Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिनोती धन्यवाद लिन्क
मिनोती धन्यवाद लिन्क दिल्याबद्दल..! करुन बघेन मी.
फक्त दोन प्रश्ण आहेत
वाटाणे कमीत्-कमी किती तास भिजवावे लागतात?
आणि कुकर मधेच शिजतात का कुकर शिवाय पण पटकन शिजतात?
त्या लिन्कवर ही माहिती आहे - पण काळ्या चण्याबद्दल आहे.
मा.बो वर रेसिपी "गुगल सर्च" ने मिळाली नाही.
चिकन सॉसेज वापरून काय काय
चिकन सॉसेज वापरून काय काय करता येइल?
इथे खायची पाककृती दिसतेय. मला
इथे खायची पाककृती दिसतेय. मला वाटलं की त्या 'पाक'वर काही ठोस कृती करण्याविषयी आखणी चालली की काय?. कारण असे धाडसी रेसिपी बनविण्याची ताकद फक्त महिलांमध्येच असु शकते. इंदिरा गांधीनी एक सनसनीत फोडणी देऊन त्या पाकला सुतासारखं सरळ केलं होतं.त्या गेल्या, पुरुषांचं राज्य आलं नी पाक मुजोर झाला.
सांगाना एखादी जालीम 'पाक'कृती.
एकदा माफी असावी.पुन्हा इथे नाही येणार..
धन्यवाद जागू, शर्मिला आणि
धन्यवाद जागू, शर्मिला आणि मिनोती.
आजच बनवायची आहे. तत्पर उत्तराबद्दल धन्स.
माझ्याकडे चिक्कीचा गूळ
माझ्याकडे चिक्कीचा गूळ आहे.कडक ,खुसखुशीत तिळाची वडी कशी करायची?
नवल कोल दोन भाग करून
नवल कोल दोन भाग करून खोबर्यासारखे खोवावे.त्याच्या पाण्यात मुगाची डाळ भिजवत ठेवावीं.मिरची फोडणीला घालून डाळ , नवलकोल , ओले खोबरे घालून वाफेवर शिजवावी.मस्त होते. माझ्या सासुबाईन्ची स्पेशालिटी आहे ही भाजी.
नवल कोल म्हणजे काय?
नवल कोल म्हणजे काय?
मोतीचुर्च्या लाडु कुती हवी
मोतीचुर्च्या लाडु कुती हवी आहे ?
चिकन सॉसेज नुसते ग्रिल करुन
चिकन सॉसेज नुसते ग्रिल करुन किंवा तव्यावर परतून त्याचे तुकडे करायचे. भरपूर लिंबाचा रस, थोडा चाट मसाला, थोडी कोथिंबीर शिंपडायची वरून अन एकेके टूथ पिक लाऊन अपेटायझर म्हणून हाणायचे!
नाहीतर उभा चिरलेला कांदा, फुग्या मिरच्यांच्या स्ट्रिप्स या बरोबर परतायचे अन पेने किंवा मोठ्या शेल पास्ता बरोबर मिक्स करायचे.
चिकन सॉसेजचं भरपूर काही करता
चिकन सॉसेजचं भरपूर काही करता येतं.
*केसिंग काढून कुस्करून लजानियात
*चक्क नानमधे सॉसेजचे बारिक तुकडे, बाजारातलं आयतं मेक्सिकन चीज ब्लेंड आणि परतलेल्या कांदा-सिमलामिरचीसारख्या भाज्या वापरून केसडीया(?). तव्यावर जरासं बटर घालून छान शेकून घ्यायचं चीज वितळेपर्यंत.
*फ्राइडराइस
*पास्त्यात
*अंड्याच्या भुर्जीत
छान मिळाल्या आयडिया...करून
छान मिळाल्या आयडिया...करून बघते...
रमा हलव्याची रेसिपी टाकली
रमा हलव्याची रेसिपी टाकली आहे.
