पुणे: लालु जीटीजी- रविवार १७ जानेवारी २०१०

Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10

मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्‍यावर येणार आहेत. Happy भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन. Happy

जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:

तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)

जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु . Happy म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिषने पाण्याचे ग्लास उपडे केल्याशिवाय हल्ली कोणत्याही गटगची सुरूवातच होत नाही >> lol.gif

माझे दुसरेच तर GTG होते. मागच्यावेळी माझ्या समोरचा ग्लास पडला होता. तोही (बहुतेक)मिनूनं पाडला होता.
चॉकोलेटस् वाचवायच्या नादात पाण्याचा ग्लास पडला. Happy

GTG मस्त झाले... GTG चं नाव 'लालूचं झिपलॉकमय GTG' असं केलं तरी चालू शकेल Happy साजिर्‍याने लालूची मुलाखत घ्यायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे नेहमीचे यशस्वी(?) विषय यावेळी अजिबात निघाले नाहित. laughing.gif ठिकाण बदलल्यामुळं घाइ नाही झाली. सगळ्यांचं खाउन झाल्यावर हिम्सकूलनी सर्वांना बर्फी वाटली. मधूकरनी पुढच्या GTG ला सगळ्यांसाठी राजमलाइ आणायचं कबूल केलंय.
फोटो टाका कोणितरी प्लीज..

लालूचं झिपलॉकमय GTG' >> म्हणजे मुंबई गटगला बर्‍याच माबोकरणी हजर असतील तर Wink

नाही टाकणार. मुळीच नाही टाकणार.
माबो जिटीजी चे फोटो जे हजर असतात त्यांनाच पाठवले जातात. सार्वजनिकरित्या टाकायचे नसतात असा नियम आहे.

अहो अनिल्,जरा दमानं घ्या की राव.. पुढच्या जीटीजीला उपस्थित रहा.. म्हणजे तुमच्या सगळ्या शंकांच निरसन होईल .. :).. बायदवे,जीटीजी हा गेटटुगेदर या शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे..

नीरजा,वाईन म्हणजे दारू नव्हे काय


>>

या प्रश्नात एका स्वतंत्र बीबी चा ऐवज आहे महाराजा ! Proud

अरे आता हे "जी टी जी " म्हण्जे काय ?


>>>

'गागोंलासु'....

नवर्‍यासाठी नाही, मिस्टरांसाठी/ यजमानांसाठी/ इकडच्या स्वारीसाठी
>>
आमचं ध्यान, सलम्याके अब्बा, आमचं पाटील, ह्ये र्हायलंच वाइच...

नी.... Lol

एका "बी" नं ....दुसर्या "बी" ला कशाला ओळखायचं ...तशी त्याची उन्ची फक्त अर्धा फूट ज्यास्त आहे ..हा

तोही (बहुतेक)मिनूनं पाडला होता >> ए ऽऽ तो काशीनं पाडला होता .. वाट्टेल ते बोलू नकोस. ऐकून नाय घेनार हां .. मी स्त्रीवादी महीला आहे थेट सर्गात जाईन तक्रार करायला Proud

मीनू..
दानेदानेपर लिखा है खानेवालेका नाम!!!
राजमलाई हे अप्रतिम प्रकरण असतं.. जे पूनमसाठी आणलेलं असून साजिर्‍याने उचललं आणि अर्धं स्वतः खाऊन अर्धं मला देऊन टाकलं... मी ही खाऊन टाकलं.. Happy

अरे काय हे...... मी हे सगळ आज वाचते आहे.......मला सांगीतल का नाही कुणी????? (भोकाड पसरलेला चेहरा)
मला जमले असते यायला...:(
मिसले मी

च्च. लहाणपणी असायची ती राजमलाई भन्नाटच होती. आता कायतरी वेगळीच लागली. म्हणजे वाईट नाही, पण चव तशी नव्हती. Sad

जाऊ द्या. मॅनेजमेंट बदलले असेल त्यांचे. Proud आपले नाही का, कार्याध्यक्ष एकदाच बदलून पाहिले, तर केदार जीटीजी किती भारी झाले होते!

मीनूबाई तुमी बी लिवा की वृत्तांत. गंधर्वात त्या मधुकराला प्रश्न विचारीत होता. आता हितं पण प्रश्नच विचारायलाय.

काशी, कुणीच कुणाला सांगितलं नव्हतं. इथं पब्लिक बीबी होता, तोच वाचून आलेलो आम्ही तर. Proud

Pages