उद्योजकता विकास संघ- संकल्पना

Submitted by चंपक on 14 January, 2010 - 03:57

दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.

महाराष्ट्राला सहकार चळवळीची मोठी परंपरा आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विट्ठलराव विखे पाटलांच्या प्रयत्नांनी अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक गावी उभा राहिला. अन संपुर्ण देशात सहकारी संस्थांचे जाळे पसरले. भले-बुरे लोक या प्रयत्नांनी जीवनातील यशस्वींपैकी एक म्हणुन गणले गेले. हीच सहकाराची परंपरा खाजगी क्षेत्रातही दिसुन येते. दिवंगत श्री. धीरुभाई अंबानींच्या रुपाने प्रथमच 'पब्लिक इस्स्यु' हे प्रकरण सर्वसामान्य लोकांना समजले अन आज रिलायंस इंडस्त्रिज हे एक अद्भुत सत्य म्हणुन आपणा समोर उभे आहे. 'गांव करिल ते रांव करिल काय?' ह्याची सार्थता पटते. अन म्हणुन, मायबोलीवर वेगवेगळ्या कारणांनी वावरणारे, वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा अनुभव असणारे लोक अश्या उद्योजक निर्माण करण्याच्या प्रक्रियेत सामावुन घ्यावे ह्या उद्देशाने हे पहिले पाउल आहे.

कुणासाठी:
१)'संपत्ती निर्माण करणारे उद्योग उभे रहावेत' असे वाटणार्‍यांसाठी.
२)ज्या लोकांना उद्योग व्यवसाय करायचा आहे- अशी इच्छा आहे.
३)ज्या लोकांचा उद्योग आहे, अजुन काही मदत हवी आहे.
४)काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी भुतं दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी सुंदर मुली/मुले दिसतात.
काही लोकांना जळी स्थळी काष्ठी पाषाणी पैसा दिसतो... असे पैसा दिसणार्‍या लोकांसाठी!

काय करावे:
१)इथे अशा कल्पना लिहिल्या जाव्यात ज्या प्रत्यक्षात संपत्ती निर्माण करु शकतील. (मला काय करायला आवडले असते- हे नाही तरी चालेल.)
२)मांडलेली कल्पना व्यावहारिकतेच्या कसोटीवर पुर्णतः उतरली पाहिजे. (कल्पना विस्तृत स्वरुपात मांडली तर उत्तम)
३)अगदी व्यावसायिक गुपीते लिहिली नाही तरी चालतील. अर्थात सक्सेस स्टोरीज वाचायला आवडतील Happy
४) एखादा मायबोलीकर एका शहरात उद्योग करत आहे, अन दुसर्‍या शहरातील कुणा मायबोलीकराला असा उद्योग करण्याची इच्छा झाली, तर माहिती अन शक्य असेल तर लॉजिस्टिक ची मदत व्हावी.
५) फ्रॅन्चाईसी च्या संकल्पनेचा विस्तार व्हावा. काही मायबोलीकरांनी/ कुटुंबियांनी/मित्रांनी एकत्र येउन नवे उद्योग उभारावे.
६) मायबोलीकरांच्या अस्तित्वात असलेया उद्योगाचे विस्तारिकरण व्हावे.
७) छोट्या उद्योगाला लागणारे मनुष्यबळ, आर्थिक पाठबळ अन प्रसंगी मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी एका सेतु ची गरज आहे, असा सेतु बणण्याचा प्रयत्न आहे. असंख्य वानरांनी एक एक दगड टाकुण जसा एक रामसेतु बनवला अन श्री रामचंद्रांनी लंकेमध्ये प्रवेश करुन रावणावर विजय मिळवला, त्याप्रमाणे ह्या सेतु वरुन असख्य श्रीराम प्रवास करोत अन संपत्तीच्या श्री-लंके मध्ये प्रवेश करते होवोत. Happy
८) बिसनेस इज अ टीम स्पोर्ट- ह्याचे प्रत्यक्षात अनुकरण व्हावे.

उदा. लक्ष्मण नावाच्या एका मायबोलीकराला गावाकडील मित्राने त्याचा भाजीपाला पुण्यामध्ये विकण्यासाठी काही मदत मागितली होती. जोवर शक्य होते, तोवर लक्ष्मण ने ती केलीही. पण, पुढे त्याला हे शक्य झाले नाही. अश्या वेळी जर, कुणी मायबोलीकर अथवा त्याच्या ओळखीचा अथवा कुटुंबीय जर त्याला उपलब्ध होउ शकला असता, तर तो किफायतशीर उद्योग आजही सुरु राहिला असता. गावाकडील तो मित्र अन शहरातील मायबोलीकर मित्र आज एका यशस्वी उद्योगाचे धनी झाले असते. पण असे घडले नाही! दुर्दैव! अशा उदयोन्मुख उद्योजकांना एकत्र आणण्याचा हा अल्पसा प्रयत्न!

