उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.

कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्‍यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्‍या लोकांसाठी!

काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील Happy
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्‍या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत. Happy
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.

उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्‍हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कष्ट आणि इमानदारी आसल्या गोष्टी आमच्या फादर आणि मदरने शिकवल्या हायत त्यामुळं आमी हाय तितच आहोत.
>> लक्ष्मण लय वाईट वाटलं ल्येका तुला आसं बोलताना आयकून. पयल्यांदा आईला आई आन वडिलांना वडिल म्हनायला शीक. मदर आनि फादर म्हनल्यावर हसत्यात लोक आपल्याला.
दुसरं म्हनजी आपलं आई-वडिल कंदीबी आपल्यापेक्षा थोरच असत्यात. त्यांना अशी जाहीरपनानं नावं नसत्यात ठिवायची.
आरं कष्ट आणि ईमानदारी ह्येच धंद्यात यशस्वी व्हायचे गुण हायेत. तुला आई-वडिलांनी पायजे तेच दिलं हाय. बाकीचे पुढे गेले म्हनून त्याचा राग त्यांच्या शिदोरीवर कशाला काडतुयास बाबा? जाऊ दे की इतरांना फुडं. आपन आपल्या चालीनं चालत राहावं. आपल्यालाबी रस्ता दिसतोच, नव्हं द्येव त्यो दाखिवतोच.
लक्षात ठीव. वाईट मार्गानं फुडं जानारे वाईट संगतीतच मरत्यात.
त्ये वरचं वाक्य पयलं दुरुस्त कर न्हायतर काडून टाक. यवडं करच भावा.

कष्ट आणि इमानदारी आसल्या गोष्टी आमच्या फादर आणि मदरने शिकवल्या हायत त्यामुळं आमी हाय तितच आहोत. >>>>
१. 'प्रत्येक माणूस बेइमानी करूनच आयुष्यात वर येऊ शकतो' या तुमच्या कल्पनेमुळे तुम्ही प्रगती केली नसेल.
२. स्वतः जबाबदारी न घेता दुसर्‍याच्या माथी खपर फोडण्याची तुमची वृत्ती असेल. यामुळे अपयशातून शिकायला जमत नसेल.
३. तुम्ही आपल्याहून जास्त प्रगती केलेल्या लोकांकडून शिकायला कमी पडत असाल, त्यामुळे त्यांच्या यशात कष्ट व इमानदारी नसून लांडीलबाडीच आहे असे मानत असाल.
तुमचे पोस्ट वाचून खेद झाला.

गिरीश जाखोटियांचे 'एका मारवाड्याची गोष्ट्' , विठ्ठ्ल कामतांचे 'इड्ली ऑर्किड & मी' आणि 'उद्योजक होणारच मी' ही पुस्तके फार छन आहेत.
माझी पी एच डी उद्योजकतेवरच आहे.
वेळ मिळेल तशी उद्योजकतेसाठी उत्त्म पुस्तके माय्बोलीवर टाकत जाईन.
माझ्या पोस्ट वर प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे खूप आभार.

सध्या केवळ ऑफिस मधूनच मायबोली वापरता येतेय, त्यात पण मॅनेजरची नजर चुकवून वापरता येतय.
घरात संगणक नाहीये, त्यामुळे इच्छा असून पण प्रतिसाद देता येत नाहीये या ग्रूपमधील धाग्यांसाठी.

मुळात आमच्या घरात कुणी उद्योजक नाही, शेती करत आहोत, पण तोही जोडधंदा म्हणून.
अजून मी घरात माझी ही कल्पना सांगितली नाहिये, आणि मला खात्री आहे की याला विरोध होणारच.
मग त्यांना समजावून कसे सांगू? कारण व्यवसायात उतरायच असेल तर घरून फार मोठा व भक्कम पाठिंबा लागतो असे मला वाटते.

सुस्मिता, विठ्ठ्ल कामतांचे 'इड्ली ऑर्किड & मी' हे वाचलय, छान पुस्तक आहे. या पुस्तकाने पण मला फार प्रेरणा दिलीय.

