सप्रेम नमस्कार

Submitted by संयोजक on 25 January, 2010 - 15:47

patr342.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतीम तारीख: २० फेब्रुवारी २०१०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी सुमारे पाच पत्र पाठवली आहेत....
पोच मिळु शकेल काय ? Happy

मजा आली....
ही पत्र शोधता शोधता खुप जुनी आणि छन पत्र सापडली... आठवणीत मस्त रमता आलं....
तुमचे मनापासुन आभार...

चांगला उपक्रम आहे.
माझ्या मते या स्पर्धेकरता लोकं " इंग्रजी ते मराठी " हे शब्दकोष चाळतील. मस्करी करतोय , हलके घ्या.
ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा...:स्मित:

प्रीति, आपली प्रवेशिका मिळाली आहे.
धुंद रवी, मेलमध्ये तुम्ही पाच पत्रांची लिस्ट दिलेली आहे आणि अटॅचमेंटस ४ च आहेत. एक पाठवायची राहिलीये का?
धन्यवाद.

प्रीति, आपण परत पाठवलेल्या दोन्ही प्रवेशिका मिळाल्या.

बासुरी, आपल्या दोन्ही प्रवेशिका मिळाल्या.

वनिता, आपल्या प्रवेशिकांचे स्वागत आहे. हा खुला उपक्रम आहे तेव्हा कुणाची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही.

*** प्रवेशिका पाठवायची अंतिम तारीख आहे २० फेब्रुवारी २०१० ***

धन्यवाद...! आपणच लिहीलेली पत्रे द्यायची का? माझ्या मैत्रीणीने पण खुप सुंदर सुंदर पत्र लिहिली आहेत! एक एक पत्र म्हणजे निबंध असायचा ४-५ पानांचा!:P

अर्थात कोणीही असो...वडीलांनी सासरी गेलेल्या मुलीला( म्हणजे मला) , अशी पत्र चालतील का?

अरे वा ! वा! मजा येईल वाचायला .
कुणीही लिहा , कसही लिहा , फक्त आम्हाला वाचता येतील अशा अक्षरात लिहा , थोडक्यात कुत्र्याचा पाय मांजराला अन मांजराचा पाय कुत्र्याला करु नका Proud Light 1

कुणीही लिहा , कसही लिहा , फक्त आम्हाला वाचता येतील अशा अक्षरात लिहा , थोडक्यात कुत्र्याचा पाय मांजराला अन मांजराचा पाय कुत्र्याला करु नका >>>>>>>

मी पण एक लिहितो आहे. शनिवारी अपलोड करु शकलो तर ठिक किंवा सोमवारी दिला तर चालेल का? (वीकेंड ला मेल रुम बंद असल्याने अपलोड करु शकेल कि नाही शंका आहे.)

मला वाटत की मुदत वाढवावी
जे देशा/परदेशात नोकरदार लोक आहेत त्यान्ना कदाचित रविवार सुट्टीचा उपयोगी होईल व सोमवारि अपलोड करु शकतील, अशा कितीशा एण्ट्री येतिल हा विषय वेगळा, तसेच अशी मुदतवाढ देऊन मूळ नियमास बगल दिली जाउ शकते ही "चलता है चि " जाणीव वाढणे अनिष्टच, तरीही, यावेळी थोडी नव्हे तर जास्तीत जास्त मुदतवाढ द्यावी असे वाटते कारण,
बरेच लोक, स्वदेश्/स्वघरापासून खूप दूर आहेत, सन्ग्रहातील लिखित पत्रे स्कॅन करणे आणी पाठविणे इतके मला जसे सोपे होते, तसे त्यांस नक्कीच असणार नाही.
जी लहान मुले असतील, त्यान्चेकडुन करवुन घेणे किति अवघड असते ते आपण जाणताच,
अपेक्षा अशी की, उद्यापासून पुढे येतिल त्या स्विकारू, पण जमतील तेवढ्याच प्रदर्शित करु २७ ला, असे धोरण असू द्यावे.
मात्र नियमान्ची अनिवार्यता, पुढील वर्षापासुन पुढे कडक करीत जाणे योग्य ठरेल Happy

हे बरे केलेत. मी बाहेर आहे कामानिम्मित्त पुन्हा घरी आजच रात्री जाईन. एक पत्र आहे ते पाठवेन

सॉरी संयोजक, मी ईमेल पाहिले नाही. इथे मी प्रश्न विचारलेला पण उत्तर मिळाले नव्हते म्हणून पुन्हा विचारले.
धन्यवाद परत एकदा!

Pages