मायबोली ही एक मराठी लोकांनी एकत्र येण्याची जागा आहे, असे समजुन इथे येणारे सर्व लोक मराठी आहेत हे ग्राह्य धरतो. ज्या प्रमाणे गुजराती/पंजाबी लोक उद्योग व्यवसायात एक्मेकांना हरतर्‍हेची मदत करतात, त्याच धरतीवर हा एक प्रयत्न!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://epaper.esakal.com/esakal/20100301/5221049836387314711.htm

सातारा - दिवसेंदिवस दरडोई जमिनीचे प्रमाण कमी होत असताना ग्रामीण भागातील मराठी तरुण राजकीय पदाधिकारी किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होण्याच्याच मानसिकतेत आहे. स्वप्ने बाळगायची असल्यास उद्योग उभारणीची किंवा प्रथमवर्ग अधिकारी होण्याची बाळगा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले

http://epaper.esakal.com/esakal/20100301/5283229257649351600.htm

''उद्योजकता विकास आणि कौशल्य विकास या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी प्रयत्न करू,'' असे आश्‍वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिले.

एक मराठी उद्योजक नेटवर्क: डोंबिवलीच्या मराठी तरुणांचा उपक्रम
http://marathiyp.com/
http://epaper.esakal.com/esakal/20100228/5130149175416486638.htm
मराठी अस्मितेच्या मुद्द्यामुळे सध्या मराठी भाषकांचा कलही मराठी व्यावसायिक शोधण्याकडे आहे; परंतु मराठी व्यावसायिकांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. परिणामी इच्छा नसतानाही अमराठी व्यावसायिकांकडून काम करून घ्यावे लागते. अनेकांची ही गरज लक्षात घेऊन डोंबिवलीतील तीन तरुणांनी एकत्र येऊन "www.marathiyp.com' या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. देशातील उद्योजकांबरोबरच देशाबाहेरील मराठी उद्योजकांची सूची या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून 25 हजारांपेक्षा जास्त मराठी व्यावसायिकांनी या बेवसाईटची पाहणी करत या संकेतस्थळावर नावनोंदणी करण्याची इच्छा व्यक्‍त केली आहे. या संकेतस्थळाची अधिकृत घोषणा शनिवारी (ता. 27) "राज्यभाषा दिना'चे औचित्य साधून करण्यात आली.

http://72.78.249.124/esakal/20100305/5721157573231877658.htm
किर्लोस्करवाडी - औद्योगिक क्रांतीचे पर्व सुरू करणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त येत्या 10 मार्चला किर्लोस्करवाडीत साजऱ्या होणाऱ्या शताब्दी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त किर्लोस्कर ब्रदर्स लि. ने गेले वर्षभर अनेक उपक्रम राबविले असून गेले काही महिने युद्ध पातळीवर कार्यक्रमाची तयारी सुरू आहे.

यानिमित्त आपण काही करावे का? अन कसे?

या उपक्रमात बाकीच्यांना सहभागी होता येईल का? शक्य असेल तर कंपनीला भेट देणे अथवा त्यांच्या या उपक्रमाची माहिती आपल्या माहितीतील लोकांना कळवणे शक्य आहे.

किर्लोस्कर उद्योग समूहास यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत हे गौरवास्पद व अभिमानास्पद आहे. किर्लोस्कर उद्योग समूहास त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

http://72.78.249.107/esakal/20100311/5468607433397844915.htm

पुणे - दुबईत एप्रिलमध्ये होणाऱ्या पहिल्या आखाती मराठी उद्योजक परिषदेत (महाबिझ) सुमारे अडीचशे उद्योजक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. 23 आणि 24 एप्रिलला ही परिषद होत आहे. गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने (जीएमबीएफ) या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

चंपक.. अतिशय छान उपक्रम.. इथे नुसत्या ट्वाळ्या करुन नंतर पश्चाताप करण्यापेक्षा असे 'उद्योग' केलेले केव्हाही चांगले.. नाही म्हणायला याच्या आधीही इथे असे धागे सुरु झाले होते.. पण एव्हढा जोर पकडला नव्हता..

मेडिकल शॉप, फोटो स्टु्डीयो, हॉटेल, किंवा तत्सम दुकानदारीत साधारण किती उलाढाल आणि किती नफा मिळतो यावर एखादा रिपोर्ट उपलब्ध आहे का?

स्व:ताचा व्यवसाय सुरु करण्याआधी फ्रंचायझीचा मार्ग धरण्याचा विचार करत होतो. franchiseindia.com साईट पाहिली.. पण नक्की काय करावे हा एक प्रश्नच आहे..