टीपः अवांतर लिहीले गेले असल्यास क्षमस्व.

लक्ष्मण,
एका यशस्वी "इस्टोरी" मागे, दहाच काय, पन्नास अपयशान्च्या स्टोर्‍या अस्तात, बहुधा त्या गुलदस्त्यातच ठेवल्या जातात - ठेवाव्यात!
पण होत काय? बहुतेक जण, पहिल्या पन्नास नाही तर दहाही नाही, दोन तीन अपयशी प्रयत्नातच नाऊमेद होऊन पुन्हा "सामान्य सुखी जीवनाचे" कातडे ओढून घेतात व बहुधा सिस्टिमला, जगाला, सुसन्सकारान्ना, दैवाला दोष देऊ लागतात. असे होऊ नये, करु नये! Happy
माझ्याकडे माझ्या/आमच्या अपयशाच्या एकसे एक भन्नाट कहाण्या आहेत, गेल्या पस्तीस एक वर्षातल्या!
अजुनही मी उद्योजक की कायसेसे म्हणतात तो झालेलो नाही, पण अजुनही उमेद हरलेलो नाही!
अपयश आले ते माझ्यातल्या "इमानदारी वा कष्टान्च्या सन्कारानन्मुळे" नाही, तर माझे कष्टच कमी पडल्यामुळे अपयश आले असे मी मानतो.
एक साधे उदाहरण, २००८ मधे मला प्रयोगादाखल देखिल चार कट्टे तान्दुळ मिळाला होता
२००९ मधे अक्षरषः तान्दुळाचा एक दाणाही घरी आला नाहीये
अन मी तयारी करतोय २०१० च्या सिझनची, दुप्पट जोमाने! Happy कुणालाही दोष न देता!

मलाही सभासदत्व हवं आहे प्लिज!
माझ्याकडे तसा उद्योजकाचा अनुभव नाही....पण अनेक उद्योग जसे अळिंबी निर्मिती, पॉल्ट्री फॉर्म यासारखे उद्योगांसाठी लागणारे प्रशिक्षण (गव्हर्न्मेंट कोर्स) मी घेतलय! टिश्यु कल्चर, इमुपालन, औषधी वनस्पती लागवड यामधेही इंटरेस्ट आहे!

माझा स्वतःचा अनुभव बायोफर्टीलायझर/ बायोपेस्टीसाईड निर्मिती क्षेत्रातील आहे(मी बॉटनी या विषयातील पदवी आणि मायक्रोबायॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे त्यामुळे मला जास्त शेतीशी निगडीत व्यवसायांमधे आवड आहे)! मी स्वतः त्याप्रमाणे बायोपेस्टीसाईड निर्मिती प्रकल्प सुरु करणार होते पण नेहमीप्रमाणे मार्केटींगचा प्रॉब्लेम आला..... Sad

मस्त माहितीपूर्ण धागा. नीधप, मला कार्पोरेट डॉक्युमेंटरीज बनवायचा चिक्कार अनुभव आहे (आणि सीरीयल्सासाठी ड्वायलॉग लिवायचा पण)..
त्यासाठी मला मुंबईच्या बाहेर अस्ताना काही काम मिळू शकेल का?

