सप्रेम नमस्कार

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:47

patr342.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनःस्विनी
मराठीतुन स्वहस्ते लिहिलेली पत्र हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
सार्वजनिक ठीकाणी मजकुर लिहिला जाणार असल्यामुळे त्याचे औचित्य बाळगावे एवढीच अपेक्षा आहे.
व्याकरण इत्यादी बघणार नाही.
जरुर भाग घ्या.

हो मी भाग घेणारच आहे. माझे हिंदी अक्षर चांगले आहे असे शाळेत म्हणत(मराठी न्हवते शाळेत म्हणून) मग मराठी सुद्धा असणारच. मजा येणार आहे. रविवारी पत्रे लिहिन.

ते औचित्य वगैरे स्माजले हो. त्याचे भान राहिलच. संयोजक तुम्ही खालीले प्रश्णाचे उत्तर दिले नाहीत,
>सरळसोट जी काही पत्रे येतील ती सर्वच्या सर्व प्रसिद्ध करणार का? का निवड करणार हस्ताक्षरावरून? नक्की क्रायटेरिया काय आहे निवडिचा वा प्रदर्शनाचा?

मनस्विनी,
सरसकट सगळी पत्र निवडली जातील. ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे तेव्हा हस्ताक्षर चांगलं/वाईट ह्यावर निवड अवलंबून रहाणार नाही'
तसंच वर म्हटल्याप्रमाणे हस्ताक्षर चांगलं आहे पण मजकुर योग्य नाही, अशा वेळी ते पत्र प्रदर्शित करता येणार नाही.

माझे वडील मुम्बैइ ला असताना मी त्याना पत्र लिहायचे...मी तेव्हा असेन ७-८ वर्षान्ची...पोस्टकार्डावर पत्र लिहुन झाले कि शेवट्ची ओळ असायची "माझ्या पत्राला हसू नये" Lol

जुन्या पत्रावळ्या शोधल्या तर माझ्याकडे भरपुर पत्रे सापडतील! त्याकाळी मी कार्बन कॉपी करुन ठेवायचो, त्यामुळे मी लिहीलेली पत्रे आहेतच, शिवाय थोडीफार मला आलेली पत्रे ही आहेत
प्रश्न येवढाच, की जाहीर मन्चावर त्यातिल कितीन्चा तपशील उघड करता येईल, वा येणार नाही हाच आहे! Happy
मागच्याच महिन्यात, माझ्या प्रथम मुलिचे बारशाचे आमन्त्रणाची झेरॉक्स सापडली, ती पाहून थोरली हरखुन गेली होती, काय चित्रे पाने फुले वगैरे मधे तेव्हान्च्या कुवतीनुसार चारोळीबद्ध आमन्त्रण होते!
जमल तर पाठविन ते चालणार असेल तर! Happy
इतरही पत्रे आहेत, खास करुन वाचकान्च्या पत्रव्यवहारात पाठवलेली व कधीच प्रसिद्ध न झालेली! ती चालतील का? कारण तिथे माझे नावगाव असणार नाही Proud
नातेवाईकान्ना पाठवलेली दोन चार झापाझापीची पत्रे देखिल आहेत... शोधावी लागतील!
केळकर सन्ग्रहालयाच्या कै. दिनकर केळकरान्च्या हस्ताक्षरातील त्यान्नी स्वतः मला दिलेले ओळखपत्र देखिल आहे! (पण त्यात माझे नाव गाव आहे, तेवढे पुसुन द्यावे लागेल, दिले तर चालेल काय?)
अगदीच धुन्डाळत गेलो वडिलान्च्या ट्रन्कापेट्या वगैरे, तर त्यान्चे काळातील अगणित पत्रे मिळतील्-आहेत. ती द्यावित काय?
एकुण एन्ट्र्यान्ना सन्ख्यात्मक मर्यादा किती?

मराठि हस्ताक्षराचाच विषय निघतो तर,
हस्ताक्षरावरुन स्वभाव ओळखणे, या विषयाचे ये देशीचे, पुणे निवासी आद्य प्रवर्तक, बहुधा पटवर्धन असे त्यान्चे नाव असावे (किती ही विस्मृती? Sad ), त्यान्नि मला १९८५ च्या आसपास पाठविलेले पोस्टकार्डावरील उत्तर देखिल आहे, प्रचण्ड शोधावे लागेल. बघु सापडते का!

