Submitted by मयूरेश on 11 January, 2010 - 00:10
मंडळी,
मायबोलीवरील एक प्रसिध्द उसगावकर व्यक्तीमत्व लालु उर्फ शर्मिला लवकरच भारतात दोन आठवड्यांच्या धावत्या दौर्यावर येणार आहेत.
भारतात असताना पुण्यात त्यांचा दोन दिवस मुक्काम असेल. या मुक्कामादरम्यान त्यांना पुणेकर मायबोलीकरांना भेटायची इच्छा आहे. म्हणुन हे जीटीजी आयोजित करण्यात आले आहे. तेव्हा पुणेकर मायबोलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाल्वाकांच्या भेटीचा लाभ घ्यावा असे पुणेकर मायबोलीकरांना जाहीर आवाहन.
जीटीजी संदर्भातली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे:
तारीखः- १७ जानेवारी २०१०
वारः-रविवार
वेळः- सकाळी साडेआठ
स्थळ:- हॉटेल गंधर्व (बालगंधर्व रंगमंदिरासमोर)
जे कोणी येणार असतील त्यांनी लगेच आपापला हात वर करा पाहु .
म्हणजे त्यानुसार हॉटेलमध्ये रविवारसाठी आसनसंख्या आधीच सांगुन ठेवता येईल..
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी टेली-सहभागी होणार!
मी टेली-सहभागी होणार!
मयुरेश, लिस्ट ठेवतोयस ना वर
मयुरेश,
लिस्ट ठेवतोयस ना वर केलेल्या हातांची... गंधर्व मधे तेवढ्या सीटस मिळाल्या पाहिजेत हं!!
फचिन्,धन्यवाद रे ...
फचिन्,धन्यवाद रे ...
नी,काळजी करू नकोस.. ऑल गंधर्व इज अवर.
चंप्या, टेली-सहभागाच्या वेळी गंधर्वमधल्या निरनिराळ्या पदार्थांचा वास आला तर त्रास करून घेऊ नकोस रे..
त्रास करून घेऊ नकोस रे.. >>>
त्रास करून घेऊ नकोस रे.. >>> तु तिकडुन नरसाळे लाव, इकडे मी तोंड उघडे ठेवतो
तंत्रज्ञानात अजुन खुप प्रगती बाकी आहे
इतके लोक आय्टी त काय काम करते हेत मग?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीची वाट
तंत्रज्ञानाच्या प्रगतीची वाट पाहण्यापेक्षा चंपक, तू तुझा मोबाईल इकडे कुरीयर कर आम्ही सांबार आणि चटणीत बुडवून परत पाठवतो.. तू घरी इडली/डोशाबरोबर 'तोंडी' लाव.
व्हॉट अॅन आयडिया सर्जी.. 
व्हॉट अॅन आयडिया सर्जी..>>>
व्हॉट अॅन आयडिया सर्जी..>>> आशु,अगदी...
मी पन येनार .........
मी पन येनार .........
>>ऑल गंधर्व इज अवर. ऑल गंधर्व
>>ऑल गंधर्व इज अवर.
ऑल गंधर्व इज अवर वावर !!
>>व्हॉट अॅन आयडिया सर्जी
बिल्कूल ! बिल्कूल !!
ऑल गंधर्व इज अवर वावर !! ...
ऑल गंधर्व इज अवर वावर !! ... >>>नंद्या,
मी पन येनार ......... >>
मी पन येनार .........
>> ह्याला कुठं तरी न्या
आजोबांना कुठं न्यायचं आता
आजोबांना कुठं न्यायचं आता चंपका!!
चला..बर्यापैकी टाळकी जमणार
चला..बर्यापैकी टाळकी जमणार जीटीजीला असं दिसतय.. जोरात होणार म्हणजे गटग...
लाल्वाक्का,चॉकोलेटस लाना मत भुलना...
उद्या सकाळी भेटुयात मग मंडळी
उद्या सकाळी भेटुयात मग मंडळी गटगला....
मी पण येऊ का ? तुमच्या GTG
मी पण येऊ का ?
तुमच्या GTG अनेक शुभेच्छा !
मी येणार.
मी येणार.
जी एस... थापा मारू नको हं
जी एस... थापा मारू नको हं नुसत्या... नक्की ये!
अरे मला कुणीतरी एसएमएस नाही
अरे मला कुणीतरी एसएमएस नाही का करुन सांगायचं.. मी आत्ताच पुण्यातून परत आलो.. आज थांबलो असतो आणि उद्या सकाळी परत आलो असतो
माबोवर नियमितपणे यायला जमत नाय राव.. 
कुठे नेताय मला आता ????????
कुठे नेताय मला आता ????????
टण्या, आता मुंबईला ये लालूला
टण्या, आता मुंबईला ये लालूला भेटायला
जिटिजी पार पडलं का? वृतांत
जिटिजी पार पडलं का? वृतांत येऊ दया.
