पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यीस्ट घातली तरी १ ते २ तास थांबावे लागेल. भांडे उबदार जागी ठेवावे लागेल. (गरम करुन बंद केलेल्या अवनमधे ) त्यात थोडे नारळाचे पाणी व वाटलेले खोबरे घातले, वर केळीचे पान झाकले तर लवकर आंबेल. पण थोडा वेळ लागणारच.

नमस्कार..
स्नेहाने जी मागच्या पानावर लहान मुलांसाठी बटाट्याची कॄती सांगितली आहे ना ती जर ओव्हन नसेल तर कशी करायची.

जुयी, मी ओव्हन शिवाय केली नाही, पण मला वाटते की सगळे मिसळून जाड बुडाच्या भांड्यात घालून मंदाग्नीवर ठेवावे.चीज वितळून थोडा ब्राउन रंग येइपर्यंत..

'मोझ्झेरेला' चिझ वापरुन करायचे sandwitch आणि पिझ्झाशिवाय अजुन काही पदार्थ सुचवा.
>>>>>>>>
पहिली गोष्ट म्हणजे कॉस्टको तला ब्लॉक असेल तर इतका पटकन तो संपणार नाही. Happy
चीज अगदी व्यवस्थीत फ्रीज होत. त्यामुळ छोटे क्युब करुन फ्रिज केलेल चांगल.
पदार्थ:
चीज स्टिक्स
चीज पराठा
वेगवेगळ्या प्रकारचे पास्ते. बेक्ड पास्ता. Lasanga
चीज स्प्रिन्ग डोसा
बेक्ड पोटॅटोज
चीज बॉल्स. हे कबाब सारखे इतर भाज्यांबरोबर लावुन खुप मस्त लागतात.
अगदी छोटे इंग्लिश मफीन पिझ्झा
चीज ऑम्लेट
Quiches
अजुन भरपुर पदार्थ करता येतात. आठवल कि लिहिते.

इथे एकदा दीपूर्झाने कुरडयाचा उपमा अशी पाककृती लिहीली होती. त्याच्यासारखाच करत असावेत, ती पाककृती शोधून बघा.

मिनोतीने सांजा लिहीलाय दलियाचा. सांज्याच्या पोळ्यासाठी तो सांजा वापरता येईल. मी उपमा करते, आपल्या नेहमीच्या उपम्या सारखाच फक्त रव्या ऐवजी दलिया वापरायचा.

मीरा, बॉम्बिनो शेवया असतिल तर नुडल्स शिजऊन घेतो तश्या शिजऊन घ्यायच्या, घरच्या असतिल तर नाही घ्याव्या लागत. फोडणीला जिरे, मोहोरी, उडीद दाळ, कडिपत्ता, मिरची घालुन कांदा, हव्या त्या भाज्या (गाजर, मटार, बिन्स, फ्लॉवर) परतुन घ्यायच्या, मिठ, हळद घालायचं, मग शेवया घालुन परतायचं. घरच्या असल्यास पाणी घालुन शिजवायचं. वरतुन लिंबु पिळुन खायचा.

दलिया उपमा, रव्यासारखाच करायचा.

बॉम्बिनो शेवया
>>
खास उपम्यासाठीच्या शेवया...
मस्त होतो याचा उपमा...

शेवयाचा उपमा मी रव्याच्या उपम्यासारखाच करते. शेवया तुपात भाजुन घ्यायच्या आधी. प्रीति सांगते आहे तसं डायरेक्ट फोडणीत घालुन परतुन घेतल्या तरी चांगला होतो.

दलियाची खिचडी आणि सांज्याची कृती आहे इथे नव्या मायबोलीत. दलियाचा उपमा पण रव्याच्या उपम्यासारखा करायचा. अडीच पट पाणी पुरते शिजायला.

मला कोणी घरी लहानमुलांसाठी पोष्टिक असे चॉकलेट्स कसे बनवावे ते सांगाल का?
घरी त्याच्यासाठी खास काळे खजूर आणले आहेत, पण तो ते खायायला मागतच नाही, काय करु?
एकदा.. मी सगळे ड्राय फ्रूट्चे भरड कुट करून काळ्या खजुरमध्ये मिक्स करून चॉकलेटसारखे गोळे केलेले , पण त्याने एकच खाल्ला, चव कळल्याबरोबर बंद.. मग मीच खाऊन संपवले..

इथे मलइ बर्फी ची क्रुती आहे. त्यात वेलदोडे/ काजू बदाम ऐवजी पाव चमचा व्हेनिला इसेन्स व अर्धी वाटी
हर्शे चॉकोलेट पावडर घातली तर मस्त वडी होते चॉकोलेट् फ्लेवर ची. वरून एक एक काजू बदाम लावता येइल.

प्रिती, बम्बीनो अहे माझ्याकडे, करुन बघते, धन्स. छान वाट्ते रेसिपी.
अमॄता , दलीयाचि खिचडी मी करुन बघीतली, छान होते. नेहमीपेक्शा वेगली.

मागे एकदा दिनेशनी गोडी बटाटयाच्या रश्याची क्रुती दिली होती , बरीच शोधली तरी मिळत नाहीये . मदत करा प्लिज Happy

सीमा,
चीज स्टिक्
चीज बॉल्स. हे कबाब सारखे इतर भाज्यांबरोबर लावुन खुप मस्त लागतात.
अगदी छोटे इंग्लिश मफीन पिझ्झा
कसे करायचे?

चिकन बर्गर इडियन स्पाईस वापरुन कसा करायाचा? एग घालतात का? एगने खुप पातळ झाला खिमा . प्लीज रेसिपी महित असेल तर , वदन कवली वर पन शोधले ....
धन्स.

चिकन बर्गर इडियन स्पाईस वापरुन कसा करायाचा? एग घालतात का? एगने खुप पातळ झाला खिमा . प्लीज रेसिपी महित असेल तर , वदन कवली वर पन शोधले ....
धन्स.

Pages