'मला उद्योजक व्हायचंय'वर महाराष्ट्र चेंबरतर्फे शनिवारी परिसंवाद

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5709611.cms

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या महिला उद्योजक समितीतफेर् 'मला उद्योजक व्हायचंय' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता, फोर्टमधील १२ के. दुभाष मार्ग, ओरिकॉन हाऊस, सहावा मजला, बाबासाहेब डहाणूकर सभागृहात हा परिसंवाद होणार आहे.

http://www.esakal.com/esakal/20100516/5601012435419888855.htm

दुबईमधील आईस्क्रीम बनविण्याचे कौशल्य आत्मसात केलेल्या सतीशने जलंबसारख्या छोट्याशा गावात कुल्फीचा कारखाना सुरू केला. त्यासाठी आवश्‍यक यंत्र सामुग्री त्याने जुळविली. त्याच्या कारखान्यात कुल्फी तयार करण्यासाठी गावातून दूध खरेदी करण्यात येते. दररोज तयार होणारी कुल्फी विक्रीचा प्रश्‍न गावातील सुशिक्षित बेरोजगार विनोद जगन्नाथ चोपडे या युवकाने सोडविला. त्याच्याकडे असलेल्या मालवाहू ऑटो रिक्षात फ्रिजर ठेवण्यात आले. त्यामध्ये कुल्फी ठेवून मोबाईल विक्री केंद्र सुरू झाले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रिक्षावर हिंदी मराठी गाजलेली गिते वाजविली जाऊ लागली. खामगाव- शेगाव शहरात गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला उभे राहून कुल्फीची विक्री केली जाते.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6013248.cms
युवा व नव उद्योजकांसाठी परिषद

महाराष्ट्र औद्योगिक आणि आथिर्क विकास असोसिएशन व इंडियन यंग आंतरप्रिनअर्स फोरम यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने युवा व नव उद्योजकांच्या विकासासाठी १७ जून २०१० रोजी परिषदेचे आयोजन केले आहे. सांताक्रुझ येथील हॉटेल ग्रँड हयात येथे ही परिषद होणार आहे.

सदर परिषदेत उद्योग, व्यापार व निर्यातीच्या संधी, नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, संयुक्त उद्योग व्यवसाय, बिझनेस प्लॅन इत्यादीविषयी माहिती देण्यात येणार आहे.

कार्यक्रमास मुख्यमंत्री अशोक चव्हाण, योजना आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद जाधव, कायनेटिक मोटार कंपनीजचे संचालक सुलज्जा फिरोदिया-मोटवानी प्रभृती उपस्थित राहणार आहेत, असे असोसिएशनने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अधिक माहितीसाठी फोन (०२२) ६१५०९८००, फॅक्स (०२२) २८७४३५४३.

दोन दिवसा पुर्वी एका प्रतिथयश कंपनीचे पाणी शुध्द करण्याचे यंत्र ( फिल्टर ) घेतला. यातला मुख्य भाग ब्रोमाईड ने चार्ज असलेला चार्जर किवा फिल्टर जो पाण्यातील जंतु मारतो. त्याच्या आधीचे वेगवेगळ्या जाळ्या फक्त पाण्यातील नको असलेल्या गोष्टी काढुन टाकणार्‍या. हा ब्रोमाईड फिल्टर व कार्बन फिल्टर दर वर्षाला बदलावा लागणार ज्याची किंमत रुपये ४०० फक्त. बाकीचे कंटेनर इ. किंमत रु. २९९०/- आज जगात अनेक कुटुंबे आहेत जे स्वच्छ पाण्याकरीता वर्षाला येव्हडे पैसेही मोजु शकत नाहीत. त्यांच्यासाठी कोणी स्वस्त फिल्टर बनवेल का ?

Pl. contact nearest SISI (Small Industries Service Instt.)run by Govt.Of India.
to find out cash and other support extended by them.
visit Nitin Potdar's blog.
all the best

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6741416.cms

गेली सहा दशके ' महाराष्ट्राची चव ' जगभर पोहोचवणा-या चितळे बंधू मिठाईचे मालक राजाभाऊ ( नरसिंह भास्कर) चितळे यांचे बुधवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

राजाभाऊंच्या वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता. भरपूर कष्ट करूनही त्यांना नशिबाची साथ मिळाली नव्हती. वडिलांची ही मेहनत त्यांनी पाहिली होती. त्यातूनच पैसा कमावण्याचं आणि तो काटकसरीनं वापरण्याचं तंत्र त्यांनी अवगत केलं.

प्रचंड आत्मविश्वास , काटकसर आणि मिळविलेल्या पैशाचा योग्य वापर या तीन तत्त्वांचं आयुष्यभर पालन करणा-या राजाभाऊंनी ख-या अर्थाने महाराष्ट्राची चव जगभर नेली. चितळेंची बाकरवडी हा तर ग्लोबल ब्रँड म्हणून ओळखला जातो. केवळ उत्तम निर्मिती करून भागणार नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी वेगळे पॅकेजिंग हवे आणि वेगळे वितरण हवे हेही राजाभाऊंनी जाणले. त्यासाठी त्यांनी चितळे उत्पादने महाराष्ट्रभर मिळतील अशी यंत्रणा उभारली होती. मराठी माणसाला धंदा करता येत नाही, हे विधान राजाभाऊंनी साफ खोटे ठरवले. त्यांनी उद्योगक्षेत्रात घेतलेली भरारी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

Pages