उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.

कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्‍यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्‍या लोकांसाठी!

काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील Happy
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्‍या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत. Happy
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.

उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्‍हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, वरील मजकूर म्हण्जे आपल्याच मनातील विचार असं वाटलं.
मायबोलीवरून एका जुन्या विस्मरणात गेलेल्या नातेवाएकांशी पुन्हा ओळख झाली. त्या पुण्यात माझ्या घरी येऊन गेल्या, त्यांच्या मोकळ्या वेळात त्या माझ्या साड्यांचे मार्केटिंग करू शकतील का इ. बोलणे पण झाले. लक्ष्मणराव, खरंच केवढा टाइमपास करतोय आम्ही? अहो, उद्योगात माणसं जोडावी लागतात. स्वतःच्या कोषात राहून नाही चालत.
माझा छोटासा व्यवसाय, पण त्यात किती तरी ईकॉनिमिक्स दडलेलं आहे.
उदा. मी धारवाडहून साड्या काढवून आणते : माझा प्रवास - बस वाहन उद्योगाला चालना, साडी कारखान्याला चालना, साडी कारखान्यातील कामगारांना नोकर्‍या, सूतगिरण्यांना चालना, माझ्याकडील शिंपिणबाईला रोजगार, पॅकिंग साठी प्लअ‍ॅस्टिक्च्या पिश्व्या बनवणार्‍या छोट्या उत्पादकाच्या कारखान्याला चालना, कुरियर उद्योगाला चालना, यावर मी भरत असलेला टॅक्स - माझ्या सरकारला उत्पन्न.
हा टाइमपास आहे का? या सगळयाला माणसं जोडावी लागतातच. नुसती डिग्री पुरत नाही.

susmita आगदी खर

व्यवसाय म्हटल की एक परिक्षाच आसते नापास न होणारी पण अभ्यास प्रचड !!!!!!!

मला हि सभासद व्हायचय ह्या गटाच Happy

मी १२ वि च्या सुट्टित एका फुड कंपनिचे प्रॉडक्ट्स आणुन विकले होते (आजु बाजुच्या घरी जाऊन आणि आत्याच्या रीकाम्या दुकाणात मांडुन Proud )

मध्ये काहि वर्षां पुर्वी केटरींग चा व्यवसाय हि केला होता त्याला चांगला प्रतिसाद मीळाला होता ... घरगुती ऑर्डर पासुन सुरवात झाली, सॉफ्टवेअर कंपन्यांच्या ऑर्डर्स मीळायला लागल्या होत्या पण काही कारणास्तव मला हा उद्योग बंद करावा लागला ... आता परत ह्या (फुड/केटारींग) क्षेत्रात ऊडी मारण्याचा विचार आहे Happy

ह्या क्षेत्रा बाबत कुणी मार्गदर्शन केल तर खुप मदत होईल ... आभार Happy

मामी आणि सुस्मिता, खरोखर धडाडीच्या आहात! कौतुक आणि आदर वाटला.

इथे अमेरिकेत अगदी भर वस्तीत काही छोटे मळे आहेत. (ते आधीपासूनच असावेत अन्यथा घरं बांधायच्या जमिनीवर शेती करता येत नाही असं ऐकलं.) ह्या मळ्यांत हंगामी भाज्या, फळं ह्यांची पिकं काढली जातात. जवळपासच्या लोकांसाठी 'टोपलंभर भाज्या/फळं $$ इतक्या दरात' अशी जाहिरात केली जाते. लोक देखिल मुला-बाळांसह ताज्या भाज्या, फळांसाठी तिथे जातात. हे गोळा करायला चर्च, शाळांमधून सहली जातात. जो माल अशा प्रकारे खपणार नाही तो रस्त्याच्या कडेला किंवा 'फार्मर्स मार्केट' मधे विकायला ठेवतात. ह्यात साठवण, दूरवर ने आण असे प्रकार नसतात.

अश्या प्रकारचा लहान प्रमाणातला उद्योग भारतात चालू शकेल का?

