उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.

कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्‍यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्‍या लोकांसाठी!

काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील Happy
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्‍या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत. Happy
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.

उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्‍हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीप्रमाणे मायबोलीवर जी.एस. अन अश्विनीमामी हे दोन प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांनी मार्गदर्शन करावे.

सुंदर संकल्पना ,
माझ्याही मनात पुढे चालुन व्यवसाय करावा अशी सुप्त इच्छा आहे , कदाचीत सगळ्या जाणकारांची मतं / अनुभव वाचुन भविष्यात योग्य ती दिशा मिळेल असा विश्वास वाटतो .

चंपक
अरे तू पण एक यशस्वी उद्योजक आहेसच ना, दूग्ध व्यवसायातला. चांगली कल्पना आहे, अश्या सगळ्या यशस्वी लोकांनी मार्गदर्शन दिले तर पुढच्या उद्योजकांच्या पिढीला/बॅचला त्याचा फायदा होईल..

शेतीत बरेच गच्चु खाऊन झाल्यावर लक्षात आले की शेती करुन सन्मानाने जगणे कठीन आहे. मग शेतीमाल प्रक्रिया उद्योगाची निवड करुन काम सुरु केले. सध्या झक्कास चाललेय. काम मर्यादित असले तरी यशस्वी पथावर आहे.

इथे बर्‍याच गोष्टींची सरमिसळ होते आहे. नंतर सापडायला अवघड जाईल.

१. कृपया कुठल्याही व्यवसायाबद्दल असणारी माहिती व्यवसाय मार्गदर्शन इथे द्यावी/विचारावी. उदा. इमु पालन असा धागा करून इथल्या प्रतिक्रिया तिथे लिहाव्या. म्हणजे सगळ्या एकत्र राहतील.

२. मराठी उद्योजकाना एकत्र नेटवर्किंग करता यावे म्हणून नवीन ग्रूप सुरु करण्याचे काम सुरु आहे. अशा उपक्रमात विश्वासाची गरज असते त्यामुळे या ग्रूपमधे कुणाला कसा प्रवेश देता येईल याबद्दल काही धोरणे ठरवत आहोत. उदा. ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याला आपले खरे नाव मायबोलीवर लपवायची गरज नाही त्यामुळे व्यक्तिरेखेत खरे नाव असेल आणि ते पडताळून पहायचे निकष पूर्ण केले आहेत अशानाच त्यात प्रवेश मिळेल.

व्यक्तिरेखेत खरे नाव असेल आणि ते पडताळून पहायचे निकष पूर्ण केले आहेत अशानाच त्यात प्रवेश मिळेल.>> मला कळला नाही हा मुद्दा. म्हणजे मी ईथे 'भ्रमर' हा आयडी घेऊ शकतो पण व्यक्तीरेखेमधे माझं खर नाव असणं अपेक्षित आहे कां?

सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो. आम्ही 'सिनर्जी इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल कोर्सेस' नावाची संस्था सुरू केली आहे. त्यात 'Certificate Course in Direct Taxes', 'Certificate Course in Indirect Taxes', 'Professional Accountancy Course' आणि 'Fundamentals of Business' हे मी डेव्हलप केलेले सर्टिफिकेट कोर्स आणि 'Finance', 'Accountancy', 'Law', 'Company Secretary', 'Personality Development' आणि 'Management' या विषयांमध्ये कोचिंग क्लासेस चालवण्याचा बेत आहे.

यामध्ये सहभागी होण्याची (Faculty or Franchisee) कुणा मा.बो. करांची इच्छा असेल किंवा कुणी मार्गदर्शन करू शकत असेल तर त्यांचे स्वागत आहे.

कृपाभिलाषी,

शरद

हम्म.
चंपक उत्तम उपक्रम.
एक व्यवसाय आहे माझ्या मनात जो उत्तमरित्या चालेल. तो म्हणजे ट्रान्स्पोर्ट बिजनेस.
शक्यतो मालवाहतुक नकोच. कार रेंटल किंवा क्वालिस, इनोव्हा, तवेरा, सुमो अशा गाड्या रेंटलचा बिजनेस.
फक्त ह्या व्यवसायातील खाचाखोचा माहिती नाहियेत आणि सध्या दुसर्‍या ठिकाणी आर्थिक जबाबदार्‍या असल्याने ही रिस्क घेवु शकत नाहिये. पण हा व्यवसाय खुप उत्तम पैसा मिळवुन देणारा असु शकतो.
जर कोणाला ह्याविषयी काहि माहिती असेल तर नक्की लिहा.

मला नक्कीच सहभागी व्हायला आवडेल. मी प्रोफेशनल (कंपनी सेक्रेटरी) आहे आणि एम्.बी.ए. आहे त्यामुळे ग्रूपचा मला आणि कदाचित माझा ग्रूपला फायदाच होईल. Happy

शरद

मी एक लहानसा उद्योजक आहे, मला देखिल आवडेल सहभागी व्हायला. जुन्या माबोवर अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता, पण कुठ माशी शिंकली माहित नाही असो. मी मुंबईत आहे. पुढची रुपरेषा कळवा. धन्यवाद.

