फुलक्यांचं आहे (पाणी फिरवायचा भाग सोडून)
हुश्श....
श्यामली, अमृता, मिती धन्स
श्यामली, अमृता, मिती धन्स
येस! मितीची प्रोसेस अचूक आहे.
येस! मितीची प्रोसेस अचूक आहे. भाकरी फुगण्यासाठी मधे किंचीत जाड आणि कडेने पातळ अशी हवी..माझी अजून जमत नाही.. पातळ झाली की उचलता येत नाही म्हणून थोडी जाडच ठेवते कडेने.. सवयीने जमेल.
Vitroceramic वरण . पण
Vitroceramic वरण
.
पण Vitroceramic ला भाकरी तव्यावरच भाजावी लागते ना. निखार्यावर कशी ठेवणार. पण कृती तिच.जी बाजु थापताना खाली असेल ती भाजताना वरती ठेऊन त्यावर पाणी फिरवायच. बाकी वरती सांगितलच आहे सगळ्यानी.
साबुदाण्याचा Brand बदलला आणि
साबुदाण्याचा Brand बदलला आणि खिचडी बिघडली.गिच्च गोळा झालाय..
चवीला चांगली लागतेय पण अगदीच बघवत नाहीये ..
पुढे काय करता येईल?
(आणि हो, हा प्रश्ण जर चुकीच्या ठिकाणी विचारला असेल, तर please सांगा, कारण मला माहितेय माझं काय चुकलं ते..:)..पुढे काय करायचं ते माहित नाही..)
साबुदाण्याची खिचडी फसल्यास
साबुदाण्याची खिचडी फसल्यास थोड्या तुपावर नेहमीप्रमाणे साबुदाण्याची खिचडी एकदोन वेळा परटुन घावी. प्रेशरकुकरमधील भांड्यात ही खिचडी घालून भंड्यावर झाकण ठेवा. कुकरच्या ३ शिट्ट्या घ्या. मऊ फुललेली अन मोकळी खिचडी तयार होईल.
सुतेजा मठकर , विलेपार्ले यांनी लोकसत्ताच्या चतुरा पुरवणीत दिलेली युक्ती
सखी, सॉरी टू से, साबुदाणा
सखी, सॉरी टू से, साबुदाणा फेकून दे..
मी ऑलमोस्ट २-३ महिने चांगली खिचडी खाल्ली नव्हती, चुकीचा ब्रँड व तो ही ४पाऊंड आणल्याने..
कित्येक प्रकारांनी साबुदाणा भिजवला पण व्यर्थ.
माझ्यासाठी लक्ष्मीच बरा..
खिचडी तर नाहीच होणार चांगली
खिचडी तर नाहीच होणार चांगली
पण वडे किंवा थालीपिठं ट्राय करुन बघ.
मी ही गेल्यावेळी आणलेला
मी ही गेल्यावेळी आणलेला साबुदाणा चांगला नाही. भिज्वल्यावर चांगला मोकळा झालेला पण चवीला खिचडी काहीतरीच झालेली आणि वर काळपट रंग. फेकावाच लागणार मलाही.
नवरा आणि मी शर्थीचे प्रयत्न
नवरा आणि मी शर्थीचे प्रयत्न करत होतो इथे साबुदाण्याची खिचडी मनासारखी व्हावी म्हणून. सगळे प्रयोग करून झाले..अगदी कुकर वगैरे सहित. पण देशात होते तशी नाही झाली.
एक शेवटचा उपाय म्हणून खालील प्रयोग केला आणि नेम लागला.
उद्याच्या ब्रेकफास्टसाठी खिचडी करायची असेल तर मी आज रात्रीच झोपण्याआधी साबुदाणा भिजवून (अगदी अंगाइतक्या जेमतेम पाण्यात) लगेच फ्रिजमध्ये टाकते. रात्रभर आत राहिल्याने काय होते कोण जाणे पण खिचडी चांगली होते हे नक्की!
करून पहा आणि मला सांगा. लगेच पेटंट घेऊन टाकते कशी
मी माझ्या सासूबाईंची पद्धत
मी माझ्या सासूबाईंची पद्धत वापरते.
तुपात जिरे मिरची वगैरे फोडणी झाली की साबुदाणा नुस्ता एकदा हलवून घ्यायचा त्यात. व सरळ मायक्रोवेव्हला ८-१० मिनिटं ठेवायचा. अधूनमधून हलवायचे. अतिशय मोकळी व मस्त खिचडी होते ! सा.खि प्रेमी नवरा फिदा!
खादाडमावशी, तुमची पद्दत करुन
खादाडमावशी, तुमची पद्दत करुन पाहीन नक्कीच.
बस्के, तुझीही.
गुजराथी लोक सा खि करण्यासाठी
गुजराथी लोक सा खि करण्यासाठी भिजवलेला साबुदाणा आधी वाफवून घेतात आणि मग फोडणीला टाकतात असं ऐकलंय.... कोणी करून पाहिलीय का तशी खिचडी?
प्रेशर कुकर ने फरक नाही पडला.
प्रेशर कुकर ने फरक नाही पडला. शेवटी थालीपिठं केली.
धन्यवाद सगळ्यांना मदत केल्याबद्दल.:)
सखी , हा साबुदाणा इतका चिकट
सखी , हा साबुदाणा इतका चिकट आहे, तर तुम्हाला त्याचा उपासाचा पिझा करून पाहता येईल्...पहा नवीन पाककृती..साबुदाणा तसाच टाकून द्यायचा नसेल तर. साबुदाणा कोरडा भाजून त्याचे पीठही वापरता येईल, काही कृतींमधे.
केकला तडे गेलेत.. दुष्काळी
केकला तडे गेलेत.. दुष्काळी भागातला केक वाटतोय. आता काय करता येइल??
तसाच खाऊन टाकावा किंवा
तसाच खाऊन टाकावा
किंवा काचेच्या छोट्या ग्लास मध्ये खाली फळे मग केक, कुठले सिरप्स , जॅम ने सजावट करुन द्यावे. म्हणजे मुळात केक कसा दिसतो ते कोणाला कळणार नाही.
लाजो यांची ही कॄती पण मस्त वाटतेय.
http://www.maayboli.com/node/8596
केकवर chocolate/peanut butter
केकवर chocolate/peanut butter spread लावुन वर थोडा सुकामेवा पेरा.
काहि केक्सना, तडे जाणेच
काहि केक्सना, तडे जाणेच अपेक्षित असते. खुपदा तयार मिक्सच्या पाकिटावर जे चित्र असते, त्याला तडा गेलेला असतो ( खरे तर तो केक नीट भाजला गेल्याची खूण असते )
त्याचा वरचा भाग धारदार सूरीने वा दोर्याने कापून टाकून, त्यावर टोपिंग / आईसिंग करता येते.
me Gits che Rasmalai mix
me Gits che Rasmalai mix vaparun Rasmalai keli ahe..2 packets vaparun 35 chya aaspas rasmalai kelya ahet..pan rasmalai jara hard zalya ahet..mausar an ivirghalnarya nahit..udya amchyakade guest yenar tyasathi banvun thevlya ahet..pan ata serve karavyasha vatat nahit..asha banlyamule..krupaya kahitari suchvave..kahi idea vaparun tyanna soft karata yetil ka?
गिट्स ची रसमलाई कडकच होते.
गिट्स ची रसमलाई कडकच होते. आता मऊ करता येईल असे वाटत नाही. ती वेगळी काढून त्या दूधात तयार गुलाबजाम टाकता येतील.
Pages