'जागु, इथे रेसिप्या लिहु
'जागु, इथे रेसिप्या लिहु नयेत' अस सांगत मिलिंदा येइलच इथे
असो, कुणाला मनुने रव्याच्या केकची रेसिपी कुठे टाकलिये माहित्ये का?? मला मिळत नहिये..
रीकोटा चीझ पासुन काय गोड
रीकोटा चीझ पासुन काय गोड बनविता येइल
रिकोटा चीझची रसमलईची कृती आहे
रिकोटा चीझची रसमलईची कृती आहे मायबोलीवर.
सिंडे, माझ्या प्रश्णाच उत्तर
सिंडे, माझ्या प्रश्णाच उत्तर कधी देणार?? मी चॉकोलेट केक केल्यावर
मनुच्या पाऊलखुणा शोध
मनुच्या पाऊलखुणा शोध
तुला विचारल हेच खर तर माझ
तुला विचारल हेच खर तर माझ चुकल
जागु खुप खुप धन्यवाद.
जागु खुप खुप धन्यवाद.
नमस्कार जागू, कृपया या
नमस्कार जागू,
कृपया या पानाच्या मथळ्यावरील सूचना वाचा :
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
कृपया तुमची कृती योग्य जागी टाकणार का?
धन्यवाद.
पालक डाळ ची कोणी कृती सांगाल
पालक डाळ ची कोणी कृती सांगाल काय? सर्च करुन रीतशीर कृती नाही मिळाली....... लिंक दीली तरी चालेल.................
'मोझ्झेरेला' चिझ वापरुन
'मोझ्झेरेला' चिझ वापरुन करायचे sandwitch आणि पिझ्झाशिवाय अजुन काही पदार्थ सुचवा.
प्राजक्ता मोझारेल्ला चीझच्या
प्राजक्ता
मोझारेल्ला चीझच्या आणि टोमॅटोच्या चकत्या सॅलड म्हणून एकत्र खायलापण खूप छान लगतात.
पालक डाळ इथे आहे -
पालक डाळ इथे आहे - http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/07/blog-post.html
रुनी धन्यवाद! अग कॉस्ट्को तला
रुनी धन्यवाद! अग कॉस्ट्को तला ब्लॉक आहे चिझचा ,तेव्हा सॅलड करेल पण, अजुन क्रुती (लहान मुलांना आवडतिल अशा) मिळाल्या तर चालतिल तेव्हा सुचवा अजुन..
कोल्ड कट सँडविचेस गूगल कर.
कोल्ड कट सँडविचेस गूगल कर.
बटाटे उकडा,त्यामधे किसलेले
बटाटे उकडा,त्यामधे किसलेले चीज्,अगदि थोडे दूध्,मीठ आणि मिरपूड मिसळा,आणि ओव्हन मधे बेक करा.लहान मुलांसाठी छान आहे.
Sandwich मध्ये घालण्याकरता
Sandwich मध्ये घालण्याकरता alfalfa sprouts आणले होते आणि दोनदा सँडविचेस खाऊन झाले तरी संपतच नाहीयेत. खोकं एवढसं दिसलं तरी किती कोंबून भरलेले असतात त्यात! त्याचं दुसरं काही करता येईल का? भारतीय स्टाईलने कोशिंबीर वगैरे? किंवा आणखी काही?
अल्फा अल्फा स्प्रॉट्स ज्यास्त
अल्फा अल्फा स्प्रॉट्स ज्यास्त दिवस ठेवू नये(फ्रीजमध्ये सुद्धा). एक बुरशी येवू शकते(cold resistant mold). ज्यास्तीत ज्यास्त २-३ दिवसात संपवावे.
सरळ पराठेत,डाळीत, सॅलड मध्ये घालून संपवायचे. बारीक चिरून दह्यात घाल +जीरा पूड मस्त लागेल.
यीस्ट घालुन इडलि कशी करायची
यीस्ट घालुन इडलि कशी करायची कोणी सांगु शकेल का? इडलि रवा आणि डाळ वाटली आहे.लगेच आंबण्यासाठी अजुन काय करता येइल?खूप थंडि मुळे अजिबात ferment झाले नहिये.plz मदत करा.
Pages