सप्रेम नमस्कार

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:47

patr342.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा छान उपक्रम! बघू प्रयत्न करतो. १० वी नंतर पहिल्यांदाच पत्रलेखनाचा प्रसंग.
मी इ-पत्र पाठवले तर चालेल का? पत्र पाठवण्याची शेवटची तारीख काय आहे?

बी, आपण लिहिलेले पत्र स्कॅन करुन किंवा प्रकाशचित्र काढुन आम्हाला पाठवायचे आहे. ते पत्र मायबोलीवर प्रसिद्ध करण्यात आले की अर्थातच वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध होइल.

रंगासेठ, पत्र हे आपल्या हस्ताक्षरातच असले पाहिजे. पत्र ई-पत्रासोबत जोडुन मराठीभाषा@मायबोली.कॉम वर पाठवायचे आहे.

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

मस्त उपक्रम Happy

मी मायबोलीवरच माझ्या मैत्रिणीला लिहीलेल एक पत्र प्रकाशित केल होत ललित मधे. तेच पुन्हा पाठवता येईल का?

(ह्याला म्हणतात आळशीपणा Wink )

कवे वर वाचल नाहीस का? पत्र हस्ताक्षरात हवय छापलेले/टाइप केलेले नकोय. त्यामुळे वही पेन घे आणि लिहायला घे सरळ तेच पत्र:)

सही!! यात तर भाग घेणारच नक्की.

पत्रलेखन बंद झाले, याचे नेहेमी वाईट वाटत आले आहे मला. Sad कुणाची कल्पना आहे ही? मनापासून अभिनंदन, आणि धन्यवादही.

आणखी एक म्हणजे, एकापेक्षा जास्त प्रवेशिका चालतील काय?

एकापेक्षा जास्त प्रवेशिका चालतील काय >> मलाही हाच प्रश्न पडलाय. आणखी एक प्रश्न पत्राला पानांची काही लिमीट आहे का. म्हण्जे जास्तीत जास्त किती पानी असावे?

एकापेक्षा जास्त प्रवेशिका चालतील का? ह्यावर संयोजन समिती निर्णय घेईल आणि लवकरच सर्वांना कळवण्यात येइल.

संयोजिका असे हवे आहे ना कारण सर्व स्त्रियाचं आहेत ना या संयुक्तामधे?

बरं मी नक्की पाठवतो जुने मला आलेले पत्र.

कविता, ही स्पर्धा नाही. त्यामुळे आधी प्रकाशित झालेले पत्र चालेल. परंतु पत्र आपल्या हस्ताक्षरात असले पाहिजे.

एका व्यक्तीच्या एकापेक्षा अधिक प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. आपले संपूर्ण नाव प्रवेशिकेसोबत पाठवणे अपेक्षित आहे. आपली इच्छा नसल्यास नाव प्रसिद्ध केले जाणार नाही.

हाताने लिहिलेली पण पत्रासारखी असलेली लग्नपत्रिका चालेल का? (अर्थातच संबंधित व्यक्तिंची परवानगी घेऊन). हस्ताक्षर माझेच आहे.

हस्ताक्षरात लिहिलेले पत्रलेखनाचा उत्तम नमुना असलेले कुठलेही पत्र चालेल. पत्रस्वरुपात लिहिलेली पत्रिका चालेल.

कुठल्या भावना व्यक्त असलेले पत्र चालेल? (हा सिरियस प्रश्ण आहे, चुकीचा वाटू शकतो कुणाला पण इलाज नाही) Happy

प्रेमभावना, राग, दुखः काय असलले चालेल?

मला हि आयडिया आवडली. मी मराठीतून पत्रं कधीच लिहिले नाही. एक चिट्ठी लिहिली होती आजीसाठी एकच वाक्य असलेली 'आजी,मी तुझ्या घरी येणार नाही, तु रागावतेस' व पाठवून दिली आईबरोबर. Happy

एक शंका...

ते हस्ताक्षर बद्द्ल अडचण आहे. कारण मी लिहिलेले जर इतर लोकांना वाचताच आले नाही तर? Happy मराठीत टाईप केले तर नाही का चालणार?

एका व्यक्तीची एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येइल >> हे एका कुटुंबातील एकच प्रवेशिका असेही आहे काय?

उदाहरणार्थ, मला आलेले वडिलांचे पत्र आणि मी माझ्या मित्राला पाठवलेले पत्र अशा दोन प्रवेशिका पाठवू शकतो काय?

एका व्यक्तीच्या एकापेक्षा अधिक प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. साजिरा, तुम्ही ही दोन्ही पत्रे पाठवु शकता.

मग हि फक्त हस्ताक्षराचे प्रदर्शन आहे काय?( हो..वरती मी वाचले पण पुन्हा कन्फर्म करतेय)

मग ग्रामर वगैरे चेक करणार का? की सरळसोट जी पत्रे येतील ती प्रसिद्ध करणार का? का निवड करणार हस्ताक्षरावरून? नक्की क्रायटेरिया काय आहे प्रदर्शनाचा?

Pages