<< मराठी उद्योजकाना एकत्र नेटवर्किंग करता यावे म्हणून नवीन ग्रूप सुरु करण्याचे काम सुरु आहे. अशा उपक्रमात विश्वासाची गरज असते त्यामुळे या ग्रूपमधे कुणाला कसा प्रवेश देता येईल याबद्दल काही धोरणे ठरवत आहोत. उदा. ज्याला व्यवसाय करायचा असेल त्याला आपले खरे नाव मायबोलीवर लपवायची गरज नाही त्यामुळे व्यक्तिरेखेत खरे नाव असेल आणि ते पडताळून पहायचे निकष पूर्ण केले आहेत अशानाच त्यात प्रवेश मिळेल >>
असा जर गृप तयार झाला तर जास्त परिणामकारक ठरेल आणि जबाबदार व्यक्तींपुरताच जर प्रवेश मर्यादीत राहीला तर त्यामुळे त्याची उपयोगिताही नक्किच वाढेल. मी पण उद्योजक आहे आणि माझे अनुभव शेअर करायला तसेच इतरांकडून माहितीज्ञान मिळवायला नक्कीच सोईचे पडेल.

>व्यक्तिरेखेत खरे नाव असेल आणि ते पडताळून पहायचे निकष पूर्ण केले आहेत अशानाच त्यात प्रवेश मिळेल.>> मला कळला नाही हा मुद्दा.

तुमचा आयडी काहिही असला तरी आत तुमच्या व्यक्तिरेखेत तुमचे खरे नाव, आडनाव लिहायची सोय आहे. ते जाहिरपणे दिसते. ज्याचा व्यवसाय आहे आणि वाढवायचा आहे त्याला हे नाव दाखवण्यात वावगे वाटू नये अशी संकल्पना होती. त्यासाठी आयडी बदलायची गरज नाही. उलट असे नाव जाहिरपणे दाखवल्याने तुमची विश्वासार्हता वाढून व्यवसायाला मदतच होईल.

>>>> ज्याचा व्यवसाय आहे आणि वाढवायचा आहे त्याला हे नाव दाखवण्यात वावगे वाटू नये अशी संकल्पना होती.
आपल्याला बोवा हे नावगाव देणे जमायचे नाही! Happy

मस्त कल्पना आहे.

मलाही शेतीसंदर्भात काहीतरी उद्योग सुरू करायची इच्छा आहे पण अजुन सगळे धुसर आहे. इथले अनुभव वाचून काही दिशा सापडेल/मार्गदर्शन होईल अशी अपेक्षा आहे....

मला सहभागी व्हायला आवडेल. मी एका चित्रपट निर्मिती करणार्‍या प्रा.लि.कं. ची डायरेक्टर आहे.

उद्योगाच्या काही कल्पना:
१. डॉक्युमेंटरीज आणि कॉर्पोरेट फिल्म्स बनवून देणे यासाठी मोठे मार्केट आहे. माझ्या प्रोपायटरीद्वारे मी हे काम करते.
२. अनेक ठिकाणी ग्रामीण भागांमधे आता शूटींग्ज होत असतात. तिथे शूटींगसाठी लागणारे मनुष्यबळ आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणे हा एक महत्वाचा व्यवसाय होऊ शकतो. नीट अभ्यास करून आणि थोडं डोकं चालवून सेटप तयार केला तर चांगला चालू शकतो. सेटपसाठी खूप भांडवल लागणार नाही. संवादकौशल्य आणि माणसे जोडणे महत्वाचे. ठराविक काळापुरताच पूर्ण वेळ आणि बाकीचा वेळ इतर सगळे उद्योग सांभाळून करता येण्यासारखा व्यवसाय आहे. कोकण आणि गोवा इथल्या ग्रामीण भागात हे विषेशकरून शक्य आहे. (उद्योजक ज्याला म्हणतात त्या क्याटेगरीमधे हे बसतं की नाही मला माहीत नाही.)

मुटेसाहेब,
शेतीमालाच्या प्रक्रीयेसंदर्भातल्या तुमच्या प्रयोगांची आणि यशस्वी प्रयत्नांची माहीती तपशीलात वाचायला आवडेल.

चंपक, उत्तम उपक्रम आहे, अशा काही ऑनलाईन आणि ऑफलाईन नेटवर्क्स मध्ये सहभगाचा जो काही अनुभव आहे त्यावरून ग्रुपची विश्वासार्हता व उपयुक्तता टिकण्यासाठी एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात, योग्य वाटल्यास विचार व्हावा.