कसं झालं गटग ? लालूला हॅपी
कसं झालं गटग ? लालूला हॅपी बड्डे केलं का?
कुठे नेताय मला आता ????????
कुठे नेताय मला आता ???????? >> कुठ्ठे नेण्याच्या लायकीचा नाहीच्चेस तू तसाही..

गटग चांगला झाला .. हे लिहायचंच राहीलं
सगळे मुम्बैचे ......काही
सगळे मुम्बैचे ......काही उप्योग नाही ............
जीटीजी मस्त झालं... लालुहस्ते
जीटीजी मस्त झालं... लालुहस्ते मायबोलीकरांनी आणलेला केक कापुन `हॅपीबर्थडे टू लालु' च्या गजरात तिचा आदल्या दिवशीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.. मग लालुने चॉकोलेटस वाटप केलं आणि आम्हाला मस्त ट्रिटही दिली :).. भरपुर गप्पा आणि गंधर्वमधील खाद्यपदार्थांवर ताव मारत जीटीजी कम लालु वाढदिवस जोरात साजरा झाला. :).
जीटीजीला उपस्थित मायबोलीकर पुढीलप्रमाणे: दस्तुरखुद्द लाल्वाक्का,मयूरेश, अरुण,पूनमवहिनी,मिल्या,मीन्वाज्जी,अतल्या,यशवर्धन,नीधप,जीएस,हिम्सकुल,मधुकर,साजिरा,वैभव जोशी,देवा,मनीष,सँडी आणि दोन ज्युनिअर मायबोलीकर नचिकेत आणि सिध्दार्थ.. शिवाय कार्यक्रम संपल्यावर काही उरल्यासुरल्या मायबोलीकरांना भेटलेली मुंबईकर मायबोलीकर साधना.. आणि गटगच्या वेळी टेलीस्वरूपात उपस्थित असलेला चंपक.
तर असा हा लालु पुणे गटगचा थोड्क्यात आढावा...
?? ही कसली मतांची पिंक
??
ही कसली मतांची पिंक टाकतायत हे जिकडे तिकडे. पुण्याच्या जिटीजी ला सगळे मुंबईचे होते हा शोध कुठून लावला यांनी?
जिटीजी उत्तम झालं... धमाल केली.
केक खाल्ला (इतर अनेक गोष्टींबरोबरच!!)
टण्या उगाच बोंब मारू नकोस.
टण्या उगाच बोंब मारू नकोस. एसेमेस किती करावेत तुला? एकाचेही उत्तर येत नाही. मिळत नाहीत का?
लालू जीटीजी अतिशय उत्साहात संपन्न झाले. यात खालील मायबोलीकरांनी हजेरी लावली.
लालू, मयुरेश, अरूण, पूनम, मिल्या, नचिकेत, मीनू, अतल्या, सिद्धार्थ, देवा, नीरजा, यशवर्धन, जीएस, मधुकर, हिम्सकुल, साजिरा, वैभव जोशी, मनीष, सँडी (कुणी राहिले असेल तर अॅड करा प्लीज).
चंपक आणि आशूडी यांनी फोनवरून हजेरी लावली.
लालूच्या वाढदिवसानिमित्त टाळ्यांच्या गजरात केक कापण्यात आला. त्याबदल्यात तिने बहुचर्चित झिपलॉकपिशव्या आणि चॉकलेटे सर्वांना वाटली.
त्यानंतर भरपूर खाणे आणि मस्त गप्पा झाल्या. विशेष म्हणजे यावेळी 'आयडीज आणि ड्युआयडीज' हे नेहेमीचे यशस्वी विषय निघाले नाहीत. शिवाय कुठच्याही प्रकारचे गॉसिप झाले नाही. देव करो आणि यापुढचे सर्व जीटीजी असेच पार पडोत.
झाला माझा वृत्तांत. आता इतरांनी आपापले लिहावेत ही नम्र विनंती.
अर्रर्र. आद्याध्यक्षांनी माझ्या आधीच नंबर लावला वाटाते. असू देत.
ओके ....आम्ही मिस् केल
ओके ....आम्ही मिस् केल ....माहित नव्ह्त ना !
मयुरेश, टेलीस्वरूपात उपस्थित
मयुरेश, टेलीस्वरूपात उपस्थित असलेली मी सांगितली नाही का तुला साजिरा आणि पूनमने?

लालू , तू तरी सांग गं.. आणि माझ्याकडून उशीराने वादिहाशु!
लालूने काय संक्रांतीचं वाण
लालूने काय संक्रांतीचं वाण म्हणून झिपलॉकच्या पिशव्या वाटल्या की काय
साजीरा .....धन्यवाद !
साजीरा .....धन्यवाद ! काअॅमेन्टरी बद्द्ल
Pages