लिंबुटिंबु,
आपल्या विपुल संग्रहातील (आपल्यामते)सर्वोत्कृष्ठ, सुस्पष्ट/ ठळक अक्षरातली पत्रे पाठवा.
धन्यवाद

सगळ्यात आधि ह्या उपक्रमासाठी तुमचे मनापासुन आभार आणि खुप कौतुक....
माझ्यासाठी पत्रलेखन हा प्रांत नवा नाही. मी अजुनही आठवड्याला निदान एक तरी पत्र लिहतोच. कमीतकमी पोस्टकार्ड तरी.....!

किती पत्र पाठवायची ह्यावर बंधन नाही असे कळाले त्यामुळे चार पत्र चालतील का ?
प्लीज प्लीज....

पत्रलेखक म्हणुन माझे नाव गुप्त वगैरे ठेवायची माझी काहिही अट नाही... (...उलट माझं नाव जाहिर कराच... Wink ) .....आणि आवडलं तर जाहिर वाचनही करा. Happy

पण चार पत्र घ्या राव माझी.......

माझे हिंदी अक्षर चांगले आहे असे शाळेत म्हणत(मराठी न्हवते शाळेत म्हणून) मग मराठी सुद्धा असणारच.

Proud

दोन्ही देवनागरीत लिहितात.

>>>> लिंबुटिंबु,
>>>> आपल्या विपुल संग्रहातील (आपल्यामते)सर्वोत्कृष्ठ, सुस्पष्ट/ ठळक अक्षरातली पत्रे पाठवा.
Uhoh
स्वल्पविराम हवाय मला तुमच्याकडून Proud कुठे टाकुन घेऊ???? Biggrin

आपल्या विपुल संग्रहातील (आपल्यामते) "," (इथे टाकु?) सर्वोत्कृष्ठ, सुस्पष्ट/ ठळक अक्षरातली पत्रे पाठवा.

की
आपल्या विपुल संग्रहातील"," (इथे टाकु?) (आपल्यामते)सर्वोत्कृष्ठ, सुस्पष्ट/ ठळक अक्षरातली पत्रे पाठवा.

Light 1
असो
शोध चालू आहे! Happy

मी माझी प्रवेशिका पाठवली आहे. माझ्या मुलीने मला लिहिलेले पत्र पाठवले आहे. (मी तिला लिहिलेले पाठवता येणार नाही कारण माझे गचाळ अक्षर तिला समजत नाही म्हणुन मी नेहमी टायपुन पाठवते).

१. प्रामुख्याने मराठीतच आहे. फक्त सुरवातीला आणि अध्येमध्ये इंग्रजीचा वापर आहे.
२. तिच्याच हस्ताक्षरात आहे. प्रवेशिकेवर तिचेच नाव लिहिले आहे.
३. नाव गुप्त ठेवण्याची आवश्यकता नाही.
४. नमुद केले आहे.
५. स्कॅन कॉपी आहे
६. बाकी ठिक.

प्रवेशिका स्विकारली जाईल अशी आशा आहे Happy

मस्त आहे या स्पर्धेची कल्पना.

मोबाइल आणि नेट आल्यानंतर पत्रव्यवहार बंद झालेज याचे फ़ार दु:ख वाटते.आधी खूप लिहीली आहेत पत्रे... ..सध्या त्याच्या कॊपीज मिळणार नाहीत.
पण तरीही नविन एखादे लिहायचा प्रयत्न करणार...नक्की! Happy

माझ्या दोन प्रवेशिका आत्ताच मेल मधुन लागोपाठ पाठवल्या आहेत. Happy
कृपया बघुन मिळाल्यात का व योग्य आहेत का ते कळवावे! Happy