धन्यवाद मृण्मयी.
अशा प्रकारे १ माणूस तळजाईच्या टेकडीवर ताज्या भाज्या विकतो. पण तो विशेष प्रोफेशनल नाही, ठराविक वेळी ठराविक जागी असेलच याची खात्री नाही. स्वतःच्या सोयीने कुठ्ल्यापण वेळी येतो, खाडेपण करतो. खरंतर हा धंदा जोरात चालू शकतो, कारण खायला चारी वेळा लागतंच ना.

खर तर मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी दररोज ताज्या भाज्या निवडुन, साफ करुन, चिरुन त्या पॅकबंद पिशव्यातून विकल्या, अगदी घरपोच केल्या तरी चांगला उद्योग होऊ शकेल. माझ्या एका मित्राने फार आधी हा प्रकार केला होता. पण तो बाजारात बसायचा आणी त्याला ईतर भाजीवाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. बिचारा मराठी माणूस तो, उठला त्यातून.

पुण्यात सातारा रोडवर विवेकानंद पुतळ्याजवळ मोठी शेतं आहेत. अजूनही. मला कितीतरी वेळा वाटतं की ही शेतं बिल्डरला विकण्याऐवजी तिथे फूड & फन चा धंदा काढावा. फार्म हाऊस, मराठमोळं जेवण वगैरे. कुणाजवळ पैसा असेल तर हा धंदा जरूर काढावा. पुण्यात अभिरुची फार्म जोरात चालतं. पण सातारा रोड परिसरात असं नव्यानी उघडलं तर 'हिट' होणार याची खात्री आहे.

प्रथम त्या शेताच्या मालकाशी काँट्रक्ट करावे लागेल किंवा शेत विकत घ्यायचे. सध्या बहुतेक तेथे लिंबू लावले आहे. झाडांना हानी न पोचवता थोडे लँडस्केपिंग करून घ्यावे. काही झोपड्या, घसरगुंड्या, झोपाळे टाकावे. गावाकडच्या जेवणाची सोय करावी. थोडा पैसा मोकळा झाला की अजून खूप मौज मस्तीच्या गोष्टी करू शकता. उदा. पोहोण्याचा तलाव व त्यात एखादी वॉटरगेम, झाडावरची झोपडी, कृत्रिम शेततळे व त्यात मासे पकडण्याची सोय, मुलांसाठी माती खेळण्याचा सँड पिट इ.

खरं तर कुठल्याही उद्योगाची सुरुवात होत ते आवडी पासुन. तुम्ही उद्योग करायचा म्हणुन कुठलाही करु नका. ते तुम्हाला मनापासुन आवडतं ना, याचा आधी विचार करा. किंवा एखादा उद्योग करायचा ठरवला की त्यावर मनापासुन प्रेम करा. लव्ह मॅरेज- अ‍ॅरेंज मॅरेजसरखंच काहीसं. मग त्यावर रीसर्च करा. अगदी बारकाईने. सगळं काही लिहुन काढा. त्या क्षेत्रातल्या आधीच्या लोकांशी बोला, तज्ञांशी बोला. तुमच्या कल्पना त्यांना सांगा. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही जे काही उभं करणार आहात त्याचं चित्र उभं राहिलं पाहिजे. Everything is born twice, first in front of your eyes, then actually. मग टप्पे आखा, व्यवस्थित मांडणी करा. संभाव्य धोके, त्यांना तुम्ही कसं तोंड देणार याचे थोडेसे आराखडे बांधुन ठेवा. टप्प्या-टप्प्यात आपल्या ध्येयाकडे जा. यश तुमचच आहे. Happy

माझे नाव विशाल भारती आहे.
मी,एका सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता आहे. मला online matrimony धर्तीवर एक वेबसाईट सुरु करायची आहे. या वेबासाईट द्वारे लग्नसंबध जुळावेच, तसेच त्यासंबधी रोजगार (ज्याप्रमाणे कार्यालय, कार्यालय व्यवस्था, वधुचा साजश्रुंगार, फोटोग्राओफी, व्हिडीयोशुटिंग, जेवण, वगैरे.) ही समाज बांधवांना मिळावा अशी कल्पना आहे. यासंबधी जर मला आपल्या मराठी उद्योजक द्वारे काही कल्पना, मदद, guidance मिळावा अशी आशा धरतो.