झाले सुरु
आम्च नेहमी आस्च होत आम्हाला सागांय्च आस्त काय , लिवाय्च आस्त काय , अन आर्थ भलतेच निघतात . अरेरे माझ्या बद्दल बोलयचे झालेतर माझ्या घारातील माझ्या रुपाने पहीली पिढी शिक्षण घेउन काहीतरी करत आहे , ना कुनाचे मार्गदर्शन , ना अर्थिक बाजु भक्कम , आणी घरातील वातावर ?
तरी पण आई वडिलांचे एकच वाक्य नेहमी आसायचे , लक्ष्या काय बी कर इमानदारी आणी कष्ट याला जगात लय कींमत हाय , या दोन गोष्टी आणी माझी बुद्धी या मुळे मी आज जे काही आहे ते फक्त या आई वडीलांच्या वाक्या मुळे .
माणसाकडे पैसा , शिक्षण , किंवा इतर काही बाबी तुमच्या प्रगतीच्या आड येउ शकत नाहीत फक्त तुमच्या कडे जिद्द पाहीजे , मह्त्वकांक्षा पाहिजे .
गावाकडुन आई वडीलांकडुन एक रुपया न घेता मी पुणे विद्दापिठात एम . ए . केले आहे ते फक्त माझी मह्त्वकांक्षा , आणी मला मिळालेले माझे गुरु व त्यांचे आर्शिवाद .( मा बो वर मला शिक्षण देनारे काही गुरुजी आहेत )

आम्च नेहमी आस्च होत आम्हाला सागांय्च आस्त काय , लिवाय्च आस्त काय , अन आर्थ भलतेच निघतात >> Happy

माझ्या मेलला उत्तर देरे बाबा.
वाट बघतोय.

लक्ष्या काय बी कर इमानदारी आणी कष्ट याला जगात लय कींमत हाय , या दोन गोष्टी आणी माझी बुद्धी या मुळे मी आज जे काही आहे ते फक्त या आई वडीलांच्या वाक्या मुळे .>> लक्ष्मणराव अनुमोदन.

उत्तम उपक्रम. माझी मुम्बई-गोवा महामार्गाजवळ ११ एकर जमिन आहे. तिथे हॉर्टीकल्चर/ग्रीन हाऊस आधारीत (किफायती फुलांची लागवड, आयुर्वेदिक्/सुगन्धी वनस्पती लागवड) काहीतरी करायचा मानस आहे. सध्या परदेशातील पुष्प बाजाराचा अभ्यास करणे सुरु केलय. जर कोणाला भागीदारीत रस असेल तर नक्की बोलुया.

सुस्मिता फार प्रेरणादायी आहे तुमची सक्सेस स्टोरी. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Happy

नमस्कार लोक्स,
माझे पती पण गेल्या २ महिन्यान पासुन स्वताचा उद्योग करत आहेत ,
ते शेतकर्याना लागणारे trolley बनवण्याचा उद्योग करत आहेत,
आणि सध्या १ finacial company पन काढ्ली आहे,मला हि स्वताचा स्वत्नत्र व्यवसाय काढायचा आहे,professionaly मी software tester असल्या ने कशी सुरुवात करु ते कळत नाही

मला ही तुमच्या बरोबर व्यवसाय करायला नक्की आवडेल.

'उद्योजक' हे मासिक कसे आहे? आम्ही MCED च्या क्रुषी विद्यापीठ (पुणे) येथील कार्यालयात वाचला होता एक अंक, पण पूर्ण वाचता आला नाही.
जेवढा वाचला तेवढा भाग चांगला वाटला.

नमस्कार,
मी नुकतेच पुण्यातुन एम्.सी.एम केलय. मला माझ्या गावी संगणक संबधीत व्यवसाय करण्याची ईच्छा आहे पन काय करावे तेच कळत नाहीये.

कित्ती राव टाईमपास्स ? चंप्याचा इचार काय होता आन इथ फक्स्त आस'' केले तर तसे होइल '' माझे शिक्षण एव्ह्ढे झाले मी काय करु ? !! याने आसे केले त्याने तसे केले !!आव पुढच बोला की राव .
मला पडलेले प्रश्न .?
तुम्हाला मा बो वर यव्हढा वेळ कसा मिळतो ? ????????????????????????????????
तुम्ही नोकरी करीत असाल तर .
आणी नोकरी करीत असाल तर तुम्ही तिथे टाइमपास करताय , जे लोक टाईमपास करतात ते नविन उद्दोग जरी सुरुकेला तरी तो टाइमपास म्हणुनच सुरु करतील

