पुणे: लालु जीटीजी- रविवार १७ जानेवारी २०१०

Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10

मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्‍यावर येणार आहेत. Happy भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन. Happy

जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)

जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु . Happy म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालूने काय संक्रांतीचं वाण म्हणून झिपलॉकच्या पिशव्या वाटल्या की काय..>> मंजे कसली हुश्शार गं तू ..अगदी बरोब्बर ओळखलस.. Happy

गटगला अभिनव संक्रांत हळदीकुंकू समस्त पुरुषांनी करवून घेतले. लालूने अगदी आठवणीने माझ्यासाठी आणलेल्या झिपलॉकच्या पिशव्या सगळ्यांनी पळवल्या Sad मीनू तर काय माझी समैच. त्यामुळे माझ्या सर्व गोष्टींवर तिचा हक्क आहेच, सर्वाधिक पिशव्या तिच्याकडेच गेल्या. तात्पर्य- पुण्यात झिपलॉकच्या चांगल्या पिशव्या मिळत नाहीत हे परत एकदा सिद्ध झाले. माझी स्टँडींग ऑर्डर कायम आहे! Proud

बाकी गटगला धमाल आली. यावेळी व्हेन्यू बदलला ते बरं झालं कारेधक्ष. वैशालीची गर्दी नव्हती, त्यामुळे उठाउठा केलं नाही कोणी.. निवांत बसता आलं.

पुढच्या जिटीजीच्या संकल्पनेबद्दल काही बोलला नाहीस साजिरा!!

संक्रांतीचं वाण सगळ्या बाप्यांनी लुटलं हो.. आणि मी एकही झिप्लॉक घेतली नाही म्हणजे मुंबईत मिळतात हे सिद्ध झाले.. Happy

हा हा हा!

पहाटे ९ ला जीटीजी ठेवुनही जीएस आले आहेत हे कळताच मला इथे दुपारी साडे तीनला ही जांभई आली होती Happy

******************************

आताच इथे एक वोलोंगोंग जीटीजी संपन्न झाला!

दुबई स्थित मायबोलीकरीन सौ. अनिता ह्या इथे काही अभ्यासा निमित्त आल्या होत्या. त्यांची भेट झाली. दुबईला आमच्या वुलोंगोंग विद्यापीठाचे कॅम्पस आहे. त्या तिथे पी एच डी करतात.

छान वाटले!

लोक हो मला लालूचा मोबाइल नंबर पाठ्वा पार्सल कुरीअर करायचे आहे त्याला लागते. विपूत द्या. मी लगेच डीलीट करेन.

लालुंचा हॅप्पी बड्डे केक कापुन साजरा करण्यात आला.
गटगला मजा आली, राजमलाईचा आस्वाद घेता आला.
माझ्या टेबलावर दोन पिल्लं बसलेली होती तोवर काहीच घोळ नव्हता.
पण इतरानी (मोठी माणसं) येऊन पिल्यानी न केलेली कामं पुर्ण केलीत.
पाण्याची ग्लासं परत परत उलटवलित, नंतर पाणी पुस टेबल साफ करं चालुच होतं.
"माझ्या नवर्‍यासाठी केक ठेवा" हा नारा खुप गाजला.
साजिर्‍यानी माझ्यासाठी राखुन ठेवलेला प्रश्न राखुनच ठेवला.
Wine Partyचं Planning चालु होतं, ठरलच तर कळवा बरं का.
आता फोटु पण टाका.

Wild Partyचं Planning चालु होतं<<
मधुकरा, तुझा गैरसमज झालाय...
आम्ही Wine GTG चं ठरवत होतो.
Wine पिऊन Wild कसं होता येईल?
त्यासाठी मोहाची नको का? Happy

नवर्‍यासाठी नाही, मिस्टरांसाठी/ यजमानांसाठी/ इकडच्या स्वारीसाठी Blush

मनिषने पाण्याचे ग्लास उपडे केल्याशिवाय हल्ली कोणत्याही गटगची सुरूवातच होत नाही Rofl

तर ठरताक्षणी ते सर्वांना कळवलं जाईलच... फक्त मद्यपि जिटीजी माबोवर जाहीर कळवलेलं चालणारे की नाही हे प्रशासन ठरवेल. Happy

वाइन ही वाइन असते. दारू नाय काय. आद्याध्यक्षांचा अनुभव कुठेतरी कमी पडतो तो असा. Proud

मधुकर तो प्रश्न मीनूबाईंचा होता बरं का. शेवटपर्यंत तुला विचारलाच नाही तिने. पण पुढल्या वेळेस नक्की विचारेन म्हणाली. बाकी, तुझे पहिले जीटीजी ना? मग वृत्तांत मोठ्ठा लिहिला पायजे. (आद्याध्यक्षांच्या) हुकूमावरून.

बाकी, तुझे पहिले जीटीजी ना? मग वृत्तांत मोठ्ठा लिहिला पायजे. (आद्याध्यक्षांच्या) हुकूमावरून.<<
मोदक मोदक!!

बर आपण झालेल्या जिटीजीबद्दलच इथे बोलूया काय?

फुडचं फुडं

Pages