>>खर तर मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी दररोज ताज्या भाज्या निवडुन, साफ करुन, चिरुन त्या पॅकबंद >>पिशव्यातून विकल्या, अगदी घरपोच केल्या तरी चांगला उद्योग होऊ शकेल. माझ्या एका मित्राने फार >>आधी हा प्रकार केला होता. पण तो बाजारात बसायचा आणी त्याला ईतर भाजीवाल्यांनी त्रास द्यायला >>सुरुवात केली. बिचारा मराठी माणूस तो, उठला त्यातून.

किती लोक अश्या भाज्या घेतात? मी ज्याना ज्याना विचारले ते, चिरलेल्या भाज्या घेत नव्हते. आता किती मायबोलीकर अश्या भाज्या घेतील?
मी बिग बाझार मध्ये पाहिले होते की चिरलेल्या भाज्या दिड्पट महाग होत्या. उदा. न चिरलेली भेंडी ४०रु/कि. होती, तर चिरलेली १५रु/२५०ग्र. अश्याच दुसर्या भाज्याही होत्या. ४ जणांच्या कुटंबाला चिरलेली भाजी महाग होते. एकटा माणूस अश्या भाज्या घेईलही..पण जर तो मुलगा असेल तर शक्यता कमीच आहे Happy
जे higherMiddle claas मधले आहेत, त्यांच्या कडे घरकामाला बाई असते..त्यांच्याकडुन भाज्या निवडून-चिरून घेतात.
मी ह्या संदर्भात १-२ हॉटेल वाल्यांशी बोललो (उडपी/शेट्टी). त्याच्याकडे मुले असतात त्यामुळे ते भाज्या चिरतात. त्यांना चिरलेल्या भाज्यांचि गरज नसते.
हा. मोठ्या हॉटेल वाल्यांना (lodgingसकट) कदाचीत गरज पडेल.
त्यामुळे मला वाटते की एका मर्यादेपुढे ही आयडिया वाढू शकणार नाही

बाकिच्यांची मते जाणुन घ्यायला आवडेल.

किती लोक अश्या भाज्या घेतात? मी ज्याना ज्याना विचारले ते, चिरलेल्या भाज्या घेत नव्हते. आता किती मायबोलीकर अश्या भाज्या घेतील?<<
आम्ही पुण्यात घेत होतो पण मग व्यवसाय करणार्‍यांची नियत बदलली. वरच्यावर कशीतरी निवडलेली भाजी, ठराविक ऐवजापेक्षा कमी ऐवज, महिन्याचं भाज्यांचं कॅलेंडर आधी घेऊन जायचे ते तरीही ठरल्यापेक्षा वेगळीच भाजी असं काय काय व्हायला लागलं. माझ्या आईचं खूप पथ्य होतं त्यावेळेला त्यामुळे तिला ठराविकच भाज्या चालायच्या. मग आयत्यावेळेला दुसरी भाजी आणून निवडा/ चिरा करावं लागायचं. नंतर त्या व्यवसायकर्त्याने घरातल्या कोणाच्या आजारपणासाठी बरीच रक्कम उधार मागितली. बाबांनी काही रक्कम दिली. ती पूर्ण फिटायच्या आतच व्यक्तीने व्यवसाय बंद केला. पैसेही बुडले. हा व्यवसाय करणाराही मराठी माणूसच होता. असो. पण ही सोय उपलब्ध असेल तर माझ्यासारख्या अनेकजणी नक्की घेतील.