मीता,
मी जालना येथे राहतो (जालना हे औरंगाबाद पासुन ६० कि.मी. अंतरावर आहे).
हार्डवेअर मध्येच पण संबधीत व्यवसाया (डिलर व डिस्ट्रिब्युटर) बद्द्ल जास्त माहीती नाहिये. and regarding software I am intrested in Franchises and reselling. any help from maaybolikar's

लक्ष्मणराव, तुम्ही ग्रूपचे सभासद नाही त्यामुळे तुम्हाला फक्त मोजकाच मजकूर दिसतो. जे ग्रूपचे उत्साही सभासद आहेत त्यांनी केंव्हाच नेटवर्कींग सुरु केले आहे.

phshelgaonkar, तुम्ही ग्रूपचे सभासद होऊन हा प्रश्न विचारू शकता.

http://www.maayboli.com/node/13459

सुस्मिता आणि अश्विनी मामी,
हॅटस ऑफ टू यू.

सगळ्यांच्याच पोस्टमधून मी शिकते आहे.

नंदे,
रत्नागिरी भागात कृषी पर्यटन वाढीस लागतेय. त्यांच्यासाठी ५-१० मिनिटाच्या माहीती आणि जाहीरात प्रकारच्या फिल्म्स करून देण्याच्या दृष्टीने विचार करून बघ. पण पोस्टसाठी मुंबई गाठण्याशिवाय पर्याय नाही तुला.
अडोब प्रिमियर किती सॉफिस्टिकेटेड आहे मला माहीत नाही नाहीतर ते टाकून घेऊन एडिट होऊ शकेल.

शेळगावकर, हार्डवेअर मधे तुम्हाला फक्त peripheralsची डिलरशीप घ्यायची आहे की संगणक विक्री आणि तदनुषंगाने सर्व सेवा पुरवायच्या आहेत ते ठरवा. सॉफ्टवेअर मधे टॅली, अँन्टीव्हायरस हे तुम्ही सुरुवातीला विकु शकता.

सुस्मिता आणि मामी तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच. मी नवर्‍याला दाखवणार आहे तुमचे पोस्ट! या ग्रुप मुळे बरेच काही शिकायला मिळतेय.

धन्यवाद. उगीच विषय भावनिक करायचा म्हणून लिहिलेले नाही तर उद्योग करताना येणार्‍या अड्चणींची कल्पना असावी म्हणून. उद्योग म्हण्ले की,:
१) आपले वैयक्तिक आयुष्य काही राहात नाही.
२) वर चुका सुधारून घेणारा बॉस नसतो.
३) अगदी पेट्रोलचे २०० रु. ते टॅक्ष चे २०००० रु आपल्याच खिशातून जातात.
४) एम्प्लॉइज वर फार विश्वास टाकता येत नाही.
५) पैशाच्या बाबतीत पीक्स व व्हॅलीज चा सामना असतो. फार पैसे एकदम आले तर ते खर्च न करण्याचे तारतम्य बाळगावे लागते नाहीतर महिनोंमहिने पैसे पैसे करत हिंडावे लागते.
६) ग्राहक स्पर्धकांकडे आकर्षित होउ शकतात.
७) प्रॉडक्ट, पेन(इन्ग्रजी) , पैसा व पॅशन याचे अजब कॉम्बो म्हण्जे उद्योग.
८) एम्प्लॉइज ना प्रोटेक्ट करणारे खूप कायदे असतात पण उद्योजकास अनेक कर, स्टेटयुटरी पेमेन्ट्स
यांनी जखडलेले असते. त्यात प्रॉफिट भेट्लाच तर त्यावर मोठा इन्कम टॅक्ष लागतो.
९)नैतिकतेचे उल्लंघन करण्याची प्रलोभने जागोजागी येतात व त्यात आपला एकूण सेन्स ऑफ सेल्फच
धोक्यात येऊ शकतो. माणसे बघता बघता बदलून जातात.
१०) भ्रष्टाचाराचा सामना करावाच लागतो. त्यात आपला कस लागतो.

Pages