१) उद्योजकांनी एकत्र यावे, एकमेकांच्या व्यवसायाचा, सेवेचा, अनुभवाचा, इंन्फ्रास्ट्रक्चरचा, परदेशात, दुसर्‍या शहरात असलेल्या वास्तव्याचा, ओळखींचा काही उपयोग होऊ शकतो का ते पहावे, ज्यांना उद्योजक व्हायचे आहे त्यांना काही सल्ला, मदत, माहिती, भागीदारी असे काही हवे असल्यास ते द्यावे असा एकंदर उद्देश असेल तर नेमकेपणा येईल असे वाटते.

२) हे वातावरण टिकण्यासाठी, या ग्रुपमध्ये सहभागासाठी काहीतरी निर्माण करणारा वा कौशल्याधारित सेवा देणारा वा तसे करू इच्छिणारा असा काहीतरी निकष ठेवल्यास एकंदर गुणवत्तेच्या दृष्टीने चांगले होईल. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाले तर नेटवर्क वा मल्टीलेवल मार्केटिंग, विमा एजंट, इस्टेट एजंट, इन्वेस्टमेंट एजंट ( कन्सल्टंट, अ‍ॅड्व्हायझर असे काही नाव असले तरी) अशा मंडळींना प्रवेश असू नये. एकदा का ही मंडळी जमून पिडू लागली की उद्योजक हळू हळू गळू लागतात आणि ग्रुपला ओहोटी लागते असा अनुभव आहे.

३)सभासदांसाठी एक पथ्य सुचवावेसे वाटते: कुठलीही माहिती, सल्ला, व्यवसायाच्या नव्या वाटा सुचवतांना ज्यात आपल्याला पुरेसे ज्ञान व अनुभव आहे त्याबद्दलच द्यावी, अमुक तमुक व्यवसायात 'य' पैसे आहेत असे 'अ' सांगत होता असे 'ब' चे म्हणणे आहे अशा स्वरूपाची असू नये.

उपक्रमास शुभेच्छा

अरे वा. शरद मला फ्रॅन्चाइस द्या. माझ्याकडे स्पेस आहे. व माझे ऑफिस १४ शाळा व २ कॉलेजेस च्या मध्ये आहे. मला सीएस पूर्ण न करता आल्याची खूप खंत वाटते ती मी भरून काढू शकेन. मला ही असा कोर्स करायचा आहे.

पुढच्या आठ्वड्यात मेल करते.

ग्रेस ला डॉग शो साठी बेस्ट लक.

माझ्या कडे डिटरजंट, अगरबत्ती क्लीनर्स बनविण्याच्या प्रक्रीया ची माहिती आहे. ती मी देऊ शकेन. विस्ताराने नक्की लिहीन.

नी. एक अनुभवी फिल्म मेकर माझा कलीग होता व मी त्याच्या साठी स्क्रिपट्स लिहीत असते. आम्ही दोघे काही फिल्म मेकर्स साठी इन्फ्रा. करू शकतो. शूटिन्ग क्रू साठी २० पॅकेट ब्रे.फा. लंच वगैरे ऑर्गनाइज केले आहे .

चंपक शेट उत्तम बीबी.

हैद्राबादमधे तुम्हाला खूपच स्कोप आहे मामी. तिथली इंडस्ट्री खूप मोठी आहे.
मुंबईसारखीच.

डॉक्यू, कॉर्पोरेट करून देणे हे तुम्ही तिथे अगदीच करू शकता. अर्थात अनुभव आणि फिल्ममेकींगचे बेसिक ज्ञान हवे. तिथे तसे शॉर्ट कोर्सेस असणार.

शूटसाठी इन्फ्रा उभे करून देणे हे ग्रामीण भागासाठी जास्त करून उपयोगाचे आहे. आता कोकण आणि गोवा हे हॉटस्पॉटस बनलेले आहेत शूटींग्जसाठी तेव्हा तिथल्या तरूण हुशार मुलांनी पर्यटनाला धरून हा विषय हाताळण्याचे ठरवले तर लागेल ती माहीती देण्यास मी कधीही तयार आहे.

शेती करणार्‍याला शेतीला धरून कृषी पर्यटन हा विषय हाताळता येऊ शकतो. मी थोडी माहीती जमवली आहे. यात असलेल्या काही लोकांबद्दलही माहीती आहे. मार्गदर्शन करू शकणारे लोक.
१. भडसावळे (पहिलं नाव लक्षात नाही. ) - यांचं कृषी पर्यटन या विषयावरचं याच नावाचं पुस्तकही आहे आणि त्यांनी ही संकल्पना उत्तमरित्या राबवली आहे.
२. मामाचा गाव - समीर साळवी - गुहागर तालुक्यात मुंढर.
३. पांडुरंग तावडे/ तायडे - यांचा प्रत्यक्ष परीचय नाही पण फेसबुकवर यांच्याबद्दल माहीती मिळालेली आहे. ते स्वतः फेसबुकवर आहेत. बारामती तालुका.

Pages