>>मी बिग बाझार मध्ये पाहिले होते की चिरलेल्या भाज्या दिड्पट महाग होत्या. उदा. न चिरलेली भेंडी ४०रु/कि. होती, तर चिरलेली १५रु/२५०ग्र. अश्याच दुसर्या भाज्याही होत्या. ४ जणांच्या कुटंबाला चिरलेली भाजी महाग होते. एकटा माणूस अश्या भाज्या घेईलही..पण जर तो मुलगा असेल तर शक्यता कमीच आहे <<
एकटा मुलगा असेल तर भाज्या स्वतः निवडेल? विनोदीच. असो.
भाज्यांची किंमत आणि निवडण्या/चिरण्याची किंमत आणि निवडल्या/ चिरलेल्या भाज्यांच्या स्टोरेजवरचा वेगळा खर्च हे बघता दीडपट किंमत बरोबर आहे. पण बिग बझार मधल्या चिरलेल्या भाज्या अनेकदा खराब झालेल्याही असतात किंवा आपण घरी पोचेतो खराब होतात इतक्या शिळ्या असतात. स्थानिक पातळीवर जर हा व्यवसाय केला गेला तर भाज्या इतक्या शिळ्या व्हायची गरज नसते. आणि निवडणं/चिरणं करण्यासाठी वेळ, कष्ट लागतात तेव्हा त्यासाठी योग्य ती किंमत आकारली जाणं यात अयोग्य काय? तसेच न चिरलेल्या/ निवडलेल्या एक किलो भाजीमधे किमान २०० ग्रॅमचा कचरा निघतोच. पालेभाजी असेल तर जास्तच तेव्हा किलोचा भाव हा खरंतर किलोचा नसून ८०० ग्रॅम ते ५०० ग्रॅमचा असतो. निवडलेली/चिरलेली भाजी जी असते त्यात ही घट नसते. चार जणांच्या कुटुंबासाठी लागणारी भाजी, ती निवडायचा/ चिरायचा वेळ लक्षात घेतला तर आयती निवडलेली/ चिरलेली भाजी वेळ आणि कष्ट वाचवणारी ठरते. घराबाहेर पडून काम करणार्‍या किंवा घर आणि संसारापलिकडे आयुष्य असलेल्या प्रत्येक बाईसाठी ही गोष्ट गरजेची आहे माझ्यामते.

>>जे higherMiddle claas मधले आहेत, त्यांच्या कडे घरकामाला बाई असते..त्यांच्याकडुन भाज्या निवडून-चिरून घेतात.<<
त्यासाठी पण पैसे मोजावे लागतात. तेव्हा शेवटी पाव किलो भाजीची किंमत जास्तच होते. तसेच सगळ्यांनाच बाई मिळते असं नाही. तिच्या वेळा जमतात असं नाही. वेळा नाही जमल्या तर बाईच्या हातात घराची किल्ली देता येण्याइतकी ती विश्वासू असेलच असं नाही.

>>त्यामुळे मला वाटते की एका मर्यादेपुढे ही आयडिया वाढू शकणार नाही<<
हेल्थ कॉन्शस असलेल्या प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात घरचं जेवण हे महत्वाचं असतं आणि तिथे अशी निवडलेली/ चिरलेली भाजी मिळत असेल तर नोकरी आणि संसार एकाच वेळेला सांभाळण्याची कसरत करणार्‍या प्रत्येक बाईला आवडेलच. त्यामुळे मध्यमवर्गीय घरांसाठी ही एक उपयुक्त गोष्ट आहे. तेच लोक या व्यवसायाचे ग्राहक आहेत. हॉटेल इंडस्ट्री वा पोळीभाजी केंद्रे नाहीत.

मी उद्योजिका नाही, तरी हा बाफ आवडीने वाचते, तुम्हा सर्वांचे कौतुक वाटते म्हणून.
वरच्या काही पोस्टींवर लिहावेसे वाटले-
१) सातारा रोडवरची रिकामी जागा- ती जागा ऑलरेडी विकत गेलेली आहे. तिथे नाट्यगृह आणि सिनेमागृह करायचा प्लॅन आहे. सद्ध्या ओसाडच आहे, याचा अर्थ काहीतरी घोटाळ्यात अडकलेली आहे, तेव्हा सावधान. सद्ध्या सातारा रोडवर रिकामे प्लॉट नाहीतच. थेट शिरवळ गाठावे लागेल Happy तिथे मात्र सुस्मिता म्हणतात तसे थीमपार्क उभे केले तर जोरात चालेल.