संयोजक
सप्रेम नमस्कार.
मी दोन प्रवेशिका पाठवल्या आहेत. . माझ्या वडीलांना लिहिलेले पत्र . आणि एक प्रेमपत्र आहे.
१. दोन्ही मराठीतच आहे.
२. माझ्याच हस्ताक्षरात आहे. प्रवेशि्का बासुरी या नावानेच घ्या.
३. स्कॅन कॉपी आहे.परंतू ते ३ पानी व २ पानी असे असल्याने पानांवर नंबर टाकले आहेत
४. बाकी ठिक.काही अडचण वाटल्यास संपर्क साधावा.
५.प्रवेशिका स्विकारली जाईल अशी आशा आहे ..:)
बासुरी

कै.दिनकर केळकरान्चे स्वहस्ताक्षरातील पत्र मला अजुनही सापडत नाहीये Sad
पण शोधताना, इसवीसन १९४४-४५ साली वयाचे २२/२३ व्या वर्षी माझे वडीलान्नी स्वहस्ताक्षरात लिहीलेला "त्रैभाषिक व्याकरण (संस्कृत मराठी इंग्रजी)" या प्रबन्धाचे हस्तलिखित सापडले, त्यातिल मोजकी पाने आज पाठवतो (खर तर आत्ताच इथेच एखादे पान टाकावे असा मोह होतोय, पण टाळतो)
आशा आहे की असे पत्र स्वरुपात नसलेले हस्तलिखित चालू शकेल Happy सन्योजक, चालणार नसेल, तर पाठवायचे आधीच कळवा.
(खर तर पानान्च्या केवळ इमेजेस देण्यापेक्षा , त्यात (त्याकाळी) चर्चिलेला काही विषय, खास करुन तत्कालीक व मागिल सव्वशे वर्षातील संस्कृत भाषेच्या अधोगतीची कारणमिमांसा इत्यादिक मजकुर, इथे स्वतन्त्र बीबी उघडून जसाच्च्या तसा लिहावा असे वाटते, ते वाचताना जाणवते, की त्या काळी इन्ग्रजान्च्या अधिपत्याखाली झालेली गळचेपी अन आता स्वतन्त्र भारतात होऊ लागलेली मराठीची अवस्था यात फार फरक नाहीये, तो लेख मूळातूनच वाचण्यासारखा आहे, व मराठी भाषा दिनानिमित्त औचित्यपूर्ण ठरेल असे मला वाटते
जर सन्योजकान्ची परवानगी असेल तर या भाषादिनाच्या निमित्ताने मी हे करु इच्छितो.)

लिंबूटिंबू, आपली प्रवेशिका मिळाली. पण प्रदर्शन हे पत्रलेखनाचं असणार आहे तेव्हा आमच्याकडे पत्र पाठवणं अपेक्षित आहे.तुमचं हस्तलिखित सगळ्यांना वाचता यावं ह्याकरता तुम्ही वेगळा बीबी सुरु करु शकता. मराठी भाषा दिवसांतर्गत आपली प्रवेशिका स्विकारली जाणार नाही. धन्यवाद.

आज अंतिम तारीखच बघायला आले. २० फेब केलीत बरे केले. दिवस येतो जातो, जरा निवांत पणे पत्र लिहायचा मुहुर्त मिळेल तर शप्पथ. Happy

आयला, त्यातली ४ व ५ या पानान्वरील कमलाबाई देशपाण्डे यान्ची १४ मार्च, १९४५ रोजीची स्वहस्ताक्षरातील "प्रस्तावना" हे सम्भाव्य वाचकांस लिहिलेले पत्रच आहे असे मानत नाही का तुम्ही? मी तरी तसेच मानत होतो बुवा आजवर! Wink
म्हणून तर एकाहत्तर पानी प्रबन्धातील, संस्कृत-मराठी-इन्ग्रजी व्याकरणाबाबतची मूळ प्रबन्धविषयाची पाने वगळून केवळ सुरवातीची प्रमेय-प्रस्तावना-विषयप्रवेश येवढीच पाने पाठवली होती (नैतकैबै मेलं? आख्खा प्रबन्धच नस्ता का पाठवला? Proud ) असो. पुन्हा कधीतरी
[तोवर तुमच्या "नियमान्च्या सीमाभिन्ती तुम्हालाच लखलाभ", त्यानियमांनुसार खर तर मग ताजी ताजीच पत्रे हवित, मी उगाचच ट्रन्कापेट्याकपाटं धुन्डाळत बसलो Sad ]

Pages