२) निवडलेली भाजी- बिग बझार सारख्या मोठ्या स्टोअरमध्ये मुख्यत्वे भाजीचा खप कमी असतो. त्यामुळे तिथली निवडलेली भाजी शिळी असते. बरेच भाजीवाले नि.भा ठेवतात. साधारण पाव किलोच्या भावात तीच निवडलेली २०० ग्रॅम भाजी मिळते. उदा. गवार १० रू पाव- आख्खी. १० रूच्या निवडलेल्या पाकिटात २०० ग्रॅम असते.
भाजी नाशवंत असल्याने हमखास गिर्‍हाईक नसेल तर तोटा होणे निश्चित. सध्या तसेही भाजीचे भाव महागल्याने लोक महाग भाजी घ्यायला बिचकतात. पण सचोटी आणि नियमितपणे कोणी नि.भा देत असेल तर दोन रूपये जास्त देऊनही त्याच्याकडून हमखास ती घेतली जाते हा अनुभव. माझ्या भागामध्ये दोघी भाजीवाल्या पालेभाजी देतात निवडून- २ रू प्रती गड्डी. मेथीची एक गड्डी घेतली की तासाभराने तिचे ५ अधिक निवडायचे २ असे सात रुपये देऊन भाजी घरी घेऊन जायची. मटार, मकाही निवडून देतात. ह्या बायका प्रामाणिक आहेत. जेवढी गड्डी आहे तेवढी भाजी देतात. त्यात मारत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे कायम गर्दी असते.
थोडक्यात ह्या धंद्याला मरण नाही, पण कष्ट आणि सचोटी हवी.

आनंद ...
खर तर मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी दररोज ताज्या भाज्या निवडुन, साफ करुन, चिरुन त्या पॅकबंद >>पिशव्यातून विकल्या, अगदी घरपोच केल्या तरी चांगला उद्योग होऊ शकेल. माझ्या एका मित्राने फार >>आधी हा प्रकार केला होता. पण तो बाजारात बसायचा आणी त्याला ईतर भाजीवाल्यांनी त्रास द्यायला >>सुरुवात केली. बिचारा मराठी माणूस तो, उठला त्यातून.
सध्या पुण्यात हा प्रयोग काही तरुण करत आहेत ..सध्या जवळपास १ टन भाजीपाला हा घर पोच केला जातोय ..

आनंद, काही प्रातिनिधिक मते तुम्हाला मिळाली आहेतच.
सध्या जवळपास १ टन भाजीपाला हा घर पोच केला जातोय .. >> १ टन हा फार मोठा व्हॉल्युम आहे. कौतुक त्या तरुणांचं. Happy

कृपया मला पण या ग्रूपचा सभासद करुन घ्यावे.

मी एक संगणक अभियंता (SAP Enterprise Portal) असलो तरी याच क्षेत्रात व्यवसाय करायचा मानस नाही. गेल्या एक वर्षापासून वेळ मिळेल तसा वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहे.

भारत हे व्यवसायासाठी सर्वात चांगले क्षेत्र आहे असे मला मनापासून वाटते. प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरींग, हॉटेलींग असे कित्येक पर्याय येथे उपलब्ध आहेत. माझ्यापुरते बोलायचे म्हटले तर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरींग व्यवसायामधे रुची आहे.

या ग्रूपच्या निमिताने बरेच काही मार्गदर्शन मिळेल याची खात्री आहे.

मी त्याच अर्थी बोललो होतो नी. किती तरुण आहेत ही कल्पना नाही, पण १ टन नक्कीच चांगला व्हॉल्युम आहे. आणि कित्येक टनाचं मार्केट उपलब्ध आहे. Happy

भ्रमर, नीधप ....
तसा आता काही निवडक सोसायट्या,काही भागात सुरु आहे,तसा १ टन म्हणजे खूप नाही =१००० किलो,ग्रुपची एकुण उलाढाल रोज १५-१६००० च्या आस्पास आहे ..

नी,
पार्ल्यात ही सोय मिळत होती.
सद्य्या च माहित नाहि.
आइला विचारल पाहिजे.
प्राचि सोसायटी मधे कोणी तरि हा व्यवसाय करत होते

Pages